राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

बाहूबली हॉस्टेलचे दिवस – भाग १

प्रस्तावना

माझे एक वर्षाचे शिक्षण बाहुबली विद्यापीठ, बाहुबली, कुंभोज (जि. कोल्हापुर) येथे झालं त्याच्या काही आठवणी येथे देत आहे त्याला कारण गुगल ने मला अचानकच आमच्या विद्यापीठाचे संकेतस्थळ समोर आणून दिले, शोधत दुसरंच काही होतो.. !


हे शाळेचे ब्रिद वाक्य

हे गुरुकुल म्हणजेच आमचं हॉस्टेल व त्यावेळची जेल 😉


हे मंदीर… चांगले उंच जागी आहे !


हेच ते ग्राउंड जेथे आम्ही रोज चकरा मारल्या … चुका केल्यामुळे 😉


घरच्या एका पत्रासाठी डोळे लावून आम्ही वाट पाहत असू.. शाळेच्या गेट समोरच असलेले पोस्ट ऑफिस 😦


हे बाहुबलि स्वामी ह्यांच्याच आशिर्वादाने मी पंधरा वेळा यशस्वी पणे हॉस्टेल मधून पळून गेलो (नंतर परत पकडून आणला व धुतला ही गोष्ट वेगळी )

सर्व फोटो ह्या संकेतस्थळाद्वारे भेटले – http://www.bahubali-vidyapeeth.org
अजून काही चित्रे शोधत आहे भेटतील तस तशी मी येथे प्रकाशीत करत राहीन.

******************************************************************

कोल्हापुरातील शालेय प्रगती पाहून आई-वडीलांनी मला बाहुबली हॉस्टेल मध्ये ठेवणे नक्की केले, नुतन मराठी विद्यालय मधून माझा दाखला काढला गेला व सरळ मे मध्येच मला घेऊन आई-वडील बाहुबलीला आले व दोन तासाच्या आतच सर्व कार्य संपुर्ण करुन मला हॉस्टेल मधील हॉल मध्ये (एका हॉल मध्ये ५० एक मुले राहत होती) सोडण्यासाठी आले, मला माझी लोखंडाची पेटी व त्यावर माझे नाव व पत्ता, बेसनचे लाडू व थोडा चिवडा हे सर्व हाती देऊन बाबा बाहेर गेले व हॉस्टेल मधील पुर्ण इतिहासामध्ये कोणी रडून दंगा केला नसेल इतका दंगा मी केला.. आईला जाऊच दिले नाही अर्धा तास, थोड्या वेळाने गुरुजी आले .. पाढंरा कुर्ता.. पांढरे धोतर… व डोक्यावर विरळ केस.. सडसडीत शरीर .. वण गोरा… व डाव्या हातात वेताची काठी !

पुढील पाच मिनिटामध्येच आई-बाबा हॉस्टेल मधून बाहेर जाऊ शकले एकदम आरामात व मी मुसमुसत अंगावर पडलेले वळावरुन हात फिरवत तेथेच बसून राहीलो .. डोळ्यात पाणी जमा करुन ! संध्याकाळची वेळ झाली थोड्या वेळाने माझ्या आजू बाजूची मुलं आपापली ताट-वाट्या – तांब्या घेऊन निघाली … मला काही कळाले नाही मी एकाला विचारले””कुठ निघालात ?” तो खेसकला, “जेवणार नाहीस की काय ? चल जेवायला” ” मी म्हणालो ” इतक्या लवकर ? ” तो हसत म्हणाला ” येथे नियम चालतात.. आपल्या सवयी नाही, मी पण नवीनच आहे… पाच दिवस झाले मला येथे येऊन… माझं नाव निल, चल जेवण घेऊन मग बोलु”

क्रमशः

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: