राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

फाइनांशियल क्राइसिस 2008

जानेवारी ११,२००८
रिस्की लोन मध्ये पैसा बुडाल्यामुळे बँक ऑफ अमेरीका ने कन्ट्रीवाइड फायनान्सियल ला ४ बिलियन डॉलरची मदत दिली.

जानेवारी २०,२००८
यूबीएस ने अडकलेल्या कर्जाची किंमत ४ बिलियन डॉलर ने कमी केली व अश्याच पध्दतीने सबप्राईम कर्जा संबधी राईटडाउन्स वाढून १८.४ बिलियन डॉलर च्यावर वर गेले.

फेब्रुवारी १७,२००८
ब्रिटन ची बँक नॉर्दर्न रॉक पैशाची कमरतता भासू लागली म्हणून सरकार ने सरकारी केले.

मार्च १७,२००८
बेयर स्टर्न्स ला अमेरीकन इनवेस्टमेंट बँक जेमी मोर्गन चेज ने विकत घेतले प्रति शेयर २ डॉलर रेट ने !

जुलै १३,२००८
अमेरीकेतील रियल ईस्टेट मार्केटला वाचवण्यासाठी युएस फेडरल रिजर्व ने फेनी व फ्रेडी मेक ह्यांचे जवळ जवळ सर्व कार्य आपल्या हाती घेतले.

सप्टेंबर १५,२००८
९/११ ला झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेन मार्केट मधी ७ वर्षातील सर्वात काळा दिवस . लीमैन ब्रदर्स दिवाळेखोर झाली व मैरिल लिन्च ला सरकारने मदतीने वाचवले व जगातील सर्वात मोठी इन्स्युरन्स कंपनी एआयजी अडचणीत सापडली.

सप्टेंबर १६,२००८
सरकारी बँकानी आर्थिक मंदी व क्राइसिस पासून वाचवण्यासाठी अरबों रुपये मार्केट मध्ये आणले, एआयजीचा शेयर ५०% डाऊन झाला तेव्हा अमेरिकन सरकारने एआयजीला ८५ बिलियन डॉलर ची मदत दिली व बार्कलेज बँकने लीमैन १.७५ बिलियन मध्ये विकत घेतले.

सप्टेंबर १७,२००८
गोल्डमैन सैक्स व मोर्गन स्टेन्ली चे शेयर खुप खाली आले व ब्रिटन ची लीयड टीएसबी ने राइवल एचबीओएस ला विकत घेतले व युएस सिक्योरिटीज & एक्सजेंज कमिशन ने शॉर्ट सेलिंग वर बंदी आणली. (ह्यामुळे भारतीय मार्केट संभाळले गेले नाहीतर त्याच आठवड्यात आपण ११००० च्या पण खाली गेलो असतो)

सप्टेंबर १९,२०,२१ २००८
अमेरिका सरकारने ७०० बिलियन पैसे ओतून मंदीच्या मारामध्ये सापडलेल्या कंपन्या विकत घेण्याची तयारी दर्शवली व त्यामुळे जगभरातील मार्केट मध्ये तेजी आली

सप्टेंबर २५, २००८
अमेरीकेचा सर्व मोठा बँक वॉशिंगटन म्युच्युअल बरबाद झाला व त्याची संपत्ती जेपी मोर्गन चेज ने १.९ बिलियन डॉलरला विकत घेतली.

माहीती स्त्रोत्र : इकानॉकिक्स टाइम

ह्यामुळे काय झालं ?

ह्यामुळे भारतीय शेयर बजार जो २१००० पॉइंन्ट होता जानेवारी मध्ये तो आज १३२०० वर आला आहे, मोठ मोठे शेयर आपल्या नेहमीच्या भावापेक्षा १५०-२०० रु खाली आले आहेत, आयसीआयसीआय बँक मागील दोन आठवड्यामध्ये ७३९ वरुन सरळ ५३२ पर्यंत गेला… मोठ मोठ्या बँका आपल्या कर्मचारी वर्गाना नोकरीवरुन कमी करत आहेत आजच एचएसबीसी व एचपीने आपले हजारो कर्मचारी नोकरीवरुन कमी केले ! लीमैन ब्रदर्स ब्रदर्समुळे भारतातील २५००० लोकांच्या नोकर्या गेल्या व तीतक्याच लोकांच्या नोक-या धोक्यात आहेत.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: