राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

अव्यक्त क्षण

****
परवा चूकन तुझ्या लग्नाचे फोटो फ्लिकर वर भेटले.. खुपच छान दिसत होतीस लग्नाच्या दिवशी… कुठेच अपसेट दिसली नाहिस हे पाहू खुप बरं वाटलं , हा त्या दिवशी माझा वाढदिवस होता शक्यतो तु विसरलीस… कित्येक वर्ष तु मला न चुकता शुभेच्छा देत होतीस न चुकता… .. पण त्या दिवशी तु विसरली… मी खुप वेळ वाट पाहीली होती तुझ्या फोनची.. पण तो फोन काही वाजलाच नाही.. असेच दिवस दिवस काढले पण तुझा फोन आला नाही.. एक दिवस दुसराच कोणी सांगून गेला की तुझं लग्न झालं म्हणून.. मी इतका वाईट ही नव्हतो गं.. तु मला स्वतःच सांगितले नाहीस.. लग्नाच्या दोन दिवस आधी तु माझ्याशी तास भर गप्पा मारल्यास… त्यावेळी तर सागायचे .. पण तुझं मन मला कधीच कळालंच नाही.. !

तुला आठवतो तो गज्या.. तु त्याला गजकर्ण म्हणायचीस.. फक्त तुला चिढवतो म्हणून मी त्याच्या अंगावर धावून गेलो होतो… व त्याने माझा हात मोडला होता.. त्या दिवशी पण तु अशीच .. काना डोळा करुन निघून गेली होतीस … सर्वाच्या समोर… पण संध्याकाळी हॉस्पीटल मध्ये आली होतीस भेटायला….. जेव्हा त्या व्यक्तीने तुझ्या लग्नाची बातमी दिली .. तेव्हा कोठे तरी वाटलं होतं.. की दोन-एक दिवसामध्ये.. फोन करुन.. बोलली तर असतीस माझ्याशी.. पण तो फोन आलाच नाही कधी !

तुला आवडतो म्हणून निळा रंग वापरायचो… तुला आवडतो म्हणून पिच्चर पाहायचो.. फक्त तुला आवडते म्हनून मला कधीच नआवडलेली शेपुची भाजी आवडीने खायचो… पण तुला माझी आवड कधी कळलीच नाही… तु आपल्याच दुनिये मस्त राहीलीस… आपले रस्ते कधी वेगळे झाले हे तुलाच काय मला देखील कधी समजलेच नाही.. तुझ्यासाठी तुझ्या घरासमोरुन मारल्या जाणा-या चकरा कधी कमी झाल्या… कळत न कळत कधी बंद झाल्या हे तुला कळालेच नाही… दिवसातुन दहादा येणारा माझा फोन कधी येणं बंद झाला तुला कळालेच नाही…!! हा पण मी तुला कळत न कळत नाव न लिहता पाठवलेली तुझ्या वाढदिवसाचे कार्ड तु माझंच आहे हे समजून जपुन ठेवली आहेस हे काल परवाच कळाले .. त्या वेळी कळत न कळत डोळ्यातून कधी पाणी गालापर्यंत आलं कळालंच नाही… खरं सांगू मला तु कधी समजलीच नाहीस ! तुझ्या मनात असलेली माझ्या बद्दलची भावना मला कधीच उमजली नाही… तुला माहीत होतं की मी वेडा आपले विचार कधी व्यवस्थीत व्यक्त करु शकणारच नाही तरी देखील तु एकदा ही विचारलं नाहीस !

गरब्याच्या रात्री.. तुझ्या कळत न कळत मी तुझ्या पाठीशीच असायचो ! तु कधी ह्या गरब्यातून त्या गरब्यात जात असे व.. मग रात्री दोन-अडीच त्या दरम्यान घरी एकटं कसं जायचं ह्या काळजीत घुटमळत उभी राहत असे तू … तोच मी तुझ्या समोर येऊन… तुला घरापर्यंत सोबत करायचो… आज देखील आठवलं की हसू येतं स्वतः वरच ! पण मी बरोबर येत आहे हे कळताच तुझ्या चेह-यावर दिसणारा आनंद कधी डोळ्यासमोरुन गेलाच नाही ! छोट्या छोट्या गोष्टी मध्ये देखील तुला आनंद मिळायचा व तुझ्या चेह-यावर एक वेगळच हसू दिसायचं … ! तुला आठवत असेल तु एकदा नापास झाली होतीस कुठल्याश्या तरी परिक्षेत… व तु रडून रडून डोळे लाल करुन बसली होतीस.. राम मंदिराच्या मागच्या बागेत…. त्यावेळी देखील तुला आधार देण्यासाठी मीच आलो होतो.. तुला कधी झोप लागली व तु माझ्या खांद्यावर विसावलीस हे तुला लक्षात देखील नसेल.. पण तुझे गालावर सुकलेले अश्रु पाहू माझे पाणावलेले डोळे.. तुला कधी उमजलेच नसतील !

मी जेव्हा जेव्हा माझं प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा… तु काही ना काही कारण सागून तेथून निघून जात असे… पण जेव्हा तु स्वतः आपलं प्रेम व्यक्त केलं होतस तेव्हा तु विसरली होतीस… की मी तुझ्या पासून किती दुरावलो होतो…. ! तरी ही … सर्व चुका माफ करुन मीच पुन्हा तुझ्या जिवनात आलो होतो… पण जसं जसे… तुझे सर्कल वाढत गेले तसं तसे मी तुझ्या सर्कल मधून पुन्हा बाहेर पडत गेलो… ! आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तु मला न बोलवता त्याला बोलवलंस तेव्हाच खरं तर ह्या कहानीचा अंत होणे गरजेचे होते पण मी वेडा… तुला पुन्हा पुन्हा माफ करत राहीलो .. व तु कधी पुन्हा येशील माझ्या कडे ही आशा करत बसलो !

****
खुप वर्षी झाली होती आपल्या अनाम नात्याला… शक्यतो तु मला विसरली देखील असशील पण मी अधीमधी तुझी माहीती शोधण्याचा नेहमीच प्रयत्न करत होतो… कधी काळी एकदोन चकरा देखील तुझ्या घरासमोरुन मारल्या.. एकदा तु दिसलीस ही.. मोठी वेणी बांधलेली मागे… गुजराती पध्दतीची ती सिल्कसाडी… गळ्यात मंगळसुत्र… कानातील सोन्याच्या रिंगा… हात देवपुजेचे साहित्य … ह्म्म बरोबर एक लहान छकुलासा गोंडस मुलगा… असेल ३-४ वर्षाचा… तु आंबाबाईच्या मंदिरामध्ये.. आली होतीस… तु जेथे उभी होतीस त्याचा बरोबर मागे दगडी खांबाच्या मागेच मी उभा होता… तु एकदा पदर सावरायला मागे वळली होतीस… एक क्षण शक्यतो नजरेला नजर मिळाली असे वाटताच मी तेथून बाहेर पडलो… व बाजूच्या छोटेखानी मंदिरामध्ये घुसलो.. ! थोड्या वेळाने बाहेर आलो तोच तु भिरभिरत्या नजरेने कोणाला तरी शोधताना दिसलीस.. मला वाटलं मलाच शोधत आहेस.. तोच एक इसम तुझ्या जवळ आला व तुझा शोध संपला! ह्म्म तो तुझा नवरा होता.. शक्यतो तुम्ही देवी दर्शनालाच आला होता… !

काही दिवसापुर्वीच तुझी मैत्रीण भेटली होती नेट वर चॅटींग मध्ये.. बोलता बोलता ओळख झाली व जुन्या आठ्वणी पुन्हा हिरव्या झाल्या… ! तीच म्हणाली होती.. की तुला मला एकदा भेटायचं आहे… ! खरंच मी हरकलो होतो.. एकदम खुष झालो होतो… ! तुला भेटायला मीळेल ह्या विचारानाचे फुलकीत झालो होतो! पण तोच मनाने पुन्हा सावरले मला व विचार केला काय होईल तुला भेटून पुन्हा ? राहू दे .. ज्या जखमांच्यावर खपली चढलीच आहे ती का स्वतःच ओरबडून काढावी ? नकोच तुला भेटणे ! पण पुन्हा पुन्हा विचार डोक्यात येत गेले व मी त्या मैत्रीणीला हो भेटतो म्हणून सांगितले !

तुझ्या भेटण्याच्या विचारानेच अंगावर नेहमी रोमांच उभे राहतात… कधी काळी हरवलेल्या वाटा… पुन्हा सापडतील ह्याची आशा देखील कधी केली नाही मी.. पण तो योग पुन्हा येत आहे.. माहीत नाही तु मला ओळखशील की नाही… म्हातारा जरी दिसत नसलो तरी मध्ये खुप मोठा काळ वाहून गेला आहे… ज्या काळ्या भोर केसांचा मला कधी काळ माज होता ते केस आता थोडे थोडे पांढरे झालेले आहेत… डोळ्यावर चष्मा चढला आहे.. व आज काल फ्रेंच कट दाढी देखील ठेवली आहे.. माहीत नाही तु ओळखशील की नाही… पण तु अजून तशीच दिसत असशील नाही… त्या तुझ्या पुढे पुढे करणा-या केसाच्या लटा.. आज देखिल हलकेच गालाला स्पर्श करत विसावल्या असतील.. तुझे ते टपोरे डोळे आज देखील तुझ्या मनातील सुख / दुखाचे भाव जसेच्या तसे प्रतिबिंबीत करत असतील… आज देखील देखील तु पहाटे पहाटे अंगणात रांगोळीचा सडा घालत असशील व चुकुन कोणी वेगाने गाडी घेऊन घरा समोरुन गेला तर बाहेर येऊन पाहत असशील की मी तर नाही… दिवस दिवस भर फोन वर गप्पा मारणे तुझ्या इतकं मला कधी जमलंच नाही… त्या तुझ्या मित्राच्या गाडीचे.. पैश्याचे… स्टाईलचे तु केलेलं कौतुक मला कधी जिव्हरी लागलं ह्याचा तु विचारच केला नाही व अचानक एक दिवस मी सोडून गेल्या वर मात्र फिर फिर भिंगरी सारखी गावभर मला शोधत फिरली होतीस .. तेच प्रेम .. तोच भाव आज देखील असेल का तुझ्या मनात ? अशी अनेक प्रश्न मनाच्या कोप-यात चरफडत आहेत… बोचत आहेत.. व कोठे ना कोठे मी संपत आहे !

Advertisements

One response to “अव्यक्त क्षण

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: