राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

बाहूबली हॉस्टेलचे दिवस – भाग ६

बाबांनी हात मागे बांधले व उचलून खुंटीला टांगला व म्हणाले ” राजा, बघ हे शेवटंच. सहा महीने राहीले आहेत व्यवस्थीत रहा. पळुन नको येऊ, त्यानंतर तुला पुन्हा कोल्हापुरातील शाळेत घालेन ठीक. तुझ्या नादी आमची मल खुप पळापळ होत आहे..” मी हो म्हणालो तेव्हा मला खाली ठेवला पुन्हा उचलुन.
पुन्हा घरला न जाता सरळ बाबांनी मला हॊस्टेल वर पोहचवला व अण्णाच्या तावडीत दिला अण्णा म्हणाले ” तु मारणार नाही आता बस…”
कसे बसे मी व्यवस्थीत एक महीना काढला व ना कोणी मारलं ना… राग दाखवला… ! पण शिस्ती तर शिस्त होती.. सकाळी अण्णा दुस-या मुलाला उठवायला सागंत असे

दिवाळी सुट्टीला घरी घेऊन आले बाबा ! दिवाळी सुट्टी चांगलीच १५ दिवसाची होती… पुन्हा घरचे वातावरण भेटल्यावर परत हॊस्टेलला जाण्याची काय मनात इच्छा येत नव्हती … पण बाबांचा मार विचारात घेऊन जाण्याची तयारी झाली पण काय झालं आठवत नाही पण कश्यावरुन तरी बीनसलं व मी घरातून निघून पंचगंगेच्या काठी जाऊन बसलो… ! दोन एक तासाने शोधा शोध चालू झाली… आजू बाजूचे काका.. मामा… घरमालंकाची मुल सगळीच मला शोधत फिरु लागली !

मी आपला मस्त मजेत शिवाजी फुल पार करुन… पार आंबेवाडी पर्यंत पोहचलो.. सायकल होतीच. जवळ.. आंबेवाडीतून सरळ… निगवेला आलो… व निगवेपासून ३ चार किलोमिटर वर एक गाव आहे.. तेथे आमच्या बाबांचे मित्रांचे घर होते… त्याच्या घरी मी खुपदा गेलो होतो.. व ते देखील रोज आमच्या घरी येत.. त्यामुळे मला नवीन नव्हते..घर त्यांचे.. !
जोतिबा डोंगराच्या पायथ्यालाच घर त्यांचे… ! मी घरात गेलो… प्रभात काका… घरी नव्हते… ते कोल्हापुरात. त्याची मुलगी मनिषा व काकी होती… गेलो… मस्त पैकी जेवलो व झोपलो…
त्यांनी विचारलंच नाही कसा आलो व का आलो त्यांना वाटले असावे की मी बाबाच्या बरोबर आलो आहे.. व बाबा.. काकांच्या बरोबर शेतात गेले असावेत !

चारच्या दरम्यान उठलो… व मनिषाला घेऊन सरळ जोतिबाच्या डोंगरावर… फिरायला.. मनिषा माझ्या पेक्षा वयाने जरा मोठी.. ! त्यामुळे ती पुढे व मी मागे हा असा प्रवास आम्ही चालू केला.. व चांगले दोन तास.. जंगलाचा मेवा शोधत फिरलो जे मिळाले करवंदे…. बोरं.. खिश्यात जमा करत खात.. संध्याकाळी सहाच्या दरम्यान खाली आलो !

रात्री आठच्या दरम्यान प्रभातकाकांचा घरी फोन आला व काकीला म्हणाले ” राजा अजून घरी आला नाही आहे… पळाला बहूतेक पुन्हा… जरा घरी यायला वेळ होईल..” तेव्हा काकी म्हणाल्या ” अगं बाई, हा लेकाचा तर येथेच आहे… मला वाटलं तुमच्या बरोबर आला आहे..” असं म्हणताच काकांनी फोन ठेवला व अर्धा तासात घरी पोहचले बाबांना घेऊन.
“अप्पा, मारुन काय फायदा नाय… ह्या पाठवूच नकोस पुन्हा हॊस्टेलला… येथेच घाल शाळेत कुठेतरी” इती काका.
बाबांच्या डोळ्यातून राग स्पष्टपणे दिसत होता. पण दुस-याच्या घरी आहे ह्याचे त्यांना भान होते म्हणून अजून मारला नव्हता… काकांनी ते ओळखले होते म्हणून रात्री काय घरी जाऊ दिले नाही व बाबांना जेवण करायला लावून मला झोपवले !

हॊस्टेलची सवय म्हणा अथवा काही ही.. मी चारच्या आसपास उठलो.. उगाच कोणाला त्रास नको म्हणून कोणाला न उठवता मी संडासला जाण्यासाठी हळूच बाहेर आलो…. पाण्याचा डबा शोधता शोधता जरा धडपडलो… तोच काकांना जाग आली व ते जवळ जवळ पळतच बाहेर आले व मला बकोटीला पकडले व म्हणाले ” अरे मर्दा, पळून चालास व्हय ? ” मी म्हणालो ” नाही हो… मी तर…” पण मी अजून काही बोलणार तोच बाबांनी एक कानाखाली वाजवली व मला उचलून बैठकीच्या खोलीत घेऊन आले ह्या सगळ्या गडबडीत घरची सगळीच मंडळी जागी झाली व एक चांगलाच गोंधळ चालू झाला

काकीने मला एका बाजूला ओढले व बाबांना म्हणाली ” असं, पोराला का गुरावानी मारताय !” बाबा म्हणाले ” तुम्ही बाजूला व्हा.. ह्याचा पायच तोडतो पळतो कसा हे बघतो” त्यात मी पुन्हा म्हणालो ” मी पळून….” तोच काका म्हणाले ” अरे पोरां असं कसे करतोस… तु इकडे तीकडे पळतोस .. तुला शोधायला आम्ही पळतो.. जर का कुठ खरंच दुरवर गेलास तर तुला शोधणार कुठे ? ” मला आता राग आला होता…. व संडास देखील जोरात आले होते… मी ओरडलो व म्हणालो ” पळून चाललो नव्हतो… हॊस्टेलच्या सवयी मुळे जरा लवकर उठलो व संडासला चाललो होतो.. लई जोरात आलं आहे.. जाऊ द्या मला” हे एकुन मनिषा फिस्स करुन हसली व ती हसलेले बघून… काका व काकी हसू लागल्या… व मी बाबाना पहिल्यांदा दिलखुलास हसताना पाहीले… ! मी पळतच पडसाकडे गेलो व क्रियाकर्म करुन परत आलो..!

पण झालेल्या प्रकारामुळे… आमच्या घरात एक बैठक बसली व त्यात आईने निक्षुन सांगितले की राजाला हॊस्टेलला पाठवायचं नाही… बाजूचे घाटगेकाका पण मध्येच बोलले..एकुलता एक दिवटा हरवला तर काय करनार ?… शेवटी बाबा म्हणाले.. मी शाळेत विचारतो.. जर साध्य झाले तर घरीच अभ्यास करुन परिक्षा देईल हा.. नाही तर दुसरा उपाय आहे माझ्याकडे !

जसा शाळेचा नियम होता त्या प्रमाणे मला शाळेत येऊनच अभ्यास करावयाचा होता व बाहेरुन परिक्षा हा प्रकार तेथे नव्हता
पुन्हा माझा गणपती उचलून बाहूबली हॊस्टेल मध्ये ठेवण्यात आला…. आईला काळजी लागली होती की हा पुन्हा पळाला व गावला नाही तर काय ?

क्रमश:

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: