राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

दिल्ली ते दिल्ली ! भाग – २

ती माझी वेटर पुन्हा माझ्या जवळच्या जागी येऊन उभी राहीली व माझा ग्लास भरुन दिला….

क्रमशः

पुढे चालू :

मी तिला विचारलं हा पुजा प्रकार रोजच चालतो का ? ति मानेनच हो म्हणाली.. व माझा अर्धा भरलेला ग्लास तीने परत फुल केला. ती काही उत्तर देणार नाही हे लक्ष्यात आले होते… पण मनाची उलाघाल काही कमी झाली नाही मी तर तीला विचारलं…” बार मध्ये अशी पुजा ? जरा विचित्र नाही वाटत> ?” ह्या वेळी ती माझ्या कडे बघून हसली व म्हणाली ” पहली बार ही आए हो क्या ? पुजा तो हर बार में होती होगी, यह भी तो धंदा है… धंदा चालु करणे के पहलें जरा भगवान को याद किया तो क्या हुवा ?” मी ह्म्म्म म्हणालो व पुन्हा एक प्रश्न विचारला ” पण हे देवाला चालतं का ? नाही ज्या हातानी तुम्ही दारु पाजता त्याच हाताने देवाला.. पुजा घालता ? ” ती ने जर विचित्र नजरेनेच पाहीले व तीला माझ्या प्रश्नातील खोच समजली असावी… ती म्हणाली ” उसी ने नसीब में लिखा है, जो लडका है ना… पुजा कर रहा था.. विनोद.. बहुत अच्छा गाता है… आपने अभी सुना ना.. पर कोई उसे फिल्म में गाने का मोका नही देगा.. पता है क्युं … उस के नसीब में बार में ही गाना लिखा है | ” मी मानडोलावली व पुन्हा विचारलं ” तुम यहा क्या काम करते हो ? ” ती उत्तरली व म्हणाली ” सर्विस.” तोच एक जवळ-जवळ ८० वर्षाचा म्हातारा आपल्या हातातील छडी टेकत माझ्या समोरच्या टेबलावर येऊन बसला व ती मला नजरेनेच बघ म्हणाली व त्याच्या जवळ गेली… त्याने काही ऑर्डर दिली.. ती त्याचा पॅग घेऊन आली… त्या म्हाताराच्या खांद्यावर हात ठेऊन ती तेथेच उभी राहीली… म्हातारा तीचा हात हातात घेऊन आपला पॅग पित बसला.. पाच मिनिटामध्येच तो आपले बिल व टिप देऊन लगालगा बाहेर निघून गेला… बिल तीने कॅशियर पाशी जमा केलं व जी आंन्टी होती तीच्या हातात टिप दिली.. आंन्टीने ती १००-१५० ची टिप कॅशियर कडुन सुट्टे करुन घेतले (दहा दहाच्या नोटा) व सर्व लेडीज मध्ये बरोबर वाटले.. व शेवटचे दहा रुपये… साईला वाहिले !

ती परत माझ्या टेबला जवळ आली व म्हणाली “देखा ! यह है पहली कमाई दिन की” मी तिला विचारलं ” अजब आहे सगळं, पण तुला हे आवडतं करायला” ती म्हणाली ” ह्म्म हो, कारण शॉर्ट मध्ये जास्त पैसा मिळतो, देखो ना अभी ५.३० हुवा है… ११.०० बजे तक फुल धंदा होता है… पगार छोड के पाच-सातसों हात में एक्ट्रा मिलता है… बदले में क्या सिर्फ दारु तो पिलानी है |” मी धन्य आहेस ह्या नजरेने तीला बघत पुन्हा आपला ग्लास उचलला… तीचा फोन आला म्हणून ती बाहेर निघून गेली.. !

मी बील मागवले व टिप ठेऊन बाहेर पडलो… डोक्यातून बारचा विचार जातच नव्हता..असे नाही की कधी बार मधे गेलो नाही पण हा अनुभव नवीन होता….. खुदा की कायनात के हजार रंग… ! त्या बार मध्येच कानावर पडलेले गाणे गुणगुणत मी पुन्हा निताच्या ऑफिस मध्ये आलो… साडेसात वाजलेच होते… थोड्या वेळात गाडी पण आलीच व मी आपल्या सिट वर जाऊन बसलो… !

सकाळी सहाच्या आसपास कोल्हापुरला गाडि पोहचली तेव्हा जाग आली आपली बॅग उचलत मी बाहेर येण्यासाठी निघालो तोच एक आंन्टी किंचाळली… मी दचकुन मागे बघितले तर ती आंन्टी माझ्याकडेच बघून दात खात होती.. मी चुकुन तीच्या पन्नास किलोच्या पायावर माझा छोटासा पाय दिला होता.. मी स्वारी स्वारी म्हणत कसा कसा जिव वाचवून गाडीतून खाली आलो व सरळ सैयाद्री वर जाउन रुम बुक करन्यासाठी वळलो तोच एक पोलिस वाला माझ्याकडे आला व म्हणाला” साहेब, बोलवत आहेत..” व समोर उभ्या असलेल्या पोलिस गाडी कडे बोट दाखवलं ! च्यामयला सकाळ सकाळी काय लचांड असा विचार करत साहेबापाशी पोहचलो तो म्हणाला ” बॅग में क्या है ? ” शक्यतो माझा अवतार बघून त्याला वेगळीच शंका आली असावी… मी म्हणालो ” साहेब मी इथलाच आहे मराठी येतं, बाकी बॅगेत काहीच नाही कपडे आहेत्…बघनार असाल तर उघडतो” असे म्हणत मी आपल्या जॉकेटचे बाहे वर केले व बॅग उघडली… तो म्हणाला ” राहु दे राहु दे, उत्तर भारतीय दिसताय ? ” मी नवल वाटल्याचे चेह-यावर दाखवत म्हणालो ” हो, दिल्लीचा तुम्हाला कसं कळालं” तो जरा गर्वातच म्हणाला ” तु जो हातात लाल दोरा बांधला आहेस त्या त्यावरुन… मी पण बांधला आहे बघ.. हरिद्वारला गेलो होतो तेव्हा” मी हसलो व ठीक ठिक म्हणालो व त्यांना जाण्याची परवानगी मागितली ” साहेब जाऊ का ? रुम वर जाउन आंघोळ करायची आहे व महालक्ष्मीला पण जाणे आहे” तो मानेनेच ठिक म्हणाला व मी आपली बँग सांभाळत हॉटेल मध्ये पोहचलो !

*******

दुस-या दिवशी घरी पोहचलो व झोपलं ( काय काय केलं १५ दिवस हे लिहणे योग्य वाटत नाही… उगाच क्रमशः का वाढवा 😕 हा उच्च विचार करुन मी सरळ जानेवारीच्या १७ तारखेवर येतो.

*******

१७ला धडपडत मी पुण्यात पोहचलो.. धडपड ह्यासाठी की मी चुकुन कर्नाटक महामंडळाच्या बस मध्ये बसलो होतो 🙂 दुपारी आमच्या परम मित्र निलकांतला फोन करुन नेहमी प्रमाणे विसरलेला त्याचा पत्ता घेतला व त्याच्या घराकडे कुच केली. व्यवस्थीत डब्बल रिक्षा भाडे देऊन मी त्याच्या घरी पोहचलो पण निलकांत घरी पोहचलाच नव्हता त्यामुळे टाईम पास साठी त्याचा लॅपटॉप उघडून बसलो दहा मिनिटात येतोच असे सांगणारा मित्र बरोबर अडीच तासाने पोहचला 🙂 त्यानंतर आम्ही एका गुप्त मिटींग साठी एका गुप्त जागी गेलो ( गुप्त ह्यासाठी की मला नाव आठवत नाही आहे आता 😦 )
पुर्ण मिटिंग संपु पर्यंत फायर ब्रीगेडला बोलवावे लागेल एवढा धुर आम्ही सोडला, तेव्हा बाकी समाजमनाची काळजी घेत आम्ही बाहेर आलो ( आम्ही म्हणजे बाकीचांनी नावे गुप्त ठेवावी की नाही ह्याची कल्पना दिली नाही आहे त्यामुळे मी धम्याचं, आद्याचं व इनो’बाचे नाव घेत नाही आहे) मी व निलकांत मंडळी बाहेर आलो तो छोटे खानी कट्टा संपवला. फोटो प्रयोजन झाले नाही समक्ष्व.

दुस-या दिवशी सकाळी निलकांत द्वारे देवाचा (प्रभु) नंबर भेटला व फालतु काही न बोलता ठाणेला येणे एवढाच आदेश देऊन देव गायब झाले 😉 दोन तासात सांगा ही गुप्त सुचना आमच्या कानावर आलीच होती, निलकांतला तयार करुन ( बिझी असतो बेचारा, नेहमी काही ना काही तरीच काम करत असतो) येतो म्हणुन आम्ही लगेच ( ?) निघालो व काही तासातच ठाण्याला पोहचलो.

क्रमशः

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: