राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

पाप येवढे आहेत डोक्यावर…

कर्म, आराध्य व मी ह्यात सध्या गुरफटलो आहे मी काय शेवटचे लिहू तुझ्यासाठी काही असेच शब्द, जे माझ्या मनातून उमटत आहेत. काय नाही दिलेस तु मला जिवनामध्ये ? जेवढे जगलो सुखाने जगलो, काही क्षण दुखाचे तर काही क्षण सुखाचे ! माझे कर्मभोग तरी ही तु साथ होतीस, दुखात ही तु सुखी होतीस… पण तुझे अश्रु देखील मी कधी फुसले नाही, जेव्हा जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा देखील मी तुझ्या जवळ नव्हतो, कष्टांना तु आपलसे केलेस, माझ्यासाठी कधी तरी रक्त देखील सांडलेस.

जेव्हा तुला मी उमजलो तेव्हा देखील मी असाच होतो आज ही असाच आहे, सध्या वयाच्या बाबतीत मी अश्वथामा आहे, मरण नाही पण सुखाचा मणी कोणी तरी, कोणी तरी काय ज्याने दिला त्यानेच काढून घेतला आहे, भळभळती जख्म अशीच उघड सोडून दिली आहे त्याने माझ्यासाठी, एकच शब्द जगणे सोडला आहे माझ्यासाठी, पण का व कुणासाठी ह्याचा काही आधार ? मागे पाहतो तो काही शव माझ्या खांद्यावर आहेत असेच आपल्याचे, कोणी आपलं होतं, कोणी रक्ताचे तर काहींचे ऋणानूबंध. पण सध्या शव उचलून उचलून दमलो आहे, काल जे शव श्मशानामध्ये पोहचवले त्याचा चेहरा पण नाही पाहीला.. कारण ते शव देखील माझेच होते मरत कोणीही असो, पण क्षणा क्षणाला चिता माझीच जळते.. असेच अगणीत वेळा मी जळलो आहे. कधी तरी एक शव माझा ही असेल असेच निपचित पडलेले. सुखासुखी जगामध्ये अवचितपणे कोठेतरी हरवलेले.. कोणाला काय पडले आहे दुस-याच्या खांद्यावर कोणाचे वजन आहे ह्यांची ? कोणी गाते आहे कोणी हसत आहे कोणी जगाचे रंगबिरंगी रुप पाहात आहे..समोरुन गेलेल्या यात्रे मध्ये कधीतरी मी पण असेल ह्याची कुणाला चाहूल आहे ? हे शब्दजाल आहेत मला ही माहीत आहे कधी तुझ्या समोर मी हे लिहलेले बोलेन ह्यांची खात्री मला ही नाही तरी ही..

पण जाण्याआधी काही वचने आहेत काही संस्कार आहेत त्यांना पुर्ण करणे आहे, नांदत आहे ती दुस-यांच्या घरी तीचे देखील पहावयाचे आहे मला माहीत आहे त्यामुळे मी सध्या जिवंत आहे, एकुलती एक असली तरी काय झाले तीच्यासाठी देखील मी एकुलता एकच आहे, दुखःची काय कमी ह्या जगामध्ये, पण सध्या मी तुमच्या बरोबर सुखात ही नाही, किती घाव होत असतील तुझ्या मनावर ह्याची थोडीफार कल्पना आहे पण माझा ना-इलाज आहे, तु जी आहेस ते मी शत जन्मी देखील होऊ शकत नाही, तु जे भोगले ते सहन करण्याची शक्ती माझ्यात कधीच येणार नाही, पण मी तुझ्या पोटी आलो हे भाग्य माझे पण मी तुझ्या पोटी आले हे दुर्भाग तुझे आहे ..

तु जगलीस माझ्यासाठी, मी पण मी ? माझा अहंम, माझा मी व दुस-यांचे अधिकार, हक्क ह्यांना संभाळात मी तुझा हक्क कधी हिरावून घेतला हे कळालंच नाही, आज उमजलं आहे पण… ती वेळ निघून गेली आहे, तो काळ, ती वर्षे ते तप मागे पडले आहेत… तु माझ्यासाठी वेचलेल्या कष्टांना, तु माझ्या आठवणीमध्ये सांडलेल्या प्रत्येक अश्रुंचा मी देणेदार आहे, कर्ज आधीच तुझे माझ्या अंगावर होते… सध्या मी कर्जामध्ये दबलेला आहे…

किती स्वप्ने असतील व किती कल्पना तुझ्या माझ्यासाठी… भांडी घासलीस दुस-या घरची तर कधी कपडे धुतले.. नशेचा कहर तु झेलला जन्मभर.. मी देखील असाच अडाणी राहिलो, किती प्रयत्न केलेस तु मला शिकवण्यासाठी पण मी मुर्ख असाच शिकण्यापासून पळत राहिलो… माझ्यासाठी कधी पाटल्या विकल्या तर कधी मंगळसुत्रातील सोने.. तुला काय वाटले मला आठवत नाही ते दिवस, मी लहान होतो पण असाच निगरट होतो.. , माझ्यापुढे मी कुणालाच पाहत नाही, माझा गर्व माझा अहंम म्हणजेच माझे सर्वस्व आहे असेच समजत होतो पण एक एक करुन सगळे सोडून गेले कधी देवाची करणी तर कधी नशीबाची खेळी… कधी जिंकलो तर कधी हरलो पण ह्या खेळामध्ये मी तुला काही क्षण विसरलो.. त्याच कर्मांची फळे मी भोगली आहेत… ज्यांच्यासाठी जगलो तेच गेले.. आपल असं कोणीच राहिले नाही जवळपास, अमर नात्यांच्या ग्वाही देणारे आज पलिकडे बसले आहेत, मला ह्या जगात एकटेच सोडून… कोणी येतं काही क्षण मध्येच पण नाते न जपता फायदा जपून..पुढे निघून जातात असेच नेहमी प्रमाणे मला एकटे टाकुन !

आज तुझ्यापासून दुर आहे, हजारो किलोमिटर पण मनाने तुझ्या चरणावरच लोटांगण घातले आहे.. तु मला एकदा माफ कर, ह्या जन्माची कसर नक्कीच भरुन काढेन, पुढील जन्मात तुझ्या पोटी येईन !
पण ह्याची खात्री नाही, पाप येवढे आहेत डोक्यावर…

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: