राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

शेयर मार्केट (बेसिक) भाग -२

********

मागील भागात आपण शेयर्स म्हणजे काय हे पाहीले आता आपण ह्या भागात डिमेट अकाउंट कसे उघडावे व त्यासाठी काय काय करावे व काय पहावे ह्याची माहीती घेऊ.

तुम्हाला जर शेयर विकत घेणे असेल अथवा आयपीओ मध्ये शेयर साठी निवेदन करणे असेल तर तुम्हाला एक डिमेट अकाउंटची गरज असते, ते तुम्ही कुठल्याही ब्रोकरकडे आपले ड्रेडिंग अकाउंट तथा डिमेट अकाउंट ओपन करु शकता. जसे शेअरखान, रिलायन्स मनी, ५ पैसा, अलिट स्टॉक्स, अरिहंत कॅपिटल, एंजल ब्रोकर अश्या असख्यं संस्था उपलब्ध आहेत.

सर्वात प्रथम तुम्ही ज्या संस्थेत आपले डिमेट / ट्रेडिंग अकाऊंट उघडणार आहात त्या कंपनीची पुर्ण माहीती मिळवण्याचा प्रयत्न करा, जसे ह्यांची सेवा कशी आहे, सेवा कशी देते, ऑफलाईन ट्रेडिंग बरोबर ऑनलाईन ट्रेडिंग सुविधा देते की नाही, ब्रोकरेज (दलाली) किती आहे, केव्हा पासून मार्केट मध्ये कार्यरत आहे, ह्यांचे मुख्य कार्यालय कुठे आहे व ग्राहकसेवा क्रेंद्र उपलब्ध आहे कि नाही व जर उपलब्ध असेल तर त्यांची कार्यक्षमता किती आहे इत्यादी.

संस्था जेव्हा तुम्हाला एक फॉर्म देण्यासाठी तेव्हा तो फॉर्म व्यवस्थीत वाचा व सर्व फॉर्म आपल्या समोर भरुन घ्या व जे जी कागदपत्रांची प्रत तुम्ही त्यांना देत आता त्याची एक नोंद आपल्या कडे ठेवा व सर्व कागदपत्रांच्या प्रतीवर स्वतःचे हस्ताक्षर करणे गरजेचे आहे व जेवढ्या प्रती असतील त्या सर्वांच्यावर हस्ताक्षर करणे गरजेचे. प्रत्येकाचा फॉर्मचा फॉर्मट वेगळा असतो पण काही छोट्या कंपनीचे डिमेटचे फॉर्म व ट्रेडिंग अकाउंटचे फॉर्म वेगळे असतात व त्यांना तुमच्या कागदपत्रांच्या प्रती देखील दोन दोन जातात.

तुमच्या जवळ पॅनकार्ड असणे बंधनकारक आहे, जर पॅन कार्ड असेल तरच तुमचे डिमेट अकांउंट उघडू शकते हा नियम आहे, पॅनकार्ड वर पुर्ण नाव असणे बंधनकारक आहे ( काही जणांच्या पॅन कार्ड वर फक्त राज असे लिहलेले असते तसे पॅन कार्ड चालत नाही तर पॅनकार्ड वर तुमचे पुर्ण नाव हवे जसे राज जैन / राज कुमार.)
तुमच्या जवळ उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्यावर देखील पुर्ण नाव हवे.

काय काय कागदपत्रे हवीत.

१. पॅनकार्ड
२. बँक अकाउंट व त्याची स्टेटमेंट अथवा चेक वर तुमचे नाव प्रिंट असावे अन्यथा पासबुकची प्रत.
३. दोन / तीन पासपोर्ट साइज रंगीत फोटो ( जास्त जुना नको दोन-तीन महिण्यातच खेचलेला असावा)
४. पासपोर्ट / रेशन कार्ड / वाहनचालन परवाना / मतदान आयकार्ड / सरकारी सेवा संस्था मध्ये असाल तर तेथील आयकार्ड / रेंट अग्रीमेंट / टेलीफोन बील / लाइट बील.
५. इंनशोरंन्स पॉलिसी / कंपनी लेटरहेड वरील तुमची ओळख

तुमची ओळख दर्शवण्यासाठी (४) ची कागद पत्रांपैकी कमीत कमी एकची प्रत हवी.
तुमच्या पत्याची खात्री करण्यासाथी (२) , (४), (५) पैकी एकची गरज पडेल.
(१) व (३) गरजेचेच आहे ह्यासाठी दुसरा ऑप्शन नाही 😉

कागद पत्रांची तयारी झाल्यावर कंपनीने दिलेला फॉर्म एकदा वाचून घ्या व जो व्यक्ती तुमच्याकडून फॉर्म भरुन घेत आहे तो जेथे जेथे हस्ताक्षर करावयास सांगेल तेथे करण्याआधी येथे हस्ताक्षर का हे विचारुन घ्या समजवून घ्या व मगच हस्ताक्षर करा. जवळ पास कमीत कमी २८ व जास्तीत जास्त ३५ एक हस्ताक्षर करावी लागतात तेव्हा आपल्या पेन सुस्थितीत आहे ह्याची खात्री करुन घ्या 😀
तुमच्या पॅन कार्डवर जे हस्ताक्षर आहेत तेच हस्ताक्षर जवळ जवळ सर्व जागी करावेत.

जेव्हा हस्ताक्षर करत असाल तेव्हा एक कॉलम येईल ब्रोकरेज स्लॅब चा.

हा महत्वाचा मुद्दा आहे ह्याची पुर्ण माहीती घ्यावी.
ब्रोकरेज !
सर्व कंपन्या आपल्या आपल्या नियमाप्रमाणे ब्रोकरेज घेतात, पण जर शेअर मार्केट मध्ये सर्वात ठिसूळ कुठला नियम असेल तर हा ब्रोकरेजचा नियम.
कंपनी तुम्हाला १० पै / ५० पै असा भाव सांगत असेल तर त्याचा अर्थ आहे, डे-ट्रेडिंगसाठी १० पै / १०० रु. व डिलेव्हरीसाठी ५० पै / १०० रु.

हे समजण्यासाठी तुम्हाला डे ट्रेडिंग व नॉर्मल ट्रेडिग (डिलेव्हरी) म्हणजे काय हे समजावून घ्यावे लागेल.

१. डे-ट्रेडिंग – समजा तुम्ही आयसीआयसीआय चे १० शेयर ८०० रु. दराने तुम्ही ड्रेडिंग डे मध्ये (९.५५ सकाळी ) विकत घेतले व ८१० रु. दराने तुम्ही ते विकले ( ३.३० दुपारच्या आधी) ह्याचा अर्थ तुम्ही डे ट्रेडिंग केली व साठी तुमची ब्रोकरेज १० पैसे दराने लागेल.

२. डिलेव्हरी (नॉर्मल ट्रेडिंग) – समजा तुम्ही आयसीआयसीआय चे १० शेयर ८०० रु. दराने तुम्ही ड्रेडिंग डे मध्ये (९.५५ सकाळी ) विकत घेतले व ते तुम्ही ३.३० च्या आधी विकले नाही व त्याला आपल्या डिमेट अकांउट मध्ये जाऊ दिले ह्याचा अर्थ तुम्ही त्या शेयर्सची डिलेव्हरी घेतली व साठी तुमची ब्रोकरेज ५० पैसे दराने लागेल.

एक सुचना :- जेव्हा तुम्ही शेयर विकत घेता व जो पर्यंत विकत नाही तो पर्यंत तुमचे शेयर्स कंपनीच्या पुल अकाउंट मध्ये राहतात, पण तुम्ही एकदा शेयर्सची डिलेव्हरी घेतली तर ते शेयर्स तुमच्या डिमेट अकाउंट मध्ये येण्यासाठी तीन दिवस लागतात उदा. तुम्ही १ तारखेला शेयर्स डिलेव्हरी घेतली तर त्याचा पे आउट ३ तारखेला, ह्याचा अर्थ तुमच्या डिमेट मध्ये शेयर्स ३ तारखेला दाखवेल तो पर्यंत ते शेयर्स तुमच्या ब्रोकरच्या पुल अकाउंट मध्येच दाखवत राहील. डिलेव्हरी शेयर्स विकल्या नंतर ही पे आउट तुम्हाला तीन दिवसानंतरच भेटेल.

मार्केटमध्ये तुम्हाला १ पै / १० पै पासून ३० पै / ८० पै ब्रोकरेज घेणारे भेटतील… तुम्ही जेवढी घासाघासी भाजी खरेदी साठी करता तेवढीच येथे पण करु शकता.. नॉर्मली मार्केट मध्ये तुम्हाला ३ पै / ३० पै रेट नक्कीच भेटेल.

पुढील भागात आपण ट्रेडिंगचे दोन प्रकार आहेत एक ऑफलाईन ट्रेडिंग व एक ऑनलाईन ट्रेडिंग ते समजावून घेऊ.

क्रमशः

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: