राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

अंत… भाग-२

मागील भाग १

********************************

तीने हसून फोन कट केला, ह्याला कुठे घेऊन जाऊ हा विचार करत मी कधी रिंकीचा विचार करु लागलो कळालेच नाही, समोरुन ट्रकचा येणार प्रखर ज्योत माझ्या डोळ्यावर पडल्यावर मी अचानक ब्रेक मारले व गाडी एका बाजूला कलंडत आहे असे वाटले …. व गाडी कश्यावर तरी जोरात आदळली…..

स्टेरिंग व्हिलवर डोके जोरात आपटले व गाडी एक चक्कर घेउन बाजूच्या डिव्हाडरला धडकली…एअर बॅग एकदम फुलली व माझ्या तोंडासमोर आली.. मी कसाबसा त्यातून सुटका करुन घेत बाहेर आलो व त्याच्या बाजूच्या खिडकीकडे गेले व त्याला तपासला, तो बाजूलाच कलंडलेल्या अवस्थेत होता एक हात डोक्यावर होता, मी तेथेच पडलेल्या काचेच्या तुकड्याने एअरबॅग फाडली व त्याला बाहेर काढला, त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते,तो काहीच बोलत नव्हता, घाबरला होता जाम, मी एक रुमाल त्यावर धरला व लगेच फोन हाती घेतला व फॅमेली डॉक्टर ला फोन लावला व त्याला सर्व परिस्थिती सांगितली व रिंकीच्या फोन वरुन रुग्ण्वाहिकेला फोन लावला व त्यांना लोकेशन समजावून सांगितली. थोड्यावेळाने आम्ही हॉस्पिटल मध्ये होतो जास्त लागले नव्हते मला व त्याला देखील पण तरीही डॉक्टरने चेकअप साठी थांबवून घेतले व त्याला दोन दिवस हॉस्पिटल मध्ये राहणे बंधनकारक केले, त्यांच्या मते त्याची जखम जरा खोल होती शक्यतो सिटी स्कॅन करणे गरजेचे होते, माझ्या व त्याच्या डोक्यालाच फक्त मार लागला होता मला जखम झाली नाही पण त्याला झाली होती शक्यतो डोके काचेवर आदळले होते त्यामुळे ! मी जेव्हा जोरात ब्रेक मारले तेव्हाच त्याचे व माझे डोके आदळले असावे व जेव्हा डिव्हाडरला गाडी धडकली तेव्हा एअरबॅग बाहेर आली असावी… हा विचार चालूच होता तोच माझ्या खांद्यावर कोणी तरी हात ठेवला.एक २७-२८ वर्षाची युवती माझ्या बाजूला उभी होती….नजरा नजर झाली ! आम्ही दोघेच बाहेर होतो…

मी- तू ?
ती- हेच मी तुला विचारत आहे तु कसा काय अजय बरोबर आज ? व काय झाले.
मी- काही नाही, थोडासा अपघात झाला. आज त्याचा वाढदिवस म्हणून पार्टी.
ती- बरोबर ड्रिंक केली असावी अशी शंका आलीच मला, ड्राईव्ह कोण करत होते ?
मी- मीच. पण समोरुन येणा-या ट्रकच्या लाईटमुळे जरा गोंधळ उडाला.
ती- ओके. तो कुठे आहे ?
मी- आत चेकअप चालू आहे.. ओळख दाखवू नकोस.
ती- ओके.

डॉक्टर बाहेर आले व मला आत जाण्याची परवानगी दिली. त्याच्या डोक्याला पट्ट्या बांधल्या होता व तो बेडवर निवांत पडला होता, हसत माझे स्वागत करत.

मी- स्वारी यार.. एकदम ट्रक..
तो- अरे राहू दे यार… होता है.. लाईफ है !
मी- तरी देखील यार चुकी माझी होती..
तो- इटस ओके.
मी- चल तु आराम कर मी पण जरा रेस्ट करतो घरी जाऊन.
तो- तु ठीक आहेस ना ?
मी- हो, मुक्का मार लागला आहे जास्त काही नाही..
तो- गुड. गाडीचा काय हाल ?
मी- क्लिनर साईड डॅमेज ! दरवाजा व समोरची काच.
तो- ह्म्म, आपण वाचलो हेच महत्वाचे, पोलिसाचे काही लफडे ?
मी- नाही, सेट केले.

तोच ती आत आली व त्याच्याकडे काहीश्या रागावलेल्या नजरेने पाहून म्हणाली..

ती- काय झाले हे सर्व ?
तो- तु कशी काय येथे आलीस ?
ती- मी काय विचारते आहे.
तो- हा माझा प्रॉब्लम आहे, ओके.
ती- अजून मी तुझी बायको आहे व तुला दोन मुले ही आहेत हे लक्षात असू दे.
तो- शटअप. अरे, हो. हा राज माझा जूना मित्र आपल्या लग्ना आधीचा. लग्नात नव्हता येथे तो, व आता भेटला आहे जेव्हा आपण तलाक घेत आहोत तेव्हा.. काय योगायोग आहे नाही.
ती- तुम्ही होता का ह्याच्या बरोबर ?
मी- हो, मीच गाडी चालवत होतो, स्वारी.
ती- पिल्यानंतर तुम्हाला गाडी चालवावी असे वाटलेच कसे ?
तो- तो माझा मित्र आहे, काही बोललीस तर खबरदार.

ती रागाने पाय आपटत निघून गेली, मी त्याच्या शेजारी बसलो व त्याला थोडे पाणी पिण्यासाठी दिले त्याला रेस्ट घे, उद्या भेटतो. असे सांगून सरळ बाहेर निघून आलो. बाहेर पार्किंग मध्ये एक लाल रंगाची गाडी पार्किंग लाईट लावून उभी होती मी तडक त्या गाडी कडे गेलो दरवाजा उघडला व मी ड्रायव्हर सिटच्या बाजूच्या सिटवर बसलो गाडी वेगाने दिल्लीकडे धावू लागली…

मी- कुठे चाललो आहोत आपण ?
ती- घरी.
मी- ठीक आहे, काही बोलायचे पण आहे तुझ्याशी.
ती- जेवण करु मग बोलू.
मी- प्लान कुठे पर्यंत आला तुझा ?
ती- होईल सर्व काही दिवसात, त्यानंतर…. हिट !
मी- गुड. माझी पण पुर्ण तयारी झाली आहे, पण…
ती- आता मध्येच काय पण ?
मी- काही नाही.

मी काचेतून बाहेर पहात खिश्यात असलेल्या रिंकीच्या फोन बद्दल व तीच्या बद्दल विचार करु लागलो. उगाच रिंकीचा फोन नको वाजायला म्हणून बंद करा ह्यासाठी बाहेर काढला.

ती- हा फोन कधी घेतलास ?
मी- माझा नाही आहे, माझा माझ्या खिश्यात आहे, एका एका मित्राचा आहे.
ती- मग तुझ्या कडे का ?
मी- तो विसरला होता गाडीत.. ओह शट.. माझी गाडी, पार्किंग मध्ये आहे.
ती- चल, मी वळवते गाडी.
मी- नको, मी कॅब ने जाईन तो पर्यंत तु जेवण तयार कर पाऊण तासात येईनच मी.
ती- ह्म्म्म.
मी- मला येथेच ड्रॉप कर.
ती- मागे शर्ट आहे बॅग मध्ये, चेंज कर, ह्यावर रक्ताचे डाग आहेत व घाण झाला आहे.
मी- कुणाचा शर्ट आहे ?
ती- गिफ्ट होते त्याच्यासाठी.
मी- ह्म्म्म.

मी गाडीतच शर्ट बदलला व रेड लाईटवर गाडीतून बाहेर आलो व दुस-या बाजूने एक कॅब पकडली व मॉल कडे माझी कॅब धावू लागली. मी रिंकीचा फोन चालू केला व त्या फोन ने आपल्या फोन वर एक मिस्ड कॉल मारली व तीचा नंबर सेव्ह केला. हे करत असतानाच रिंकीचा फोन वाजू लागला… नंबर अनोळखी होता.

मी- हल्लो !
तीकडून – हल्लो, राज.
मी- हो मीच, तुम्ही कोण ?
तीकडून- लगेच, जयपुर हायवे ४८ किलोमिटर स्टोन जवळ ये.
मी- अरे कोण आहे ? ह्या नंबरवर मी आहे तुला कसे कळाले ? व मी तेथे का येऊ ?
तीकडून- जास्त विचार करु नकोस, आला नाहीस तर डोक्याला हात लावायची पाळी येईल, व तुझा प्लान बरबाद.
मी- माझा प्लान ? हु आर यु ?
तीकडून- जयपुर हायवे ४८ किलोमिटर स्टोन. ३० मिनिटाच्या आत.

फोन कट झाला…. कोण होता तो ? हा विचार डोक्यात पिंगा घालत होता, आवाज कुठल्यातरी Software चा वापर करुन बदललेला वाटत होता.. कोण होता तो ???
माझ्या बद्दल त्याला एवढी माहीती कशी ? हा फोन माझ्याकडे आहे हे त्याला कसे माहीत… डोक्याचा पार भुगा झाला होता… तोच कॅब मॉलच्या गेट मधून आत आली व मी पैसे देऊन सरळ पार्किंग लॉट मध्ये गेलो.. गाडी जागेवरच होती… !
मी दरवाजा उघडला व आत बसलो तोच कसला तरी वेगळाच सेंट मला गाडी मध्ये जाणवला…. हा सेंट तर .. रिंकी.. ! नाही यार असेच आपल्याला आठवला असावा असे वाटले… तरी ही मागील सिट वर चेक करुन घेतले व स्टेरिंग व्हिलच्या खाली असलेल्या माझ्या गुप्त ड्रॉव्ह मध्ये हात घातला व मला हवी असलेली वस्तू तेथेच आहे ह्याची खात्री करुन घेतली व सरळ गाडी जयपुर हायवेला लावली.

४८ किलोमिटर स्टोन जवळ एक गाडी पार्किंग लाईट लावून उभी असलेली दिसली… जरासा अंदाज घ्यावा ह्यासाठी मी त्याच्या जवळूनच गाडी पुढे घेतली व चोरट्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला पण काहीच दिसले नाही…. मी गाडी जरा पुढे जाऊन थांबवली तो रिंकीचा फोन परत वाजला…..

मी- हल्लो.
तीकडून- काय भिती वाटली की काय ? गाडी मागे घे.
मी- माझ्या जिवाला काही धोका ?
तीकडून- डिल करायची आहे मला. तुझा जीव घेऊन मला थोडीच पैसे मिळणार आहेत.
मी- ठीक आहे…

मी गाडी रिवर्स मध्ये घातली व सरळ मागे घेऊ लागलो… मागील गाडीचा दरवाजा उघडला व उघडलेलाच राहिला.. पुन्हा फोन वाजला…

तीकडून- माझ्या गाडीमध्ये ये.

मी फोन बंद केला व गाडी बंद करुन सरळ.. जे होईल ते होईल हा विचार करुन त्या गाडीच्या दिशेने चालू लागलो… दरवाजा उघडा होताच, मी जरासे आत बघण्यासाठी
वाकलो तोच एकदम पोटात जोरात कळ आली, माझा हात आपसूकच पोटाकडे गेला तर हाताला काही तरी ओले लागले….. मी ओरडलो… वोह शट… गोळी मारली मला तू…. असे म्हणत मी खाली कोसळलो…. !

क्रमशः

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: