राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

अंत… भाग- ४

तोच रुम च्या खिडकीतून गोळ्या चालल्या व काही कळायच्या आत रिंकी जमिनीवर पडली व मी स्वतःला वाचवण्यासाठी… बेडच्या खाली जाण्यासाठी उठलो तोच डाव्या हातातून प्रचंड कळ आली व मी मटकन खाली पडलो… साठे आत दरवाजा जवळ जवळ तोडत आत येताना दिसले व माझ्या मागील खिडकीवर ते अंधाधुंद फायरिंग करु लागले… मी हळू हळू बेशुध्द पडलो….

मागील भाग – ३
*******************

काय झालं अचानक कुणाला काहीच कळले नाही, त्यानीं हल्ला का केला ? कुणावर केला.. माझ्यावर की रिंकीवर ? गोळ्या झाडल्या गेल्या… दोन जिवंत माणसं रक्ताच्या थारोळ्यात पडलेली.. हॊस्पिटल मध्ये सर्वत्र गोंधळ उडालेला कुणाला काहीच कळत नव्हते… डॊक्टर-नर्स आले, पोलिस वाले गोळा झाले व मला व साठेंना आयसीयू मध्ये हलवण्यात आले, रिंकी… बिचारी विनाकारण आपला जीव गमवून बसली माझ्यामुळे…

# एक आठवड्यानंतर…

माझ्या खांद्याला गोळी लागली होती… साठेंना जवळ जवळ चार गोळ्या लागल्या पण ते वाचले..
तुम्हाला काहिच कळाले नसेल नाहि काय चालू आहे ते.. का माझ्यावर धडाधड ह्ल्ले होत आहेत.. कोण मला मारण्यासाठी तयार बसला आहे.. ह्या सर्व नाट्यामागे कोण आहे व हे सर्व का ? हे एवढे सोपे नाही आहे समजणे… खुप मोठी गोष्ट आहे… जवळ जवळ ह्या गोष्टीची सुरवात सहा वर्षामागे एक छोट्याश्या कामामूळे झाली… व आता त्याचा अंत आला आहे जवळ…! कळेल तुम्हाला लवकरच सर्व काही…

****

ती आत येताना दिसली… व एक वेगळाच सुगंध… रुम मध्ये पसरला…

ती- तुझ्यावर पुन्हा हल्ला झाला ?
मी- मी हो.
ती- काही अंदाज आला का कोण आहे ह्या मागे सर्व ?
मी- अजून नाही पण काही माग लागले होते पण… रिंकी मारली गेली.
ती- ओह…
मी- तो येणार आहे का भेटायला /
ती- नाही, तो पण भितीने गारठला आहे, घरातून बाहेर पडतच नाही आहे..
मी- कोड मिळाला ?
ती- नाही अजून.
मी- वेळ नाही आहे आपल्याकडे हे तुला माहीत असावे.
ती- मी ट्राय करते आहे मी ना…
मी- ट्राय नाही जर जगायचे असेल तर मला तो कोड हवा आहे… !
ती- येस. मिळेल काळजी करु नकोस..
मी- जेव्हा मला तु सोडले होते मागच्यावेळी… त्यानंतर तु कुठे गेली होतीस ?
ती- का ?
मी- असेच..
ती- मी, ऒफिस मध्ये व जरा काम केले.. का काय झाले ?
मी- ओके… त्या दिवशी तु मॊलकडे पण गेली होतीस ?
ती- नाही.. का ? असे का विचार तो आहेस ? तुला माझ्यावर संशय आहे ?
मी- सध्याच्या अवस्थेत तर मला माझ्या स्वत: वर पण संशय आहे….
ती- काय बरळतो आहेस… माझ्या शिवाय तुला तुझे काम करताच येणार नाही….
मी- माझी पिस्तुल त्यांच्याकडे कशी गेली ?
ती- काय माहीत… गाडीचे लॊक तोडणे येवढे अवघड नाही आजच्या काळात..
मी- रिंकीचा फोन माझ्याकडे आहे हे त्यांना कसे कळाले ?
ती- मला काय माहीत….
मी- रिंकी तुझ्या ऒफिसमध्ये काम करते हे तुला माहीत नव्हते ?
ती- व्हॊट…तुला काय म्हणायचे आहे ?
मी- तुला समजले असावे मी काय म्हणतो आहे ते…
ती- चल मी निघते…
मी- एक फोन देऊन जा..
ती- माझ्या घे..
मी- ठीक.

ती गेली… तिचा फोन हाता घेऊन मी खेळत होतो.. तोच एक विचार आला… व नंबर डायल केला..

मी- हलो.. रॊक्स ?
तीकडून- हाय.. बोल ! हा नंबर तुझा नाही..
मी- हो माझा नाही… एक काम होते…
तो- बोल.
मी- डिटेल्स हव्यात..
तो- नंबर..
मी- हाच.. मागील एक महिन्याच्या कमीत कमी. टाईम फक्त १२ तास, किंमत तु बोल.
तो- डन. ५ घेईन.
मी- डन.

फोन कट. रॉक्स… टेलीकॉम व वायरलेस मध्ये मास्टर माणूस… एक नंबरचा हॅकर… मला जे हवे आहे ते तो देईलच ह्यात शंका नाही..

खरंतर मला तीच्यावर संशय येणे खुप मोठी गोष्ट… माझ्या प्लान तीच्या शिवाय पुर्ण होणेच नाही.. पण न जाणे का मला तीच्यावर खुप संशय येत होता.. रिंकीने जेथे उभे राहून फोन केला होता.. त्याजागेच्या मागेच हिची केबीन… रिंकी हिच्या ऒफिस मध्येच काम करते… व दुसरा बळकट आधार.. सेंट.. जो मला माझ्या गाडीत बसल्या बसल्या जाणवला होता.. मला वाटले होते तोच सेंट रिंकीने मारला असावा… पण आज जेव्हा ती आत आली तेव्हा तोच सुगंध मला पुन्हा जाणवला… म्हणजे गाडितून पिस्तुल हिनेच गायब करणे काही मोठी गोष्ट नव्हती… व तीने का करु नये.. मी मेलो तर सर्व प्लान तीचा होईल व ते करोडो रुपये तीचे…. ! यस ही सारी गेम त्या करोडो रुपयांसाठी चालू आहे… ज्या राष्ट्रीय नेत्याने जनतेला रोज लुटून जमा केली होती.. व त्यांने एका कडेकोट बंदोबस्त असलेल्या तीजोरीमध्ये जमा ठेवली होती व त्याचे पाच वेगवेगळे कोड होते… तो सर्व संपती घेऊन पळून जाणारच होता देश सोडून तोच कोणी तरी त्याला टपकवले.. हे सर्व मला कसे माहीत…. दॆट्स द पॊइंन्ट.. ती तिजोरी मीच डिझाईन करुन दिली होती पण मी एक चुक केली होती कोड रिसेटचा ऒपशन आपल्यासाठी सोडला नव्हता… खरं तर मला माहीतच नव्हते की ते कश्यासाठी.. करुवून घेत आहे तो… ! पण जेव्हा त्याला मारलं गेले त्याच्या काही तासातच माझ्याकडे एक फोन आला व त्या फोन नंतर हा सर्व लफडा चालू झाला… !
कुणाला तरी कोड हवा होता…. व तो त्यासाठी काही ही करायला तयार होता.. दोन पाऊले मी पुढे होतो पण तो देखील काहीच पाऊले माझ्या मागे होता..

*************************

क्रमशः

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: