राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

अंत… सुरवात

आज दिनांक –/–/२००९
काही दिवसापासून गायब असलेले श्रींमत कपडे व्यापारी अजय ठाकूर ह्याचे शव जयपुर एक्स प्रेस हायवेच्या जवळ कुजलेल्या अवस्थेत मिळाले. पोलिसांनी अजून काही सांगण्यास असमर्थता दाखवली आहे फक्त प्रेताजवळ मिळालेल्या वस्तू वरुन ते अजय ह्यांचे प्रेत आहे ह्याची खात्री पटली आहे व शरीर पोस्टमार्टम साठी गंगाराम हॉस्पिटल मध्ये पाठवले गेले आहे- बातमीदार.
________________________________________________
दोन वर्षामागे…..
________________________________________________
मी- हाय दोस्त !
तो- हाय, कसा आहे.
मी- मी मस्त मजेत तु बोल कुठे आहे आजकाल, काय काम चालू आहे ?
तो- मी पण मजेत. दिल्लीतच आहे साऊथ एक्स ला.
मी- अरे, वा! काय करतो आहेस ?
तो- स्वतःचेच काम करतो आहे, गारमेंटचे.
मी- गुड गुड !
तो- अरे खुप दिवस झाले भेटलो नाही आपण, भेटू या का ? आज ?
मी- हो हरकत नाही, आज रविवार मला ही काही काम नाही, बोल कुठे भेटू ?
तो- ओडीसीला ? नको नको मोजो ला भेटू, संध्याकाळी सहाला.
मी- ठीक आहे मोजो ला मी येतो बरोबर सहाला.

फोन कट. माझ्यापासून सिटी मॉल ३० एक किलोमिटर वर होते अजून खुप वेळ होता सहा वाजायला म्हणून मी एक थंड बियर घेऊन बसलो व टिव्ही वर कार्यक्रम चालू केले, तोच पुन्हा फोन वाजला, त्याचाच होता.

तो- अरे राज, एक तासातच भेटू रे.
मी- ओके. चल हरकत नाही, मी निघतो तु पण पोहच.
तो- ठीक. मी येतो आहे मग, पार्किंग मध्ये आल्यावर फोन करेन.
मी- ठिक.

कमीत कमी पाच एक वर्षाने भेट असू आम्ही, मेल वर चॅट वर गप्पा होत असतं पण मागील दोन एक वर्षापासून ते पण बंद झाले होते तो आपल्या कामात व मी आपल्या कामात. पण आज योग आला आहे तर भेटू. गाडी घेऊन जाउ या की बुलेट ह्या विचारात दहा एक मिनिटे खर्ची घातली व त्याचावर थोडा रुबाब टाकावा ह्या उद्देशानेच सरळ मी गाडी घेऊनच जायचे ठरवले व पंधरा मिनिटाच्या एक्सप्रेस वे च्या सफरी नंतर मी सिटी मॉल च्या समोर पोहचलो. पाच एक मिनिटात त्याचा पण फोन आला व तो मोजो मध्ये पोहचला होता. मी फोन केला व म्हणालो..

मी- अबे, आज रविवार मोजो मध्ये कपल इंन्ट्री.
तो- अरे यार एक मिनिट माझी फ्रेन्ड आहे तीला पाठवतो बाहेर तिच्या बरोबर ये आत.
मी- ठीक आहे पाठव नाव काय तीचे ?
तो- रिंकी. ब्लु ड्रेस.
मी- ठीक.

दोन-तीन मिनिटातच रिंकी बाहेर येताना दिसली गेट मधून. मी दुरुनच हाय केले व म्हणालो
मी- रिंकी ? मी राज.
ती- हाय. चल.
मी- ठिक.

मी तीच्या बरोबर चाललोच होतो पण माझे लक्ष तीच्यावरच होते, मी व्यवस्थीत तिला वरुन खाली पर्यंत पाहीले व तीच्या बद्दल काही आराखडे मनात तयार केले, शक्यतो ती कॉल सेंटर मध्ये जॉब करत असावी, पगार चांगलाच असावा, वय जेमतेम २४-२५ व इतर बरेच काही… गेट वर पोहचलो, इन ची इंन्ट्री केली व हातावर वरच्या बाजूस स्टॅप मारुन घेतला, मुली बरोबर फ्री इंन्ट्री व शनिवार-रविवार फक्त कपल्स इंन्ट्री. मोजो एक डिस्कोथेक आहे गुडगांव मधला व चांगलाच मोठा देखील आहे… कित्येकदा आलो होतो त्यामुळे नवीन काहीच वाटत नव्हते पण एरवी मी एकटाच येत असे ते पण सोम ते शुक्र पर्यंतच शनिवार-रविवारी मी कधीच जात नाही मला गर्दी जास्त आवडत नाही हे कारण असावे अथवा मला मोठा डिजेचा आवाज आवडत नसावा पण मी मोकळ्यावेळीच जातो… तेसे आज पण आम्ही लवकरच आलो होतो त्यामुळे गर्दी कमी होती एका सोफ्यावर तो बसलेला होता समोर हॅनीकेन भरलेली असावी ग्लास मध्ये.. मला पाहू तो उभा राहिला व जोरात मिठी मारत म्हणाला..

तो- राज भाई, तुला भेटून खुप आनंद झाला रे.
मी- मला पण भावा, बोल कसा आहेस एकमद बॉडी-बीडी कमवलेली आहेस लेका.
तो- हा हा हा.. जिम करतो आहे रोज गेली दोन वर्ष.
मी- गुड ! ही कोण ?
तो- रिंकी. माझी मैत्रीण.
मी- एक मिनिट. रिंकी, जरा एक काम करशील का ? पाच मिनिट जरा मोकळे सोड आम्हाला. फक्त पाच मिनिट.
ती- हो, हो. इन्जॉय.

ती आपली लगेच उठून समोर डिजे केबीन कडे निघून गेली.

मी- अबे, तुझे तर लग्न झाले आहे ना ? मग ही ?
तो- सोड ना यार…
मी- काय झाले ते सांगतोस का ?
तो- अरे, डिर्वोस घेत आहे मी. फाईल अप्लाईड केली आहे कोर्टात ह्या आठवड्यात होईल.
मी- काय ? तुझी मुले ? दोन आहेत ना ?
तो- हो. एक मुलगी व मुलगा.
मी- त्यांचे काय ?
तो- सोड ना यार, येथे दुस-या कामासाठी बोलवले आहे तुला.
मी- ओके. नंतर बोलू बोल, कश्यासाठी बोलवले आहेस ?
तो- अरे, आज माझा वाढदिवस. विसरलास लेका तू.
मी- ओह शट. विश यू अ व्हेरी व्हेरी हॅप्पी बर्थ डे.
तो- चियर्स. रिंकी… ये रिंकी, कम जॉईन ! चियर्स.

मी तो पॅग घशातून रिचवत होतो पण मी त्याचा चेहरा निहाळत होतो त्याच्या चेह-यावर क्षणाक्षणाला बदलणार हावभाव कसली तरी अनामिक चिंता त्याच्या चेह-यावर दिसत होती तो नाचत होता, हसत होता पण काही ना काही लपवत होता. दोन एक तास पार्टी इन्जॉय केल्यावर मी त्याला म्हणालो…

मी- चल ड्राईव्ह पे चले.
तो- ठीक चल. रिंकी ला ड्रॉप करु या आधी, नाइट शिफ्ट आहे तीची.
मी – ठीक. चल.

आम्ही खाली पार्किंग मध्ये आलो, दोघांच्याकडे पण सेम गाडी होती त्यामुळे मी माझी गाडी येथे पार्किंगमध्येच उभी ठेवली व त्याच्या बरोबर गाडीत बसलो व मागील सिटवर रिंकी. पार्किंग लॉट मधून बाहेर येताना त्यांने जरा नशेमुळे गडबड केल्यावर मीच गाडी चालवायचे ठरवले, मी गाडी चालवत होतो, वसंतकुंजला रिंकीला ड्रॉप करायचे होते, तो नशेमध्ये चूर झाला होता, खुपच बियर पिली होती त्याने. ६०-७० च्या स्पिड मध्ये मी गाडी चालवत होतो व मागील सिट वर बसलेली रिंकी चोरुन चोरुन माझ्याकडे बघत आहे ह्याची मला कल्पना आलीच होती…. तीच्या घरासमोर तीला ड्रॉप केले व ती त्याला बाय करुन माझ्या विंन्डोजवळ आली व बाय करुन एक स्माईल देऊन गेली… मी गाडी वळवली व सरळ हायवे च्या दिशेने चालू लागलो तोच मागे एक फोन वाजू लागला मी मागे पाहीले तर रिंकीच्या हात असलेला फोन मागे सिट वर पडला होता त्याला मी आवाज दिला पण तो फुल्ल नशेमध्ये होता त्यामुळे मीच मागे हात घालून फोन हातात घेतला. फोन वर होम ब्लिंक होत होते म्हणजे रिंकीच घरातून फोन करत असावी, मी फोन उचलला.

मी- हलो, रिंकी ?
ती- हो. स्वारी माझा फोन गाडीतच राहिला.
मी- हो आताच पाहीला मी पण चल मी येतो परत देण्यासाठी.
ती- आता नको, माझी कॅब पण आली आहे मी कामावर जात आहे, एक काम कर परत येताना मला कंपनीमध्ये देऊन जा तू, जर तुला हरकत नसेल तर.
मी- अरे काही हरकत नाही, दोन एक तासाने ह्याला ड्रॉप करुन मी येईन, तुझ्याच नंबर वर एसएमएस कर तुझा कंपनी अड्रेस.
ती- ठीक.

तीने हसून फोन कट केला, ह्याला कुठे घेऊन जाऊ हा विचार करत मी कधी रिंकीचा विचार करु लागलो कळालेच नाही, समोरुन ट्रकचा येणार प्रखर ज्योत माझ्या डोळ्यावर पडल्यावर मी अचानक ब्रेक मारले व गाडी एका बाजूला कलंडत आहे असे वाटले …. व गाडी कश्यावर तरी जोरात आदळली…..


****
क्रमशः

फक्त कथा आहे, कुठे ही साम्य वाटले तर तो फक्त योगायोग समजावा ही विनंती.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: