राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

माय व्हॅलंटाईन

माय लास्ट व्हॅलंटाईन !

कशी आहेस तु ? आनंदात आहेस ना ? मला विसरली आहेस ना आता नक्कीच ? असे अनेक प्रश्न मला विचारायचे आहेत गं. पण त्या प्रश्नांना तुझ्या पर्यंत कसे पोहचवू ! चल हरकत नाही मी पाहतो आहे ना तुला ह्यातच आनंद आहे ! तुला जाणवत नसेल की मी तुझ्या आसपास आहे.. माझं मन तुझ्याच आसपास घुटमळत आहे… !

कित्येक वर्ष झाली मला तुला काही गिफ्ट देऊन पण.. तुला आठवतं का ? आपला लास्ट व्हॅलंटाईन डे ? नेहमी प्रमाणेच मी आलो होतो तुझ्या जवळ… पण आपल्या बाबांना आसपास पाहून नजरेच खुणवले होते… नंतर .. कसं विसरु ते मी ! तु दिलेले एकएक गिफ्ट माझ्या घरी अजून ही असेल. … ती कोमजलेली फुलं.. तो माझ्या नावाचा काचेचा गोलक.. ते तु दिलेला.. पेन …. ती ग्रिटिंग कार्डस… सर्व काही आहे अजुन ही माझ्या बॆगेत.. ! मी दिलेले गिफ्ट तु असेच जपुन ठेवले आहेस का ? ह्म्म.. नसावी.. तु नाही ठेवणार मला माहीत आहे… ! हरकत नाही..!

तु नेहमी म्हणायचीस .. आपलं प्रेम कसं नजर लागण्यासारखं आहे नाही… लोकांना तर नवल वाटत असे… ही विचित्र जोडी पाहून… तु परी सारखी रेखीव व मी असाच नमुना ! तरी ही आपलं प्रेम फुललं पण न जाने कुनाची नजर लागली… असल्याचं नसलेले झालं ! हरकत नाही यार हे सगळे माझं नशीब खोटं … त्यामुळे !

तुझ्या प्रत्येक शब्दांना मी जपावं व तुझ्या साठीच शेवट पर्यंत श्वास घ्यावा, हा असला विचार मी खुप वेळा केला…. व्हॅलंटाईन डे आला परत.. दर वर्षी येतो… ह्यावेळी पण आला ! तुझी आठवण आली… ! येऊ नये ह्यासाठी खुप प्रयत्न केला.. पण मी वेडा.. !
तुझ्याच आठवणीमध्ये झुरतो.. आहे.. असाच.. वेड्यासारखा ! कधी तरी जाईन ही हे जग सोडून.. तेव्हा मात्र मला खरोखर आनंद मिळेल.. मुक्त झाल्याचा आनंद !

तसं पाहता ह्या दिवसाचं मला काहीच अप्रुप नाही गं …. असे अनेक दिवस येतात जाता.. प्रेमी-प्रेमिका आपले मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी हाच दिवस वापरतात… सगळेच वापरतात म्हणून मी देखील वापरत होतो बस्स ! पण आज तु जवळ नसल्यावर मला खरंच ह्या दिवसाचं महत्व कळालं गं ! कधीच आठवण येऊ देत नाही मी तुझी… पण ह्या दिवशी मी मात्र असाह्य होतो… अगनिक एसएमएस.. मेल… मित्रांचे संदेश.. व प्रत्येकामध्ये.. प्रेमाचा इजहार ! कसं गुदमरल्या सारखं होतं मला हे तुला नाही समजणार कधी ! तु कधी आपलं कोणीतरी हरवलं आहे.. दुर गेलं आहे… असा विचारचं केला नसशील त्यामुळे तुला काहीच वाटत नसेल … त्यामुळेच तुला कळनार नाही विरहाचं दुख: काय.. आहे… माझ्या मनाची उलाघाल समजणं तुला जमणारच नाही… शक्यतो हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत हे मला ही माहीत आहे.. .. तु आता माझी नाहीस हे देखील.. पण कधी तरी… कुठल्यातरी जन्मामध्ये तु फक्त माझीच होण्यासाठी नक्कीच ये …

******************

काही नाती… कधीच जुळत नाही ! पण त्या नात्यांच्या मुळे होणा-या अगणिक जखम घेऊन कोणी तर असाच माझ्या सारखां अश्वथामा वावरत असेल… कुठे तरी… बाबा रे… हे दुख:.. प्रेम… नशा… काहीच नाही रे ! उगाच झुरत नको बसू…. कुठल्यातरी… कोप-यावर.. जिवनाच्या अनोळखी वळणावर… कोणी ना कोणी तर आपलं भेटेल… त्याचा हात पकड ! जगण्यातला आनंद तुला नक्कीच सापडेल रे भावा ! आम्ही काय रे ! आलो काय गेलो काय…. आता संपलोच आहे… असाच एखादा क्षण मला मुक्त करुन जाईल !

त्या दिवशी… माझा व्हॅलंटाईन पण माझ्या ऋणातून व मी त्याच्या ऋणातून मुक्त होईन.

*******************
दिल-ए-नादान अजब जुस्तजू में क्यूँ है
तुझसे शौक-ए-गुफ्तगु में क्यूँ है
मैंने चाहा है बहुत तुझ को
तु मेरी हर एक आरजू में है
तु मेरे साथ है तो लगता है ऐसे
एक उजाला सा मेरी रूह में है
जुदा खुद से करूं तो कैसे करूं
तेरी चाहत तो गर्दिश-ए-लहू में है। – अनाम कवी

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: