राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

शेयर मार्केट (बेसिक) भाग -३

मागील भागामध्ये आपण अकाउंटसाठी काय काय करावे लागेल व ब्रोकरेज म्हणजे काय हे पाहीले आता आपण आपले ट्रेडिंग कसे करावे हे शिकू.

ऑनलाईन ट्रेडिंग म्हणजे तुमच्या व्यक्तीगत संगणकावर कंपनीने प्रोव्हाईड केलेल्या प्रणाली द्वारे शेयरची खरेदी / विक्री करणे.
व ऑफलाईन ड्रेडिंग म्हणजे ब्रोकर ने केलेली व्यवस्था ज्याद्वारे तुम्ही त्याच्या ऑफिस मध्ये / ट्रेडिंग हाऊस मध्ये जाऊन अथवा फोन करुन आपल्या शेयरची खरेदी / विक्री करु शकतात.

ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये कंपनी तुम्हाला एक ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस सुविधा अथवा एक ओडिएन डाएट / नाव्हो नावाची प्रणाली प्रोव्हाईड करतात ज्याद्वारे तुम्ही खरेदी / विक्री चालू करु शकता.


ओडिएन प्रणाली

ओडिएन चांगले आहे व वापरावयास सोपे पण आहे.

*

ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेसमध्ये कंपनी तुम्हाला जावा बेस्ड सुविधा प्रोव्हाईड करते त्यासाठी तुमच्या संगणकावर एक छोटीसी प्रणाली जावा व्हर्चुअल मशीन (Java Virtual Machine ) प्रस्थापीत करावी लागते. त्यानंतर तुम्हाला दिलेल्या युजरनेम व पासर्वड द्वारे तुम्ही आपल्या ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस मध्ये प्रवेश करु शकता.

जेव्हा तुम्ही ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस मध्ये प्रवेश कराल तेव्हा सर्व प्रथम तुम्हाला आपल्यासाठी स्क्रिप्ट प्रोफाईल तयार करावे लागेल.
स्क्रिप्ट प्रोफाईल म्हणजे तुम्हाला ज्या शेयर्स मध्ये ट्रेडिंग करावयाचे आहे त्याची एक लिस्ट.

जर तुम्ही सेक्टर प्रमाणे आपली लिस्ट तयार केली तर शेअर वर नजर ठेवण्यासाठी सोपे जाते.
उदा. बँकिंग सेक्टर साठी एक प्रोफाईल , आयटी सेक्टर साठी एक व अ‍ॅटोमोबाईल साठि एक प्रोफाईल.
ह्याचा फायदा हा आहे की तुम्ही एकाच वेळी एका सेक्टर मधील उतारचढाव व्यवस्थीत पाहू शकता व गोंधळ पण होणार नाही.

ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस मध्ये काही चांगल्या गोष्टि आहेत जसे की नवीन वापरकर्ताला ह्याचा वापर एकदम सुसह असतो जास्त अडचण वाटत नाही… सर्व काम माऊस द्वारे होऊ शकते. पण जर तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर आहात तर मात्र ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस तुमच्यासाठी नाही.. कारण येथे थोडा वेग कमी पडतो ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेसचा.

*

जर तुम्हाला कंपनी ओडिएन डाएट / नाव्हो नावाची प्रणाली देत असेल तर त्यांची स्थापना पण कंपनीचाच व्यक्ती करुन देईल व त्याच्याकडून थोडे बेसिक माहीती सुध्दा भेटेल.
ज्यांना फास्ट ट्रेडिंग करायचे आहे ( म्हणजे दिवसाला कमीत कमी २५ च्या वर ट्रेड ) त्यांच्यासाठी ओडिएन डाएट / नाव्हो नावाची प्रणालीच गरजेची आहे कारण ह्यामध्ये सर्वकाम किबोर्ड द्वारे होते व वेगाने ऑर्डर ईन्ट्री करता येते तसेच शेयरचा ग्राफ / मार्केटचा उतारचढाव / सेक्टर प्रमाणे चढ-घट घ्याची सर्व माहिती तुम्हाला आपल्या स्क्रीन वर दिसत राहते व त्यामुळे वेगाने निर्णय घेता येतो.

*

जेव्हा तुम्ही एखादी एक स्क्रिप्ट आपल्या प्रोफाईल मध्ये सेव्ह करता त्याच्यावर राईट क्लिक करुन / अथवा एफ१ दाबला तर खरेदी विंन्डो तुमच्या समोर येतो व तुम्ही तेथे तुम्हाला काही इंन्ट्री करावी लागेल, जशी तुम्हाला किती शेयर विकत घेणे आहेत, काय रेट ने विकत घेणे आहेत, मार्केट रेट ने घेणे आहे की तुम्हाला हव्या त्या किंमतीला.

समजा तुम्हाला Sesa Goa स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला खरेदी (इच्छुक भाव) २५०.१५ पैसे दिसत आहे व विक्री (इच्छुक भाव) २५०.७५ जर तुम्हाला खरेदी करायचे आहे तर दोन मार्ग आहेत जो विकणारा आहे त्याचा रेट २५०.७५ आहे तर तुम्ही तुमचा खरेदी भाव २५०.७५ ठरवून घेऊ शकता पण जर तुम्हाला २५०.१५ नेच विकत घेणे आहे तर तुम्हाला तो भाव ठरवावा लागेल पण जो पर्यंत २५०.१५ च्या भावाने विक्रेता येणार नाही मार्केट मध्ये तो पर्यंत तुम्हाला तो शेयर मिळणार नाही.
समजा एखाद्याने आपला विक्रि रेट २५०.१५ ठरवला तर लगेच तुम्हाला शेयर मिळतील असे नाही, कारण तुमच्या प्रमाणेच अनेकजण तो रेट लावून वाट पाहत असतील , तर सिस्टम तुम्हाला नंबर प्रमाणे शेयर देत राहतो म्हणजे समजा तुम्हाला १०० शेयर खरेदी करायचे आहेत व तुमच्या आधी ४०० शेयर त्याच रेटने खरेदी होण्यासाठी वेटिंगमध्ये आहेत तर आधी त्यांना मिळेल व मग तुम्हाला.

समजा तुमच्याकडे १०० शेयर सेसागोवाचे जमा झाले, खरेदी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे शेयर जमा झाले की नाही हे पहाण्यासाठी तुम्हाला ट्रेड रिपोर्ट चेक करावे लागेल जेव्हा तुमच्या ट्रेड रिपोर्ट मध्ये व नेट पोझिशन मध्ये शेयर दाखवत असेल तेव्हाच तुम्ही ते शेयर विकण्याची प्रक्रिया चालू करा नाही तर शॉर्ट सेलिंग होईल ( हे नंतर समजावून घेउ की शॉर्ट सेलिंग म्हणजे काय) शेयर विकण्यासाठी तुम्हाला खरेदी भाव काय आहे ह्याचा अंदाज घ्यावा लागेल.

१ शेयरची किंमत = २५०.१५ पैसे X १०० = २५०१५.०० रु. जो मार्केट रेट आहे त्याप्रमाणे.
व तुम्ही ते १०० शेयर २५१.५० पैसेच्या भावाने विकले तर २५१५०.०० रु.

काय काय खर्च जोडला जातो त्याची माहीती.

खर्च नंबर एक = ब्रोकरेज = ३ पैसे इंन्ट्राडेवर / डिलेव्हरी वर ३० पैसे.
खर्च नंबर दोन = सर्व्हिस टेक्स =१०.३% बोकरेजवर
खर्च नंबर तीन = एसटीटी ( सिक्युरिटी ट्रानजेक्शन टॅक्स ) = इंन्ट्राडे वर ०.०२५% विक्रिवर फक्त / डिलेव्हरी विक्रिवर ०.१२५% खरेदी विक्रीवर

१०० शेयर खरेदीवर २५०१५.०० रु. चा खर्च.
२५०१५.०० रु वर ब्रोकरेज ३ पैसे प्रमाणे ईन्ट्राडेवर ७.५० पैसे. / ३० पैसे दराने डिलेव्हरीवर ७५.०५ पैसे.
ब्रोकरेजवर सर्विस टेक्स ईन्ट्राडेवर ०.७७ पैसे. / डिलेव्हरीवर ७.७८ पैसे.
_______________________________

२५०२३.२७ ह्या भावाने तुम्हाला १०० शेयर भेटले (सर्व खर्च जोडून) ईन्ट्राडेवर.
२५०९७.८३ ह्या भावाने तुम्हाला १०० शेयर भेटले (सर्व खर्च जोडून) डीलेव्हरीवर.

आता

विक्री = २५१५०.०० रु.

१०० शेयर खरेदीवर २५१५०.०० रु. चा खर्च.
२५१५०.०० रु वर ब्रोकरेज ३ पैसे प्रमाणे ईन्ट्राडेवर ७.५५ पैसे. / ३० पैसे दराने डिलेव्हरीवर ७५.४५ पैसे.
ब्रोकरेजवर सर्विस टेक्स ईन्ट्राडेवर ०.७८ पैसे. / डिलेव्हरीवर ७.७७ पैसे.
विक्रीसाठी एसटिटि ( सिक्युरिटी ट्रानजेक्शन टॅक्स ) इंन्ट्राडेसाठी ६.२९ रु. / डिलेव्हरीवर ३१.४४ रु.

विक्रि खर्च काढून तुमची विक्री रक्कम = २५१३५.३८ ईन्ट्राडेवर
विक्रि खर्च काढून तुमची विक्री रक्कम = २५०३५.३४ डिलेव्हरीवर.

आता तुम्हाला फायदा झाला की तोटा हे पाहू.

ईन्ट्राडे वर…

खरेदी भाव – २५०२३.२७
(वजा) –
विक्रि भाव – २५१३५.३८
___________
एकुन -११२.११

म्हणजे ईन्ट्राडेवर तुम्हाला ११२.११ पैसे फायदा झाला ( नेट पोझीशन मध्ये फायदा नेहमी वजा व तोटा नेहमी आधी चिन्हाने दाखवला जातो)

डिलेव्हरीवर…

खरेदी भाव – २५०९७.८३
(अधिक) +
विक्रि भाव – २५०३५.३४
___________
एकुन +६२.४९

म्हणजे डिलेव्हरीवर तुम्हाला ६२.४९ पैसे तोटा झाला ( नेट पोझीशन मध्ये फायदा नेहमी वजा व तोटा नेहमी आधी चिन्हाने दाखवला जातो)

ह्याचा अर्थ तुम्हाला डिलेव्हरी मध्ये प्रॉफिट मार्जिन नेहमी इन्ट्राडे पेक्षा जास्त ठेवावे लागेल कमीत कमी डिलेव्हरीचा खर्चाचा अंदाज घेऊनच शेयर विक्रीची किमंत ठरवावी जेणे करुन तुम्हाला नकळत तोटा होणार नाही.

पुढील भागात आपण चार्ट / ग्राफ पहाणे व इंट्राडे टिप्स कसे काम करतात ते पाहू.

छायाचित्र गुगलद्वारे
क्रमश :

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: