राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

अहिंसावादी – म्हणजे काय ?

मी जैन !

त्यामुळे लहानपणापासूनच मी अहिंसा अहिंसा चा जाप करताना घरापासून बस्ती (जैन मंदिर) पर्यंत लोकांना / मुनींना पाहीले आहे त्यात मला काहीच नाविन्य नाही पण भटांच्या एकाला चित्रकलेला (डिजिटल कला) एका मिपाकरांने प्रतिसाद दिला की मला पहिले आवडले व दुसरे नाही कारण ते अहिंसावादी आहेत म्हणून.

आता मला एक गोष्ट नेहमीच भेडसावत असते… ती गोष्ट त्यांच्या त्या वाक्याने एकदम मनात परत आली व त्यासाठी हा काथ्याकुट !

जगदिश चंन्द्र बोस ह्यांनी १९३७ पुर्वीच हा शोध लावला होता की वनस्पती व झाडं ह्यांना जाणीव असते म्हणजे त्यांच्या पण जीव असतो ते सजीव आहेत, आता हिंसा म्हणजे काय ? एखाद्याने एखादाचा जीव घेणे / विनाकारण जीव घेणे म्हणजे हिंसा हाच अर्थ मला माहीत आहे व शक्यतो तुम्हाला ही.

आपण खाण्यापासून ते कागदापर्यंत अनेक कारणांनी वनस्पती / झाडे ह्यांची हत्याच करत आलो आहोत की मग ? कारण जगदिश चंन्द्र बोस ह्यांचे संशोधन आपण मान्य करतो ( जगाने मान्य केले) म्हणजे आपण मानतो की वनस्पती सजीव आहे त्यानुसार आपण एखादी वनस्पती तोडली तर ती हत्याच ना ? मग आपण अहिंसावादी कसे ?

जर आपण स्वतःला अहिंसावादी म्हणतो तर आपण उठता बसता अनेक हत्या करतो हे कोणालाच माहीत नसावे ? अनेक प्रकारच्या केस्मेटीक क्रीम मध्ये व्हेल मासा पासून प्राप्त केलेले तेल (चरबी) वापरली जातेच की, मागे मॅड टिव्ही वर पाहीले जे ब्रेश आपण आपल्या मुलाला चित्रकलेची आवड लागावी म्हणून विकत आणून देतो त्या ब्रेश साठी अनेक छिछुंदर ( * मराठी शब्द) ह्या प्राणांची हत्या केली जाते ! एका छिछुंदर चा जीव घेतला तर फक्त दहा ब्रेश तयार होता आता बोला.

सर्वात सर्व जागी सहज पणे मिळणारे डिझेल / प्रेट्रोल व इतर त्यांचे उप पदार्थ हे पण जैविक इंधन आहे … म्हणजे कोणाकडून तरी हत्या झालीच ना.. भले ती निसर्गाकडुन होऊ दे !

काही गोष्टी जश्या.. बुट / चपला / पर्स / वायरींगचे सामान / हिरे छाटणीचे काम लहान मुलांच्या कडून अत्यंत अत्याचार करुन करुन घेतले जातात… त्यांना मानसिक / शारिरिक इजा केली जाते म्हणजे ती देखील एक प्रकारची हिंसाच ना 😕

आपण अजारी असल्यावर काही दवादारु करतो.. मेडीसीन खातो / पीतो ! काही अशा मेडीसीन मध्ये देखील काही जिवांची हिंसा करुनच त्याच्या तील उपयोगी द्रव्य / पदार्थ वापरला जातो ..

जर वर दिलेल्या उदाहरणांना तुम्ही गरज म्हणत असाल तर मग आपण हिंसेचेच समर्थन करतो असे वाटत नाही का ?

आपण पुर्ण पणेच परजीवी आहोत असे तुम्हाला वाटतं का ?

जर आपण परजीवी आहोत मग आपण अहिंसावादी कसे ठरतो 😕

Advertisements

2 responses to “अहिंसावादी – म्हणजे काय ?

  1. Mahendra सप्टेंबर 25, 2009 येथे 10:27 सकाळी

    झाडांना/वनस्पतींना नर्व्हस सिस्टीम नसते म्हणुन त्यांचा वापर करणं ही हत्या होत नाही. जर नर्व्हस सिस्टीम नाही, म्हणजेच, दुःख, वगैरे नाही असाही दावा केला जातो.. गीतेमधे सांगितलंय की एका जीवावर दुसरा जीव जगतो.. शंभर टक्के अहिंसावादी कोणिच होऊ शकत नाही.

  2. Anonymous सप्टेंबर 25, 2009 येथे 5:59 pm

    माझ्या माहितीप्रमाणे वनस्पतिज अन्नात निषिद्ध भाग ५०टक्क्यांपेक्षा कमी असल्याने ते सात्त्विक अन्न मानले जाते. अशा अन्नाच्या सेवनाने हिसक प्रवृत्ती दूर ठेवता येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: