राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

भटकंती तिसरा स्टॉप – दिल्ली -११०००६

दिल्ली पीनकोड ६ भाग असेलही असा, पण बाकी दिल्लीत तो असा बेटासारखा राहू शकेल का? – मनिष ह्यांचा एक प्रतिसाद. हे वाचल्यावर मनात आलं की चला जरा मिपा करांना दिल्ली-६ ची सफर घडवू या. दिल्ली-६ चित्रपटात दाखवलेला भाग हा दिल्ली-६ चा नाहीच आहे, पोलिसांनी व सरकारने सुरक्षतेचे कारण करुन दिल्ली-६च्या टिमला शुटिंग करुच दिलेले नव्हते, त्यांनी दिल्ली पासून दुर राजस्थानमधील एका लोकेशनवर ते शुटींग केले आहे काही भागाचे.

***

चांदणी चौकचा परिसर

जुन्या काळातील चांदणी चौकचा परिसर

लाल किल्याच्या लाहोरी गेटच्या समोरील भाग म्हणजेच दिल्ली-११०००६.
दिल्लीतील सर्वात प्रसिध्द असा चांदणी चौकचा परिसर. जवळ ३०० वर्षापुर्वी वसलेला हा दिल्लीचा भाग एक महत्वपुर्ण भाग. भारतातील प्रमुख धर्म तुम्हाला येथे प्रामुख्याने पहायला मिळतात, हिंदु, जैन, मुसमान, ख्रिच्चन व सिख. येथे ह्या धर्माची श्रध्दास्थाने देखील जवळ जवळच आहेत. शंकर मंदिर, रामलिला मैदान, जैनांचे लाल मंदिर, जामा मसजिद व सिखांचे सिसगंज गुरुद्वारा , ख्रिच्चनांचा चर्च, हे मुख्य नाही तर दोन किलोमिटरच्या परीसरातील मंदिरे व धर्मस्थळे ह्यावर लिहायला बसले तर एक चांगला मोठा लेख तयार होइल इतकी त्यांची संख्या.
ज्यांना दिल्लीची गर्दी अनुभवांची आहे त्यांनी येथे एक चक्कर जरुर मारावी, प्रचंड गर्दी, गोंधळ व धावपळ, मध्येच सायकल रिक्षावाले.. बाजूला ओरडणारे फेरीवाले.. मंदिरातून.. येणारा घंटानाद, मसजिद मधून येणारी प्रार्थनेची बांग, गुरुद्वारातून येणार एक ओंकार.. सगळे एकसाथ एक वेळ चालू असतं, सकाळी ७ वाजल्या पासून येथील रस्ते भरुन जातात ते मध्य रात्रीपर्यंत हलचल चालूच असते.
ह्या भागाचं एक वेगळे पण म्हणजे ज्या धर्माचा सण आहे त्या धर्माच्या रंगात हा भाग नाहून निघतो.. शिवरात्री असो वा दिवाळी.. सगळी कडे त्या दिवसाच्या निमित्याने व्यापार होतो… ईद असो वा गुरु दिन तोच रंग तुम्हाला दिसेल. भरीस भर म्हणून जगप्रसिध्द २६ जानेवारीची परेड चा रुट देखील येथून जातो. समोरच असलेला लाल किल्ला व धर्मस्थळे ह्यामुळे येथे येणा-या पर्यटकांची संख्या अफाट असते. मी कधी ही तीकडे गेलो तर मला नेहमीच त्या जागेचे काही ना काही तरी वेगळे पण जाणवतं, येवढ्या धर्माचे, भारतातील कानाकोप-यातून आलेला समुदाय ह्या इवल्याश्या जागे मध्ये कसा समावला असेल, अरुंद बोळ, गल्ल्या, एकदम शतकापुर्वीच्या पध्दतीचे दोन-तीन मंजीली इमारती, त्या इमारतीवर असलेल्या बरसाती, गल्ली बोळातून लोंबकळणा-या तारा.. आडवे तीडवे खांब, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसलेले फेरीवाले.. छोटे दुकानदार, खाण्यापिण्यांची असंख्य दुकाने, पराठेवाली गल्ली, नटराज दहि-भल्ले, सर्वत्र पसरलेला अतराचा सुगंध.. सगळं विचित्र वाटतं तरी ही कुठंतरी आपण पण त्याच गर्दीचा , त्याच वातावरणाचा भाग झालेलो असतो.

शहाजहानची सर्वात मोठी मुलगी जहांआरा साठी निर्माण करण्यात आलेला हा सराय (परिसर) सुंदर गार्डन व एतिहासिक वास्तूनीं नटलेला हा भाग खरं तर लाहोरी गेट पासून फतेपुर मसजीद पर्यंत जाण्यासाठी तयार केलेला मार्ग. हा चार भागामध्ये विभाजित केलेला आहे १. उर्दु बझार, २. फुल मंडी ३. जैहरी बझार / असर्फि बझार ४. चादंणी चौक. येथे इंग्रजांनी बांघलेला एक ११० फुट घंटाघर (घड्याळ टॉवर) बांधलेला होता तो १९५१ मध्ये पाडून मार्केट साठी जागा वाढवली गेली. हा भाग मला वाटतं भारतीय इतिहासाचा एक मुक साक्षीदार आहे, मुघल राजांनी केलेल्या हत्या, गुरु तेगबहाद्दुर ह्यांचे केलेले सिर-कलम व अनेक गोष्टी ह्या भागात घडल्या, पण तसाच हा भाग भारतीय स्वातंत्र्यातील अनेक मोठ मोठ्या घडामोडीला देखील साक्षीदार आहे.

येथे काय नाही मिळत, कपड्यापासून ते इलेक्टॉनिक वस्तू पर्यंत, चादरी पासून ते मखमली कालिन पर्यंत सगळे विकले जाते, खाण्यापिण्याच्या वस्तूची तर येथे रेलचेल आहे, पण येवढं सगळं असताना ह्या भागाचा विकास का नाही झाला, माझ्या नजरेने जे पाहीले त्यानुसार ह्या ला जबाबदार काही अंशी सरकार जरी असले तरी देखील येथील गर्दी व तंग रस्ते ह्यामुळे सरकारला काही ही करायला तयार होत नसावी, मी एकदोन जणांशी जेव्हा ह्या बद्दल बोललो ते ते म्हणाले “राज, दिल्ली का दिल है यह.. एक दिन भी यहा काम रुक गया तो समजो दिल्ली रुक गई.” एका अंशी हे खरं वाटतं. खरोखर दिल्ली -६ हे दिल्लीचे दिलच आहे, जर दिल्ली जाणून घ्यायची असेल तर एकदा का होईना दिल्ली-६ ला भेट दिलीच पाहीजे.

सिसगंज गुरुद्वारा

* सर्व फोटो महाजालावरून सभार.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: