राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

माझी सफर – अयोध्या – कानपूर वारी — भाग -२

थोडी शोधा शोध केल्यावर विश्व हिंदू परिषद चे कार्यालय भेटले पण तेथे राजीव जी नव्हते अचानक कोणीतरी महत्वाचा व्यक्ती कानपुर येथे आलेला होता व त्याच्या बरोबर ते कानपुर ला कार्यशाळा घेत होते, माझे मन जरा घाबरलेच अरे यार आता काय करावे ? दुर-याला स्वत:ची अडचण सांगणे माझा स्वभाव नव्हताच त्यामुळे काही न बोलता बाहेर आलो मी मनात म्हटलं चला काही तरी देवाच्या मनात वेगळेच आहे जे होत आहे त्याला हो म्हण. ईकडे तीकडे जरा फिरण्याचा विचार करुन थोडे अयोध्या दर्शन घेण्याचे ठरवले व त्या नूसार राम मंदीराकडे निघालो, तेथे पोहचताच माझ्या एका विशाल व भव्य मंदीराची कल्पनाच अस्त-व्यस्त झाली, व चारी बाजूला पोलिसांचा गरडा, सैनिकांची धावपळ व मधोमध श्री राम मंदिर विराजमान. दर्शन झाले न झाले सगळच ठीक होते पोलिस कोणाला जाऊच देत नव्हते, तेव्हा पाच कोसाची प्रदिक्षणा पुर्ण केली व अयोध्या येथे स्थित जैन मंदिरांकडे मोर्चा वळवला. अयोध्या येथे ५ जैन तिर्थंकरांनी जन्म घेतला असे मी वाचून होतोच त्यानूसार सर्व प्रथम नेमीनाथ जैन मंदिराकडे गेलो व जाताच पहीला प्रश्न जो मला कधीच अपेक्षीत नव्हता, गेटवरच एक महाशय भेटले ” अरे अंदर कहा जा रहे हो ? कोण हो ? कहा से आए ? काय काम है ? किस से मिलना है ? ” मी चकित अरे मंदिरामध्ये लोक का जातात ? मी उत्तर दिली ” मै राज जैन हूं कोल्हापूर से हूं, भगवान जी के दर्शन करने है ” एवढ्यावर त्या बिचा-या व्यक्तीचे समाधान झाले नाही व व तो म्हणाला ” अच्छा जैन हो, चलो नमोकार मंत्र तथा दर्शन मात्रे गा के दिखा ” आता मात्र माझे डोके गरम झाले व त्याला मी म्हणालो ” यह देखो साब, नमोकार मंत्र हो गा सकता हूं पर दर्शन मात्रे का एक भी मंत्र आरती याद नही है … ना मै यह समजता हूं की इसकी कोई जरुरत है ? भारतीय कानून के मुताबीक कोई भी अंदर जा सकता है.. तथा मै तो खुद पैदायशी जैन हूं” आप मुझे महाराष्ट्र के किसी भी जैन महाराज या मंदिर के बारे मैं पुछ सकते हो” झाले इतके बोलल्यावर तो भडकलाच व मला धक्के मारुन मुख्य गेटच्या बाहेर उभे केले व म्हणाला “जा , अपने कानून के पास” अंहिंसेच्या देवाची पुजा करणा-या व्यक्तीने धक्के / मारामारी करत मला बाहेर काढले. मी विचार केला अरे बापरे मी तर हिंदू आहे तर हा माझा हाल जर चुकून कोणी मुसलमान वैगरा मंदिरामध्ये दर्शनासाठी आला तर त्याला हे लोक त्याला कापूनच काढतील. ह्या प्रकारानंतर ईतर जैन मंदिरांकडे जाण्याचा माझा विचार देखील रद्द झाला व मी आपला परत रेल्वे स्टेशन जवळ आलो तर कळाले की संध्याकाळी ७.०० वाजता रेल्वे आहे तेव्हा थोडाफार टाईम पास केला व रेल्वेची वाट पाहू लागलो, कधी नाही ते रेल्वे एकदम वेळे वर ७.५० वाजता आली व मी धावपळ करुन जनरल डब्ब्यात चडलो.

कानपुर मध्ये रात्री १२.०० / १.०० च्या दरमान पोहचलो व जो पत्ता अयोध्या येथे सांगितला होता तो विश्व हिंदू परिषद, लाल मंदिर मैदान, कानपूर बस इतकाच होता, एक दोन रिक्षा वाल्यांना विचारले तर कोणी २०.०० रुपये तर कोणी २५.०० रुपये मागीतले , खिश्यात तर फक्त पन्नास रुपये राहीले होते व मला जेवण ही करायचे होते तेव्हा रिक्षाने जाण्याचा विचार टाळला, व पायीच निघालो, २ / ३ किलोमीटर चालल्यावर समोर सर्कल मध्ये एक पोलिस गाडी व काही पोलिस उभे दिसले जिवनात कधीच चुकीचे काम {पोलिसांच्या हाती पडण्या ईतके}
केले नव्हते त्यामुळे भिती ही वाटली नाही व मी सरळ त्यांच्या जवळ गेलो पोलिसांच्या गाडी वर लिहले होते “आपके लिए, आप के साथ, हमेशा” मी थोडेस धाडस केले व त्यांना पत्ता विचार ला झाले पोलिसांना दोन तासासाठी मी टाईमपास ठरलो ,
पोलिस : ” कहा से आया बे ?”
मी : “हूं तो कोल्हापुर महाराष्ट्र का पर अभी अयोध्या से आया हूं”
पोलिस : ” यहा क्या करने आया बे ? तुम्हारे ईस थैले में क्या है? दिखा जल्दी, साले कही असला {दारु-गोळा} तो पार्सल नही कर रहा हैं ना ? “
मी जाम घाबरलो मी म्हणालो “नाही नाही देखो कुछ भी नही है मेरे थैले में “
थोडे फार शोधा शोध करुन {केल्याचे नाटक करुन} मला तो म्हणाला ” देख अभी तो मै तुम्हे जाने नही दे सकता साब आने दे फिर देखेंगे”
मी तेथेच शेकोटी समोर बसलो व विचार करु लागलो की पुढे काय ?
तासाभराने त्यांचे साब आले व थोडी फार तीच कथा पुढे करित माझे कपडे व माझी त्यांच्या भाषेत तलाशी घेतली व मला पुढे जाण्याचा रस्ता सांगून जाऊ दिले. मी हुश करु लाल मंदिराजवळ पोहचलो तर कार्यालयामध्ये सर्वजन झोपले होते तेव्हा मी तेथेच गेटवर रात्र काढायची हे ठरवून बाहेर बसलो. जी लोक येथे दिल्ली बाजूला जानेवारी महिन्यात आली असतील तर त्यांना कल्पना असेल की येथील थंडी काय चीज असते त्यावेळी अंगावरचे कपडे सोडुन माझ्या जवळ अंगावर घेण्यासारखे काहीच नव्हते, तरी ही मी बाहेर बसलोच कसा हेच आज मला कळत नाही. सकाळ चे ५.३० वाजले असतील एक गुरखा जो रात्री गस्त घालत होता तो माझ्या जवळ आला व माझी विचार पुस केली मी जेव्हा त्याला राजीव जींचे नाव सांगितले तसा तो उडालाच व म्हणाला ” क्या तुम राजीव जी के जाणकार हो , माफ करना भाई उन्हे मै अभी जगा हूं” असे बोलून तो पळतच आत गेला, पण तो पर्यंत थंडीमुळे माझे अंग आकडून आले व शक्यतो मी बेशुध्द देखील पडलो किंवा प्रचंड झोप आली असे काहीतरी झाले असावे, पण जेव्हा थोड्या वेळाने जाग आली तेव्हा दोन-चार जण माझ्या जवळ सोप्यावर बसले होते व मी एका बेड वर पडलो होतो मी लगेच उठलो तेव्हा एक व्यक्ती बोलला ” अरे काई बात नही लेटे रहो, तो तुम ही राज जैन हो क्या दिवेदीजी का फोन तो आया था तुम्हारे बारे में, पर जब मेरा यहा आने का कार्यक्रम बना तो मैंने वापस फोन किया था पर तब तुम वहा से निकल चुके थे, चलो काई बात नही तुम सही जगह पोहच तो गये.” थोडा नहा धो के तयार हो जायो हमे कही जाना है, आज से तुम्ह मेरे साथ ही रह ना ठीक है” मी देवाचे नाव घेतले व म्हणालो चल देवाची कृपा आहे अजून माझ्यावर.

थोड्या वेळाने मी तयार होऊन त्यांच्या समोर गेलो व विचारले की मला काय काम करावयाचे आहे ते सांगा त्यानूसार मी तयारी करतो त्यावर ते फक्त हसले व म्हणाले ” अरे भाई, तुम्ह थके हूये अभी आये हो, थोडा ईधर उधर देख लो जो भी काम अच्छा लगे वही तुम करना ” मी देखील थोडा हसलो व लगेच काम शोधावयास चालू केले तेव्हा मला समोरच पुस्तकांचा गठा पडलेला दिसला व एक कार्यकर्ता तेथे त्यावर पत्ते लिहीत होता त्याच्या जवळ गेलो व परवानगी घेऊन लगेच त्याच्या बरोबर पत्ते लिहू लागलो, तासाभराने राजीव जींनी मला बोलवले व म्हणाले चल तु माझ्या बरोबर . मी त्यांच्या बरोबर गाडीतून निघालो एक तास भरच्या प्रवासानंतर एका घरासमोर येऊन गाडी थांबली व राजीव जी व त्यांच्या पिशवी घेऊन मी त्यांच्या मागोमाग आत गेलो, आत जाताच मला धक्का बसला अरे हया व्यक्तीला कोठे तरी पाहिले आहे कोठे बरे…. तेव्हा आठवले जी पुस्तके बाबू घाटवर वाचली होती त्या पुस्तकांमध्ये ह्यांचा फोटो देखिल होता नाव ह्यांचे ” श्री अशोक सिंघल ” मी नमस्कार केला व बाजूला उभा राहीलो, ते दोघे काही तरी अर्धातास बोलत होते पण माझे त्याच्या व्यक्तिमत्वाकडे सोडून दुसरे लक्षच नव्हते कोठे. ही अशोक सिंघल मी माझ्यावर पडलेली पहीली छाप होती, थोड्यावेळाने त्यांचे लक्ष माझ्या कडे गेले तेव्हा हसत राजीव जींना त्यांनी माझ्या बद्दल विचारले व राजीवजीं नी त्याना माझी माहीती पुरवली माझ्या कडे संगणकाचे शिक्षण आहे असे त्यांना समजताच ते राजीव जीनां म्हणाले ” भाई राजीव, ईन्हे तो आप अपने आर. के. पुरम कार्यालय मै रखो” तेव्हा राजीवजीं नी त्यांना नम्र पणे नकार दिला व त्यांनी मला स्वत: संगेच ठेवणार असल्याचा उल्लेख पुन्हा एकदा केला.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: