राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

माझी सफर… हरिद्वार मध्ये – भाग ३

त्यानंतर मी व राजीव जी काही दिवसानंतर त्यांच्या हरिद्वार कार्यालयात आलो, व तेथे माझी राहण्याची व खाण्य़ापीण्याची व्यवस्था केली गेली तेथे माझ्या सम-वयाचा एक मुलगा “आनंद” तथा माझ्या पेक्षा वयाने कमीत कमी २० वर्षे मोठे शर्माजी होते, ह्यांचे नाव कधी विचारलेच नाही कारण सर्वजण त्यांना शर्माजी म्हणत व मी देखील त्या सर्वांसोबत त्यांना शर्माजींच म्हणू लागलो, हर की पॊडी पासून १ किंमी च्या अंतरावरच आमची धर्म शाळा होती व समोर च्या घरांची व दुकानांच्या ओळी मागे गंगा नदी वाहत होती, काही आठवडे तर मला हे देखील माहीत नव्हते कि आम्ही जे पाणी अंघोळी साठी व पीण्यासाठी वापरतो ते गंगेचे पाणी आहे जे पाणी शेकडो , लाखो नाही नाही करोडो लोक आपल्या जिवनाच्या शेवटच्या क्षणी उपयोगी पडावे म्हणून लहान लहान चंबूतून कोणी बाटल्यामधून आपल्या घरी ठेवतात, काय योगायोग असतो एकाच्या जिवनामध्ये नाही… लहान पणी आजोबा म्हणायचे की तु कुलदिपक, घराण्यातला एकुलता एक मुलगा.. तुच शेवटी गंगेचे पाणी माझ्या तोंडी खालशील. त्यांची ईच्छातर पुर्ण झाली नाही पण दिवसाचे २४ तास मी मात्र गंगेच्या सानिध्यात राहत होतो.

आनंद व माझी सुरवातीलाच चांगली मैत्री बनली व तो माझ्या बरोबर कधी गंगेच्या तीरावर तर कधी बिर्ला मंदिरामध्ये… तर कधी वेळ मिळालाच तर लक्ष्मण झुल्यावर फिरु लागला, शर्माजी व माझी आध्यात्मिक जोडी छान जमली व तेथेच पहील्यादां रामायण ही वाचले व महाभारत ही , तसेच अनेक.. कथा त्यांच्या सोबत वाचल्या, राजीव जी संस्थे मध्ये मोठ्या पदावर असल्यामुळे त्यांच्या आज ईकडे उद्या तिकडे अशा वा-या चालतच असत, माझा हरिद्वारचा स्नेह बंध असा बांधला गेलाच होता पण त्यावर मानाचा तुरा खोवला तो राजीव जींनी एक दिवस एक बातमी घेऊनच ते कार्यालयात आले व मला बोलवले ” राज, कल से तु अपने एक स्नेही श्री निरंजन जैन जी के यहां जायोगे तथा उन का एक कॊलेज है यहा रुडकी में तुम वहा काम करना ठीक है कल मैं तुम्हे एक पत्र के साथ वहा भेजूंगा लेकिन सुबह जल्दी जाना होगा करीब ६.०० बजे तुम्हे वह अपने कार्यालय में मिलेंगे.” वाह माझ्या तोंडातून दुसरे काहीच बाहेर पडले नाही व मी सकाळ सकाळी तयार होऊन जैन साहबांच्या कार्यालयात ५.५० लाच पोहचलो व त्यांचा फायदा देखील मला त्याच वेळी झाला व त्यांना माझ्या वेळेत कामावर येण्याबद्दल सागण्याची गरजच राहीली नाही. मी तेथे काम करु लागलो प्रथम प्रथम कार्यालयातीलच छोटे छोटे काम मला दिले गेले जसा एक चपराशी पण मी काही कुरकुर न करता काम करु लागलो दिवसामागून दिवस जात होते अशीच चार महिने गेली एक दिवस मी थोडा वेळ मोकळा होता म्हणून कार्यालयातल्याच संगणकावर बसून गेम खेळू लागलो कसा वेळ गेला कळालेच नाही पण त्याच वेळी जैन साहेब हे माझ्या पाठीमागे उभे राहीले होते, त्यांनी माझी गेम संपल्यावर मी जसा उठलो तसेच ते बोलले ” राज जैन, आप मेरे साथ थोडी देर बात करोगें अभी” त्यांचा दरारा मला माहीतच होता मी नखशिखांत हादरलो होतो दरदरुन घाम फुटला होता व मी विचार करतो होतो आता काय उत्तर द्यायचे ह्यांना व नंतर काय सांगायचे राजीव जींना ज्यांनी आपला शब्द टाकून मला येथे कामावर लागले होते.

जैन साहेब ” तुम्हे यह पीसी चला ना कबसे आता है ? “
मी : ” जादा कुछ नही आता सर, पहले मै एक सेंटर चला ता था तब थोडा बहोत सिखाता पर उसे भी अब दो साल हो चूके है सिर्फ कभी कभी गेम खेलता था यही पर”
जैन साहेब : ” ठीक है, कम से कम तुम्हे यह तो मालूम है ना की पीसी क्या होता है तथा काम कैसे करता है. तो कल से तुम अरविंद वर्माजी के साथ काम करोगे तथा computer Lab का रख्रखाव देखोगे” मी ठीक आहे म्हटलं व दुस-या दिवसापासून नवीन कामाला सुरवात देखील केली.

अरविंद वर्मा एक गुणी व अत्यंत आनंदी असणारा माणूस ह्याला हसण्यासाठी काही कारणाची गरज देखील लागत नसे व स्वभाव एकदम गरिब त्यामुळे त्यांची व माझी जोडी एकदमच मस्त जमली व त्यांनी मला संगणक व संगणकाचे काम ह्या बद्दल माहीती देण्यास सुरवात केली पहिल्या महिन्यात खुपच अवघड गेले कारण एक तर हिंदी व English दोन्ही बाजू माझ्या कुमकुवत होत्या व संगणकात ह्या शिवाय काहीच चालणार नव्हते तेव्हा मात्र गोची झाली मग मात्र अरविंद सरांनी माझी रोजच्या रोज इंग्रजी तथा हिंदीचा क्लास चालू केला रोज अर्धा एक तास ते मला दोन्ही भाषेतील महत्वाचे व रोज उपयोगी पडणारे शब्द तथा वाक्य शिकवू लागले व त्याच बरोबर मी त्यांच्या मदतीने संगणकावर हात फिरवू लागलो व काही दिवसामध्येच मी पत्रे प्रिंन्ट करणे व खर्चाच्या नोंदी ठेवण्यासारखे काम करु लागलो, त्यांना त्यांनी मला नवनवीन प्रणाली देखील संगणकावर वापरणे शिकवले.

दिवसामागून दिवस जात होते व मला हरिद्वार येथे येऊन ५-६ महिने झाले होते पण पगार अजून फिक्स झाला नव्हता व जो रोज खर्च मिळत होता तो राजीव जींकडून मिळत होता तेव्हा मी एकदा राजीव जींना ह्या बद्दल विचारले तर त्यांनी काळजी करु नकोस असे सांगितले, काही दिवसानंतर मात्र त्यांनी मला बातमी दिली की तुझा पगार हा १८००.०० रु. आहे व तो मला प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मिळणार होता. मी खुपच आनंदलो आता येथे काम करण्याला एक सकारात्मक परिणाम मला भेटला होता व मी जीव तोडून संगणकाचे शिक्षण नेटाने चालू ठेवले, कधी कधी कार्यालयीन काम संपल्यावर देखील मी संगणकावर बसून असे तेव्हा ही बातमी चपराशीच्या मार्फत जैन साहबांना कळाली व त्यांनी अरविंदकडे ह्या विषयी विचार ना केली की कार्यालय बंद झाले असताना देखील राज कोणाच्या परवानगीने कार्यालयात उशिरापर्यंत थांबत आहे ? तेव्हा अरविंद सरांनी खुप प्रयत्न करुन माझी शिकण्याची ईच्छा व माझा पुढे संस्थेला होणारा फायदा ह्याबदल जैन साहबांना सांगितले तेव्हा मात्र मला एकदम कायदेशीर परवानगी मिळाली उशिरापर्यंत काम करण्याची तथा माझ्या साठी ग्रंथालय व संगणक खोली ही मी जाऊ पर्यंत खुल्ली ठेवण्याची परवानगी तसेच जाताना सर्व दरवाजे व खिडक्या बंद आहेत ह्याची खात्री करुन जाण्याची अट घातली गेली, ह्या सगळ्या गोष्टी बस मधून जाताना अरविंद सरांनी सागितल्या व माझ्याकडुन २००.०० रु. मागितले व म्हणाले ” मै आप को कुछ जरुरी किताबे तथा सीडी ला के देता हूं जिसकी मदत से आप अपना काम जल्दी सिख सकोगे. ” मी त्यांना सांगितले की मला पैसे राजीव जी कडे मागावे लागतील व मी ते शक्यतो उद्या देऊ शकेन व तो विषय तेथेच संपला पण मी घरी पोहचू पर्यंत विचार करत होतो की कुठल्या तोंडाने राजीव जींकडे पैसे मागू माझे राहणे , खाने, गाडी खर्च तर तेच देत होते व त्यांच्यावर आणखी किती ओझे टाकायचे ? मी विचार करता करता घरी पोहचलो व शर्माजींना माझी अडचण सांगितली तेव्हा मी शर्माजींना एक पार्ट-टाईम काम माझ्या साठी पाहण्याची विनंती करुन मी गंगे किनारी जाऊन बसलो.

माझ्या जवळच एक सज्जन व्यक्ती बसले होते व ते काहीतरी श्लोक तोंडातल्या तोंडात पुटपुटत होते व मला ते श्लोक कुठेतरी वाचल्या सारखे अथवा कानावरुन गेल्या सारखे वाटले व मी त्याची पुजा संपल्यावर त्यांना त्या श्लोकासंबधी माहीती विचारली, ते एकदम खुश होऊन म्हणाले ” अरे भाई यह श्लोक तो भगवत गीता अध्याय में से है ” व त्यांनंतर माझ्याशी गप्पा मारता मारता ते म्हणाले ” देखो वहां जो बिर्ला मंदिर है ना उसके पिछे ही गीता भवन है तुम्ह वहा आ जाना सुबह या शाम को, बहोत सारे भक्त आते है तथा भक्ती में गाते रहते है तुम्हे भी आनंद मिलेगा” मी म्हणालो ” ठिक है, वैसे भी मै काम से ५.०० बजे तक फ्री हो जाता हूं मै अवश्य आ जाऊंगा”
मी तेथेच थॊडा वेळ बसलो व नंतर बिर्ला मंदिरात जाऊन बसलो हे जे बिर्ला मंदिर होते ते एक नितांत सुंदर मंदिर होते व ६ फूट मंदिर हे गंगेमध्ये होते, मला येथे खुप शांती मिळायची व मी विचार करायचो की बिर्ला जींनी हे मंदिर उभे करताना काय विचार केला असे व त्यांनी इतके पैसे मंदिरांसाठी का लावले असतील तर त्यांचे उत्तर मला तेथेच बसल्या बसल्या मिळायचे की मनाची शांती त्यासाठी मंदिर उभे करण्याचा खर्च काहीच नसेल त्यांच्यासाठी.
* हेच ते बिर्ला मंदिर जो भाग पाण्यामध्ये आहे तेथे बसण्याची व जाप करण्याची सुविधा आहे .

संध्याकाळी जरा वेळानेच ६.०० वाजता मी गीता भवन मध्ये गेलो व तेथे त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करु लागलो तर ती व्यक्तीच समोर आली व म्हणाली ” आजा बेटे, देखो आज सारे लोग यहा समय पर आ गए है तुम्हारी ही कमी मुझे लग रही थी, जा ओ पहले मुरारी जीं के दर्शन कर के आ जाओ हम आज भजन यही बैठके करेंगे” मी मंदिरामध्ये जाऊन भगवान कृष्णाचे दर्शन घेतले व परत त्यांच्या बैठकीत आलो तर तेथे माझी ओळख करुन दिली व माझी देखील मी ओळख करुन दिली. काही काळ जवळ जवळ एक तास-दिड तासानंतर मी परवानगी घेऊन बाहेर आलो व माझ्या पाठीमागेच एक व्यक्ती बाहेर आला व म्हणाला ” भाई, जरा सुनना मै रवी मुनराल हूं यही रहता हूं तथा मेरी छोटीसी दुकान है यही रोड पे आगे चल के, अभी तुम बता रहे थे की तुम कॊम्पूटर के जाणकार हो तथा तुम्हारे पास शाम का समय फ्री रहता है ? ” मी म्हणालो ” नहीं टाईम तो फ्री है लेकिन दुकान का अथवा आपके हिसाब किताब का काम नही देख सकता इतना भी मुझे अभी आता नही है” व मी त्यांच्या कडे पाहू लागलो व मनात विचार केला बघ लेका कसे लगेच लक्षात आले माझ्या की तू कामासाठीच विचारणार आहेस ते. पण तो विचार मनात येतो तोच ती व्यक्ती परत म्हणाली ” नहीं नही मुझे दुकान के काम के लीए नही चाहीए आपका समय, मेरा एक बेटा है उसे मे सिखा ना चाहता हूं, तथा यहा आसपास कोई है नही सिखाने वाला मै दिल्ली से क कॊम्पूटर ले के घर में रखा है लेकिन उसे सिखा नही सकता मैं अगर आप अपना थोडा समय देतो वह भी कुछ सिख जाएंगा” मी त्यांना म्हणालो राजीव जींना विचारुन सांगतो व मी तडक आपल्या घराकडे निघालो तर वाटेत शर्माजी तथा राजीवजी भेटले व ते मलाच शोधत होते कासावीस होऊन.

राजीव जी ” राज यह कोई तरीका है तुम पिछले चार घंटे से गायब हो किसी को अत्ता पता नहीं की कहा चले गये हो, हम तो परेशान हो गये थे, उस अरविंद का फोन आया था कि तूम पैसे को लेकर चिंतीत हो, तभी शर्माजी भी कह पडे की हा तुम परेशान हो हम ने सोचा की तुमने कही…. नहीं भगवान का लाख लाख शुक्र है की तुम सही सलाम हो कहा गये थे ? “
मला माहीतच नव्हते की माझ्यासाठी इतका गोंधळ तेथे कार्यलयात व घरामध्ये चालला आहे की ह्यांनी विचार केला की मी जीवाचे काही बरे वाइट करुन घेतले असावे व त्याच शंकेने ते गंगेचा तीरावर मला शोधण्यासाठी निघाले होते. मला हसू आवरले नाही व मी म्हणालो ” राजीवजी मै आप को जान देने वालों में से लगता हूं क्या ? मै तो प्रथम बिर्ला मंदिर बाद में गंगा के किनारे तथा आखिर मैं गीता मंदिर चला गया था भजन करने… नहीं सुनने” त्या नंतर राजीव जीं शी मी रवी मुनराल ह्यांच्या विषयी सांगीतले तर ते लगेच म्हणाले ” बेटा, जाना तुम्ह उनके पास अच्छे लोग है तथा तु किसी को सिखा दोगे तो तुम्हारे लिये भी अच्छा रहेगा तुम्हारा अभ्यास होता रहेगा ठीक है ना ? ” मी त्यांना हो म्हणालो व आपल्या खोलीत जाऊन बसलो.

आज आनंदचा मुड खराब दिसत होता व तो राजीवजीं काही बोलत होते व मला असे वाटले की माझा विषय चालू आहे बाहेर म्हणून मी लगेच बाहेर आलो तर राजीव जीं आनंदला सांगत होते की ” मै राज से बात करता हूं” व मी त्यांना विचार ले की काय झाले ? तर राजीव जींनी आनंदला बाहेर जाण्यासाठी सांगितले व मला आपल्या जवळ बसवून म्हणाले ” बेटा, देखो यह आनंद भी तुम्हारे ही साथ का है वह हम सब के लिए खाना बनाता है, चाय बनाता है तुम भी कभी कभी समय मिले तो उसकी मदत किया करो वह यहि तो कह रहा था ओर कुछ नही, बस थोडासा काम बाटलो उसे भी सकुन मिलेगा व तुम्हे भी. क्या कहते हो ?” मी विचारातच पडलो म्हणालो ” राजीव जी, अगर यहि बात थी तो वह मुझे भी तो कह सकता था, मै तो सुबह का अपना खाना खुद बना ता हूं तो शाम को भी मै उसकी मदत कर सकता हूं कोई बडी बात नहीं थी इसमें की आप को बताया जाये” व आनंद व माझ्यामध्ये पहीली धुसपुस येथे मी संपुष्टात आणली.

रोज सकाळी पाच वाजता उठून सकाळ सकाळी गंगेच्या बर्फासारख्या पाण्याने आंघोळ आवरुन , स्वत:चे जेवण व डब्बा तयार करुन मी ७.०० वाजता विध्यालयात पोहचत असे व दुपारी १.०० वाजता सुट्टी झाली की दोन तास संगणकावर प्रयोग करुन मी ३.०० / ३.३० च्या सुमारास घरी परतत असे व नंतर एक तास भर रवी जीच्या मुलाला संगणक शिकवत असे, व संध्याकाळी कधी बिर्ला मंदिर तर कधी हर की पैंडी तर कधी गीता मंदिर तास भर बसून येत असे व रात्री ८.३० च्या सुमारास आनंदला जेवण बनवण्यासाठी मदत करित असे.. असे एक दमच सुरळीत जिवन माझे चालू होते व असेच कधी वर्ष निघून गेले हेच कळाले नाही, व अचानक एक दिवस शर्माजी व मी बोलत असताना मला शर्माजी जींनी स्वत: बद्दल माहीती दिली जी मला आज पर्यंत त्यांनी सांगितली नव्हती तेव्हा मात्र मी विचार मग्न झालो वर रात्री झोपताना त्या बद्दल विचार करु लागलो की काय करावे ? व कसे ?

क्रमश:

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: