राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

माझी सफर… मैहरोली ते करोलबाग – भाग ५

मैहरोलीला पोहचल्यावर सर्वात प्रथम काम केले ते कत्यानी मंदिर शोधण्याचे थोडीफार शोधा शोध करुन मंदिर शोधले व मंदिर कार्यालायात जाऊन सर्वात प्रथम पं. हरीकृष्णजीची माहीती विचारली तर तेथे एका सज्जन माणसाने सांगितले की हो पं. जी येतात पण सकाळ सकाळी. मी थोडा मनातून सुखावलो व म्हणालो ठीक कमीत कमी आपण येथे पर्यंत तरी पोहचलो व आता नाही तर कमीत कमी सकाळी तरी भेटतीलच, त्याच कार्यालयात विचारुन घेतले की जवळ पास राहण्याची सोय कुठे आहेत त्यांने समोरच असलेली कत्यानी धर्मशाला दाखवली व म्हणाला की जा तेथे रुम मिळेल. मी लगेच तेथे जाऊन कार्यालयात रुम साठी विचारणा केली, ” भाई साब, एक रुम चाहिए था” समोरी व्यक्ती माझ्या कडे नखशिकांत पाहून म्हणाली ” ठीक है, कहा से ? कितना समय के लीए रुम चाहीए ? ” मी विचार केला की आज व उद्याचीच गरज आहे तेव्हा दोन दिवस असे सांगितले त्याने एक दिवशाचे १५०.०० रुपये घेतले व म्हणाला ” कल का पैसा कल देना” मी धन्यवाद करुन रुम वर गेलो तर तेथे काहीच नव्हते, मी परत खाली कार्यलयात गेलो व बि़छाना तथा पाघंरुन ह्याची विचारना केली त्या ती दिली ही पण संगे ५०.०० रु. पण घेतले. सर्व सामान रुम वर पोहचवून तडक जवळच्या एसटीडी बूथ वर गेलो व सर्वात प्रथम दिवेदी जी नां फोन करुन सर्व कथा व कहाणी सांगितली व येथे दिल्ली ला आल्या बद्दलच माहीती दिली त्यांनी मला सांगितले की ” राज बेटे, पत्ता नही कहा गलती है, पर तुम्ह निकल के दिल्ली पोहच चुके ही हो तो जहा रुके हो वही रुकना मै को देखता हूं कोई प्रबंध होता है क्या, तुम्ह मुझे कल फोन कर ना” ही रामगाथा सांगून फोन खाली ठेवला त्याच वेळी जाणिव झाली की जवळचे पैसे संपत आले आहेत व आता पैसे वाचवने गरजेचे आहे.

दिवस व रात्र कशीबशी निघून गेली व मी सकाळ सकाळी मंदिराच्या कार्यालयात जाऊन पुन्हा पंडीत जींची विचारणा केली तो म्हणाला की थोडा वेळ थांब येतीलचे, थोडा वेळ थोडा वेळ करत करत १०.०० वाजले पण ते काही आले नाहीत, माझ्या कडे पाहून तो म्हणाला ” भाई, आज तो आए नहीं, तथा मेरे पास उन्हका कोई पत्ता तो भी नही है, यही मिलते थे रोज जरुरत नही पडी कभी पता जाणने की” मी हसून म्हणालो” कोई बात नहीं, आज नही तो कल सही” व परत धर्मशाळेत आलो व दिवेदींजींना फोन लावला पण ते फोन वर भेटले नाहीत आशा निराशा असा भावनिक खेळ चालू झाला होता पैसे झरझर करुन संपत होते व पंडित जी अथवा दिवेदी जी काय मला मिळायला तयार नव्हते अथवा देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते,

४ थ्या दिवशी मात्र पैसे संपले व मी हिशोब करु लागलो की कोठे कोठे खर्च केले व कीती पण त्याचा काहीच उपयोग नव्हता खिश्यामध्ये दमडी नव्हती तेव्हा हिशोब काय कामाचा. सकाळ पासून काही खाल्ले देखील नाही व संध्याकाळी धर्मशाळेने नियमाप्रमाणे पैसे मागितले त्यांना मी माझी अडचण सांगितली व म्हणालो की एक दिवसाचा मुक्काम राहू द्या, बेचारा तो देखिल नोकर माणूस पन त्याच्या मध्ये देव होताच त्यांने परवानगी दिली व म्हणाला” देखो भाई एक नही, दो दिन रुको यह तो धर्मशाला है ही, हम पैसे ईसलिए लेते है की थोडी साफ सफाई रहे तथा लोग आरामसे रह सकें ” असे म्हणून तो पुढे निघून गेला. मी मनातल्या मनात त्यांचे आभार मानले व भुके पोटी विचार करु लागलो की आता काय ?

विचार करता करता बाहेर आलो तोच एक महाशय जे मंदिर कार्यालयात काम करायचे ते माझ्या जवळ आले व म्हणाले ” भाई, अभी खबर मिली है की पंडीत जी बिमार थे इस वजह से व मंदिर नही आ रहे थे पर व कल सुबह यहा मिल जायेंगे” मी आनंदाने त्यांचे आभार मानले व म्हणालो ” अब कोई फिकर नही रही काम हो ना हो कम से कम उन्हे मिलतो जाऊंगा ही”
सकाळ सकाळी मंदिरात गेलो व तर देवाप्रमाणे कार्यालयात पंडितजी बसले भेटले मी त्यांना ओळख तथा शर्माजींचा व माझा संबध ह्या विषयी माहीती दिली व म्हणालो की काही काम हवे आहे, पंडीत जी म्हणाले ” हम्म, भाई देखो, शर्माजी तथा मै पुराने साथी रहे है तथा एक ही प्रांत के है, तुम कहा ठहरे हो ?वही आज भी रुक जायो मै तुम्हारे लिए किसी से बात करता हूं कल सुबह मिल लेना मुझे” मी त्यांचे आभार मानले व मंदिरात दर्शनासाठी गेले, तेथे पहिल्यांदा दिड दिवसानंतर अन्न प्रसादाच्या रुपाने माझ्या पोटात गेले व थोडा फार आराम भेटला.”

दुस-या दिवशी सकाळी पंडित जीं माझ्या साठी बातमी घेऊन आले व म्हणाले की ” बेटा, तुम्हारा काम हो गया है तथा तुम्ह यहा से झेंडावालान, करोल बाग जाओ तथा वहा ***** का कार्यालय है वहा तुम्हे श्री चारी जी मिलेंगे ठिक है, यह रहा पता तथा उन्ह का फोन नंबर,, मेरा नाम बता दे ना, जरुर तुम्हे काम देंगे वह मेरे बहोत अजीज स्नेही है” मी त्यांच्या चरणाला हात लावून नमस्कार केला व म्हणालो ” पंडित जी, आपने जो मेरे लिए किया है, यह मै जिवन भर नहीं भुलुंगा” कार्यालयातील त्या व्यक्तीचे देखील आभार मानले व धर्मशाळेत जाऊन कपडे तथा पिशवी घेऊन कार्यालयात गेलो व त्यांना चावी हात देवून त्यांचे आभार मानले व म्हणालॊ की “मेरा काम हो गया है भाई साब, मैं अब यहांसे जा रहा हूं पर वापस जरुर आऊंगा आपसे मिलने” व तेथून सरळ मुख्य रोडवर आलो व एकाला विचारले की ” भाई, करोल बागला रस्ता कुठला जातो ?” तो ” अरे भाई, बसे जाओ बहोत दुर है ” मी ” नहीं भाई साब पैसे खत्म हो चूके है” मी हसलो.. पण ते हसू एकदम निराळे होते त्यामध्ये मला देखील एक निराशा जाणवली ” तो म्हणाला ” नये हो क्या ? रुक अभी तुम्हे बस मै बिठा देता हूं” व त्यांने जवळच उभी असलेल्या बसच्या चालकाशी बोलणी करुन मला बस मध्ये पाठवले मी त्याचे आभार मानले व म्हणालो देव अजून माझ्या बरोबरच आहे.

करोलबाग बाग पासून झेडावालान जवळच आहे, तेथे गेल्यावर मला ते कार्यालय तथा ती व्यक्ती देखील सापडली मी त्यांना नमस्कार केला व म्हणालो ” सर, मैं राज जैन, पंडीत जीं ने आपसे बात की होगी” ते आपल्या चष्मातून माझ्याकडे बघत म्हणाले ” हम्म, क्या काम जाणते हो, यहा तो प्रेस का काम है, पंडीत जी बता रहे थे की तुम्हे Computer चलाना आता है” मी हो म्हणालो. ते म्हणाले ” ठीक है, तुम्ह यही मेरे साथाआ काम करोगें तुम्हारे रहने का प्रबंध मै ने कही करोलबाग मे किंया है वहा अपने ही प्रेस का पुराना कार्यालय है फिलाल तुम वही रहना, पंडीत जी ने तुम्हारे बारे में बताया तो है सब लेकिन तुम फिर अपने बारे मैं बता दो” मी त्यांना सर्व राम कथा पुन्हा सांगितली व ते म्हणाले ” अछा तो तुम महाराष्ट्र से हो, ठिक है सही जगह आये हो यहा बहोत सारे व्यक्ती मिलेंगे तुम्हे महाराष्ट्र के” व से म्हणून खिश्यातून ५००.०० रुं दिले व म्हणाले ” यह रखना खर्चे के लिए तथा जरुरत हो तो मांग लेना ठिक है, अब तुम बाहर जो रामकिशन जी बैठे है उन्हे अंदर भेज तो मै उन्हे तुम्हे जहा रहना है बहा पोहचाने के लिए तथा वहा क्या कमी है यह देखने के लिए भेजता हूं”

थोड्या वेळाने चार-पाच अरुंद असे बोळ फिरत मी एका चागल्या बांधले गेलेल्या बिल्डींग समोर उभा राहिलो व रामकिशन जी आपले आत जाउन चावी घेऊन परत माझ्या कडे आले व म्हणाले ” देखो वह उपर तीसरे माले पे दुसरा कमरा है ना उसकी यह चावी है, पहले वाले कमरे मे मै रहता हूं, जा, कुछ जरुरत हो तो बोलना मुझे, बिस्तर तथा बाकी जरुरत की चिजे देखील है उपर” मी त्याला म्हणालो” भाई, कमरा तो बाद मै भी देख लूंगा फले मुझे खाना खाना है दो दिन हो गए है अच्छा तथा सस्ता कोई हॊटेल बता दो जहा मैं खाना खा सकूं” तो हसला व मला संगे घेऊन गेला एका हॊटेल मध्ये मालकाशी माझी ओळख करुन दिली व माझे खाते तेथे चालू करुन म्हणाला ” देखो, यहां सुबह, शाम खाना खा के यहा लिख देना पैसे महिने के आखिर में दे देना ठिक है”

मी जेवण करुन सरळ आपल्या खोली कडे आलो व दरवाजा उघडून आत प्रवेश केला…

क्रमशः

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: