राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

माझी सफर… कार्य सिध्दी … भाग – ६

दिल्ली मध्ये कामाची, राहण्याची व खाण्याची व्यवस्था उत्तम झाली होती तसेच जे चारी जी होते ते एक सदगृहस्थ, सरळ मार्गी जिवन व तसेच त्यांचे कुटूंब. काही दिवसामध्येच मी देखील त्यांच्या कार्यालयीन जिवनाचाच एक महत्वाचा भाग बनलो, त्यांच्या मुळे किती तरी प्रयोग करुन करुन मी संगणक दुरुस्ती देखील शिकलोच. कधी बोर्ड बदल कधी विंडॊज बदल, कधी प्रिंटर वर काम करुन बघ , तर कधी नेट वर. वेगळ वेगळ्या संकेतस्थळावर जाऊन संगणकाबद्दलची माहीती आपल्याकडे जमा करणे व त्यांचे रात्री बसून अभ्यास करणे ह्यावरच काही महीने माझा जोर होता, चारी जींनी देखील धाडस करुन कधी मला आपला संगणक तर कधी स्वत:चा Laptop दुरुस्ती साठी दिला व मी देखील त्यांच्या विश्वासला तडा जाऊ न देता त्यांचे काम व्यवस्थीत करुन देऊ लागलो, तेव्हा मात्र त्यांनी माझी शिफारीश वेग-वेगळ्या व्यक्ती समोर करणे चालू केले व एखाद दुसरे बाहेरील काम देखील मला ते करण्यासाठी पाठवू लागले, ते नेहमी म्हणायचे “राज , देखो तुम्हे यह काम सिखना पडेगा क्यूं की यह काम तुम्हे पुरी जिंदगी रोटी देगा.. यहा तुम कहा से कहा तक पोहच सकते हो.. बहोत बहोत ३०००.०० से ८०००.०० रु. ही कमा सकोगे… पर यह जो काम है एक दिन तुम्हे दिन के ५०००.०० रु. कमा के देगा देखना…” व मी हसून हो म्हणत असे.

असेच एक दिवस चारीजींनी मला बोलवले व म्हणाले ” तुम्हे यही करोलबाग में जैन साब के यहा जाना है, वह टी,टी. गार्मेंट के मालिक है… जाणते हो ना टी.टी. ?” मी हो म्हणालो व त्यांची परवानगी घेऊन जैन साहबांकडे गेलो दरवाजावर परवानगी घेऊन मी त्यांच्या कार्यालयात पोहचलो तर समोर जैन साहेब बसले होते व मी जाताच त्यांना अभिवादन करुन म्हणालो की ” सर, मै राज जैन, मुझे चारीजींने आपके पास भेजा है, आप को कुछ काम है” ते हो म्हणाले व मला एका संगणकाकडे बोट दाखऊन म्हणाले ” बेटा, देखो इसे कुछ हुआ है, तथा इस मे मेरे काम की बहोत सारी चीजे है तथा वह मेरी सारी चीजे जरुरत की है” मी हो म्हणालो व त्यांच्या संगणकाकडे वळलो, थोडेफार काम केल्यावर मी त्यांना सांगितले की काही वस्तूंची गरज आहे व मला ती विकत आणावी लागेल. त्यांनी लगेच किती पैसे लागतील विचारुन घेतले व पैसे मला दिले , काही वेळानंतर मी त्यांचा संगणक चालू करुन त्यांना दाखवला व त्यांच्या सर्व महत्वाच्या फाईली त्यांना दाखवून मी त्यांना सांगितले की काय अडचण होती व किती पैसे खर्च झाले, व वाचलेले पैसे मी त्यांना परत दीले व त्यांची परवानगी घेऊन चारीजीच्या कडे परत आलो तो पर्यंत चारीजी व जैन साहेब ह्यांचे फोन वर बोलणे चालू होते मी गेल्यावर चारीजींनी फोन खाली ठेवला व म्हणालो ” वा, राज आज तो तुमने बडा ही काम कर दिया” मी हसत म्हणालो ” नही सर, इतना बडा भी नही था यह काम, बस कुछ सामान खराब था, बदल दिया तथा चालू करके उन्हे दे दिया” ते म्हणाले ” नही, छोटा नही था काम , वहा जो आदमी आता था उसने तो नया पीसी लेने के लिये कहा था तथा वह लुटने के चक्कर में था पर तुम्हारी वजह से उन्ह के पैसे बच गये तथा उन्होने तुम्हे १०००.०० रु. देने के लिए मुझे कहा है तथा शाम के समय उन्ह के यहा जाना व तुम्हे कुछ गिफ्ट भी करना चाहते है” मी हसलो व म्हणालो ” नही सर इसकी क्या जरुरत है, आप उन्हे मना कर दो कृपा कर के” पण त्यांनी जे उत्तर दिले ते मात्र माझ्यासाठी एकदम जिवनमार्गच ठरले, ते म्हणाले ” राज, जिवन में कभी पैसे को ना मत कह ना तथा जो तुम ने काम किया है उसका मुल्य जरुर लेना, शर्म पैसे की कभी नही हो नी चाहीए” मी हसत मान डोलावली व आपल्या कामाला लागलो.

चारी जींच्या कृपेने तथा माझ्या काही करण्याच्या इच्छेला मान देऊन काही महत्वाच्या व्यक्ती तथा संस्था मला संगणकाच्या कामासाठी बोलवू लागल्या व रोजचा कामाचा व्याप वाढू लागला. तेव्हा चारी जीं नी माझ्या साठी खोली वर एक फोन लावून दिला व म्हणाले की ह्याचा उपयोग आजच्या घडीला सर्वात जास्त होऊ शकतो तेव्हा सर्वांना हा नंबर दे. माझे रोज बस मधून फिरणे तथा पायी चालणे ह्यामुळे तथा काही हवामानाचा फरक असेल त्यामुळे मी काही दिवस आजारी पडलो तेव्हा मात्र चारी जींनी विचारले ” राज, कितना पैसा जोडा है ? ” मी म्हणालो की जास्त नाही १५०००.०० एक हजार रु. आहेत तेव्हा चारी जीं नी आपल्या जवळचे ५०००.०० रू. दीले व म्हणाले की एखाद दुसरी मोटर-सायकल पाहून खरेदी करुन टाक आजच, शुभ दिवस आहे आज. मी हो म्हणालो व तेथून सरळ दिनेश जवळ आलो, दिनेश तेथेच त्या गल्ली मध्ये राहत होता माझ्या खोली च्या जवळच जेथे मी जेवण करतो ते त्यांच्या काकाचे हॊटेल. मी दिनेशला एक बाईक हवी आहे असे सांगताच तो मला म्हणाला ” अरे राज सर, क्या बात है, अच्छे टाईम पें बोला है आपने, अभी रुको दो बाईक दिखा देता हूं जो चाहिए वह ले लेना” मी तेथेच थांबलो व म्हणालो “ठीक है, जल्दी वापस आना प्लीज मुझे कही जाना है” तो लगेच गेला व दोन मित्रांच्या बरोबर लवकरच दोन बाईक घेऊन परत आला, दोन्ही RX-100 यामाहा होत्या, एकाची किमंत त्याने २५०००.०० रु. व एकाची १८०००.०० रु सागितली, दोन्हीचा वापर करुन पाहिला व चारीजींना फोन केला व त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी मला काही त्यातले कळत नाही तुच बघ म्हणून फोन ठेवला. मी जास्त विचार न करता १८०००.०० वाली गाडी घेतली व म्हणालो ” पैसा अभी ले के जाना भाई, लेकिन नाम करा के आज ही देना मुझे” तो म्हणाला की सेल नोट देइन व ट्रान्स्फर दोन दिवसामध्ये करुन देइन. मी हो म्हणालो.

बाईक झाली, काम देखील व्यवस्थीत चालू झाले, नोकरी तर होतीच, व राहण्याची देखील अडचण जवळ जवळ संपलीच होती तेव्हा चारी जींच्या सांगण्यावरुन मी एका छोट्याश्या जागी दुकान काढण्याचे नक्की केले पण चारी जीचे एक मित्र व मोठे चित्रपट निर्माते श्री………. जींनी मला सांगितले की करोलबाग मध्ये एका जागीची बिल्डींग आहे तेथे त्यांच्या शेयर मार्केटचे काम त्यांचा छोटा मुलगा पाहतो तेथे काम चालू कर व तेथेच पुर्वी त्यांच्या मुलाने संगणकाचे काम करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा नाव व फोन नंबर सगलेच तयार मिळेल, मी त्यांच्या ह्या सल्ल्याला हो म्हणून तेथेच काम चालू केले.

चारी जीची आर्थिक मदत व माझ्या कामावर माझा असलेला विश्वास ह्यामुळे कामामध्ये माझा व्यवस्थित नफा चालू झाला व मी त्यातील काही शेयर चारी जीं तथा तो चित्रपट निर्माता ह्यांना देऊ लागलो.
एक दिवस चारीजीं नी मला कार्यालयात बोलावले व एका व्यक्तीशी भेट घालून दिली व म्हणाले ” राज, यह जिंदल भाई साब है, इन्ह का बहोत बडा कारोबार है तथा यह तुम्हे अपने साथ रखना चाहते है, तुम जाना चाहोगे ?” मी त्या व्यक्तीकडे निहाळून पाहीले तर ५.६ ची उंची व्यवस्थीत कपडे, एक फाईल हातामध्ये व चेह-यावर एक यशस्वी हसू. मी त्या व्यक्त दर्शनाने अथवा चारीं जींचा मान राखावा ह्या उदेशाने म्हणालो ” चारी जी, आजतक आपने जो कहा है कभी मेंने मना की या है ? ” चारी जींच्या चेह-यावर एक समाधानाचे हसू मी पाहीली व मी त्यांच्या विश्वासानूसारच बोललो हे मला खुप आनंद देऊन गेले. दोन-चार दिवसानंतर मी जिंदल ह्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो व त्यांची भेट घेऊन व्यवस्थीत कामाविषयी माहीती घेतली व त्यांच्या कडुन दोन एक आठवड्याचा वेळ मागून घेतला.

क्रमश :

* काही व्यक्ती तथा संस्थेची नावे काळजीपुर्वक येथे लिहलेली नाही आहेत क्षमा असावी, काहीतरी अनुबंध असल्यामुळे अथवा त्यांचे व्यक्तीगत जिवन येथे महाजालावर येऊ नये ह्या उद्देशाने.

Advertisements

One response to “माझी सफर… कार्य सिध्दी … भाग – ६

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: