राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

म्हसवे – सर्वात मोठा वटवृक्ष

शनीवारी घरी निघावे म्हणून निघालो होतो, पाचवडच्या थोडे आधी एका हॉटेल मध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो, पुणे तर घर २६२ किमी चा प्रवास. त्यामुळे खुप वेळ हातात आहे असे वाटत होते फोन चाळताना पुनेरींचा नंबर दिसला व एक कॉल केला व त्यांना विचारले येथे आहे का आसपास काही जागा बघण्यासारखी तर त्यांनी मला म्हसवे हे गाव सांगितले व म्हणाले जाऊन बघ बघण्यासारखं आहे तेथे. पाचवड मधून उजव्या हाताला वळालो चांगले दहा एक किलोमिटर पुढे गेलो तरी काही वडाच्या जंगलाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या शेवटी एकाला थांबला व विचारले ते मोठे वडाचे झाड कुठे आहे तर तो म्हणाला उलट आला आहात सरळ परत पाचवडला जा व तेथून डाव्याबाजूने सरळ जाऊन पहीला उजवा कट तेथून दोन-तीन किलोमीटर नंतर म्हसवेचा कट. नेहमी प्रमाणेच कप्पाळ व हाताची गाठभेट घातली वर बाईक सरळ परत वळवली.

विराटगडाच्या पायथ्याशी हे हे म्हसवे गाव आहे जे जावळी तालुक्यामध्ये येते सातारा जिल्हात आहे. म्हसवे गावाच्या बाहेर एका जागेला कंपाउड घातलेले दिसते व तेथे एक भला मोठा सरकारी बोर्ड आहे ज्यावर वटवृक्षाची माहीती लिहलेली आहे व सरकारी कृपेमुळे तो बोर्ड एकदम सुव्यवस्थीत (?) आहे फक्त अक्षरे उडाली आहेत, रंग उडालेला आहे त्यामुळे काय लिहले आहे ह्यांची माहीती घेण्यासाठी कुटलिपी वाचक असा कोणी मिपाकर आहे का हे शोधावे लागेल असे लक्ष्यात आल्यावर सर्वात आधी त्या बोर्डचाच फोटो काढून घेतला. एका गावकराकडून कळालेली माहीती अशी,

म्हसवे गावात असलेला हा वटवृक्ष पुरातनकाळापासून आहे ह्याने जवळजवळ ६ एकर जागा व्यापली आहे एकाच वटवृक्षाच्या पारंब्यातून हे भले मोठे वटवृक्षांचे जंगल उभे राहीले आहे, जो मुळ वृक्ष होता तो काही वर्षापुर्वी पडला पण त्यांच्या पारंब्यातून जो वृक्ष तयार झाला होता त्याने आपला डोलारा संभाळून ठेवला आहे, सन १८८०-८५ च्या आसपास एका ली वॉर्नर या ब्रिटिश अधिका-याने ह्याचा सर्वात आधी उल्लेख केला आहे. आता सरकार ने हे संरक्षित स्थळ म्हणून घोषीत केले असल्या कारणाने त्या जागेत प्रवेश निषेध आहे व कोणी येत जात नसल्यामुळे प्रचंड झाडी वाढली आहे त्यामुळे आत घुसण्याचा प्रयत्न केला नाही व जो गावकरी होता तो देखील इच्छूक दिसत नव्हता त्याचे कारण त्यांने आर्थिक दंड आहे असे सांगितले. बाहेरुन चक्कर मारल्यावर लक्ष्यात आले की खरोखर सरकारने किती प्रामाणिकपणे हा वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पाण्यासाठी आत विहीर खोदली आहे, वट वृक्षाला देखील बाहेरुन पाणी लागते हा माझ्यासाठी नवीनच बातमी होती अहो जो वृक्ष येथे शेकडो वर्षापासून दिमाखात उभा आहे त्याच्यासाठी पाणी ? म्हणजे सुर्याला आपली टॉर्च देऊन म्हणावे अंधारात जपून रे. हा असा सरकारी खेळ. असो, तो आपला विषय नाही. जास्त माहीती घेतल्यावर असे कळाले की हा अशिया खंडातील दुस-यानंबरचा सर्वात मोठा वटवृक्ष आहे, ह्यापेक्षा थोडा मोठा वृक्ष बंगाल मध्ये आहे ( कलकत्ता मध्ये – गुगल सेवा) . तसेच ह्यापेक्षा लहान (तीन एकर मध्ये पसरलेला) वृक्ष हा म्हसवे गावातच आहे विराटवडाच्या पायथ्याजवळ. त्या सरकारी बोर्ड प्रमाणे हा भारतातील सर्वात मोठा वटवृक्ष आहे पण कलकत्तामधील ह्यापेक्षा थोडा मोठा आहे हा वैचारीक गोंधळ तिकडेपण ( त्या खात्यामध्ये) आहे हे पाहून थोडे हसू आले. खाली फोटो देत आहे.

म्हसवे
Advertisements

2 responses to “म्हसवे – सर्वात मोठा वटवृक्ष

  1. NIK जुलै 5, 2010 येथे 9:57 सकाळी

    Nice information, Could u please send me detail add. of that tree.My e-mail id patilnikhils@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: