राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

माझी सफर… निर्णय भाग – ९

पोर्ट ब्लेयर च्या विमानतळावर कंपनीचा एक सदस्य मला घेण्यासाठी आलाच होता. थोड्या वेळाने मी कार्यालयात पोहचलो व तेथे जाऊन श्री अनुज पाटलांची भेट घेतली व काही कागद पत्रे त्यांच्या हाती सोपवली व त्यांना राहण्याच्या सोयी बद्दल विचारणा केली, त्यांनी देखील सर्व माहीती मला दिली व कार्यालयीन नियमांची तसेच येथे जे काम मला बघावयाचे आहे त्याची थोडीफार माहीती मला दिली जवळ जवळ अर्धा एक तास आम्ही बोलत होतो पण अनुज ह्यांच्या तोंडून एक ही मराठी शब्द बाहेर पडला नव्हता, तरी देखील मधून मधून त्यांना जाणिव करुन देण्यासाठी की मला मराठी येते मी काही प्रश्न मराठीतून विचारत असे, पण त्या महामानवाने एकाही प्रश्नाचे उत्तर मराठीतून दिले नाहीच. मी ही काही हरकत न घेता तेथून बाहेर आलो व पहिलाच दिवस असल्याने थोडे फार जवळची मार्केट एकाची सोबत घेऊन फिरुन आलो व जरुरी सामान विकत घेतले व संध्याकाळच्या वेळी कंपनीच्या गेस्ट रुम मध्ये पोहचलो. तर तेथे थोडाफार माहोल बद्दलेला दिसला व कंपनीचे अनुज सर, प्रदिप सर, गुप्ताजी, अविनाश असे चार-पाच जण माझी वाट पाहत बसले होते. माझी काळजीपुर्वक माहीती घेतली पण त्यांच्या बोलण्यातून मला थोडा वेगळेपणा वाट्त होता मी ती शंका माझ्याच वयाच्या अविनाश समोर बोलून दाखवली तेव्हा तो हसत म्हणाला ” अरे राज सर, कुछ नही है सब ने थोडी थोडी लेनी चालू ही की है अभी वह देखो वहा टेबल पे..” माझी नजर तिकडे टेबलाजवळ गेली तर तेथे एकदम मैफिल जमली होती. सगळे आपले कार्यलयीन अधिकार / खुर्ची विसरुन एक दुस-याला दारु पाजत होते व त्यामध्ये कंपनीचा चपराशी देखील शामिल होता.. तिकडे जिंदल मध्ये मला असे कधीच काही दिसले अथवा कळाले नव्हते की कोण कोण दारु पितो ईत्यादी पण येथे पहिल्या दिवशीच पार्टी टाईम. काहीजणांच्या आग्रहानंतर मी आपला एक ग्लास घेऊन त्याच्या गप्पामध्ये शामिल झालो येथे माझा रुल मी लागू केला रुल एक. अनजान व्यक्ती समोर जास्त पिणे नाही व जास्त बोलणे नाही. रुल दोन. आपले डोळे व कान सतत उघडे ठेवणे. व ह्या रुलस चा मला नेहमीच फायदा होतो. सर्वजण एकदम मस्त पैकी मजा करत होते बोलण्यातूनच कळाले की कोण्याच्या तरी बायकोचा वाढदिवस आहे त्यामुळे ही पार्टी. हे सगळी पार्टीच भारतातील एक-एक प्रदेशातून आली होती कोणीच लोकल नव्हते, त्यामुळे भाषा व शिव्या ह्या माहीत असल्यामुळे काही जास्त विचित्र वाटत नव्हते, पण जेव्हा थोड्य़ा वेळाने अनुज सर माझ्या जवळ आले व मला बाजूला घेऊन माझ्या शी मराठीमध्ये बोलू लागले तेव्हा मात्र मला असे वाटले की मी महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकाच्यामध्ये आलो आहे, कमीत कमी ४ वर्षाच्या कालावधीनंतर मी मराठी प्रथमच बोलत होतो.. व मला नेहमीच्या वापरातील मराठी शब्दच सापडत नव्हते तेव्हा मात्र मी त्यांची क्षमा मागीतली व म्हणालो ” सर जास्तच काळ येथे झाला व पंजाबी, हिंदी लोकांच्या सोबत बोलून बोलून स्वत:ची जन्म भाषा मात्र थोडीफार विसरलो आहे.” त्यानी हसून उत्तर दिले ” काही हरकत नाही, माझे देखील असे होते कधी कधी गावी गेल्यावर, वाईट वाटून घेऊ नकोस. बाकी मी कार्यालयात मराठी बोललो नाही ह्याचा राग तर नाही ना ? अरे आपल्या आसपास जी लोक काम करत आहेत त्याना वेगळे पण वाटू नये ह्या साठीच मी तुझ्याशी हिंदीतून बोलत होतो, मी जे म्हणतो आहे ते तु समजतो आहेस ना ? ” मग ईतरची तीकडची बोलणी झाली व जेवण करुन ते परत आपल्या घरी. व मी आपल्या रुम वर परत आलो.

दुसरा दिवस मात्र एकदमच आवाहानात्मक होता, एखाद दुसरा संगणक चालू होत होता… चालू म्हणजे फक्त BIOS दाखवत होतो, बाकी सगळे १२ संगणक बंद. काहीचा OS तर काही़चा RAM, तर काही मध्ये Software खराब. पुर्ण दिवसामध्ये एक संगणक संपुर्ण पणे खराब करुन ५ संगणक चालू केले. सपोर्ट साठी जे साहित्य मी संगे आणले होते ते सर्व संपले [काही RAM, Prosessor, Motherbaord’s] मी अनुज सरांना ह्याची रिपोर्ट दिली व रुम वर जाऊन तानून दीली, मस्त पैकी झोपलो. दिलेल्या लिस्ट मधील सामान येण्यासाठी कमीत कमी ४ दिवसांचा वेळ होता तो पर्यंत अंदमान निकोबार फिरण्याचा मी प्रोग्रम घेऊन अनुज सरांच्या कडे पोहचलोच होतो तो पर्यंत त्यांनीच माझा प्रोग्रम तयार केला होता, ते म्हणाले, ” राज, देखो सामान तो ५-६ दिन के बाद ही आयेगा, तब तक तु मेरे साथ यहा के छोटे मोठे काम करणे मे मदत करो, यह लिस्ट काम की” मी ती लिस्ट घेऊन आपल्या टेबला जवळ आलो व मनातल्या मनात चरफडत मी ती लिस्ट वाचून काढली, बागेची हालत खराब आहे माळीला सांगून ती ठीक करा, कुठे कुठे लाईट नाही आहे तेथे लावा, काही नळ खराब आहेत, काही गेट वर बेल नाही आहे.
सहाव्या दिवशी अर्धाहून अधीक काम पुर्ण केले व तो पर्यंत संध्याकाळ पर्यंत माझे सामान माझ्याजवळ पोहचले. बाकी पाच संगणकांचे काम व बाकी छोटे मोठे काम मी एका आठवड्यातच निपटून काढले व नेटवर्कचे काम चालू केले व ते देखील चार दिवसामध्ये संपवले, येथे येऊन तीन आठवडेच झाली होती तो पर्यंत मला फोन करुन जिंदल साहबांनी परत बोलवले दिल्लीला. अनुज सरांनी ह्याची कल्पना मला दिली व बाकी राहिलेले थोडेफार काम तेथूनच कोणाकडुन तरी करुन घेऊ असेल म्हणाले व मला परत जाण्याची तयारी कर असे सांगून मोकळे झाले, माझ्या परत जाण्याची दिवशी मात्र अनूज सर मला म्हणाले ” राज माफ कर, अरे मला असे वाटले होते की जिंदल साहेब तुला दोन-तीन महिन्यासाठी येथे ठेवतील ह्यासाठीच मी तुला कोठे ही फिरु दिले नाही, पण पुढील वेळी मात्र मी स्वत: तुला घेऊन जाईन फिरण्यासाठी अंदमान निकोबार हे नक्की ह्यावेळी जरा चुक झाली.” मी म्हणालो काही हरकत नाही सर ह्याच कंपनी मध्ये काम करत आहे पुढे मागे वेळ येईलच फिरण्याची येथे. मी तेथून परत दिल्लीला आलो.

कंपनीमध्ये आल्या आल्या मला शिमला जाण्याची तयारी करण्याचे सांगितले गेले तेव्हा मात्र मी भडकलोच . व सरळ जिंदल साहबांच्या समोर जाऊन नकार दिला व म्हणालो ” बाबूजी, अभी कल ही तो आया हूं मै, मुझे यहा के भी तो काम देखने है, आते ही यहा मेरे लिऎ ढेरसारा काम पडा है तबभी मुझे आप शिमला भेज रहे हो,” जिंदल साहेब एकदम आरामात मला म्हणाले ” ठीक है तो मै चारी जी कॊ मना करता हूं की राज नही आयेगा, आप अपना काम खुद करे।” चारीजींचे नाव आल्या आल्याच मी जरा वरमलो व म्हणालो ” चारीजीं ? वहा शिमला क्या कर रहे है?” तेव्हा जिदल साहेब म्हणाले,” अरे वहा शिमला में चारीजी का तथा मै मिलके एक स्कुल चलाते है वहा कुछ नये पीसी लगाने है वहा तुम्हे जाना है।” मी ठीक आहे म्हणालो व एक नवीन प्रवासाची सुरवात पुन्हा चालू केली.

अंदमान हून आल्यानंतर मी एका आठवड्याच्या आतच शिमला मध्ये आलो होतो, थंडीची ती नुक्तीच सुरवात होती पण माहोल एकदम मस्त होता. जे चित्रपटामध्ये शिमला पाहिले होते त्या शिमला मध्ये मी स्वत: होतो व माझ्या नशिबावर मला जरा देखील विश्वास वाट नव्हता की कधी अंदमान तर कधी विमान प्रवास तर येथे मी स्वत: शिमला मध्ये ? जे माझे नेहमीचे काम होते ते मी चालू केले व दोन-चार दिवसामध्येच ज्या काही संगणकीय अडचणी होतो व जे नवे संगणक जोडायचे होते ते पुर्ण करुन मी चारीजींची परवानगी घेऊन शिमला फिरून आलो. रोज सकाळी पहाडावर चढून वर तास तास भर बसण्याची व निसर्गाच्या अदभूत करणीचा आनंद घेणे हा कार्यक्रमी चांगला चार दिवस चालवला, जिंदल साहबांच्या एका फोन ने परत मला दिल्ली मध्ये पोहचवले, पण तेथे ती पोहचण्य़ाआधीच माझ्या यशस्वी शिमला तथा अंदमान वारी मुळे माझ्या बद्दल त्यांना विश्वास वाटत होता की काय जाने मी पोहचण्याआधीच मला तेथून परत एकदा प्रवासासाठी पाठवण्याची तयारी जिंदल साहबांनी केली होती. मला पुण्याला जायचे होते पण काही कारणामुळे मला पुण्याच्या जागी विशाखापट्ट्णम ला जाण्याची तयारी करा असे सांगीतले गेले पण बीन-पगारी मला येथे ११ महिने झाली होती व हे पक्क केले की जो पर्यंत पगार ठरत नाही व त्यानूसार पगार भेटत नाही तो पर्यंत नो वर्क. काम बंद..

माझ्या ह्या काम बंद आंदोलनांची माहीती काही तासातच जिंदल साहबांच्या जवळ पोहचली, व मला बोलवणे आले, दिड तासाच्या वाद विवादातून काहीच बाहेर पडले नाही अथवा जिंदल साहबांनी बाहेर पडू दिले नाही व मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊन व त्यांच्या समोर बोलून दाखवून मी त्यांच्या रुम मधून बाहेर आलो, शर्माजींनी मला खंदा वीर असे म्हणून पाठीवर थाप मारली व म्हणाले ” राज, जो काम में पिछले ९ साल में नही कर पाया वह तुमने कर दिखा या, जा बेटे जा यहा से अच्छा कुछ तेरे लिऎ भी होगा तभी तो भगवान यह चहाता है तु यहा ना रहे.. जा”

मी तडक आपल्या रुम वर आलो व आपले कपडे बांधले व बाहेर रस्तावर आलो, संध्याकाळची वेळ, थंडीचा महिना कुठे जायचे ? हा विचार डोक्यात चालू झाला…

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: