राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

माझी सफर… सत्व-परिक्षा.. भाग -११

कंपनीमध्ये मी चांगलाच रमलो होतो व जवळ जवळ कंपनीमधील सर्वजण मला नावानीशीच ओळखू लागली होती, संगणक कमीच होते व जे होते देखील जुने, मी थोडाफार प्रयत्न करुन व मालकाशी बोलणी करुन काही नवीन संगणक विकत घेण्याचा व जूने संगणक नवीन लोकांना देण्याचा निर्णय घेतला, व गुडगांव व दिल्ली मधील काही दुकानातून कोटेशन्स मागवली, चार पाच चांगले भाव पाहून मी ती कोटेशन्स मालकांच्या समोर ठेवली व म्हणालो निवडा जो भाव व काम ठीक देइल त्यांला काम देऊ असे ही सांगितले तेव्हा ते म्हणाले ते सर्व तु पाहा व मला फक्त रक्कम सांग कीती चा चेक तयार करायचा तो. मी हसलो व ठीक आहे असे म्हणून बाहेर आलो तोच दोन एक व्यक्ती माझी बाहेर वाट पाहत होते, मी त्यांच्या जवळ गेलो व त्यांची विचारपूस केली, तेव्हा कळाले की ज्या काही कोटेशन्स आल्या होत्या त्यातील एका कंपनीचे प्रतिनिधी म्हणून ते माझ्या कडे आले होते,
प्रतिनिधी -“नमस्कार सर.”
मी – “नमस्कार बोला.”
प्रतिनिधी -“सर, आमची कोट तुम्हाला भेटलीच असेल.”
मी – “हो, भेटली ना. विचार चालू आहे अजून काही नक्की झालेले नाही आहे पाहू”
प्रतिनिधी -“सर, आम्ही चांगली सर्विस देऊ, तसेच तुमचा फोन आलेल्या काही मिनिटामध्येच आमचा अभियंता तुमच्या कंपनीमध्ये पोहचेल, दहा मिनिटाचाच रस्ता आहे”
मी – “ह्म्म्म, बरोबर आहे.”
प्रतिनिधी -“सर बाकीच्या काही दुकानदारांचे कोट तुमच्या कडे आले असतील त्यातील सर्वात कमी कोट आमचीच आहे ह्याची खात्री आहे आम्हाला”
मी – फक्त हसलो.
प्रतिनिधी -“तरी ही मार्केटचे काम आहे जरा कमी जास्त झाले असेल तर आम्ही बदल करु शक्तो कोट मध्ये”
मी – “ह्म्म नाही कोट मालकांच्या समोर गेली आहे मी काही करु शकत नाही आता पण पाहू काय होते ते”
प्रतिनिधीचा साथी -“सर, मी अरविंद आहे व ही संस्था माझीच आहे गेली ५ वर्ष मी ह्या व्यवसायामध्ये आहे, व मला माहीत आहे कोट गेली आहे पण तुमच्या हाती सर्व काही आहे असे माझे गुप्त सुत्र… सांगत होता”
मी – “च्या मायला, कंपनी मध्ये गुप्त-सुत्र…माफ करा मी मराठीमध्ये बोललो, आमच्या कंपनीमध्ये तुमचा जुगाड मी समजलो नाही”
अरविंद -“सर, काय करावे हा कारोबार जरा असाच आहे सर्व माहीती ठेवावी लागते आम्हाला.”
मी – ” ह्म्म बरोबर, तर मग.”
अरविंद-” सर, ईकडचे तिकडचे बोलत बसत नाही, १० टक्के व नक्की करा.”
मी – “दहा टक्के ??? ” च्यायला ही काय नवीन भानगड.
अरविंद-“सर, ठीक है ११% कर लो…ह्म्म्म नही सीधा आप १२ % कर लो ठिक है अब. तो कब फोन करु पीओ के लिये ?”
मी – अजून गोंधळलोच होतो काही कळत नव्हते हा काय बोलतो आहे ते, मी सरळ त्यांना म्हणालो थांबा आलोच. व जवळ जवळ पळतच माझे एक सहकारी व नवीन मित्र यादव ह्यांच्या कडे गेलो व सगळी बातचित त्यांना सांगितली, ते हसत म्हणाले ” अबे, वह तुम्हे तुम्हारा हिस्सा बता रहा है… १२% मतलब जो भी बिल बनेगा उसका १२%. हा कर दे बेटा, तेरे तो मजे है अब.”मी हसलो व परत मिटीग रुमवर आलो.
मी अरविंदला म्हणालो “ठीक है, कल बात कर ना एक बार”

संपुर्ण दिवस १२% वरच मी फिरत राहीलो, कमीत कमी मला २८००० हजार रुपये मिळणार होते, काय करावे , कसे करावे.. हाच विचार करत थांबलो, चार महिन्याचा सरळ सरळ पगार हाती येणार होता काय करावे..
दिवस संपला, एकच्या जागी दोन बियर संपल्या व वैतागुन झोपी गेलो तर रात्रभर झोप नाही आली, अर्धवट झोपलेल्या अवस्थेत मी विचार करता करता एक निर्णय घेतला व रात्री एकदम शांत झोपलो.

सकाळच्या कामातून मालक असे मोकळे झाले तसा मी त्यांच्या जवळ गेलो व त्यांना सर्व काही खरं खरं सांगितले, ते माझ्याकडे पाहतच राहीले व म्हणाले “अरे, भाई यह सब तु मुझे बता रहा है, यह तो मुझे सब पता है, सारी जगह काम इसी तरीके से चलता है, अपने यहा भी, लेकीन तु पहला आदमी है जो अपने मालिक को बता रहा है” असे म्हणत जोर जोरात हसू लागले, मला काहीच कळाले नाही व चुपचाप त्यांच्याकडे पाहत उभा राहीलो, त्यांनी इंटरकॊम वर कंपनीचे जीएम शी बोलणी केली व त्यांना आपल्या रुम वर बोलावले, ते आल्यावर म्हणाले ” वर्मा जी, देखो मै नही कहता था मेरा बेटा उं ही कीसी को मेरे यहा काम के लिए नही भेजेगा व तो हीरा है तथा अपने साथ हीरे ही रखता है, देखो ईसे आप कहते थे की यह २८०००.०० मे बिक जायेगा, यह मेरे सामने खडा है आप के २८०००.०० की पेशकश बता रहा है” व पुन्हा हसू लागले व वर्माजी माझ्या कडे पाहत म्हणाले, ” बेटे, १२ साल की नोकरी में मैंने पहली बार धोका खाया आदमी पहचानने में, माफ करना कल जो तुम्हारे साथ घटा व सब मेरी तथा इंन्ही की प्लानिंग थी.” अरे बाप रे, मी तर चक्क परवानगी न घेताच एका खुर्चीवर मटकन बसलो व आपला चेहरा झाकून घेतला व माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. ते पाहू वर्माजी तथा मालिक दोघे गडबडले व म्हणाले” अरे राज बेटा, क्या बात है क्या हुंवा, कोई बात चुभी क्या तुम्हे ? अगर हां तो माफ कर ना भाई.” मी म्हणालो ” सर नहीं, यह बात नही हैं, आपने जो कीया तथा बताया यह एक मालिक कर के आप का फर्ज था, आपको अपने कंपनी मी सिर्फ अच्छे लोग ही चाहींए, पर मेरे आखोंमे आसू मेरे घरवालों की याद की वजह से आये, शायद मैंने ही उन्हे समजने मे देरी की लेकीन जो बात आपको मैंने बतायी उसके पिच्छे मेरी प्रेरणा मेरे संस्कार ही थे जो बचप्पन में मुझे अपने घर से मिले थे.. उसी के वजह से मेरे आखं हर आयी मुझे माफ कर ना सर. ” “अरे राज, कोई बात नाही, लेकिन सच्ची बात बता ने का तुम्हे भी तो फायदा है … वर्माची इस को पक्का कर लो तथा इसकी पगार आज से ३०००.०० रू. बढां दो “
वर्माजीं माझ्या कडे हसत म्हणाले “तो राज, आज पार्टी होगी तुम्हारे तरफ से हा…. हा हा…” मी देखील हसत हो म्हणालो पण मालिक म्हणाले ” अरे छोडॊ, आज सबका दोपहर का लंच कंपनी खाते से, बाद में राज से पार्टी लेना वर्माजी” मी हसलो व म्हणालो “सर कोई बात नही लेकीन आप का ट्टीफन का क्या हो ?” व हसत बाहेर आलो. आपल्या केबीन मध्ये जाऊन सर्वात प्रथम देवाचे आभार मानले व म्हणालो ” अरे देवा, असेच मला पापातून नेहमी वाचवत राहा रे, गणेशा”

क्रमश

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: