राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

लफडा

प्रेम बिमसब झुट.. नाटकं आहेत.. प्रेमात पडायचं कश्याला ?
हा मुर्खासारखा प्रश्न मी अनेकांच्या तोंडातून बाहेर पडताना पाहीला आहे,
त्यांची किव करावी शी वाटते,
अरे यार प्रेम कधी ना कधी तुम्ही पण केलंच असेल ना..
पण काही कारणामुळे तुम्ही अयशस्वी झालात म्हणुन सरळ प्रेम भावनेवर ब्लेम ?
नाय यार हे काय चांगले नाही ! आपण आपला दोष कोणावर तरी का काढायचा

आता बघ ना, परवा माझा एक मित्र खुप दुख:त होता दारु पीत होता..
मी विचारलं काय झालं रे बाबा.. तु असा देवदास कसा झाला
तो म्हणाला… ती नाही म्हणाली.. व दोस्ती पण तुटली !
मी म्हणालो… असं कसं ? प्रेम नाही तर नाही दोस्तीची का वाट लावली तीने ?
तो म्हणाला… माहीत नाही… भेटु नकोस म्हणून सांगितले ती ने !
मी म्हणालो… ओ तेरी लफडा मोठा आहे… माझ्याशी बोलायला सांग !

ती हा ना करत बोलली माझ्याशी !
मी म्हणालो… तो त्याने तुला प्रपोज केलं !
ती म्हणाली… हो. पण मी नाही म्हणाले !
मी म्हणालो… का ? नाही म्हणालीस !
ती म्हणाली… आवडला नाही !
मी म्हणालो .. दोस्ती होती ना ?
ती म्हणाली.. हो दोस्ती होती !
मी म्हणालो… मग नावडत्या व्यक्ती बरोबर दोस्ती कशी ?
ती म्हणाली .. दोस्त म्हणून आवडत होता पण त्या नजरेने नाही पाहीलं कधी !
मी म्हणालो… ती नजर ? चल ठीक ती नजर नाही पण दोस्त म्हणून तर आवडता होता ना ?
ती म्हणाली… ह्म्म हो, दोस्त म्हणून चांगला होता.
मी म्हणालो… मग दोस्ती का तोडली ?
ती म्हणाली… त्याने प्रपोज केलं होतं ना त्यामुळे !
मी म्हणालो… प्रपोज ठीक आहे.. पण दोस्ती का तोडलीस ?
ती म्हणाली… माहीत नाही, पण भीती.
मी म्हणालो… दोस्ताची भीती ?
ती म्हणाली… नाही, पुन्हा प्रपोजची भीती.
मी म्हणालो… नाही म्हणाली तर तो पुन्हा का प्रपोज करेल ?
ती म्हणाली… केला तर ? त्यामुळे दोस्ती नकोच.
मी म्हणालो… प्रपोजचं केलं ना.. चाकू दर नाही दाखवला !
ती म्हणाली… पण मला भिती वाटत होती म्हणून दोस्ती पण नको म्हणाले !
मी म्हणालो… तुला कोण दुसरा आवडतो ?
ती म्हणाली… हो !
मी म्हणालो… तुझी त्याच्याशी मैत्री आहे ?
ती म्हणाली… हो !
मी म्हणालो… तु त्याला प्रपोज केलंस ?
ती म्हणाली… नाही, भीती वाटते.. नाही म्हणेल ह्याची !
मी म्हणालो… तुला कसली नाही हीची भीती.. विचारुन बघ.
ती म्हणाली… नाही म्हणाला तर दोस्ती पण तुटेल.
मी म्हणालो… तुटली तर तुटली.. त्यात काय !
ती म्हणाली… नाही, चांगला मुलगा आहे.. !
मी म्हणालो… ज्यानं प्रपोज केलं त्याच्यात व तुझ्यात काय फरक आहे माहीत आहे ?
ती म्हणाली… नाही.. !
मी म्हणालो.. त्याच्यात गट्स आहेत.. आपलं प्रेम व्यक्त करण्याचं !
ती म्हणाली… ह्म्म शक्यतो !
मी म्हणालो… शक्यतो नाही , आहेत. ज्याच्या मध्ये गट्स आहेत अश्या मित्राला तु सोडत आहेस.
ती म्हणाली… पण !
मी म्हणालो… आता कसला पण ? तो देवदास झाला !
ती म्हणाली… हो कळालं मला पण !
मी म्हणालो… मग ?
ती म्हणाली… तु समजव त्याला.
मी म्हणालो… तेच करतो आहे.
ती म्हणाली… विचार करेन.

गेली ! त्याला फोनवला व म्हणालो तुझं अर्ध काम रस्तावर आणलं आहे खड्डा मारु नकोस परत.. वाट बघ !

काही कळाले का तुम्हाला वर काय लिहले आहे ते ?
मला पण नाही

पण तुटलेले दोस्ती व प्रेम जोडायला मला खुप आवडतं !
अरे लोकांना कळतच नाही आपण भांडणाच्या नादात कीती आनंदाचे क्षण व्यर्थ घालवतो ते !

कोण समजवणार ह्यांना ! प्रेमाची महती … दोस्तीची ताकत जेव्हा ती / तो जवळून गेल्यावर कळते !

भांडा रे भांडायला कोण नको म्हणत आहे… पण जरा प्रेम राहु द्या मनात .. सगळेच दरवाजे कधी बंद करायचे नसतात.. न जा ने कोण कधी जिवनामध्ये कुठल्या वाटेला भेटेल !

»

Advertisements

One response to “लफडा

  1. Anonymous फेब्रुवारी 12, 2010 येथे 11:34 सकाळी

    hmm, barobar ahe. Prem nahi jamal mhanun maitri todnyachi kahi garaj nahi. arthat ha anubhavatun alela shahnpana ahe. Hich gosht amhi pan keli hoti kahi varsha purvi. Ata amhi parat bhetlo, ani amachi maitri tashich zali jashi adhi hoti. Pan maitrichi evdhi amulya varsha vaya ghalavlyachi khant ahech.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: