राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

माझी सफर……..प्रेम पर्व…. भाग-१४

दोन दिवस झाले होते विभा भेटून. संजनाने गडबड केलीच होती पण चूक माझी देखील होती माझी व्यक्तीगत डायरी माझ्या कडे नाही आहे हे मला लवकर लक्ष्यात आलेच नव्हते… ही माझी चूक.
तिस-या दिवशी देखील १० वाजले तरी विभा कार्यालयात आली नाही हे पाहून मात्र माझे मन अस्वस्थ झाले व काही विचारणा न करता मी तडक विभाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला, मी लगेच बाहेर पडलो व अर्धा तासाच्या आतच विभाच्या घराच्या गेट समोर उभा राहीलो, पण आत कसे जावे व काय बोलावे ह्या विचारात मी खुप वेळ बाहेरच उभा राहीलो तोच विभाची आई बाझार खरेदी वरुन परत येत होती व मला पाहून म्हणाली ” अरे बेटे राज, बाहर काहे खडे हो अंदर चलो” मी त्यांच्या मागोमाग घरात घूसलो व माझी तळमळत असलेली नजर शक्यतो तीच्या आईने ओळखली व मला म्हणाली ” अरे राज, विभा तो घर में नही है, वह नैनीताल गयी है, अपने चाचा के घर ! दो दिन हो गये है” मी जरा रिलाक्स झालो व म्हणालो ” अभी अचानक नैनीताल क्या कर ने चली गयी, बिना बता ये ?” तीची आई म्हणाली ” अचानक नही गयी है, एक दिन तो तबीय्यत खराब थी उसकी डॊक्टर साहब बोले की सैर करना जरूरी है तब गयी है वह दोपहर को पिताजी के साथ… वह कंपनी फोन लगा रही थी पर मेंने ही मना किया था फोन करने के लिए .. कही कुछ काम ना बता दे उसे .. यह सोच कर ! पर तुम्हे तो फोन किया होगा ना उसने ?” मी म्हणालो ” नही. आंन्टी जी, में चलता हूं अभी मुझे कई जाना भी है, विभा अपना फोन ले गयी है क्या साथ में ? ” तीची आई म्हणाली ” हां”

मी खुप विचार केला व मनाचा हिय्या करुन एसटीडी वरुन फोन लावला… रिंग होत होती … खुप वेळानंतर तीने फोन उचलला ” कोन ” मी म्हणालो ” अरे विभा में राज ! तुम्हारी तबीयत कैसी है ” ती म्हणाली ” अरे राज, अभी तो ठीक है, तबीयत तुम्ह बताओं तुम्हारा क्या हाल है ” मी म्हणालो ” अच्छा है, तुम्ह से कुछ बात करनी थी… अगर बुरा ना मानो तो ?” ती म्हणाली ” देखो राज, इतने दुर से तुम ने फोन कीया है, तथा मेरी तबीयत के बारे मे पुछ रहे हो मुझे काफी अच्छा लगा, लेकीन बाकी बाते जब तुम यहा आयोगे मुझे मिलोगे तभी करेंगे.. पता नोट करो अभी,” मी जरा चकरावलोच पण एका आजारी तथा जी मला आवडते त्या मुलीची इच्छा मोड ने मला जरा वेगळेच वाटले व मी नकळत तीचा पत्ता नोट करु घेतला.

“क्या, नैनीताल, अभी जाना है, तुम्हे क्या लगा.. नैनीताल यही है.. कीं तुम बस में बैठ गये तथा एक घंटे में पोहच जाओगे ! ” – ईती वर्माजी.
“लेकीन सर मेरा जाना बहोत जरुरी है..” मी (जाने का महत्वाचे आहे हे मी स्वत:लाच पटवून देऊ शकलो नव्हतो तेथे वर्माजींना काय पटवणार)
“अबे लेकीन काम कोन करेगा तेरा यहा, ” – वर्माजीं. पण एक तासाच्या मिटींग नंतर मात्र ते तयार झाले पण का व कसे हे देव जाने.

“अरे हीरो उठो, नैनीताल आ गया है, बस आगे नही जायेगी अब. पता नही सोना ही था तो बस में क्यूं सोते हो भाई…. कही रुम लो वहा सो जायो मस्त !!” – बस कंडेक्टर.
” अरे भाई, जरा सस्तासा हॊटेल बता देना मुझे कोन सा है ! “- मीच नेहमी प्रमाणे.
” हम्म, नीचे उतर पहले. जहा देखेगा वही हॊटेल मीलेगा तुझे ” – – बस कंडेक्टर.

खुप घासाघासी करुन एक रुम फिक्स केली व जवळचे असलेले सर्व सामान तेथे ठेऊन मी लगेच यसटीडी जवळ गेलो व विभाला फोन लावला ” विभा में राज, नैनीताल में पोहच गया हूं…. तुम्हारा दिया हुआ पत्ता तो है मेरे पास फिर भी जरा तुम गाईड करोगी मुझे ?”
” सच्ची ? ” विभा. ” तुम सही में नैनीताल पोहच गये हो ? “
मी – ” नहीं, मे तो नैनीताल के यसटीडी बुथ से तुम्हे पागल बनाने के लिए फोन कर रहा हूं..! क्या बात कर रही हो विभा, में यहा नैनीताल में हूं.. आना कहा है बता दो !”
” राज मुझे विश्वास नही हो रहा है, तुम नैनीताल में आ गये हो।” – विभा. ” देखो किसी को पुछ कर तुम ज्योलीकोट रोड की तरफ आ जाना, वहा से बस मेरे चाचा का हॊटेल xyz तुम्हे दिख जायेगा” – विभा.
मी ठीक आहे असे म्हणून ज्योलीकोट मार्ग शोधून त्यीच्या काकाच्या हॊटेल जवळ पोहचलो, तर तेथे तीचे वडील बागेत काहीतरी माळीला सांगताना दिसले मी त्याच्या जवळ गेलो व नम्स्कार केला ” नमस्ते अंकल जी”
“हो, राज तुम यहा कैसे ?” -अंकल.
“नैनीताल घूमने आया था अंकल जी” – मी
“अब, इस महीने मे ?, अरे नैनीताल तो जरा गरमीओं मे आते… चलो अंदर जरा चाय पीते है” – अंकल.
इकडची तीकडची खुप बोलणी झाली पण बुढा मुळ गोष्टीवर काय येत नव्हता व मला विभाचा विषय काढता येत नव्हता मी काय करावे ह्या विचारात असतानाच एक नोकर त्याच्या कडे आला व म्हणाला ” सर, विभाजी आप को बुला रही है” तो अंकल काही म्हणायच्या आतच मी म्हणालो ” अरे वा, विभा भी आप के साथ है ?” मला जरा त्याचा चेहरा पडल्यासारखा वाटला पण काही क्षणाने तो हसून म्हणालो ” हां, वह भी यही है,मीलोगे उसे ? चलो. “
मी आपल्याच हुशारीवर बेहद खुष झालो व मनातल्या मनात म्हणालो ” देखा, राज का दिमाग.” मी त्यांच्या बरोबर विभाच्या रुम वर पोहलो.
तीचा बाप तीच्याशी काय बोलला व काय नाही हे काही लिहीत बसत नाही, जास्तच फिल्मी वाटू लागेल मला व तुम्हाला देखील.
“विभा, तुझ्याशी काही बोलायचे आहे मला, मध्ये बोलू नकोस, फक्त मी काय सांगतो ते लक्ष दे” – मी.
“ठीक है बोलो” – विभा.
“देखो विभा जो कुछ संजनाने कहा, तुम्हे अच्छा लगा नही लगा मुझे पता नही, लेकीन तुम मुझे धक्के दे के यहा से निकालो उस से पहले एक ही बात मुझे तुम पसंद हो, मुझे तुमसे प्यार है”- व मी खिश्यात हात घातला व तीच्यासाठी घेतलेले एक गिफ्ट तीच्या समोर धरले.
ती दंगा करेल, शिव्याशाप देईल, मला म्हणेल तुझी आई बहीण आहेत की नाहीत घरात अथवा आपल्या वडीलांना बोलवेल….. असे काही मला वाटत होते.. पण तसे काही न घडता ती मला म्हणाली ” डियर, हीच जर गोष्ट तु मला संजनाने सांगायच्या आधी सांगितली असतीस तर….”

Advertisements

One response to “माझी सफर……..प्रेम पर्व…. भाग-१४

  1. THE PROPHET फेब्रुवारी 10, 2010 येथे 3:58 pm

    Rajbhau,Tumchi goshta atishay chhan aahe..utkanthavardhak…aani ho…he sagla nantar neet ekatra karun aani thoda vistarana lihun ek uttam atmacharitra banu shakta….keep it up…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: