राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

गोल्ड – मार्केटवर एक नजर

सोनं खरेदी करावे की नाही करावे हा प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदाराना नेहमी पडतो. गेले खुप दिवस गोल्ड १६००० – १७००० च्या रेंज मध्ये फिरत आहे व आपला भाव अस्थिर ठेऊन आहे, ह्यामागे गुंतवणूकदारांची मानसिकता आहे व थोडेफार शेअर मार्केट मधील चढ-उताराचा हात देखील. २५ नोव्हेंबर २००९ ला सोन्याने १८००० चा भाव दाखवला होता व त्यानंतर वीस दिवसाच्या आतच भाव १६५०० पर्यंत आला होता. व सध्या तो १६०००-१७००० च्या भावामध्येच फिरत आहे.
भारतामध्ये सोने खरेदी सर्वात जास्त लग्नासाठी केली जाते व त्याचा खुप मोठा फरक मार्केटवर पडतो , ऑफ सिझन मध्ये सोने खरेदी करणारे खरेदीदार आता खरेदी करत नाही आहेत कारण त्यांना असे वाटत आहे की सोन्यामध्ये अजून १०००-५०० रु. चा उतार येईल व शक्यतो येईल ही कारण लग्नाचा सिझन येण्यासाठी अजून खुप महिने बाकी आहेत व डिसेंबर महिन्याच्या तुलनेने जानेवारी महिन्यात सोन्याच्या खरेदी मध्ये १०-१५% ची घट झाली आहे हीच घट चालू राहीली तर सोन्याचा दरावर नक्कीच फरक पडेल. जास्तित जास्त ग्राहक सध्या सोन्यामध्ये भाव उतरण्याची वाट बघत आहेत जर काही कारणाने सोन्याच्या भावामध्ये १०००-१५०० ची घट झाली तर नक्कीच सोनं खरेदीदारांची झुंबड उडेल खरेदीसाठी हे नक्की.
शेअर मार्केट व नजर मारली तर मागील दोन महिने मार्केट खुप मोठा चढ उतार दाखवत आहे व त्याचा देखील मानसिक परिणाम गोल्ड मार्केटवर होतो. कारण मोठ मोठे गोल्ड फंड वाले मार्केट खाली जात असेल तर आपला पैसा गोल्ड मध्ये गुंतवतात व मार्केटवर जात असेल तर शेअरमध्ये (हेजिंग पध्दतीने ) पण रेंज बाऊड शेयर मार्केट मुळे त्याना देखील तसे करणे अवघड होऊन बसलेले आहे कारण शेयर मार्केट + गोल्ड दोन्ही पण सध्या रेंज बाउंड झाले आहेत. शक्यतो पुढील आठवड्यात येणार्‍या बजट मुळे ही अढी सुटायला मदत होईल.
एक नियमित विचारला जाणारा प्रश्न की मला गोल्ड मध्ये गुंतवणूक करायची आहे कसे करु ?
ह्याचे उत्तर – मार्केट चा विचार करुन गुंतवणूक करावी. जसे वर लिहले आहे की लग्न सिझनला अजून खुप वेळ आहे व त्या दरम्यान गोल्ड मार्केट मध्ये खुप चढ उतार होईल तुम्हाला आपल्यासाठी एक रेट टार्गेट फिक्स करावे लागेल ( जसे मी १५५०० चे टार्गेट फिक्स केले आहे) कि त्या रेट ला आल्यावर मला गुंतवणूक करायची आहे ५०% गुंतवणूक तुम्ही तेव्हा करा व चुकून अजून काही शे रु. रेट खाली गेला तर राहीलेले २५% खरेदी करा व २५% आपले खेळते भांडवल ठेवा म्हणजे जर मार्केट मध्ये तेजी दिसत असेल तर काही चढ्या भावाने देखील उरलेले २५% चे गोल्ड घेता येऊ शकेल.
गोल्ड घेताना शक्यतो २४ कॅरेट च्या कॉईन / विटा ह्या स्वरुपात घ्या. शक्यतो दागीने घेऊ नका कारण जेव्हा विक्री करण्याची वेळ येते तेव्हा त्याच्यातील तुट वजा करुन किंमत मिळते व २४ कॅरेट मध्ये तुम्हाला पुर्ण भाव मिळतो. गोल्ड मधील गुंतवणूक ही दिर्घ अवधीची गुंतवणूक मानली जाते ह्याचा खरेदी करताना नक्की विचार करावा. जास्त रिस्क घेण्याची इच्छा नसेल तर मार्केट मध्ये चांगले गोल्ड फंड आहेत त्यामध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय होऊ शकतो.
***********
गुंतवणूक करताना आपल्या अर्थ सल्लागाराकडुन पुर्ण माहीती घ्यावी.
वरील लेख हा माहीतीसाठी लिहला आहे, सल्ला नाही आहे ह्याची नोंद घ्यावी.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: