राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

माझी सफर….आई… १८

तात्यांनी ओळख करुन दिली व त्या बिचारीचा आश्रुंचा बांध तुटावा अशी अवस्था झाली ! अर्धा एक तास ती रडल्या वर माझ्या जवळ आली व म्हणालदा…”दादा… बाबा गेले रे ” असे म्हणून तीची शुध्दी हरपली…..

तो दिवस पुर्ण रडारडी मध्येच संपला, अक्काला कसे बसे सर्व काही समजावून मी परत मावशीच्या घरी आलो.. दोन दिवसामध्ये त्याना माझे ईतक्या वर्षाचे जिवनचक्र माहीत झाले व मला आई-वडीलांचे… माझ्या सारखा कमनशीबी कोणीच नसावे ह्या दुनियामध्ये… घराच्या वाईट अवस्थे मध्येच मी माझ्या घरासोबत नव्हतो.. ह्याचे दुखः जास्त होते..
पण कालचक्र सर्व दुखःवर उपाय ! अठवड्यानंतर फोन करुन विभा व ईतर मित्रमंडळीना बातमी सांगतली की मी घरी पोहचलो आहे.. पण आई प्रवासासाठी बाहेर आहे व दोन महीने लागतील तीला परत येण्यासाठी… व तोपर्यंत मी येथेच राहणार की परत दिल्लीला येणार ह्याचा निर्णय दोन एक दिवसामध्ये घेऊन फोन करेन.
तात्या व मी असेच शेतामध्ये फिरत होतो व बोलता बोलता तात्या म्हणाले.. ” राजा, तुला माहीत नसेल पण दोन एक दिवसामध्ये मुर्हत काढून पंडीताकडून तुझी शुध्दी करुन घ्यावी अशी तुझ्या मावशीचा व माझी ईच्छा आहे”
मी ” माझी शुध्दी ? का ? “
तात्या ” कसे सांगू….तु ईतकी वर्ष बाहेर राहीलास.. ना तुझा अता ना पत्ता ! ..तुला जाऊन देखील त्यावेळी १० वर्ष झाली होती… तेव्हा आम्ही तुझे श्राध्द घातले होते… “
मी त्यांना बघतच राहीलो…. व एकदमच हसलो.. व म्हणालो “जेव्हा मी हरिद्वारमध्ये होतो.. तेव्हा माझ्या मनात नेहमी येत असे की मला काही बरे वाइट झालेच तर माझे क्रियाक्रम कोण करणार.. येथे माझे श्राध्द कोण घालणार.. तुम्ही सर्व माझे श्राध्द घालाल अशी पुसटशी देखील कल्पना नव्हती मला … चला काही हरकत नाही.. मला नाही फरक पडत ह्या गोष्टीमुळे… पण तुम्ही माझा मृत्यूदाखला तर घेतला नाही ना ???”
तात्या ” अरे नाही.. गरजच नाही पडली.. राशन कार्ड वर तुझे अजून नाव आहे”
मी ” धन्यवाद…!” व आम्ही घरी परतलो… पण दोन महीने काम न करता येथे राहणे मला चालणार नव्हेते.. तेव्हा मी परत दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला व मावशीकडे माझा पत्ता व फोन नंबर लिहून दिला व दुस-या दिवशी मी सरळ पुण्यात आलो … पुणा ते दिल्ली परत !

कामावर पुन्हा रुजू झालो व दोन दिवसातून एकदा मावशी कडे फोन करणे चालु झाले… पण ह्या सर्व लफड्यात मी व विभा जवळ जवळ… भेटेनासे झालो व कळत नकळत संपर्क देखील कमी होऊ लागला होता… त्यातच एक दिवस संजनाचा फोन आला ती म्हणाली.. ” राज अभी के अभी घर पें आ जाओ !!”
मी तीला समजवण्याचा पर्यंत केला की काम करतो आहे..व सुट्टी झाली की येतो.. ती ठीक आहे म्हणाली व मी काम संपवून संध्याकाळी तीच्या घरी गेलो…
संजना ” देखो राज… एक काम का प्रपोजल है … पढो !” तीने काही पेपर हाती दिले व मी ते वाचू लागलो… चीन मधून काही संगणक सामान आयात करण्याबद्दल ते प्रपोजल होते.. मी म्हणालो ..” अच्छा, काम है… कमाई हो सकती है.. ! ” संजना ” राज, तुम्हा रे नेहरु प्लेस में अच्छे जाणकार है… तुम अगर चाहो तो.. हमारे साथ पाटर्नरशीप में काम कर सकते हो…” मी म्हणालो ” नही.. यार.. मेरे पास ईतना सारा पैसा कहा से आयेगा !” संजना ” पैसे पुछे तुझे हमने ??…. वर्कीग पाटर्नरशीप ३०% तुम्हारा.. बाकी हमारा..!” मी म्हणालो..” हम्म ! मुझे दिक्कत नही है.. पर दो एक दिन तु पहले सोचो.. अपने पतीसे बात करो फिर !”
असे म्हणून मी जाण्याची तयारी करु लागलो व बाईक ची चावी शोधू लागलो !.. चावी कोठे गेली यार … ” संजना, चाबी देखी है… ” संजना ” नहीं… रुक जा, चाय तयार है.. पीके जाना !” मी ठीक आहे म्हणून.. सरळ समोर असलेल्या पीसीवर जाऊन बसलो.. डिस्कटॉप वर काही फोल्डर होते तेथे विभा नावाचा देखील एक फोल्डर होता.. हे घर.. मला काही नवीन नाही.. सगळेच मला ओळखतात.. विभा तर आपली.. तीचा फोल्डर उघडला तर काय फरक .. असा विचार करुन मी फोल्डर उघडला..त्यात विना व अना ने घरीच खेचलेले काही विभाचे फोटो होते.. मी ते फोटो पाहण्यात ईतका गुंग होतो.. की संजनाने चहा समोर ठेवलेला देखील मला जाणवले नव्हते….
संजना ” जिसे फोटो में देख रहे हो.. व इस रुम में कम से कम १५ मिनिट से बैठी है…” मी दचकलोच.. व फटाफट तो फोल्डर बंद करण्यासाठी धडपडलो.. जवळच ठेवलेले स्पीकर व ईतर वस्तू माझ्या धडपडीमुळे खाली पडल्या.. व मी जरा हलकाच हसत… म्हणालो ” बच्चोंने फोटो अच्छे खिचे है !… अरे विभा तुम कब आयी ? ” सोप्यावर बसलेल्या पाहून मी विचारले.
मी असे विचारताच रागाने पाय आपटत ती सरळ संजनाच्या मुलीच्या रुम कडे निघून गेली.. व मला संजनाने तीच्या पाठीमागे पाठवले…
मी “विभा.. बात सूनो..” पण ती आपल्या रागातच होती.. मी दोन तीनदा प्रयत्न केला व सरळ बाहेर येऊन संजना बरोबर.. कामाची बोलणी चालू केली… अर्धा एकतास आमची मिटींग झाली व कामाचे स्वरुप लक्षात आले.. व मी काम करने नक्की केले.. तो पर्यंत विभाचा राग उतरला होता.. ती बाहेर आली.. ” तुम्हे यहा वापस आ के… हप्ता हो गया है.. ना तुमने फोन कीया ना मिलने आहे.. क्या समजते हो अपने आप को” – विभा.
हम्म मॅडम ह्या रागात आहे तर.. मी तीला समोर बसवले व माझ्या सर्व प्रवासाची तीला माहीती व्यवस्थीत दिली व म्हणालो..” यार.. थोडा परेशान था.. ईन दिनों में… उस में ऑफिस का सारा काम रुका पडा था..टाईम नही था.. संजना के घर भी में आज ही आया हूं.. पुछो ! ” ती जरा शांत झाली व म्हणाली.. ” अपनी मम्मी से मिलने कब जाओगे?… जब मिलोगे ना तब उन्हे यही लेके आना… अपने साथ रहेगी ऑन्टी !” मी हसलो व म्हणालो..” ठीक है..प्लान कुछ मेरा भी यही था’ थोड्यावेळाने मी पुन्हा जाण्यासाठी उठलो तेव्हा मात्र विभाने चावी माझ्या हातात दिली व हसली ! मी म्हणालो..” अच्छा इस वजह से मुझे पहले चाबी नहीं मिली थी” व मी विभाला तीच्या घरी सोडून सरळ रुम वर आलो !!!

मी दिल्लीला परत येऊन एक महीना झाला होता… व संजनाच्या नवीन कामासाठी मला आपली पहली जॉब सोडावी लागणार होती.. व कंपनीने दिलेली रुम वजा घर देखील ! त्याची तयारी करुन मी कंपनी मध्ये वर्मासरांकडे मी जॉब सोडणार आहे ह्याचा उल्लेख केला.. त्यांनी प्रचंड समजावून पाहीले व नंतर परवानगी दिली व मी संजना सोबत पाटर्नर म्हणून काम चालू केले… पण सामान आणण्यासाठी चीन ला जाणे गरजेचे होते.. व टेकनीकल माहीती मला जास्त होती म्हणून माझे ही जाणे गरजेचे होते… पण संजना व तीचे पती म्हणत होते की ह्या महीन्यामध्येच जाऊ.. पण आई देखील यात्रेवरुन परत येणार होती ते ह्याच महीन्यात कसे करावे ह्या विचारामध्ये मी मावशी कडे फोन लावला …” मावशी, आईची काही खबर कधी येणार आहे परत .. फोन आला होता का ? ” मावशी ” अरे .. ह्याच आठवड्यात येणार आहे.. परत… तीचा फोन आला होता.. तु पण ये !” मी हो म्हणालो व फोन ठेवला.. मी संजनाला कल्पना दिली व म्हणालो… जाण्याची तयारी चालू करा टीकीट बूक करा मी घरी जाऊन लगेच परत येतो..!

मी सरळ दिल्ली एयरपोर्टवर जाऊन शुक्रवारची पुण्याची टीकीट बूक केली व परत येण्यासाठी बुधवारची !! शनीवारी आई घरी येणार होती !!
बझार मध्ये जाऊन.. अक्कासाठी एक तोळ्याची सोन्याची चेन व आई साठी देखील एक चेन घेतली व रुमवर जाऊन जाण्याची तयारी केली व संध्याकाळी निवांत बसून विभाला फोन करुन सर्व कल्पना दिली.. !

मी पुण्यामार्गे… सरळ कोल्हापुर व घरी पोहचलो… शनीवारी दुपारी !…..मावशीच्या घरात तर एकदम गर्दी झालेली होती… सर्व प्रवासी मंडळी देखील काही वेळापुर्वीच पोहचली होती व आई देखील…!
मी बाहेर ऊभा होतो.. व तात्या आले व मला आत घेऊन गेलो.. आई शी कसे भेटावे ह्याचा मनात विचार करत होतो.. काय सांगायचे.. कसे सांगायचे… माफी मागावी तर कशी … डोळे पाण्याने सारखे सारखे भरुन येत होते… व मी सरळ घराचा पाठीमागील अंगणात पोहचलो… तेथे आई व मावशी बोलत बसली होती व मावशीने माझ्याकडे पाहीले व आईला म्हणाली ” अक्का… राजा आला बघ ! ” आई पळत माझ्या जवळ आली व मला छातीशी धरुन ओसाबोस्की रडू लागली.. व पाच दहा मिनीटे अशीच गेली.. ! मावशीने तीला धीर देऊन खाली बसवले व मी म्हणालो..” यऊ.. मी आलो आहे ना … ” व मी देखील डोळे पुसू लागलो व तात्या माझ्याकडे आले व मला बाजूला बसवले व पिण्यासाठी पाणी देऊन म्हणाले ” राजा.. लेका रडतोस काय… आता तु मोठा झालेला आहेस.. आता काही काळजी नाही आम्हाला देखील…. मला देखील तीन मुलीच होत्या.. सगळ्या पाहूण्यामध्ये तु एकुलता एक मुलगा.. आम्ही मेलास असे समजून होतो पण देवाच्या कृपेने तु परत आला … !! गप्प बस आता रडू नकोस..”
तासादोनतासाने सर्व वातावरण निवळले.. तात्या जाऊन अक्काला देखील घेऊन आला… तात्याच्या मुली.. माझा मावस बहीणी देखील आपल्या सासर हून परत आल्या होत्या….मला भेटायला !!!!…. राजा दादाला भेटायला… वर्षानू वर्ष राखी बाधण्यासाठी हक्काचा त्यांना दादा परत आला होता ना !
पुर्ण शनीवार.. रवीवार गप्पा मारण्यात व माझी सफर ह्याच मध्ये संपले ! मी हलकेच तात्यांना सूचना दिली की मला मंगळवारी संध्याकाळी जावयास हवे कारण ह्यामहीन्याच्या शेवटी मी चीनला जाणार आहे… ! तात्या ठिक आहे म्हणाले !
मला बेसनलाडू लहानपणी खुप आवडत असत व आईला तर विश्वासच बसला नाही की मी घर सोडल्यापासून बेसनलाडू साधा चाखूनपण बघीतला नाही ईतक्यावर्षात… खास माझ्यासाठी संध्याकाळी बेसनलाडू तयार करण्यात आले व माझी आवड्ती वाम्ग्याची भाजी !!!
ईतक्यावर्षाने घरचे आईच्या हातचे जेवण खाऊन मी तृप्त झालो होतो…! सोमवारी सकाळ्सकाळी मला जवळच्या देवस्थानावर घेउन गेले व आईने आपले सर्व नवस फेडले !!!
तीचा राजा परत आला होता…. ज्याला सर्व नातेवाईक नावे ठेवत होते की कोणी त्याला हॉटेलात सफाईकामाला देखील ठेवणार नाही.. असे छाती ठोक सांगणारे होते… त्याच्या.. विरुध्द जाऊन तीचा मुलगा यश घेऊन आला होता.. मोठया कंपनी मध्ये चांगले हजारो मध्ये पगार मिळवत होता.. तीचा नवस पुर्ण झाला !! तीने माझ्याकडे एक मागणे मागीतले म्हणाली जाण्याआधी तू गाव जेवण घाल ! बस. मी म्हणालो खरोखर मोठी गडबड झाली माझी बुधवारची टीकीटे बुक आहेत व जाणे गरजेचे .. पण तु म्हणतेस तर घालू गावजेवण !!

क्रमशः

Advertisements

One response to “माझी सफर….आई… १८

  1. apashchim एप्रिल 9, 2010 येथे 4:30 सकाळी

    namaskar , please continue your writing about mazi safar .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: