राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

विचार करा !!!!

This Vedio

चलचित्रपट पाहिला निसर्गावरचा व मनात एक विचार आला…. गुगलून पाहिले व डोक्याला थोडा शॉट लागला.. तोच शॉट तुमच्या डोक्याला देखील लागू दे म्हणून हे विकि पेज !!!

सर्वात प्रथम कागद !
आपण आपल्या रोजच्या जिवनामध्ये अनेक प्रकारे कागद वापरतो.
ऑफिसमध्ये, घरामध्ये, हॉटेल्स मध्ये इकडे तिकडे.. कुठे ही… कसा हवा तसा !!

तर १ टन कागद तयार करायला किती बळी द्यावे लागतात त्याचा जरासा हा आढावा.

जे पुन्हा वापरात येणार नाही असे १ टन कागद तयार करण्यासाठी लागणारी झाडे (पुर्ण वाढ झालेली)

ऑफिसचे प्रिंन्टिंगचे व इतर कामात येणारे कागद – २४ झाडे.
म्हणजेच तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये २० पेपर रिम ( गठ्ठा ?) वापरता तेव्हा ६ झाडे बळी गेलेली असतील.

वर्तमानपत्राचे कागद – १२ झाडे
चांगल्या प्रतीचे मासिक तयार करण्यासाठी वापरले जाणारे कागद – १५ झाडे
कमी प्रतीचे मासिक तयार करण्यासाठी वापरले जाणारे कागद – ८ झाडे

वरील पेपर तर गरजेचे झाले असे समजा,
मग बाकीचे कागद कोठून येतात ?
टिशुपेपर, सिडी/डिव्हीडीचे पेपर कवर, काडीपेटी, सिगरेटचे पेपर पॅकिंग, माल वाहतूकीसाठी लागणारे मोठे मोठे बॉक्स, पेपर ग्लास, पुस्तके, वह्या……. यादी खुप मोठी आहे… !

२००० नंतर रिसायकल करण्याचा प्रयत्न सुरु केला गेला २०१० मध्ये आपण फक्त १०%च कागद रिसायकल केलेला वापरतो ( तो रिसायल केलाच असेल ह्यांची खात्री नाही, भले त्यावर चिन्ह असू दे)

गेल्या ६० वर्षात भारतातील ७०% जंगले नष्ट झालेली आहेत.

आपल्या समोरचीच उदाहरणे सांगायची झाली तर, वीस वर्षामागे कोल्हापुर विशालगड हा रस्त्ता प्रंचड घनदाट जंगलातून जात असे… की दिवसादेखील भिती वाटावी एकट्याला…. व आता ? रस्तातोच आहे, पण जंगल गायब आहे…

ज्यांनी १९९९ च्या आधी पुणे-बेंगलोर प्रवास केला असेल त्यांना आठवत असेल दुतर्फा उभी असलेली निलगिरी, वडाची झाले… आता ? बाईकवरुन दिवसाजाताना सावली साठी झाड शोधावे लागत आहे…. !

आपल्या सुविधेसाठी निर्माण झालेल्या सोयींची किंमत त्या झाडांनी मोजली…

सिहंगड रोडवर म्हणे आधी जंगल होते… परवाच कोणतरी म्हणत होते (टिंग्या / ररा) धायरीफाट्याच्या पुढे… सिंहगडाकडे जाताना !

आपल्यासमोरच जवळ जवळ ८०% झाडे गायब झाली…. जेथे तुम्ही आम्ही पोहचू शकत नाही, सरकार पोहचू शकत नाही तेथे ????

http://www.mimarathi.net/comm/blog/बघा-आणी-विचार-करा

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: