राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

Monthly Archives: जानेवारी 2011

भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी कालवश

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे निधन !

Advertisements

खेळविश्व -विश्वकप

नमस्कार !
आम्ही मी मराठीवर विश्वकप हा विभाग चालू केला आहे व क्रिकेट बद्दल चे लेख तेथे प्रकाशित करत आहोत, मान्यवर लेखकांना विनंती आहे की खेळविश्व विभाग समृद्ध करण्यासाठी हातभार लावावा, जे क्रिकेट खेळतात, ज्यांना आवडतं व जे लिहू शकतात त्यावर त्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे 🙂 तुमचा एखादा मित्र / मैत्रीण जर क्रिकेटवर लिहत असेल तर ती च्या / त्याच्या पर्यंत ही माहिती जरूर पोहचवा.

http://www.mimarathi.net

 

 

इतर भाषेतील रत्ने – भाग -२

कात्तिक बदी अमावस थी और दिन था खास दीवाळी का
आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ।

कितै बणैं थी खीर, कितै हलवे की खुशबू ऊठ रही
हाळी की बहू एक कूण मैं खड़ी बाजरा कूट रही ।
हाळी नै ली खाट बिछा, वा पैत्यां कानी तैं टूट रही
भर कै हुक्का बैठ गया वो, चिलम तळे तैं फूट रही ॥

चाकी धोरै जर लाग्या डंडूक पड़्या एक फाहळी का
आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ॥

सारे पड़ौसी बाळकां खातिर खील-खेलणे ल्यावैं थे
दो बाळक बैठे हाळी के उनकी ओड़ लखावैं थे ।
बची रात की जळी खीचड़ी घोळ सीत मैं खावैं थे
मगन हुए दो कुत्ते बैठे साहमी कान हलावैं थे ॥

एक बखोरा तीन कटोरे, काम नहीं था थाळी का
आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ॥

दोनूं बाळक खील-खेलणां का करकै विश्वास गये
मां धोरै बिल पेश करया, वे ले-कै पूरी आस गये ।
मां बोली बाप के जी नै रोवो, जिसके जाए नास गए
फिर माता की बाणी सुण वे झट बाबू कै पास गए ।

तुरत ऊठ-कै बाहर लिकड़ ग्या पति गौहाने आळी का
आंख्यां कै मांह आंसू आ-गे घर देख्या जब हाळी का ॥

ऊठ उड़े तैं बणिये कै गया, बिन दामां सौदा ना थ्याया
भूखी हालत देख जाट की, हुक्का तक बी ना प्याया !
देख चढी करड़ाई सिर पै, दुखिया का मन घबराया
छोड गाम नै चल्या गया वो, फेर बाहवड़ कै ना आया ।

कहै नरसिंह थारा बाग उजड़-ग्या भेद चल्या ना माळी का ।
आंख्यां कै मांह आंसू आ-गे घर देख्या जब हाळी का ॥

रचनाकार – कवि नरसिंह

शेतकऱ्यांचा प्रश्न आपल्या येथेच आहे असे नाही, तर समृद्ध अश्या समजल्या जाणार्‍या पंजाब व हरियानामध्ये देखील बिकट अवस्था आहे शेतकऱ्याची. व प्रत्येक भाषेत, प्रत्येक मातीत असा एखादा जन्म घेतोच जो आपल्या रचनेतून अश्या प्रश्नांना वाचा फोडतो. हरयानामध्ये आजही संयुक्त कुटुंबं पद्धती असते व गावच्या गाव नात्यातील असते, ५२ गावाचा कुणबा ,पंचक्रोशी असते, जे वयोवृद्ध आहेत त्यांच्या संध्याकाळी तरुणाई जेव्हा शेकोटीला बसते तेव्हा, कोणीतरी एखाद्या ९० पार बाबाला एखादा किस्सा सांगायला सांगतो.. व गप्पांचा फड रंगतो. प्रत्येक गावात हीच पद्धत ! मग कधी कधी लोक गीतांचा जोर चालतो व एकापेक्षा एक लोक गीते कानावर येऊ लागतात व आपण कधी तल्लीन होऊन जातो ते समजत देखील नाही.

काल रात्री थंडीचा जोर वाढल्यामुळे जरा चहा पिण्यासाठी म्हणून बाहेर पडलो तर थोडेफार असेच दृष्य एकदम हरयाणाच्या विरुद्ध दिशेला बंगलोर मध्ये दिसले. तेव्हाच मनात आलं हरयाणाचे जरा वेगळे रुप दाखवू या गेली ३-४ वर्ष हरयाना बातम्या मधून बदनाम होत आहे, लोकांच्या मनात हरियानाची प्रतिमा जरा वेगळीच होत आहे. पण तेथील माणूस देखील मातीशी जुळलेला आहे, जो प्रश्न आपल्या येथे तोच प्रश्न तिकडे देखील आहे. जमिनी विकून त्यांची पोरं आपली स्वप्ने पुर्ण करण्याच्या नादी लागली आहेत.. !

तर हा हरयाणा व हरयाणाची बोलीभाषा म्हणजे हरयाणवी !
जाट व यादवांची भाषा ! पहिल्यांदा जेव्हा कानावर ही भाषा पडेल तर तुम्ही नक्कीच दचकणार ! एकदम खडी व थेट बोलली जाणारी ही भाषा. पण या भाषेत देखील माधुर्य कमी नाही. खरं तर एखादी आनंदी कविता घेऊन अथवा रचना घेऊन हे लिहता आले असते.. पण मला ही कविता दुःखाची झालर जरी असतील तरी आवडली. भाषेची ताकत दाखवण्यासाठी योग्य वाटली म्हणून घेतली आहे.


कात्तिक बदी अमावस थी और दिन था खास दीवाळी का
आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ।

“कात्तिक बदी अमावस थी और दिन था खास दीवाळी का” दिवाळीचे जेवढे महत्त्व आपल्याकडे आहे तेवढेच हरियाणामध्ये, आपल्याकडे गणपती, दसरा इतर सण तर आहेत साजरे करायला पण त्यांना दिवाळी म्हणजे खरोखरची दिवाळी मोजून एक-दोन सण असलेला हा समाज दिवाळी एकदम उत्साहात साजरी करतो, आता पहिल्या ओळीचा अर्थ लागला असेल. वर खास हा शब्द आहे, तो मुख्य या अर्थाने आहे.

“आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ।”

दिवाळीच्या दिवशी पाहुण्याच्या घरी जाण्याची व त्यांना मिठाई व कपडेलत्ते भेट म्हणून देण्याची पद्धत तीकडे आहे व कोणी टाळू शकत नाही व जर टाळली तर बाकीचे मुद्दाम सर्वांना गोळा करून जास्त भेट देतात कारण त्यांना कळते की अरे पैश्याची अडचण असेल, नाहीतर रितीरिवाज टाळणार नाही कोणी. याच उद्देशाने जेव्हा तो पाहुण्याच्या घरी जातो तेव्हा मात्र मनात चलबिचल चालू होते, समोरच्याची अवस्था पाहून.


कितै बणैं थी खीर, कितै हलवे की खुशबू ऊठ रही
हाळी की बहू एक कूण मैं खड़ी बाजरा कूट रही ।
हाळी नै ली खाट बिछा, वा पैत्यां कानी तैं टूट रही
भर कै हुक्का बैठ गया वो, चिलम तळे तैं फूट रही ॥

पुर्ण गावात, खीर व हलवा प्रत्येक घरात तयार होत आहे, त्यांचा सुगंध सगळीकडेच पसरला आहे, सगळी कडे दिवाळीची तयारी जोरात चालू आहे, सगळे खुशीत आहेत पण, पाहुण्यांची ( हाळीच शब्द वापरू आपण) सून एका कोपर्‍यात बाजरा ( जोंधळे) कुटत उभी आहे. हाळीने (पाहुण्याने) मी आलेला पाहून लाकडी खाट ( दोर्‍यांची, जी आपल्या कडून कधीच हद्दपार झाली आहे) पुढे केली पण तो विसरला होता, ती थोडी तुटलेली आहे… पाहुण्याला हुक्का भरून देणे हा रिवाज, त्याने हुक्का भरून दिला, पण समोर हुक्का असून देखील तो फुटलेली चिलीम ओढत राहिला.

आता या ओळी काय सांगत आहेत ? अवस्था एवढी वाईट झालेली आहे की बाजरा ( जोंधळ्यांची) भाकरी करण्यासाठी सून स्वतः बाजरा कुटत उभी आहे. ( हरयाणाचे प्रमुख खाद्य गव्हाची भाकरी हे आहे, जसे आपल्या येथे गरिबीची उपमा देण्यासाठी, पीठ घातलेले पाणी दुध म्हणून पिलं असे सांगतात तसेच) बाजरा खावा लागत आहे, साधे गहू देखील शेतात पिकलेले नाही अथवा सगळे पिकं वाया गेलेले आहे. हरयाणवी शेतकरी , कोणाच्या घरी जाऊन गहू कधीच मागणार नाही. खळी च्या खळी प्रत्येक घरात भरून ठेवलेल्या असतात, पण याच्याकडे खळी तील गहू देखील संपले आहे.

घरात येणाऱ्या जाणाऱ्याला बसण्यासाठी खुर्च्या नसतात, तर खाट असतात २ फुट बाय ४-५ फुट चे. तो प्रत्येक घरात असतो व त्यावर पाहूणे बसणार म्हणून तो नेहमी व्यवस्थित ठेवला जातो. पण तो तुटला आहे हे तो विसरला आहे अथवा त्याला माहितीच नाही अथवा ते दुरुस्त करून घ्यावे एवढे ही सामर्थ्य नाही राहिले आहे.

पाहुण्याला हुक्का देणे ही त्याला सन्मान देणे हे तर आहेच पण त्यातून मी हुक्का देऊ शकतो तेवढा मी संपन्न आहे हे सांगणे देखील आहे. पण येथे जरा अवघड परिस्थिती झाली आहे, हुक्का आहे पण तो पाहुण्याला पुरले एवढाच आहे ( हुक्क्याचा तंबाखू) म्हणून समोरच्याला हुक्का देऊन तो चिलीम ओढत बसतो आहे, पण ती चिलीम खालून फुटलेली आहे, म्हणजे एक नवीन चिलीम घेणे देखील सध्या अशक्य आहे. फुटकी चिलीम ओढणे सोडा, जर हलकाच टवका जरी चिलीम चा उडाला असे तर हरयाणवी ती फेकून नवीन घेतो, इज्जत अब्रू जपणे हे त्याच्या साठी सर्वात महत्त्वाचे आहे. पण हाळीची (पाहूण्याची) अवस्था खूपच बिकट आहे.


चाकी धोरै जर लाग्या डंडूक पड़्या एक फाहळी का
आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ॥

सगळ्यात वाईट त्याला तेव्हा वाटते की अरे हे काय चाकी जवळ ( चाकी = चुली जवळ) एक दांडुकं पडलं आहे व तो दांडकं फाहळी चे आहे.. ( फाहळी = फावडा = शेत जमीन खोदण्यासाठी वापरले जाणारे). म्हणजे शेती वरून त्याचा विश्वास उडत चला आहे, आपण राब राब राबून देखील आपल्याला त्यांचे काही फळ मिळेल असे त्याला वाटत नाही आहे, म्हणून नैराश्यामुळे त्याने फावडा मोडला असेल व आता त्या फावड्याचा दांडा सरपण म्हणून चुली जवळ पडलेले आहे.


सारे पड़ौसी बाळकां खातिर खील-खेलणे ल्यावैं थे
दो बाळक बैठे हाळी के उनकी ओड़ लखावैं थे ।
बची रात की जळी खीचड़ी घोळ सीत मैं खावैं थे
मगन हुए दो कुत्ते बैठे साहमी कान हलावैं थे ॥

बाहेर दिवाळी आहे, आजूबाजूची मुले खेळ खेळत आहेत, फटाके फोडत आहेत पण यांची मुले फक्त पाहत उभी आहेत, हिरमुसलेली आहेत. काल रात्री राहिलेला भात व सीत ( ताक ?) मिसळून खात आहेत व आम्हाला ही खायला मिळेल अशी आशा घेऊन दोन कुत्री येथे बसलेली आहेत. आपल्या मुलांना देण्यास अन्न नाही आहे.. कुत्र्याला कोठून देणार ?


एक बखोरा तीन कटोरे, काम नहीं था थाळी का
आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ॥

एक बखोरा ( एक खोलगट भांडे) आणि तीन वाट्या, ताटाची गरज नाही आहे, कारण ताटाची गरज तेव्हा लागणार जेव्हा भाकरी असेल, भाजी असेल. जर तेच अन्न उपलब्ध नाही आहे तर ताट घेऊन बसण्यात काय अर्थ आहे ? मुलाबा़ळांची जेवणाची देखील आबाळ चालू आहे. त्यांची अवस्था अशी झालेली आहे की, गरिबी लपवावी हे देखील आता त्याला साध्य नाही आहे.

दोनूं बाळक खील-खेलणां का करकै विश्वास गये
मां धोरै बिल पेश करया, वे ले-कै पूरी आस गये ।
मां बोली बाप के जी नै रोवो, जिसके जाए नास गए
फिर माता की बाणी सुण वे झट बाबू कै पास गए ।

आसपासच्या मुले साजरी करत असलेली दिवाळी पाहून शेवटी त्यांच्या मुलांना रहावले नाही व आम्हाला ही हवे असा हट्ट धरण्यासाठी आई जवळ गेले. पण आधीच त्रासलेली आई, त्यांना काय उत्तर देणार ? शेवटी ती म्हणते आपल्या वडिलाकडे जावा, त्याच्या समोर रडा.(मां बोली बाप के जी नै रोवो, = माझा जीव घाऊ नका, आपल्या बापाची खा) हे सगळे वाईट घडत आहे, सगळे नासले आहे, जेथे हे गेले. यांच्यामुळेच हे घडले. दोषारोपण चालू झाले आहे, घरात ठिणगी पडलेली आहे. भांडणे होत आहेत हे आपल्या फक्त या चार शब्दातून कळते…. कारण नवर्‍यासमोर ब्र देखील न उच्चारणे ही मुलींसाठी सामाजिक शिकवण तेथे आहे, पण आता ती स्त्री देखील वैतागली आहे, त्रासलेली आहे. अगतिकतेतून काहीही बोलत आहे.


तुरत ऊठ-कै बाहर लिकड़ ग्या पति गौहाने आळी का
आंख्यां कै मांह आंसू आ-गे घर देख्या जब हाळी का ॥

बायकोचे बोलणे एकल्यावर व मुले आपल्याकडे येत आहेत, आता ते कपडे, फटाके मागणार, हे समजल्या समजल्या तो उठून गल्लीच्या कोपर्‍याकडे गेला. त्याला सुचत नाही आहे, मुलांच्या प्रश्नांना काय उत्तरे देऊ, त्यांचा सामना कसा करू. खिश्यात दमडी नाही आहे कशी साजरी करणार दिवाळी व मुलंची इच्छा तरी किती मारायची ? नैराष्य ! प्रत्येक क्षण अवघड होत चलला आहे.

ऊठ उड़े तैं बणिये कै गया, बिन दामां सौदा ना थ्याया
भूखी हालत देख जाट की, हुक्का तक बी ना प्याया !
देख चढी करड़ाई सिर पै, दुखिया का मन घबराया
छोड गाम नै चल्या गया वो, फेर बाहवड़ कै ना आया ।

गल्लीच्या कोपर्‍यावर असलेल्या वाण्याच्या दुकानात तो गेला पण वाण्याने पण छिडकारले, आधीची उधारी बाकी असताना कलफ माणसाला कोण उधारी देणार ? या जाटाचा हाल बघून हुक्का पण प्यावा असे वाटत नाही आहे, मन भरून आले आहे.
आपली अशी अवस्था पाहून तो आधीच दुखी असलेला घाबरला आहे, आपली इज्जत , अब्रु जाणार या भितीने चलबिचल झाला आहे, अचानक निर्णय घेतला व तेथूनच गाव सोडून, कि जग सोडून ? निघून गेला ते कधीच परत न येण्यासाठी. कधीच परत फिरकला नाही घराकडे. भरलेले घर, एका दिवाळीच्या रात्री श्मशान झाले. आपल्या दोन लहानग्यांना सोडून, परिवाराला सोडून तो निघून गेला.


कहै नरसिंह थारा बाग उजड़-ग्या भेद चल्या ना माळी का ।
आंख्यां कै मांह आंसू आ-गे घर देख्या जब हाळी का ॥

कवी देवाला म्हणातो आहे, अरे तु बसवलेले एक घर बरबाद झाले, मातीत मिसळले, पण तुझा खेळ काय समजला नाही, तु माळी असताना तुझ्या बागेची अशी अवस्था का झाली ? तुझ्या मनातला खेळ काही समजला नाही.

एक शेतकरी जेव्हा आत्महत्येचे पाऊल उचलतो, तेव्हा काय मानसिक अवस्था असते कसे कोणी समजू शकेल ? शेतीच्या खर्चाचे गणित फक्त एका ऋतुमुळे देखील बिघडू शकते पण ज्यांची घरेच शेतीवर चालतात, त्यांना एकदा गणित चूकले, फाडा पानं, दुसरे चालू करू असा पर्याय नसतो. असे काही वाचले ले की जिवाची तगमग होते, वाटतं की अशा आत्महत्या जर होत राहतील तर कोण पुढे शेती करायला धजावेल ?

हरि बिन कूण गती मेरी।

नये साल की पहली सुबह तुम्हें क्या दूं मैं ?
एक फूल अमन के लिए,
एक बन्दूक आज़ादी के लिए,
एक किताब संग-साथ के लिए ?
तुम्हारी आंखों के लिए नयी चमक ?
तुम्हारे ख़ून के लिए नयी गरमी,
तुम्हरे प्रेम के लिए नयी नरमी,
दिल के लिए नयी आशा, संघर्ष के लिए नयी भाषा ?
नये वर्ष में दूर हों ग़म,
नये वर्ष में मिटें सितम,
नये वर्ष में दुख हों कम,
सिर झुकें नहीं, बांहें थकें नहीं,
टूटें सभी बेड़ियां, मिले नया दम ।

रचनाकार: नीलाभ

कधी कधी भाषेची भिंत उध्वस्त होते ती अश्या कवीच्या मुळे / लेखकांच्यामुळे.
मराठीमध्ये, हिंदीमध्ये व इतर अनेक भारतीय भाषेत अनेक कवी लेखक होऊन गेले, आहेत व येतील जे आपल्या या तणावपुर्ण जिवनात काही क्षण आपले साथी बनून राहतील. वरील कविता जेव्हा मी वाचली तेव्हा दंग राहिलो होतो. एक एक ओळ म्हणजे अप्रतिम आहे, प्रत्येक ओळ एवढी समर्थ आहे कवी समोर नतमस्तक व्हावे माणसाने.

सिर झुकें नहीं, बांहें थकें नहीं,
टूटें सभी बेड़ियां, मिले नया दम ।

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येवर लिहलेली असेल ही कविता त्यांनी. तरूण रक्ताला जागृत करण्यासाठी.. जोष, एक उल्हास निर्माण करण्यासाठी निर्मित झालेली असावी ही कविता.

काही कविता भुरळ घालतात मनात कुठेतरी घर करून राहतात, त्यामध्ये नावे घ्यावीत असे खूप आहेत पण एक नाव नक्कीच सर्वात प्रथम येईल माझ्या लिस्ट मध्ये मीरा !

अरे प्रेमात वेडे होणे म्हणजे काय हे मीराच्या भजनांकडे पाहिले की कळते. भक्तीची परमोच्च सीमा रेखा पार करून ज्याला इश्वर मानले त्याच्यावरच प्रेम करायचे व ते देखील एवढं उच्च किती हातात आलेला विषप्याला देखील अमृत म्हणून घ्यायचे, हा साधा खेळ नाही आहे. त्यासाठी मीराच व्हावे लागते, मीरा आपल्या समोर फक्त येते काव्य स्वरूपात, तीने केलेल्या तीच्या बोली भाषेतील रचनेत, राजस्थानी म्हणजे पहाडी आवाज असलेला, खडी बोली ज्याला म्हणतात अशी भाषा पण त्या भाषेची गोडी जरा वेगळीच आहे.
*
हरि बिन कूण गती मेरी।
तुम मेरे प्रतिपाल कहिये मैं रावरी चेरी॥

आदि अंत निज नाँव तेरो हीयामें फेरी।
बेर बेर पुकार कहूं प्रभु आरति है तेरी॥

यौ संसार बिकार सागर बीच में घेरी।
नाव फाटी प्रभु पाल बाँधो बूड़त है बेरी॥

बिरहणि पिवकी बाट जोवै राखल्यो नेरी।
दासि मीरा राम रटत है मैं सरण हूं तेरी॥
*

हरि बिन कूण गती मेरी।
तुम मेरे प्रतिपाल कहिये मैं रावरी चेरी॥

कृष्णा तुझ्या वाचून कोण माझे, मला या संसाराच्या भवसागरातून पार करण्यास तुच समर्थ, पण जर तूच जर नसशील तर माझे काय होईल. तुच माझे सर्वस्व आहेस व तूच माझी काळजी घेणारा आहे.. येथे मीरा स्वतःला रावरी चेरी म्हणत आहे, रावरी चेरी = कट्टर समर्थक हास्य कट्टर भक्त !

आदि अंत निज नाँव तेरो हीयामें फेरी।
बेर बेर पुकार कहूं प्रभु आरति है तेरी॥

अरे तुझे नाव माझ्या हदयात फेरे धरून नाचत आहे, क्षणाक्षणाला तुझी आठवण येत आहे, सुरवात तूच व माझा शेवट ही तूच, असे वेड्या सारखं तुझे नाव घेत आहे, पण याला वेडेपणा म्हणून नकोस हीच तुझ्यासाठी मी रचलेली आरती, पुजा आहे देवा !

यौ संसार बिकार सागर बीच में घेरी।
नाव फाटी प्रभु पाल बाँधो बूड़त है बेरी॥

या संसाराच्या विक्राल सागराच्या मध्यात मी अडकलेली आहे, तीच सुटका कर रे माझी, नाव फाटी , अरे या भवसागरात अडकत चाले आहे मी, तुच त्राता आहेस तूच मला यातून बाहेर काढशील… हात दे मला, या बुडत्या जहाजातून बाहेर पडण्यासाठी, पाल बाँधो प्रभु !

बिरहणि पिवकी बाट जोवै राखल्यो नेरी।
दासि मीरा राम रटत है मैं सरण हूं तेरी॥

मी, वाट पाहत आहे तुझी, ये व मला जवळ घे, आपल्यात सामावून घे माधवा, सगळे हरले आता, दासी झाली मीरा… तुझ्या नामस्मरण मध्येच दंग आहे, लवकर ये व आपल्या जवळ कर.

किती साध्या सोप्या बोली भाषेत लिहलेली रचना आहे, काही उदाहरणे देणे, त्यातून आपली अजोड भक्ती देवा समोर मांडणे व त्याची आर्जव करण्यासाठी धडपणे ही मीरा च्या रचनेची खासियत म्हणावी लागेल. प्रयेक ओळ आपल्या ह्दयाला स्पर्श करून जाते, तीच्या प्रेमाची, भक्तीची तुलना कोणाशी होऊच शकत नाही, मीरा ही मीराच आहे, दुसर्‍या एका रचनेत तीला माधवा बरोबर राधा ची उपस्थिती खलती आहे हे स्पष्ट म्हणते पण त्याच नंतर लगेच, राधा शिवाय तुझ्यावर एवढं प्रेम करणार म्हणून ती ची महती देखील कबूल करते. ही समर्पणाची भावना मीरा च्या शब्दाशब्दांत आहे म्हणून ती मला जरा वेगळीच भासते, आवडते.

आता जरा वेगळी रचना.. माझ्या अत्यंत आवडत्या गझलकराची निदा फ़ाज़ली यांची !

कुछ तबीयत ही मिली थी ऐसी चैन से जीने की सूरत ना हुई
जिसको चाहा उसे अपना ना सके जो मिला उससे मुहब्बत ना हुई

जिससे जब तक मिले दिल ही से मिले दिल जो बदला तो फसाना बदला
रस्में दुनिया की निभाने के लिए हमसे रिश्तों की तिज़ारत ना हुई

दूर से था वो कई चेहरों में पास से कोई भी वैसा ना लगा
बेवफ़ाई भी उसी का था चलन फिर किसीसे भी शिकायत ना हुई

वक्त रूठा रहा बच्चे की तरह राह में कोई खिलौना ना मिला
दोस्ती भी तो निभाई ना गई दुश्मनी में भी अदावत ना हुई

किती स्पष्ट व अर्थपुर्ण रचना !
पहिली ओळ “कुछ तबीयत ही मिली थी ऐसी चैन से जीने की सूरत ना हुई” पाया आहे तर शेवटीची ओळ “दोस्ती भी तो निभाई ना गई दुश्मनी में भी अदावत ना हुई” कळस आहे.

दोस्ती भी तो निभाई ना गई दुश्मनी में भी अदावत ना हुई
मैत्री करणे जमलेच नाही ते तर सोडा, पण दुश्मनी करण्यासाठी गेलो तर साधी दुश्मनी (अदावत) पण नाही झाली…. क्लास !

रस्में दुनिया की निभाने के लिए हमसे रिश्तों की तिज़ारत ना हुई

मरजावां ! काय लिहू मी ओळीसाठी हास्य जगाची रित जरा वेगळी असते, येथे टिकण्यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे , पण त्याच गोष्टी मला करता नाही आल्या, नात्यांचा धंदा / व्यापार करता नाही आला मला.

आता थोडा आराम… पुन्हा कधी तरी असेच लिहीन काही माझ्या मनातील आवडत्या कवितेच्या संदर्भात !

वाय-फाय नेटवर्क व सुरक्षा

अनेकवेळा धमकीचे ईमेल पाठवण्यासाठी आतंकवादी, इंटरनेट वाय-फाय नेटवर्कचा वापर करतात हे तुम्ही वाचले असेलच, काही वर्षा पुर्वी महाग असलेले हे उपकरण आता घराघरात आहे. पण आताच वाचले (एका बझ मित्रांचा बझ) की पुण्यातील ७०% वायफाय नेटवर्क कुठल्या ही सुरक्षेशिवाय चालू आहेत. ( अनप्रोटेक्टेड ?) म्हणजे कोणी ही त्यांच्या रेंजमध्ये येऊन आपला, लॅपटॉप / वाय-फाय असलेला मोबाईल.. वापरून इंटरनेट वापरू शकतो. अगदी कोणाच्या नकळत.

जर तुमच्याकडे वाय-फाय मोडेम असेल तर…

१. जर तो तुमच्या इंटरनेट सेवा दात्याकडून मिळाला असेल तर त्यांना संपर्क करून त्यांच्या सुरक्षेसाठी माहिती घ्या. WAP पासवर्ड कसा तयार करावा पासून नेटवर्क रेंज किती ठेवावी पर्यंत ची सर्व माहिती ते देतील.

२. जर तुम्ही वेगळ्या कंपनीचा वाय-फाय मोडेम वापरत आहात तर मॅनूअल मध्ये माहिती असेल तीचा वापर करा.

३. उघडया खिडकीपासून मोडेम दूर ठेवा / खिडकी जवळ ठेऊ नका. ( १०० मिटर च्या आसपास रेंज असते वाय-फाय मोडेमची)

४. अनलिमिटेड नेट आहे म्हणून चालूच ठेऊ नका. गरज नसेल तर बंद ठेवा wink

५. आपली सुरक्षा आपल्या हाती हे विसरू नका व वर दिलेले मुद्दे अमलात आणा !

* काही मदत लागली तर निसंकोचपणे येथे विचारा.

लोकहितार्थ प्रकाशित.

आपल्या देशात खरोखर लोकशाही आहे ?

नाही, हा प्रश्न मी वेड्याच्या भरात अथवा उपहासात्मक पणे नाही विचारत आहे.
आजकालच्या बातम्या पाहिल्या की असे वाटते, भारतात लोकशाही नाही आहे, लोकांनी निवडलेले सरकार, हे देशाचे मालक आहे व त्यांना हवे तसे ते देशाचा वापर करणार. हे गेली ६०-६५ वर्ष झाले, असेच चालू आहे. आपल्याला हवे तसे कायदे बदलणे, हवे तसे अध्यादेश काढणे, कोणी विरोधात बोलत असेल तर त्याला बुकलून काढणे नाहीतर वर पाठवणे. एखादा मुद्दा हातातून जातो आहे असे वाटत असेल तर एखादे बाजार बुजगावणं उभे करणे जेणे करून जनतेचे लक्ष विचलित केले जाऊ शकेल. हे काय चालू आहे सर्व ?

मागील वर्षात २०१० मध्ये १० मोठे घोटाळे बाहेर पडले असतील, तसे नवीन काहीच नाही, नेहमीचेच. पण आकडे वाढले, मला माहिती असलेला पहिला घोटाळा बोफोर्स तो काही करोड चा होता, पण गेल्या २० वर्षात आपण खूप प्रगती केली आहे, आता लाखो करोड चे घोटाळे होतात. हो प्रगतीच आहे. एका जमातीची लांडग्यांची !

आजच्याच दोन बातम्या मन विचलित करून गेल्या.
पहिली होती, पोलिस स्टेशन मध्ये राजकीय नेत्याने / मंत्रीने / ज्याच्याकडे अधिकार आहेत अश्याने जर फोन केला तर त्यांचे रेकॉर्ड ठेवले जात असे ( विलासराव, त्यामुळेच अडकले असतील) पण आज आपल्या गृहमंत्र्यांनी तो आदेश रद्द केला व नवीन काढला की असे रेकॉर्ड ठेवण्याची गरज नाही.

दॅट्स इट ! गेम झाली ! कोणाची ? जनतेची. आणि कोणाची होणार ?

दुसरी बातमी !

अयोध्येत, हिंदू – मुस्ल्लिम वाद चालू आहे, त्यात थर्ड पार्टी आली आहे, बौध्दांची ! त्यांचे मत आहे तेथे आधी विहार होता. म्हणजे जो मुद्दा संपत आला होता, तो लगेच संपू नये, अजून ४०-५० वर्ष आपण त्या केसच्या नादात राहू, जनता नंतर विसरून जाईल अथवा दंगली करत राहिल. आज बौद्ध ! उद्या जैन ! हो. जैनांचे २४ तिर्थंकर आहेत, त्यातले ५ अयोध्ये शी निगडित आहेत. उद्या ते पण म्हणतील, तेथे आधी जिनालय होते ! पुराव्यासाठी अयोध्येत त्या त्या तिर्थंकरांची मंदिरे आहेतच. नंतर खूप आहेत जाती- धर्म ! कोणी ही उभा राहील. अरे चालले आहे का ? परवा फेसबुकवर कविता महाजन यांनी पोस्ट टाकली होती, भारतात सर्वात जास्त बाल कुपोषण आहे, अगदी आफ्रिकेतील काही देशांना लाजवेल असे ! बेरोजगारी तोंड फाडून उभी आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, पिण्याच्या पाण्यापासून खाण्यापर्यंत वांदे निर्माण होत आहेत, नंतर पाहू मंदिर, मसजिद अथवा बौध्दालय ! आता कंटाळा आला आहे राव.

जगात इतर देशात अडचणी नाहीत असे नाही, पण आपल्या एवढ्या नक्कीच नसतील. अरे देशाचा पर्यावरण मंत्री सांगत आहे की दिल्लीतील अक्षरधाम मंदिर जेव्हा बांधले गेले तेव्हा पर्यावरण खात्याची परवानगी घेतली नाही व यमुना नदीला धोका झाला / पर्यावरणाला धोका झाला… २००५ मध्ये अक्षरधामचे निर्माण संपले ! लेका ५ वर्ष काय झोपा काढत होतास ? की हरिणाची शिकार करत फिरत होतास ? आहेत ना संविधान ने दिलेले अधिकार ? ते का नाही वापरले तेव्हा ! आता तोंड वर करून सांगतो आहेस की आता आम्ही काही करू शकत नाही ? का ? पुढील वर्षी इलेक्शन आले म्हणून ?

आता २जी घोटाळा.. अरे घोटाळा आहे की पोटली बाबा की ची पोटली ? संपतच नाही आहे.. रोज नवीन ! आज सिंबल साहेब बोलले ! म्हणे १९९९ मध्ये एनडिए ने नियम केला होता कुठला तरी त्यामुळे हा लॉस झाला. अबे गेली कित्येक वर्ष तुमची सरकार आहे तेव्हा काय मोबाईलवर मॅडम शी गप्पा मारत बसला होता तुम्ही ? सरकार तुमचे, पुर्ण बहुमत तुमच्याकडे तुम्ही का नाही आधी ती चूक सुधारली ? फक्त खापरं दुसर्‍याच्या थोबाडावर कसे फोडावे हेच का बघ बसला आहात ?

कलमाडी साहेब ! तुम्ही तर देशाचे नाव एकदम उच्च स्थानावर पोहचवले ! पण एक आवडले. सीबीआयने बोलवले तरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जमा झाला नाहीत.. त्या राज्या सारखे ! पण व्हाल ! शेवटी तुम्ही सगळे भाऊच ! एका माळेचे मणी!

जनतेचा अंत नका हो पाहू ! उद्या आपल्या देशात, आपल्या लोकांच्या विरुद्ध, आपल्याच माणसाच्या छातीवर गोळ्या मारत नवीन रक्तक्रांती निर्माण होईल असे नका वागू ! भुकेला माणूस मेलेल्या माणसासारखा असतो.. त्याला नका अजून त्रास देऊ तूम्ही. आधीच पिचलेले आहेत हो… कांदा ६०-७० रु. किलो ! कधी १० ग्रॅम घेऊन यावे की २० ग्रॅम ? याची उत्तरे शोधण्यात तो मग्न आहे, नका त्याला त्रास देऊ ! तुम्ही खा पैसे.. हवे तेवढे पण त्याच बरोबर जनतेसाठी देखील काहीतरी करा. नाहीतर ………………… अवघड आहे देशाचे राजकारण ! असे म्हणत कोणी वेडा भगतसिंग तयार झाला तर तुमची पळता भुई थोडी होईल.

एक बाहूली हरवलेली….

हरवलेली बाहुली.. कधीतरी असेच…
अवचित सापडलेली.. थोडीशी वेंधळी…
थोडी स्वतःमध्येच, हरवलेली अशी
स्वप्नात जगायची, म्हणायची वास्तव
हेच आहे ते जे ,मिळत नाही ते
थोडी विचित्र होती, पण माझी होती
मनातलं मनातच, ठेवायची गुपचूप
हळूच डोळे पुसायची, बोलता बोलता मध्येच
हरवायची स्वतःला, भविष्याची स्वप्ने
जागतेपणी पहायची, गोड हसायची
की हसताना, गोड दिसायची
हे माहीत नाही,पण आवडायची
शब्दांत खेळायची, पण गोड बोलायची
हवी हवी असे, नेहमी वाटायची
काहीच क्षण, साथ होती
पण जन्मजन्मांतरीचे, नाते होते
पण ते काहीच क्षणाचे होते… तिच्यासाठी
शब्द, कविता मध्ये रमायची,
आता शब्दांना, वास्तवाचा अर्थ नाही कळत
त्याला ती काय करू शकते.. थोडी वेडी होती
वर्ष संपले आता, भेटण्याला…
पण कधीतरी मध्येच…. कुठेतरी
बिनसले काहीतरी, अचानकच
पुन्हा हरवली, ती बाहुली !
आता शोधावे, असे देखील वाटत
नाही आहे… या वर्षाला आता
अलविदा म्हणावे ,असे वाटत आहे..
जाता जाता, हळूच मागे वळून
तीच्या नजरेतून ती ला पहावे असे
वाटत आहे… पण आता नको,
जुन्या जख्मा अजून भरल्या नाहीत…
नव्या जखमा का तयार कराव्या
सरले वर्ष, सरले दिवस…सरल्या नजरा
विसरल्या आठवणी, आता विसरले दूखः,
बदलले जग, ती चे व माझे..
शब्द देखील केव्हाच हरवले..
राहू दे, सगळे मागेच आता…
भुतकाळ थोडा जमा करावा
जमेल तसे थोडे थोडे
सुखाला जवळ करावे
नववर्षाचे स्वागत जरा
झोकात करावे म्हणत आहे.