राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

आपल्या देशात खरोखर लोकशाही आहे ?

नाही, हा प्रश्न मी वेड्याच्या भरात अथवा उपहासात्मक पणे नाही विचारत आहे.
आजकालच्या बातम्या पाहिल्या की असे वाटते, भारतात लोकशाही नाही आहे, लोकांनी निवडलेले सरकार, हे देशाचे मालक आहे व त्यांना हवे तसे ते देशाचा वापर करणार. हे गेली ६०-६५ वर्ष झाले, असेच चालू आहे. आपल्याला हवे तसे कायदे बदलणे, हवे तसे अध्यादेश काढणे, कोणी विरोधात बोलत असेल तर त्याला बुकलून काढणे नाहीतर वर पाठवणे. एखादा मुद्दा हातातून जातो आहे असे वाटत असेल तर एखादे बाजार बुजगावणं उभे करणे जेणे करून जनतेचे लक्ष विचलित केले जाऊ शकेल. हे काय चालू आहे सर्व ?

मागील वर्षात २०१० मध्ये १० मोठे घोटाळे बाहेर पडले असतील, तसे नवीन काहीच नाही, नेहमीचेच. पण आकडे वाढले, मला माहिती असलेला पहिला घोटाळा बोफोर्स तो काही करोड चा होता, पण गेल्या २० वर्षात आपण खूप प्रगती केली आहे, आता लाखो करोड चे घोटाळे होतात. हो प्रगतीच आहे. एका जमातीची लांडग्यांची !

आजच्याच दोन बातम्या मन विचलित करून गेल्या.
पहिली होती, पोलिस स्टेशन मध्ये राजकीय नेत्याने / मंत्रीने / ज्याच्याकडे अधिकार आहेत अश्याने जर फोन केला तर त्यांचे रेकॉर्ड ठेवले जात असे ( विलासराव, त्यामुळेच अडकले असतील) पण आज आपल्या गृहमंत्र्यांनी तो आदेश रद्द केला व नवीन काढला की असे रेकॉर्ड ठेवण्याची गरज नाही.

दॅट्स इट ! गेम झाली ! कोणाची ? जनतेची. आणि कोणाची होणार ?

दुसरी बातमी !

अयोध्येत, हिंदू – मुस्ल्लिम वाद चालू आहे, त्यात थर्ड पार्टी आली आहे, बौध्दांची ! त्यांचे मत आहे तेथे आधी विहार होता. म्हणजे जो मुद्दा संपत आला होता, तो लगेच संपू नये, अजून ४०-५० वर्ष आपण त्या केसच्या नादात राहू, जनता नंतर विसरून जाईल अथवा दंगली करत राहिल. आज बौद्ध ! उद्या जैन ! हो. जैनांचे २४ तिर्थंकर आहेत, त्यातले ५ अयोध्ये शी निगडित आहेत. उद्या ते पण म्हणतील, तेथे आधी जिनालय होते ! पुराव्यासाठी अयोध्येत त्या त्या तिर्थंकरांची मंदिरे आहेतच. नंतर खूप आहेत जाती- धर्म ! कोणी ही उभा राहील. अरे चालले आहे का ? परवा फेसबुकवर कविता महाजन यांनी पोस्ट टाकली होती, भारतात सर्वात जास्त बाल कुपोषण आहे, अगदी आफ्रिकेतील काही देशांना लाजवेल असे ! बेरोजगारी तोंड फाडून उभी आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, पिण्याच्या पाण्यापासून खाण्यापर्यंत वांदे निर्माण होत आहेत, नंतर पाहू मंदिर, मसजिद अथवा बौध्दालय ! आता कंटाळा आला आहे राव.

जगात इतर देशात अडचणी नाहीत असे नाही, पण आपल्या एवढ्या नक्कीच नसतील. अरे देशाचा पर्यावरण मंत्री सांगत आहे की दिल्लीतील अक्षरधाम मंदिर जेव्हा बांधले गेले तेव्हा पर्यावरण खात्याची परवानगी घेतली नाही व यमुना नदीला धोका झाला / पर्यावरणाला धोका झाला… २००५ मध्ये अक्षरधामचे निर्माण संपले ! लेका ५ वर्ष काय झोपा काढत होतास ? की हरिणाची शिकार करत फिरत होतास ? आहेत ना संविधान ने दिलेले अधिकार ? ते का नाही वापरले तेव्हा ! आता तोंड वर करून सांगतो आहेस की आता आम्ही काही करू शकत नाही ? का ? पुढील वर्षी इलेक्शन आले म्हणून ?

आता २जी घोटाळा.. अरे घोटाळा आहे की पोटली बाबा की ची पोटली ? संपतच नाही आहे.. रोज नवीन ! आज सिंबल साहेब बोलले ! म्हणे १९९९ मध्ये एनडिए ने नियम केला होता कुठला तरी त्यामुळे हा लॉस झाला. अबे गेली कित्येक वर्ष तुमची सरकार आहे तेव्हा काय मोबाईलवर मॅडम शी गप्पा मारत बसला होता तुम्ही ? सरकार तुमचे, पुर्ण बहुमत तुमच्याकडे तुम्ही का नाही आधी ती चूक सुधारली ? फक्त खापरं दुसर्‍याच्या थोबाडावर कसे फोडावे हेच का बघ बसला आहात ?

कलमाडी साहेब ! तुम्ही तर देशाचे नाव एकदम उच्च स्थानावर पोहचवले ! पण एक आवडले. सीबीआयने बोलवले तरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जमा झाला नाहीत.. त्या राज्या सारखे ! पण व्हाल ! शेवटी तुम्ही सगळे भाऊच ! एका माळेचे मणी!

जनतेचा अंत नका हो पाहू ! उद्या आपल्या देशात, आपल्या लोकांच्या विरुद्ध, आपल्याच माणसाच्या छातीवर गोळ्या मारत नवीन रक्तक्रांती निर्माण होईल असे नका वागू ! भुकेला माणूस मेलेल्या माणसासारखा असतो.. त्याला नका अजून त्रास देऊ तूम्ही. आधीच पिचलेले आहेत हो… कांदा ६०-७० रु. किलो ! कधी १० ग्रॅम घेऊन यावे की २० ग्रॅम ? याची उत्तरे शोधण्यात तो मग्न आहे, नका त्याला त्रास देऊ ! तुम्ही खा पैसे.. हवे तेवढे पण त्याच बरोबर जनतेसाठी देखील काहीतरी करा. नाहीतर ………………… अवघड आहे देशाचे राजकारण ! असे म्हणत कोणी वेडा भगतसिंग तयार झाला तर तुमची पळता भुई थोडी होईल.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: