राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

गणराज रंगि नाचतो, नाचतो…………

देव मानावा अशी माणसं, देवानं पृथ्वीवर पाठवणे कधीच बंद केले आहे, युग-युग गेले, कोणी नाही आला, हाताच्या छापाला कंटाळलेली, संघटीत गुन्हेगारीला व मंदिर-मसजिद मध्ये पोळलेली जनता, एक प्रकारे वैतागलेली जनता. काहीतरी वेगळी नशा हवी होती, या सगळ्या व्यापातून, या सगळ्या कटकटीतून दूर जाण्यासाठी. त्याच वेळी देव देवदुतासारखा धावला व जनतेला देव सापडला, खराखुरा हसत-बोलत खेळत असलेला देव… !

१९८९ ला कसोटी मध्ये, बलाढ्य अश्या पाकिस्तान समोर १६ वर्षाचे एक पोरं उभ होते, जेमतेम १५ धावा करून बाहेर आला, पण त्याच टिमबरोबर दुसर्‍या कसोटीमध्ये त्यांने अर्धशतकी धावा करून आपली हलकीशी चुणूक दाखवली, देवलोकांचे असेच असते, सर्वांची सुरवात संकटातूनच होते, आपला तो कृष्ण बघा, जन्माच्या आधीपासून संकटात..पण पाऊले हळूहळू टाकत गेला अजून ही जनमनसावर राज्य करत आहेच ना, हजारो वर्ष झाली तरी. तर हा आमचा नवा देव, समजले असेलच, तरी ही सांगतो.. सचिन रमेश तेंडुलकर, जगासाठी. आमच्या साठी, सच्या, सचीन.. तेंडल्या !!! बस्स ! दुसरे नाव नाही गरजेचे.

वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादिर व नवखा वकार युनूस यांच्या समोर क्रिकेट जिवनाची सुरवात वयाच्या १६ व्या वर्षी करणे म्हणजे मजाक नाही महाराज, त्यासाठी दैवी काहीतरी हवे तुमच्याकडे… जेव्हा आम्हाला क्रिकेट म्हणजे काय हे समजले तो पर्यंत केसं पांढरी होण्याची वेळ आली होती अनेकांची, तेव्हा त्याच्या रक्तात क्रिकेट खेळत होतं.. तुम्ही कुठल्या जगप्रसिध्द, महान खेळाडूचा अगदी चड्डी न घालता येण्याच्या वयापासून हातात क्रिकेटची बॅट देऊन, हसमुख पोझ दिलेला फोटो पाहिला आहे.. सांगा बरं ? नसेल आठवतं ! कसं आठवणार दुसरा कोणी नाहीच आहे सच्या सोडून..

ज्याच्या रक्तात क्रिकेट आहे, ज्याचे बालपण क्रिकेट खेळण्याची स्वप्ने पाहत गेले, तो सोडून दुसरा कोण उचलणार भारतीय क्रिकेट संघाचा गोवर्धन ? कृष्णानं तर करंगळीवर पेलवलं काही दिवस.. यांने तर आपल्या बॅटवर गेली २१ वर्ष पेलून धरलं आहे व अजून धरून उभाच आहे हा विक्रमादित्य !! देव नाहीतर हा कोण आहे सांगा पाहू ?

९८ शतके, हा हसण्याचा अथवा ९ व ८ हा आकडा लागोपाठ लिहण्याएवढा सोपा खेळ नाही राज्या, एकाग्रता, जिद्द, रक्तबंबाळ होऊन ही, फक्त खेळण्याची जबरदस्त इच्छा शक्ती, व त्यापेक्षा जास्त तेथे सच्या लागतो… मग कुठे कोणाच्या नावापुढे ९८ शतक !! असे लिहले जाईल… हे करणारा शतकात एखादाचं !! तुम्ही नियम बदला, पध्दत बदला, मैदाने बदला काही फरक नाही पडणार जेव्हा देव उभा असेल पीच वर तेथे बाकीच्या गोष्टींची काय मोजदाद ?

एक चांगला माणूस, एक चांगला कुटुंबवत्सल गृहस्थ व खेळावर जिवापाड प्रेम करणारा खेळाडू, ही तीन रुपे, सगळ्यांना संभाळणे जमतेच असे नाही. पण देव काही करू शकतो… काही संभाळू शकतो.

जगात सर्वात जास्त धावा असलेला खेळाडू, एका वर्षात सर्वात जास्त धावा, जगात सर्वात जास्त धावा असलेला एकमेव खेळाडू, जगात सर्वात जास्त शतके, जगात सर्वात जास्त वेळा ९० ते ९९ दरम्यान ऑट झालेला खेळाडू.. जगात एकदिवसीय सामन्यात २०० धावा करणारा एकमेव.. किती एकमेव उदाहरणे देऊ ? असे सगळे रेकॉर्ड देवाच्याच नावाने असतात…

देवाच्या सगळ्या शतकांची माहिती व इतर काही गोष्टी येथे देणार आहे.. हाच धागा अद्यावत होत राहिलं, देव पुराण सांगण्यास आज शब्द कमी पडत आहेत साहेब Sad

पुन्हा एकदा या धाग्यावर लवकर या, अपडेट्स लवकरच असतील…. देवाचे शतकाचे शतक झाले की लगेच !!

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: