राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

बंद मंदिरातील धर्म – भाग ३

२६०० वर्षापुर्वी भारतात कुठेतरी महावीर स्वामींनी गजर केला. व जैन धर्म उभा राहिला असे अनेक जण समजतात.
महावीर हे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर, त्यांच्या आधी २३ झाले. त्यांनी पाया रचला व महावीर यांनी कळस रचला हे अनेकांना माहिती देखील नाही, त्यांची माहिती व्हावी म्हणून हा लेख.

1 ऋषभदेव / आदिनाथ
2 अजितनाथ
3 सम्भवनाथ
4 अभिनंदन
5 सुमतिनाथ
6 पद्ममप्रभु
7 सुपाश्वॅनाथ
8 चंदाप्रभु
9 सुविधिनाथ
10 शीतलनाथ
11 श्रेंयांसनाथ
12 वासुपूज्य
13 विमलनाथ
14 अनंतनाथ
15 धर्मनाथ
16 शांतिनाथ
17 कुंथुनाथ
18 अरनाथ
19 मल्लिनाथ
20 मुनिसुव्रत
21 नमिनाथ / नेमिनाथ
22 अरिष्टनेमि ( कृष्णाचा मावस भाऊ- संदर्भ : जैन कथा, ग्रंथ इत्यादी)
23 पाश्वॅनाथ
24 महावीर / सन्मति

हे २४ तीर्थंकर. यातील तुम्हांला किती नावे माहिती आहेत ? महावीर सोडले तर नसतील.
नावे महत्त्वाची नाही आहेत, मुद्दा महत्त्वाचा. २४ च्या आधी २३ ! तेवीस लोकांनी पाया तयार केला व हा धर्म, जैन धर्म उभा राहिला.
अहिंसा व सत्य यावर उभा असलेला.

जैनांच्या मध्ये पण दोन पंथ.
दिगंबर व श्वेतांबर.

दिगंबर म्हणजे पुर्ण नग्न, श्वेतांबर म्हणजे फक्त श्वेत कपडा शरीरावर हा भेद.
फरक थोडा अजून, श्वेतांबर देवाला दागिन्यांनी मढवतात व दिगंबर… प्रश्नच येत नाही.
श्वेतांबरा मध्ये अजुन एक फरक म्हणजे त्यांच्यात असलेले दोन वेगळे विचार पंथ.

१. मुर्तीपुजक
२. स्थानकनिवासी / स्थानकवासी

सगळे झाले ढोबळ रूप जैन धर्माचे.
पण नक्की जैन धर्म आहे काय ? तो म्हणतो काय ?

जैन कोण ?

जो त्या जिनचा अनुयायी आहे, जो त्याने आखून दिलेल्या मार्गावरून चालण्याचा संकल्प घेतला आहे तो म्हणजे जैन.

आता जिन कोण ?
जिन तो ज्याने स्वतःवर विजय मिळवला आहे, मनावर, इंद्रियावर ताबा मिळवला आहे तो म्हणजे जिन.
हे एवढं सोपं नाही बरं का, की मिळवला ताबा, झाले जिन. नग्न राहून जीवनकाल काढणे व व इंद्रियावर ताबा ठेवणे एवढंच नाही.

पाच व्रत, सम्यक ज्ञानाची अनुभूती, सहा प्रकारची अवस्था, सात तत्वे, नऊ पदार्थ, चार स्वभाव, चार सहज प्राप्त गती व एक असहज प्राप्त गती, भावना या सर्वावर ज्याला ताबा मिळवता आला, विजय मिळवता आला, जो हे सर्व पार करू शकला तो म्हणजे जिन. व त्या जिनाचे अनुयायी म्हणजे जैन.

पाच व्रत

अहिंसा: ज्ञात, अज्ञात पध्दतीने, नजर चु़कीने देखील माझ्याकडून हिंसा होणार नाही.
सत्य: सत्य हे अंतिम, काही झाले तरी सत्य मार्ग सोडणार नाही.
अस्तेय: असत्याचा विरोध (? १)
ब्रह्मचर्य: मोक्ष मार्गातील सर्वात मोठा अडथळा दुर करणे, संयम व वीर्य संगोपन करणे.
अपरिग्रह: गरज असलेल्या, नसलेल्या गोष्टी न जमवणे, कुठल्याही गोष्टीचा मोह होऊ नये म्हणून.

सम्यक ज्ञान
याचा अवाका खूप मोठा आहे, थोडक्यात माहिती देतो.

१ मतिज्ञान – मन व इंद्रियापासून जे ज्ञान मिळते ते.

२ श्रुतज्ञान – मन व इंद्रियापासून जे ज्ञान मिळाली आहे त्यातून अधिक माहिती मिळवणे.

३ अवधिज्ञान – माहिती नाही Sad

४ मन:पर्यय – माहिती नाही Sad

५ केवलज्ञान – तिन्ही काळाचे रहस्य समजणे. (भुत, वर्तमान व भविष्य)

सहा प्रकारची अवस्था
जीव, अजीव, आकाश, काळ व धर्म, अधर्म या पलिकडे पाहण्याची शक्ती, बुध्दी.

अश्याच प्रकारे सात तत्वे, नऊ पदार्थ, चार स्वभाव, चार सहज प्राप्त गती व एक असहज प्राप्त गती, भावना यावर जो ताबा मिळवतो, माहिती घेतो, ज्ञान मिळतो तो म्हणजे जिन.

जैन ईश्वराला मानतो का ?

जैन ईश्वर मानतो, पण त्याच्या असीमित ताकत, प्रभाव याला मान्य करत नाही, जैन धर्म म्हणतो की तो कर्ता नाही, तो जग चालवत नाही पण त्याच्याकडे त्याच्या आतील शक्ती आहेत. खरं तर यात थोडा गोंधळ आहे, जैन देवाला मानतो की नाही हा प्रश्न नाही आहे प्रश्न हा येतो आहे की २४ तिर्थंकरांना देव मान्य केल्यावर त्याच्या आधी असलेले, म्हणजे ते तिर्थंकर ज्यांची उपासना करत होते ते कोण व ते कोठे गेले ? या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही मला तरी अजून. जैन धर्मात मुर्तीपुजा व मंदिरे दोन्ही मान्य नाहीत, पण जैनांची मंदिरे पाहिली की विरोधाभास जाणवतो. या प्रश्नाचे उत्तर शोधतो आहे. मिळेल असे वाटते आहे येत्या काही दिवसात.

अहिंसो परमो धर्म।

जैन धर्माचे तत्त्व आहे की, आंतरिक शुद्धता सर्वात महत्त्वाची. मनातल्या मनात देखील हिंसा होता कामा नये.
हे सुत्र कधी व कोणी बांधले माहिती नाही, पण अहिंसो परमो धर्म हा नारा महावीर स्वामी पासून जनमान्य झाला.
त्याचा वापर मग नंतर गौतम बुद्ध पासून महात्मा गांधी पर्यंत अनेकांनी केला.
एकदम साधं व सोपं तत्त्वज्ञान, हिंसा करू नका, जगा व जगू द्या. बस! एवढंसे..


तीर्थंकर महावीर समाज बदलण्याची ताकत असलेले नेता होते, अनुभवातून ते मार्गदर्शन करू शकत होते व म्हणून समाजात त्यांना उच्च असे स्थान होते – गौतम बुद्ध

क्रमश:

*ही माहिती मी, मला माहिती असलेली, वाचलेली व कुठे कुठे संदर्भ घेऊन लिहलेली आहे..
१ : म्हणजे काय अजून मला समजले नाही, अथवा समजून घेण्यास चूकत आहे.

Advertisements

13 responses to “बंद मंदिरातील धर्म – भाग ३

 1. आका एप्रिल 15, 2011 येथे 3:14 pm

  प्रत्येक भाग वाचतोय… येउ द्यात..

 2. हेरंब एप्रिल 15, 2011 येथे 9:38 pm

  राजे, अतिशय उत्तम माहिती !! पुढचे भाग वाचण्यास उत्सुक !!

 3. मनोहर एप्रिल 15, 2011 येथे 10:56 pm

  माझ्या माहितीप्रमाणे मनुष्याच्या जागृती, स्वप्नावस्था व निद्रावस्था या तीन अवस्था मानल्या जातात. जागृत अवस्थेतच सुखदुःखाचा लाभ होतो असे एक संप्रदाय मानून दुःखाचा निरास करण्यासाठी ऐहिक पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत असे म्हणतो, तर दुसरा संप्रदाय स्लप्नावस्था व जागृती ज्या मनामुळे उद्बवते त्या मनालाच सुखदुःखाचे कारण मानून दुःखमुक्तीसाठी संन्यस्त होणे आवश्यक मानतो. तिसरा संप्रदाय वरील तिन्ही अवस्थात सुखदुःखाचा लाभ होत असला तरी निद्राकाळात (निर्वाणस्थितीत) मनुष्य सुखदुःखाच्या पार गेलेला असतो आणि त्यावेळी त्याच्या सुखदुःखाचा लय झालेला असतो असे मानतो. चौथा संप्रदाय वरील तिन्ही अवस्थांवर नियंत्रण ठेवणारी मनुष्याची चौथी अवस्था असून ती अवस्था प्राप्त झाल्यावर सुखदुःख या केवळ जगरहाटीनुसार घडून येणार्‍या घटना आहेत हे समजून आल्याने सुखदुःखाचा लोप होतो असे मानतो. जैन धर्म हा दुसर्‍या संप्रदायाचा वेदप्रामाण्य मान्य नसलेला उपसंप्रदाय आहे.

 4. स्वामी संकेतानंद एप्रिल 16, 2011 येथे 6:41 pm

  अस्तेय = चोरी न करणे
  स्तेय = चोरी
  स्तेय ही सुद्धा हिंसाच असते.

 5. balasaheb एप्रिल 19, 2011 येथे 4:37 pm

  kiti sundar mahiti dily thank u sirji

 6. सातारकर एप्रिल 19, 2011 येथे 6:35 pm

  काय मालक ?

  एक काफ़ीर आज मंदीर में ?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: