राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

स्वयंपाक प्रयोग

पोटामध्ये कावळे ओरडू लागले की समजावे भुक लागली आहे, काही तरी खाणे महत्त्वाचे.
राजाध्यक्षांसारखं आरामात उठतात तसे सावकाश उठावे, किचन मध्ये पाय ठेवण्याआधी तालमीतला मल्ल जसा भूमी वंदन करतो असे वंदन करावे.. काळजीपूर्वक किचनमध्ये असलेल्या सर्व वस्तू पाहून घेणे व योजना तयार करणे.

योजना तयार करणे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. कारण तुम्ही नेमके काय करणार आहात ते तुमच्या योजनेला देखील माहीत नसते. त्यामुळे नीटपणे योजनेला बाजूला घेऊन आखणी करावी.
एखादा कांदा, टोमॅटो, लसूण, इत्यादी जे काही दिसत आहे खाण्यायोग्य ते बाजूला काढून घ्यावे.
एक सुरी व पोळपाट विसरू नये. ते महत्त्वाचे नाही तर कापणार कसे तुम्ही ?

जसे जमतील तसे वार करून कांदा व टोमॅटो चा लगदा तयार करावा, हो लगदा ! कारण आपण जो करतो तो लगदाच असतो. त्याला व्यवस्थित कापलेला कांदा, टोमॅटो कोणी म्हणणार नाही..

ते कापून झाल्यावर ते बाजूला ठेऊन द्या.

मस्त पैकी समोरच्या रॅकवर पहा काय दिसते ते ! हो कारण हा लगदा आपण कश्यात वापरणार हे ठरवायला नको ? कधी कधी अशी अवस्था येते घरात भरपूर सामान असल्यावर भाजी कशाची करावी हा प्रश्न समोर उभा राहतो तसेच काहीच भाजी नसल्यावर काय करावे हा देखील तेवढा मोठा प्रश्न ! त्यात आपण आळशी सम्राट.. बाहेर जाऊन अगदी १० पावलावर असलेल्या दुकानातून भाजी घेऊन येणाचा पण कंटाळा… !

असो,

समोर काळे, पिवळे, लाल असे कसले ही रंग असलेल्या डाळीचा डब्बा हातात घ्यावा, सगळ्या डाळी मिक्स कराव्यात.
स्वच्छ, जमेल तेवढे त्यांना पाण्यात धून काढावे हो पाण्यातच चुकून हात रम च्या बाटली कडे जाण्याची अश्यावेळी शक्यता असते.

एका कुकर मध्ये योग्य प्रमाणात पाणी, जे कधीच आपल्याला जमत नाही, ते पाणी घालून कुकर पॅक करून गॅस वर ठेऊन निवांत बाहेर यावे एक सिगरेट ओढावी, कुठे काय प्रतिसाद आले, फेसबुक वर कोण चावून गेले.. इत्यादी महत्त्वपूर्ण कामे हातावेगळी करावी, तरी जर तुमच्या कानावर कुकरची शिट्टी आली नाही तरी बावरून जाऊ नये, निवांत किचन मध्ये जाऊन ज्या गॅसवर आपण कुकर ठेवला आहे, तो पेटवा. पुन्हा बाहेर या व आपली महत्त्वपूर्ण कामे करायला लागा… ३-५ मिनिटामध्ये कुकर आवाज देईल.

काय जळले, पाणी जास्त झाले असेल का ? असले नतद्रष्ट विचार डोक्यात किती येऊ देत त्या कुकर कडे ढुंकून देखील पहावयाचे नाही. आपण आपले पुढील कार्य नेटाने चालू ठेवायचे.

एक कढई घ्या. गॅसवर ठेवा, गॅस पेटवा, थोडे अंदाज घेऊन तेल टाका. कढई गरम होऊ द्या.

समोर मसाल्याच्या डब्यातील जेवढे काही आयटम दिसत आहेत ते सगळे अंदाजाने घाला !

धूर होईल, घाबरायचे नाही, चटाचटा काहीतरी उडू लागेल तेलातून, मागे वळायचं नाही… चटचट बंद झाली की मग तो कांदा, टोमॅटो व मिर्ची असलेला आयटम त्या गरम तेलात टाका !

रिलाक्स !

मस्त पैकी पुन्हा एक सिगरेट शिलगावून कश मारत ते मिश्रण संमिश्रपणे हालवत रहा…

थोड्या वेळाने कांदा लाल झालेला दिसला की कुकर कडे वळा….

कुकरचे झाकण काढा…. आतला पदार्थ कसा ही दिसत असो…

त्या कढई मध्ये ओता.. !

मीठ व लाल मिर्चीपुड त्यामध्ये हवी तेवढी टाका…. दोन-चार दा हलवा !
३ मिनिटाने गॅस बंद करा… त्यावर काही तरी झाका !

५ मिनिटाने गरमागरम काही तरी खायला मिळेल….

चांगले झाले असले अथवा नसले तरी खावे लागेल… ते तुमच्या नशिबावर अवलंबून राहील wink

जय हिंद ||

Advertisements

14 responses to “स्वयंपाक प्रयोग

 1. सिद्धार्थ एप्रिल 25, 2011 येथे 11:59 सकाळी

  >> एका कुकरमध्ये योग्य प्रमाणात पाणी, जे कधीच आपल्याला जमत नाही.
  अनुमोदन. त्याचबरोबर चपाती नावाचा प्रकार आपल्याला जन्मात झेपला नाही आणि झेपणार पण नाही. नेहमी नजर हटी दुर्घटना घटी.

  बाकी राजे आत्ता पुण्यात जाताय मग काय रोज मटार उसळ आणि शिकरण खाणार.

 2. Gurunath एप्रिल 25, 2011 येथे 12:08 pm

  सही है राजे तुमचा मुदपाकखाना प्रयोग!!!!!, सुदैवाने आमच्या घरी पोरगा अन पोरगा अन पोरगी दोन्ही मी स्वतःच असल्यामुळे हे बल्लवकर्म उत्तम जरी नाही तरी “सस्टेनेबल” खाणे इतपत तरी जाणतो!!! सही है भाई बोहोत सही है

 3. आका एप्रिल 25, 2011 येथे 1:58 pm

  कानावर कुकरची शिट्टी आली नाही तरी बावरून जाऊ नये, निवांत किचन मध्ये जाऊन ज्या गॅसवर आपण कुकर ठेवला आहे, तो पेटवा. >>>
  भारी राजे.. 🙂 🙂

 4. Sagar एप्रिल 25, 2011 येथे 2:07 pm

  मस्त रे
  बाय द वे त्या पदार्थाच नाव काय?

 5. Tanvi एप्रिल 25, 2011 येथे 4:33 pm

  >>>>कानावर कुकरची शिट्टी आली नाही तरी बावरून जाऊ नये, निवांत किचन मध्ये जाऊन ज्या गॅसवर आपण कुकर ठेवला आहे, तो पेटवा. >>> 🙂 🙂

  मस्त रे ….

 6. स्वामी एप्रिल 26, 2011 येथे 5:31 सकाळी

  हा पदार्थ आम्हीपण केलाय २-३ दा !!! काय बारसे करावे बरे याचे?? दाल-तडका म्हणावे का ह्याला?? माझ्यातरी डोक्यात हेच नाव शिजत होते डाळ शिजतांना !! 🙂
  कानावर कुकरची शिट्टी आली नाही तरी बावरून जाऊ नये, निवांत किचन मध्ये जाऊन ज्या गॅसवर आपण कुकर ठेवला आहे, तो पेटवा.>> अनुभवाचे बोल !! 😀 😀

 7. Omkar एप्रिल 26, 2011 येथे 9:28 सकाळी

  Mast lihile ahe ……step by step varnan kele ahe te far chhan ahe … tomoto cha kelela lagada (mast bolla ahes re )

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: