राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

Category Archives: प्रवास

राजमाची

DSC02377.jpg

DSC02318.jpg

DSC02328.jpg

DSC02337.jpg

DSC02346.jpg

DSC02347.jpg

DSC02351.jpg

DSC02357.jpg

DSC02359.jpg

DSC02368.jpg

DSC02373.jpg

Advertisements

ईर्शाळ – एक अविस्मरणीय अनुभव

२०११ हे माझ्या जिवनातील अतिशय सुंदर वर्ष आहे असे मला वाटतं आहे, प्रचंड भटकंती सूरू आहे, वर्षाची सुरवातच कर्नाटकातील अनेक प्राचीन भागाचे दर्शन घेण्यात निघून गेले व आता गेली दोन महिने सतत महाराष्ट्रातील दुर्गभ्रमंती चालू आहे. अजून खूप भ्रमंती होतील, होत आहे पण ईर्शाळ गडाची कालची भ्रमंती अविस्मरणीय आहे. आता पर्यंत सोपे सोपे गड खूप केले आहेत पण अवघड विभागातील गड पहिल्यांदाच केला.
दुर्गभ्रमंती म्हणजे नक्की काय, याचा अनुभव ईर्शाळ गडने दिला. लिडरची गरज का असते, वेळेचे नियोजन करणे किती महत्त्वाचे आहे अती उत्साहाला कसे बंधन घालावे व निसर्गाच्या विविध रूपासमोर कसे नतमस्तक व्हावे हे देखील ईर्शाळाच्या या प्रवासानंतर समजले.

पुण्यावरून सकाळी ४.३० ला बाईकवरून निघालो, पहाटेच्या वेळी मोकळा रस्त्ता व १८० सीसीची बाईक हा अफलातुन योग असतो. बाईक किती पळू शकते व आपण तीला किती वेगाने पळवू शकतो हे पाहण्याची योग्य वेळ. कार्ले सोडलावर पावसाने संगत दिली ती थेट शेवट पर्यंत. नखशिखांत भिजून लोणावळा, खोपोली वरून बरोबर ६.२० ला कर्जत मध्ये (११० किमी) प्रवेश केल्यावर आमची मुंबईकर टिम अजून पोहचली नाही हे कळल्यावर मी कर्जत दर्शन करण्यासाठी बाहेर पडलो, मनसोक्त भटकंती करून परतलो तेव्हा बाकीची मंडळी माझी वाट पाहत उभे होते. बरोबर ८ च्या आसपास सर्व मंडळी चौक रेल्वेस्टेशनच्या मागे हजर झाली त्यांना च्या सोबत ओळख इत्यादी करून घेतली व गडाकडे कुच केली.

कर्जत वरून ७ किमी अंतरावर चौक रेल्वेस्टेशनच्या मागून गडावर जाण्यासाठी रस्त्ता आहे, मोरबी धरणाच्या बरोबर हा रस्ता गडाकडे जातो. चौक रेल्वेस्टेशन पासून २-३ किमी अंतरावर पायथा लागतो व तेथून चढाईला सुरवात होते.

http://maps.google.com/maps?f=d&source=s_d&saddr=Pune,+Maharashtra,+India&daddr=Irshalgad,+Maharashtra,+India&hl=en&geocode=FW6ZGgEd6PZmBCkBEUZnLr_COzFD456dv0ONgg%3BFWbtIAEdGnBdBCFMQy4l42RHgg&mra=ls&sll=18.66624,74.099025&sspn=1.327043,1.766052&ie=UTF8&t=h&ll=18.72929,73.526155&spn=0.41778,0.67439&output=embed
View Larger Map

ईर्शाळ गड हा टेहाळणीचा गड आहे , याचा वापर करून त्या काळी खूप मोठ्या भुभागावर नजर ठेवली जात असे.

गडाचे पहिले दर्शन

अवखळ व टारगट मुलांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक मास्तर हवा असतो. मुंबईहून १०० पेक्षा अधिक गड-किल्ले व हिमालयातील अत्यंत अवघड अश्या अनेक मोहिमेचा अनुभव असलेले अनुभवी श्री विजय हे आले होते.

श्री. विजय

या प्रवासामध्ये मुंबई वरून आनंद काळे ( बझ मित्र व मीमवरील आका), सिमा ( मीमवरील सिम्स) तीची मैत्रीण क्षमा, स्वल्पेश, संकेत, वासंती , रुपाली व तीचे पतिदेव, अभिजीत, महेश ( बझ मित्र व अस्सल मावळा) व विजय यांची १२-१५ वर्षांची दोन मुले असे आम्ही एकून १४ जण होतो.

उजव्या बाजूला धरणाच्या पाण्याचा प्रचंड साठा समोर निसर्गरम्य ईर्शाळ व मागे प्रबळगड!

सरळसाधी वाटणारी चढाई कधी अवघड होते ते कळत देखील नाही. चढाईचे दोन टप्पे आहेत खाली धरणाजवळून वर पठाराचा पहिला टप्पा जेथे एक वाडी आहे, लोक तेथे शेती करतात.

पहिले पठार

येथे एक छोटी विश्रांती घेतली, बसून हलके फुलके स्नॅक खल्ले व थोडे फोटो काढून घेतले. थोडा थोडा पडत असलेला पाऊस व आजू बाजूला असलेली हिरवळ या मुळे दम लागत नव्हता, चढाई सोपी वाटतं होती.आनंद काळे व सिमा


क्षमा नावा प्रमाणेच मला क्षमा कर गं wink खूप पिडला आहे ही ला.

पठारावर पसरलेल्या जंगलातून, झाडी झुडपातुन वाट काढत आमची चढाई सूरू होतीच.

“आका, लेका बघून घेईन तुला.. आय गं… अजून किती चढायचे बाकी आहे Big smile ” – मी (मनातल्या मनात)

सुळका! अफाट अफाट अफाट !!! एवढा एकच शब्द सुचत होता याला पाहून. जसे जसे वर येत होतो तस तसे जमीनीचे क्षेत्रफळ कमी कमी होत जात होते. आता मुख्य चढाईला सुरवात होत होती.

ही सुरवात पाहून आपण येथेच खाली बसून रहावे काय हा उच्च विचार माझ्या मनात घोळू लागला. पण आता मुलींच्या समोर माघार कशी घ्यावी winkइज्जत का सवाल ! म्हणून डोळे झाकून चढलो बुवा ! पण मला काय माहिती हीच इज्जत माझी पुर्ण मातीमोल होईल पुढे Oups

अस्सल मावळा, महेश एक अवघड वळणावर विचारात मग्न झालेला…. नक्की पाय कुठे ठेऊ Big smile

स्वल्पेश मागे हो, नाही तर पुर्ण विराम लागेल ! असे सांगावे असे माझ्या मनात खूप आलं होतं पण पहिलीच भेट म्हणून गप्प बसलो बॉ Evil

गडाच्या अस्तित्वाची एकमेव खुण, हे पाण्याचं टाकं !


सिमे, हसू नकोस, माहिती आहे ना कुठे बसली आहेस ते Big smile , ३-४ फुट जागा, उजवीकडे हजारो फुट खोलवर दरी व मध्ये निसर्ग निर्मित ४-५ फुटाची दगडी कमान व परत डावीकडे हजारो फुट खोलवर दरी, वावरण्यासाठी फक्त १० फुट जागा त्यात ५ फुटामध्ये एक मोठा खडक ! हे सांगून कळणार नाही, त्याचा अनुभवच घ्यावा लागेल.

चिंताग्रस्त नाही आहे मी, समोर कोसळणारा पाऊस पाहत होतो त्या दगडी कमानी शेजारी बसून, जाग कीती जमी असेल बघा, एक ही फोटो त्या कमानीचा घेता आला नाही Sad

मी जिवनात पहिल्यांदा नकार दिला ! फक्त ५-६ फुटाची चढाई असताना देखील! उत्तर परत तेच, उजवीकडे दरी वरून धो धो कोसळणारा पाऊस, भन्नाट वेगवान वारा ! पण विजय यांनी हार नाही मानली व आम्हाला मानसिकरित्या बळ देऊन तयार तयार केले, शेवटी चढाई करायला लावलीच.

जेवण !

२००० फुट पेक्षा जास्त उंचीवर असलेली आमची लंचरुम घाबरगुंडी

चढताना उसनी हिंमत घेतली होती, पण उतरणे ? धडकी भरणे म्हणजे काय हे कळाले.. शेवटी रोप वापरावा लागलाच.

७० फुट लांब असलेल्या गुहे कडे जाणारा मार्ग Drunk
ही गुहा येथे आहे हे २००७ मध्ये माहिती झाले पहिल्यांदा, विचार करा मार्ग किती दुर्गम असेल जाण्याचा.


महिला गँग !
अवघड चढाई वर मिळवलेला विजय व त्याचा अविस्मरणीय आनंद चेहर्‍यावरून वाहत आहे सर्वांच्या!

ढासळत असलेला कडा, अजून किती वर्ष हा ईर्शाळ कडा उभा असेल काय माहिती Sad

क्षमा, धक्का देऊ नकोस, शिळा पडेल खाली ती.. असा गोंधळ करतेस म्हणून सिमा तुला कुठे घेऊन येत नाही बघ Laughing out loudजीव अर्धा लटकला आहे पण फोटो काढून घेण्याची हौसफार बॉ काही लोकांना Stare


यशस्वी चढाई व उतराई करून आनंदात एकत्र आलेली टीम!


परतीची वाट! एक छान व सुंदर भ्रमंती झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावरून ओसांडून वाहत होता.

बाकी सर्व फोटो येथे पाहता येतील.

विसापुर…

पुण्या-मुंबई हायवे वर इंद्रायणी नदीच्या काठी, कार्लाजवळ लोहगड व विसापुर हे दोन दुर्ग उभे आहेत.
११०० मीटरच्या आसपास उंची असलेला विसापुर नेहमीच गुढ व अगम्य वाटतो दुरवरून पाहताना.

लोहगडचा पिकनिक पॉइंट झाला आहेच, त्यामुळे देखील थोडा दुर्गम व चढण्यास अवघड असा विसापुर आपला वाटतो, जे फक्त फिरायचे खायचे व परतायचे या उद्देशाने येतात ते चूकून ही विसापुरकडे पाय वाकडी अजून करत नाही आहेत हे आपल्या सारख्या दुर्गप्रेमींचे भाग्य.

तोरणा एवढा अवघड जरी नसला तरी चढणे तुमचा दम किती आहे हे पाहण्यास पुरेसे आहे.

ढासळलेली तटबंदी आपलं गडावर स्वागत करते, दुर्गप्रेमीनी वाटेत गडावर जाण्यासाठी मार्गदर्शक लावलेले आहेत ( दगडावर रंगाने).
भरपावसात चढाई चालू केल्यावर एक वेगळाच आनंद तुम्हाला अनुभवता येई शकतो वरून वाहत येणारे पाणी व त्याच्यावर चढा-ओढ करत आपण आपली स्वतःसंगेच लढाई लढायची हा एक विस्मरणीय अनुभव ठरू शकतो.

निसर्गाचे भन्नाट रूप येथे पाहता येतं, जर नजर असेल तर जागोजागी विखुरलेले सौदंर्य पाहताना आपल्याला किती अनमोल ठेवा निसर्गाने दिला आहे याचेच अप्रुप वाटतं. वेगवेगळ्या कोनातून वरील गडाच्या तटबंदीचे दर्शन होत असते व आपण कधी एकदा वर पोहचू असे वाटत असते. गडावर पाहण्यासारखं खूप काही आहे, आपल्या अस्तित्वाच्या खुणा जपण्याचा हा गड आटोकाट प्रयत्न करत आहे.

पण आपण एक समाज म्हणून त्या पुरातन वास्तूची किती काळजी घेतो, हे तेथे पसलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, गुटक्याचे पाऊच व कचरा पाहून समजते.

गडावर थोडी स्वच्छता मोहिम राबवून स्वतःचीच मान खाली जाण्यापासून काही अंशी वाचवण्याचा प्रयत्न केला पण हात कमी पडले, कचरा जास्त होता. गडावर असलेल्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ आहेत ही त्यातल्या त्यात आनंदाची बाब.

निसर्गाने दोन्ही हाताने श्रीमंती विसापुरवर उधळली आहे हे जागो जागी नजर फिरवल्यावर दिसून येते.

गडाच्या रक्षणासाठी व कचरा टाकू लोकांना थोडीशी बुध्दी देण्या करता दोन दोन हनुमान आहेत गडावर.. तरी देखील दारूच्या बाटल्या व बीयरच्या बाटल्याचा खच गडावर दिसतोच..

सागरगड…..

काय मिळते रे भटकून ? हा प्रश्न गेली अनेक वर्षे अनेकांच्या कडून माझ्यासाठी आला असेल, पण दर प्रवासाच्या वेळी आमच्या मातोश्री न चुकता हे वाक्य आमच्या तोंडावर फेकतात व आम्ही एक विकट असे हास्य उत्तरा दाखल परत देतो. विनोदाचा भाग सोडला तर खरचं नेहमी हा प्रश्न विचारला जातो. प्रत्येक वेळी काय उत्तर देणार ? घरात बसून गड-किल्लावर चढण्याचा आनंद, तेथे पोहचल्यावर मिळणारे सुख हे शब्दात कसे सांगायचे ?

असो,

जे शब्दात सांगता येत नाही ते येथे थोडं फोटोद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो.

मित्रवर्य महेश सावंत याच्यांकडून सभार

आयला मी Big smile

गडाची वाट…

सुप्परमॅन Big smile

दुरवर राहिला…. सागर किनारा……

आपला निसर्ग…..

तरीच…. गाडी हिंदकाळत होती जाताना

माझ्या सारखे तरूण व ररा सारखे म्हातारे.. असा गड’करर्‍याचा हा मेळावा !!

सुझे म्हणत आहेत “मायला, पक्का भटक्याने लैभ भटकवला राव” Big smile

माझे आवडते खाद्य !!!

पोरांचा थरारक खेळ !!!

वाट हरवली रे.. धुक्यात!!

पुण्यातून कसे जावे :

कसे ही जा Big smile
अलिबाग च्या अलिकडे ४/६ किमी खंडाले नावाचे गाव आहे, तेथून रस्ता आहे गडावर जाण्यासाठी.
पहाटे पहाटे निघा व्यवस्थित पोहचाल. ( मित्रांना उठवण्याची जबाबदारी अंगावर घेऊ नका, पोपट होतो )

अवघड आहे का ?

आमच्या संगे ररा, निपो, टिंग्या सारखे म्हातारे कोतारे होते ते धडघाकट परत आले यावरून समजून घ्या Oups

… देवाचं घर !

माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं…बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं. त्यावेळेस शेजारच्या चरणकर आजींनी सांगितलेलं एकच वाक्य राहूनराहून आठवायचं…”देव सगळीकडे असतो”

’खरोखरच देव सगळीकडे असतो का?’ मी कित्येक वेळा शाळेत जातायेताना आई अंबाबाईला विचारले असेल, “आई तू असतेस सगळीकडे तर दिसणार कधी? आणि मग तुझ्यासाठी हे मंदिर तरी कशाला ?” पण नेहमीच तिचा प्रसन्न, हसरा चेहरा माझ्याशी न बोलताच शांत असायचा. मग मी घरी परतलो की माझ्या आईला परत तेच प्रश्न. आई म्हणायची, “अरे जसे आपल्याला घर हवे तसेच आई अंबाबाईला पण हवे ना! त्यासाठी ते दगडाचे देऊळ.” तेव्हापासून प्रत्येक देवळात मला घर दिसतं…जिवंतपणाचा भास होतो. अगदी आजही प्रत्येक मंदिर संपूर्ण फिरून, प्रत्येक दगडाला हात लावला की त्यांची स्पंदनं मला जाणवतात.

कोल्हापूरला आमच्या घराजवळ लक्ष्मीसेन मठ नावाचा एक जैन मठ होता. तिथल्या तीर्थंकरांच्या संगमरवरात कोरलेल्या पांढ-याशुभ्र, देखण्या, रेखीव मूर्ती काय, तो कणखर काळ्या दगडातला डोंगराचा राजा ज्योतिबा काय किंवा कात्यायनीच्या मंदिरातील कात्यायनी मातेची मूर्ती काय! सा-याच कशा मूर्त होऊन समोर उभ्या असतात की जिवंत वाटतात पाहताना. कळत नकळत कधीतरी आपोआप हात जोडले जातात…कधी देवासाठी किंवा कधी त्या दगडात प्राण फुंकणा-या कारागीरांसाठी!

आपल्या महाराष्ट्रात मंदिरांच्या नाना त-हा! कोकणातलं देवगडपासून जवळच समुद्रकिना-यावर असलेलं एक शिवमंदिर…(नाव आठवत नाही आहे खूप वर्षांपूर्वी गेलो होतो) केवळ नितांतसुंदर! सिंधु नदीचा अंश असलेला, मंदिराच्या पायाशी सतत अर्घ्य देणारा समुद्र, देवळाच्या गाभा-यात घुमणा-या रुद्राचा लयबद्ध गंभीर सूर प्रतिध्वनीत करणारी त्याची ती एकसंध गाज! हा समुद्रही त्या शंकरासारखाच…वरवर त्याच्या जटेतल्या गंगेएवढाच शांत पण त्या लयीतच खोल कुठेतरी प्रलयाची, रौद्राची सूप्त शक्ती असलेला…

गणपतीपुळ्याच्या मंदिराचे तर काय वर्णन करावे? लाल दगडामध्ये उभे असलेले हे मंदिर…पेशवेकालीन शैलीचा प्रभाव…समोरच्या समुद्राच्या खोलीशी स्पर्धा करणारे दहा मजली उंच कळस! शिखरांचा भार तोलणारे शेकडो हत्ती आणि वर पाय-यापाय-यांनी निमुळते होत जाणारे शिखर! देखणी कलाकुसर असलेले माझे एकदम आवडते मंदिर.

जैनांची मंदिरे तर दृष्ट लागावीत एवढी सुंदर…त्यातही श्वेतांबर जैंनाचे मंदिर म्हणजे तर स्वर्गीय. अगदी पहिल्या पायरीपासून शिखरापर्यंत सर्वकाही नीटनेटके…सर्व काही सफेद, निष्कलंक…देवापुढे तेवणा-या चांदीच्या समईच्या शुभ्र कळ्यांसारखी! बाहेरच्या रणरणत्या उन्हातून अचानक त्या संगमरवरी मंदिरात शिरल्यावर जसं शरीराला थंड वाटतं तसंच आतली महावीरांची अथवा तीर्थंकरांची शांतचित्ताने बसलेली मूर्ती, तिचे अर्धोन्मलित डोळे, अस्फुट मंदस्मित करत असलेले ते ओठ हे सारं पाहून आतूनदेखील तसंच थंड, शांत वाटतं.

दक्षिण भारतीय मंदिरे तर फक्त दर्शनाचा विषय नाहीच तेथे तर प्रत्येक मंदिर एक वेगळे विश्व आहे, त्यांचा एक वेगळाच बाज आहे. मला आठवतं ते विजयवाडामध्ये कृष्णा-गोदावरीच्या संगमाजवळ असलेले दुर्गा मंदिर…एखाद्या चित्रकाराने कागदावर पेन्सिलीने काढलेले रेखाचित्रच कागदातून प्रत्यक्षात यावं अगदी तसं!! देऊळ काळ्या पत्थरामध्ये तर शिखर अर्धे सोन्याने मढवलेले ! सकाळची कोवळी उन्हं त्या शिखरावर पडली की त्या झळाळीने आकाशात तरंगणा-या एखादया ढगाला सोन्याची झालर दिसत असे. अनेक अप्सरांच्या देवीदेवतांच्या रेखीव मुर्ती, त्यांचे भावरंगीन नृत्याविष्कार, त्यांच्या चेह-यावरचे तल्लीन भाव तिथे असे काही कोरलेले होते की देवांच्या सभेतल्या नारद-तुंबरांच्या गाण्याचा, सरस्वतीच्या वीणावादनाचा, मॄदुंगाच्या तालाचा भास होत रहातो. एकेका मूर्तीतून एकेक गोष्ट उलगडत रहाते…कालाच्या पटासारखीच निरंतर…गणेशमूर्ती असो वा ताडंव करण्या-या शंकराचे उग्र रुप दर्शन…विष्णू अवतार महिमा असो वा दुर्गेचं अक्राळविक्राळ रूप असो…हजारो वर्षापासून अखंड उन्हं, वारा पाऊस ह्याचा मारा झेलत उभे असलेली ही निःशब्द…निर्जीव मंदिरं नकळत बरंच काही सांगून जातात.

भटकत भटकत मी उत्तर भारतात आलो तसं हे वेडही माझ्याबरोबरच आलं. कलकत्यातील कालीमातेचे मंदिर असो वा लाल मंदिर असो, मनात कितीही कल्लोळ असला तरी मंदिराभोवती फिरताना मात्र एक प्रकारची आंतरिक स्थिरता जाणवली. जेव्हा मी सर्व प्रथम अमृतसरचे सुवर्ण मंदिर पाहीले तेव्हा थक्कच झालो. मंदिरात घातलेल्या धुपाने सुवासिक झालेलं धुकं…त्या सुवासाचा माग काढत मंदिराच्या खुल्या कवाडातून आत शिरणारी सकाळची कोवळी उन्हं…वातावरणात भरून राहिलेला ओंकाराचा घोष किंवा गुरुग्रंथ साहेबचे पठण आणि ती सगळी पुण्याई, तो सेवाभाव वर्षानुवर्ष आपल्या पोटात साठवून ठेवला समोरचा संथ तलाव. तलावाच्या भोवतीच्या कठडयावर बसावं आणि त्या पाण्यामध्ये पाय सोडून शांत चित्ताने समोर चालू असलेला धार्मिक सोहळा पाहत बसावे…जिवंतपणी स्वर्गात असण्याची, अमृताच्या स्पर्शाची अनुभूती ती हीच असावी का? असं क्षणोक्षणी वाटावं असं वातावरण.

उंच डोंगरद-यावर देखील मानवाने अनेक सुंदर कला कृती निर्माण केल्या आहेत. त्या बाबतीत हिमाचल प्रदेश एक नंबरवर ! अनेक शतकापासून ह्या देवभूमीवर कित्येक मंदिरे आणि मठ वसलेले आहेत. कुलुमनाली इथे असलेले हिडंबा देवीचे पुरातन मंदिर असो वा चंबा येथील लक्ष्मी नारायण मंदिर…शिखर पद्धतीचं संपुर्ण दगडी बांधकाम.पहाताक्षणीच ह्यांचं वेगळेपण जाणवतं. इतर मंदिरांत गर्भगृहाला वरती कळस असतो. इथे मात्र पूर्ण मंदिराचा आकारच कळसासारखा असतो. हा गाभारा हा कळस असा वेगळं दाखवताच येत नाही.

आणखी एक सहज जाणवलेली गोष्ट म्हणजे दक्षिण भारतीय मंदिरामध्ये भिंतीशिल्पांना मखर हा प्रकार नसतो. पण इकडे उत्तर भारतात मात्र एकेक भिंतीशिल्पंदेखील दगडी देव्हा-यात बसवलेली असतात. शिवाय उत्तर भारतीय मंदिरं तिथल्या आसपासच्या दगडामातीतून जन्मल्यासारखी वाटतात. कारण मंदिर उभं करण्यासाठी स्थानिक दगडांचा वापर केला जातो. दक्षिण भारतीय मंदिरामध्ये मात्र अनेकवेळा दुरदुरुन दगड जमा करुन मग मंदिर निर्माण केले गेले असावे असे वाटते. मंदिर आणि आसपासचा परिसर पाहिल्यावर देवळाचं वेगळेपण लक्षात येतं. कदाचित “मातीचे पाय” संपून दिव्यत्त्वाची सुरुवात ह्या देवळात होते हे तर इथे सुचवायचं नसेल नां?

बाहेरुन झालेले शेकडो हल्ले व मुस्लीम बादशाहांनी वेळोवेळी केलेली मंदिरांची तोडफोड ह्यामुळे उत्तरेतील अनेक सुंदर मंदिरे मातीमोल झाली पण त्याचवेळी पूर्वेकडे मात्र शिल्पकला बहरतच होती. त्यामुळेच ओडिसात अनेक सुंदर सुंदर मंदिरे आजही दिमाखात उभी आहेत…मग ते जगन्नाथ मंदिर असो वा कोणार्कचे सूर्य मंदिर. पूर्वेकडली मंदिरं ही अखंड दगडातून उभी राहिली आहेत हे त्यांचे वेगळेपण म्हणता येईल. भुवनेश्वरमधील मंदिरे पाहिली की हे वेगळेपण खूप प्रकर्षाने जाणवतं व तिथल्या कलाकारांची कल्पक दूरदृष्टीदेखील! निमुळती होत जाणारी शिखरे व कामरसामध्ये रत असलेल्या यती-अप्सरांची भिंतीशिल्पंदेखील ह्यांचं एक वेगळेपणच म्हणता येईल. त्यावेळच्या राजेमहाराजांनी मंदिराच्यावर मनसोक्त धन खर्च केले त्यामुळेच इथले कलाकार रामायण महाभारतातल्या कथांनी मंदिरांच्या भिंती जिवंत करू शकले. माझ्या माहितीप्रमाणे ओरिसातलं सर्वात जुनं परशुरामेश्वर मंदिरदेखील अशाच उत्तम कलेचा नमुना आहे. उत्तरेकडे राजकीय अस्थिरतेला मंदिरांच्या पावित्र्याचा, सौंदर्याचा उःशाप मिळाला आहे आणि पूर्वेकडे शृंगाराला, आध्यात्माला तिथल्या शांततेचं, सुबत्तेचं कोंदण लाभलेलं आहे. असं म्हणता येईल.

मंदिराच्या बाबतीत संपन्नता बघायची असेल तर मात्र गुजरातशिवाय पर्याय नाही. गुजरातमध्ये अगदी गल्लीबोळातही मंदिर पहायला मिळते. पण ती छोटी मंदिरेदेखील देखणीच असतात. इथल्या सुबत्तेचं प्रतिबिंब इथल्या मंदिरात पहायला मिळतं. भरूचच्या स्वामीनारायण मंदिराबाबत किंवा सोरटी सोमनाथाच्या मंदिराबाबतीत हेच म्हणता येईल. जैन मंदिरांच्या शिखरांवर जशी धर्मध्वजा फडकत असते, तोच प्रकार गुजरातमधील जवळजवळ सर्व मंदिरांमधेही दिसतो. आता जैनांनी ही पद्धत गुजरातमधून घेतली की गुजरातने जैंनाकडून हे माहीत नाही. गुर्जर समाजाच्या रक्तात भिनलेल्या व्यवस्थापन कौशल्याला इथली मंदिरंही अपवाद नाहीत. मंदिर स्वच्छ ठेवणे, गडबडगोंधळ टाळून शांतता राखणे हा ह्या व्यवस्थापनाचाच भाग.
मंदिराच्या हवेशीर बांधकामामुळे मंदिरात एक प्रकारचा मोकळेपणा जाणवतो. हिरे, मोती, सोन्याचा मुक्तहस्ताने केलेला वापर, मंदिर तोलून धरणारे कोरीव स्तंभ आणि त्या स्तंभांवरील दर्शनीय शिल्पकृती ह्यामुळे इथली मंदिरं निश्चितच प्रेक्षणीय झाली आहेत.

सारा भारत फिरलो, अनेक मंदिरं पाहिली. ती सारीच आपापल्या परीने सुंदर होती. सर्वत्र असलेला देव त्या सौंदर्यातून, तिथे भरून राहिलेल्या पावित्र्यातून, ते मंदीर घडवणा-या हजारो कारागीरांच्या कष्टांतून तिथे प्रकट झाला होता. जिथे जिथे अशी शांतता, सौंदर्य, कष्ट, पावित्र्य असतं तिथेच मला देव जाणवेल. देवाच्या शोधात आता मला कधीच फार दूर जावे लागणार नाही.

*
मी काही आर्किटेक्चरचा (वास्तुशास्त्राचा?) अभ्यासक नाही आहे, जे मला वाटलं तेच लिहीलं आहे, त्यामुळे काही जागी चुका असतील तर समक्ष्व.

त्रिकोण – एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. – (बेल्लुर) भाग – ३

मागील भागात आपण होयसाळ / होयसाल साम्राजाची राजधानी द्वारसमुद्र (हैलेबिडु) बद्दल माहिती व छायाचित्रे पाहिली आता त्रिकोणातील २रा कोन. बेल्लुर.


मंदिराचे प्रवेशद्वार

द्वारसमुद्र पासून १२-१३ किलोमीटर बेल्लुर वसलेले आहे, एकेकाळी ही जुळी शहरे संपन्न व पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून समजली जात. राजाचा वरदहस्त व राजकोष मुक्त हस्ताने वितरीत करण्याची उदारता यामुळे अनेक कलांचा प्रसार होयसाळ साम्राज्यात झाला. अत्यंत भरभराटीच्या काळात बेल्लुर व द्वारसमुद्र मध्ये शेकडो मंदिरांची उभारणी केली गेली, शिल्पकलेला राजमान्यता होतीच पण त्याच्या सौंदर्यामुळे जनमान्यता देखील लवकरच मिळत गेली.


अर्जून

आताच्या काळात मुख्य मंदिरे व वस्तूसंग्रहातील अनेक शिलालेख, मुर्ती व त्या काळातील संपन्नतेचे पुरावे सोडले तर बेल्लुर / द्वारसमुद्र फक्त एका साम्राज्याच्या काही अंश शिल्लक राहिले आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने प्रचंड काम या दोन मंदिरावर केलेले आहे. एकेकाळी पुर्ण नष्ट व विद्रुप केलेली ही मंदिरे भारतीय पुरातत्व विभागाने जसेच्या तसे पुर्ण अभ्यास करून उभे केले व त्यामुळे आपल्याला होयसाळ साम्राज्याच्या काही खाणाखुणा स्वतःच्या डोळ्यानी पाहता येतात हे आपले भाग्य.

मुख्य मंदिर

बेल्लुर मंदिराची रचना दक्षीणेत प्रसिध्द असलेल्या शिल्प प्रकारात आहे म्हणजेच विमान प्रकारात. प्रशस्थ पटांगण, उत्तुंग असे प्रवेशद्वारावरील शिखर, मुख्य मंदिर व त्याला सलग्न अशी उजवी/डावी कडे तेवढीच भारदस्त मंदिरे. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर नजरेत भरतात ते दोन स्तंभ. ३०-४० फुटी उचं व एका अखंड शिळेतून निर्माण केलेले हे स्तंभ कुठल्याही आधारावीना उभे आहेत. ( आपल्याकडील मंदिरात जसे दगडी दिपमाळ दिसते तसेच दक्षीणे कडील मंदिरामध्ये असे स्तंभ दिसतात, याचे धार्मिक कारण माहिती नाही आहे, पण एखाद्या मोठ्या विजयाची आठवण रहावी म्हणून असे मोठ मोठे स्तंभ त्याकाळात उभे केले जात व त्यावर राजाने मिळवलेल्या विजयाची गाथा लिहली जात असे) मंदिराच्या दोन्ही बाजूला धर्मशाळा सदृष्य तात्पुरती राहण्याची सोय ( हा प्रकार याच काळात सर्वमान्य झालेला दिसतो आहे, कारण अश्या प्रकारची सोय द्वारसमुद्रला होती असे शिलालेखाच्या माहिती वरून समजते तशीच सोय, श्रवणबेलगोळ, हंप्पी व दक्षिणेतील अनेक मंदिरात दिसते तसेच आपल्या जवळच्या महालक्ष्मी मंदिरात देखील त्या प्रकारची सोय होती पण कालांतराने त्या तात्पुरत्या निवार्‍याचे छोट्या छोट्या मंदिरात रुपांतर बडव्यांनी केले.)


स्तंभ


तात्पुरते निवास्थान

बेल्लुरची मंदिरे देखील द्वारसमुद्रामधील मंदिरासारखी शिल्पकलेचा खजीना आपल्या अंगावर घेऊन उभे आहेत. चन्नकेशवाचे (कृष्ण) मुख्य मंदिर व डाव्या बाजूला असलेले मंदिर बंद आहे तर उजव्या बाजूचे रंगनायकी मंदिर. गोलाकार व लेअर पध्दतीचे नक्षीकाम असलेले स्तंभ, प्रशस्थ असा पाषाण मंडप, त्यानंतर विषेश कक्ष व मग गाभारा अशी संरचना असलेली ही तिन्ही मंदिरे आतून व बाहेरून अत्यंत रेखीव व सुरेख अश्या शिल्पांनी मढवलेली आहेत. जगप्रसिध्द आरश्यात आपले रूप निहारणारी नर्तिका हे शिल्प देखील येथेच आहे तसेच गरूडेश्वराची पुर्णाकृती मुर्ती देखील येथील वैशिष्ट आहे. मंदिर परिसरामध्ये जलकुंड व ४ विहीरी आहेत त्यापैकी जलकुंड उपयोगी राहिलेले नाही आहेत तर चार पैकी २ विहीरी अजून ही वापरत येतात, देवाच्या अभिषेकाच्या वेळी तेथीलच पाणी वापरले जाते.


चबुतरा / मंडप ???


स्तंभ


मंदिराचे बाह्य स्वरूप

मंदिराच्या पटांगणामध्येच पुष्करणी पध्दतीने येथे एक उत्तर दिशेला थोडे छोटे असे कल्याणी नावाचे कुंड / चौकोण विहीर / तळे आहे. ११७५ मध्ये याचे निर्माण केले गेले, उत्तर व दक्षिण दिशेला असलेली दोन प्रवेशद्वारे आहेत व प्रवेशद्वार दोन्ही हत्तीचे सुरेख शिल्प व तेथून पुढे मध्यभागी निमुळती होत जाणार्‍या चौकोणी पायर्‍या अशी रचना आहे. वरून पाहताना या तळ्याची वैशिष्टपुर्ण बांधणी लक्ष्यात येते. काही शतकापुर्वी बेल्लुर हे धार्मिक स्थळ म्हणून पुन्हा प्रसिद्ध होऊ लागले होते व तेथे रथयात्रा व इतर धार्मिक उत्सव याचे प्रस्थ वाढले होते तीच पध्दत अजून ही सुरू आहे त्यामुळे आहोरात्र येथे भाविकांचे येणे जाणे सुरू असते त्यातूनच अस्वच्छता निर्माण होऊ लागली व एकेकाळी आपल्या गोड व रुचकर अश्या पाण्यासाठी प्रसिध्द असलेली कल्याणी शेवटी लोकांसाठी बंद करण्यात आली आता फक्त बाहेरून दर्शन घेता येते, कधी एकेकाळी निळसर असलेले वाहते पाणी आता हिरवेगार पडलेले आहे.


कल्याणी जलकुंड


जलकुंड


गरुडदेव

ज्या दिवशी आम्ही बेल्लुरला गेलो तो दिवस तेथील धार्मिक जत्रेचा होता व रथयात्रेची सुरवात होण्याच्या वेळीच तेथे पोहचल्यामुळे हजारो लोकांच्या गर्दीने आमचे स्वागत केले व गर्दीमध्ये मनसोक्तपणे फिरता येत नाही व हवे ते पाहता येत नाही. त्यामुळे बेल्लुरचा प्रवास लवकर संपवून आम्ही आमच्या प्रवासातील तिसरे टोक म्हणजेच श्रवणबेलगोळ च्या दिशेने वाटचाल चालू केली.

क्रमशः

त्रिकोण – एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. – (द्वारसमुद्र) भाग -१

प्रस्तावना :
एखाद्या गोष्टीचे वेड जर मनात घेतलं तर ते पुर्ण केल्या शिवाय माझा आत्मा शांत राहत नाही, असेच एक वेडं मला मागच्या सोमवारी/मंगळवारी टिम गोवा यांनी गोवाच्या इतिहासावर लेखन करण्यास सुरूवात केली व पहिल्या भागामध्ये, विचार करावे व शोध घ्यावे असे काहीतरी सापडले ते म्हणजे पाषाणावर खोदलेले / रेखाटलेले चक्रव्यूह पाहताना, अगदी असेच नसले तरी त्याच्याशी मिळते जुळते काहीतरी मी पाहीले होते, पण कोठे हे काही केल्या आठवत नव्हते, मग त्याचा शोध घेणे चालू केले, जुन्या ट्रिपचे फोटो पाहिले, नेटवर शोधले पण काहीच हाती पडेना पण तोच काहीतरी शोधताना काहीतरी सापडावे असे घडले, एक चित्र मला सोनालीने दाखवले व नंतर तेथेच शोध घेतल्यावर जे दिसले ते अद्वितीय होते, हैलेबिडु येथे असलेल्या पुरातन मंदिराचे फोटो कोणीतरी पिकासावर अपलोड केले होते. फोटो पाहिले थोडी शोधा शोध घेतल्यावर समजले येथून (बेंगलोर पासून) जवळ नसले तरी लांब देखील जास्त नाही हे स्थळ.

माझ्या सारखाच अजुन एक वेडा, माझ्या ऑफिसमध्येच आहे, पण कामामुळे आम्ही दोघे एकत्र भटकायला बाहेर पडू शकत, पण सगळे योग जूळून आले व अचानक शनिवारी पहाटे या प्रवासाला निघायचे असे ठरले सुद्धा. त्यांने नवीन बाईक घेतली आहे, बजाज अव्हेंजर. व त्याच प्रकारची माझी बाईक होती यामाहा एनटायसर, त्यामुळे लांबच्या बाईक प्रवासाचा अनुभव कामी आला. सकाळी ६ वाजता आम्ही बेंगलोरू मधून बाहेर पडलो. जास्त काही त्रास न घेणे हा एकमेव उद्देश ठेऊन बाईकचे स्पिड फिक्स ६० किमी / तास असे आम्ही दोघांनी ठरवले व पुर्ण प्रवास त्याच वेगाने केला. (जीवनात पहिल्यांदा कुठल्यातरी गोष्टीवर सुरवाती पासून शेवट पर्यंत कंट्रोल ठेवला)

प्रवासाला निघताना आम्हाला कल्पना नव्हती की आपण काय पाहणार आहोत व त्याचे महत्त्व काय. १००० वर्षापेक्षा जास्त काळात देखील, आसमानी व सुलतानी कहर झेलून दिमाखाने उभे असलेल्या व भारताच्या स्थापत्यकलेचा उज्ज्वल इतिहास संभाळून ठेवणार्‍या ३ भव्य व दिव्य अश्या स्थळांचे दर्शन आम्ही अचानक घेऊ, हे ध्यानीमनी देखील नव्हते पण सर्व अचानक ठरत गेले व प्रवास सूरू झाला..

स्थळ : हैलेबिडु
जिल्हा : ह्सन, कर्नाटक
कसे जावे : बाईक वरून २४० कि.मी. बेंगलोरू हून. जवळचे रेल्वे स्टेशन हसन व एअरपोर्ट बेंगलोरू.

द्वारसमुद्र, होयसाळ / होयसाल साम्राज्याची राजधानी. ईस्वीसन १००० ते १४०० हा काळ त्या साम्राज्याचा सुवर्णकाल होता. या काळामध्ये वेगवेगळ्या मंदिरांची व अनेक वास्तुशिल्पांचे निर्माण सातत्याने होत राहिले. पृथ्वीवरील स्वर्गाची निर्मिती केले होयसाळ / होयसाल सामाज्याने. द्वारसमुद्र व बेल्लूर यांना पृथ्वीवरचा स्वर्ग असे म्हणले जात असे. पुर्ण दख्खन (कर्नाटक) व तामिळनाडूवर होयसाल साम्राज्य पसरले होते.

ई.स. १००० च्या आधी त्या व आजूबाजूच्या सर्व प्रदेशावर जैन धर्माचा प्रचंड प्रभाव होता, तो प्रभाव मोडून काढून पुन्हा हिंदू साम्राज्य उभे करण्याचे श्रेय या होयसाळ / होयसाल राजांना जाते, त्यांनी त्या भागावरील जैन धर्माचा प्रभाव जवळजवळ पुर्ण नष्ट केला व आपल्या अद्भुत व देखण्या होयसाल स्थापत्य कलेतून अनेक मंदिरे उभी केली, जुळी मंदिरे या प्रकार देखील त्यांनी सुरू केला ( याची माहिती पुढे येईल). द्वारसमुद्र मध्ये असलेली व होयसाळ / होयसाल राजांनी निर्माण केलेली ही मंदिरे प्रामुख्याने शिव मंदिरे आहेत.

मलिक काफुर व मोहंम्मद बीन तुगलक, यांनी या साम्राज्यावर आक्रमण केले, सर्वात आधी दिल्ली सुलतानाच्या आदेशाने मलिक काफुर ने १३११-१३१५ च्या आसपास होयसाळ / होयसाल सम्राजावर आक्रमण केले व शेकडो उंटावरून, सोने व दागिने या साम्राजातून घेऊन गेला पण जाताना त्याने द्वारसमुद्र जवळ जवळ नष्ट केले, मंदिरे पाडली, मुर्त्या नष्ट केल्या व शहर ध्वस्त केले. यानंतर काहीच वर्षानंतर मोहंम्मद बीन तुगलक ने आक्रमण केले व राहिलेले सर्व लुटून नेले व द्वारसमुद्र पूर्णतः: नष्ट केले, त्याच्या तावडीतून काहीच मंदिरे शिल्लक राहिली ती देखील भग्न अवस्थेत.

पृथ्वीवरील स्वर्ग असणारे नगर, मातीत मिळाले, व त्याला नवीन नाव मिळाले हैलेबिडु म्हणजे जुनी राजधानी, एक नष्ट शहर.

३५० ते ४०० वर्ष होयसाळ / होयसाल राजांनी एका मोठ्या भूखंडावर राज्य केले. हे प्रामुख्याने शिव भक्त. यांच्या राज्याचं चिन्ह होते सिंह व योद्धा, त्याकाळी ज्ञात व वापरात असलेल्या तिन्ही लिपी मध्ये त्यांनी अनेक शिलालेख निर्माण केले ज्यामध्ये, तामिळ (जूनी), कन्नड व तसेच मोडी भाषेत. मंदिरामध्ये, विजय / धर्म स्तंभावर तसेच रेखीव संगमरवरी पाषाणावर यांनी विपुल लेखन केले, ज्यामध्ये विजय कथा, साम्राज्यात झालेले फेरबदल, पुराण कथा, देव स्तुती इत्यादी चा समावेश आहे. मंदिर निर्माण साठी त्यांनी स्थानिक पिवळसर दगड (प्रस्तर ?) व पाया व मूर्ती निर्माण साठी काळ्या पाषाणाचा वापर प्रामुख्याने केला.

आता त्या काळात उपलब्ध असलेली दोन मंदिरे शिल्लक व सुस्थितीत आहेत. हैलेबिडु व बेल्लूर. १२ किलोमीटरच्या अंतरावर वसलेल्या दोन प्राचीन शहरातील राहिलेले वैभव. तसे पाहता होयसाळ / होयसाल राजांनी आपल्या साम्राज्यात १५० च्या वर मंदिर निर्माण केलीत पण उल्लेखनीय व स्थापत्य कलेचा नमुना म्हणून हैलेबिडु व बेल्लूर हे महत्त्वाचे आहेत. मंदिरांची वैशिष्ट्य पुर्ण रचना व मांडणी वेगळ्या पद्घतीने केली गेली आहे. तीन द्वार असलेली व एकाच मंदिरात दोन गाभारे असलेल्या जुळ्या मंदिराची संकल्पना येथे राबवली गेली आहे. सर्वात प्रथम आपण हैलेबिडू मंदिर व त्याची रचना पाहू.

हैलेबिडु, असे नाव वापरण्यापेक्षा मी त्या शहराचे प्राचीन नाव पुढे वापरणार आहे जेणेकरून एका वैभवशाली शहराचे नाव आपल्या स्मृतीत कोरले जावे व आपल्या समृद्ध अश्या इतिहासामध्ये एक द्वारसमुद्र नावाचे नगर देखील होते ज्या नगराने देशाला व त्यावेळच्या समाज व्यवस्थेला एक नवीन प्रकारच्या स्थापत्य पद्धतीची, कलेची ओळख जगाला करून दिली याचा विसर पडू नये म्हणून.

तर,

द्वारसमुदचे मंदिर : एका तलावाच्या काठी उभारले गेलेले हे व पुर्ण पाषाणामध्ये निर्माण केले गेलेले हे मंदिर व त्याचे नाव आहे होयसळायेश्वर / होयसलायेश्वर मंदिर. राजघराण्यांचे प्रमुख मंदिर त्या राजघराण्याच्या नावानेच आजही ओळखले जाते. या मंदिराची ४-५ एकर परिसरामध्ये एक मुख्य जुळे मंदिर व आजूबाजूला सलग्न पण भारदस्त अशी ४-५ मंदिरे, समोर नंदी मंडप व (गर्भगृहाच्या समोर) विस्तृत तळे. अशी संरचना होती. आक्रमणानिमित्त प्रमुख मंदिर राहिले व बाकीची सलग्न मंदिरे काळाच्या ओघात नष्ट झाली / केली केली. आता द्वारसमुद्र मध्ये फक्त होयसलायेश्वर मंदिर आहे, पण ते भव्य व दिव्य आहे.

प्रवेशद्वारातून पाहिल्यावर अनेकांना तामिळनाडू मधील महाबलीपुरम (तामिळनाडू, ५०-६० किमी, चेन्नई पासून) मंदिराची आठवण झाली नाही तर नवलच. पण जसे जसे जवळ जाऊ तसा तसा फरक समोर स्पष्ट होत जातात. महाबलीपुरम विषयी नंतर कधीतरी लिहतो. तर होयसलायेश्वर मंदिर हे तीन टप्पात आहे. नजरेत भरतो तो पहिला भाग दर्शनी मंदिराचा. जसे जसे तुम्ही जवळ जाता तसे मंदिर निर्माण करताना वापरलेली कल्पकता समोर येत जाते. ५-६ फुटाच्या मंदिराचा पाया, पूर्णतः इंटर-लॉकिंग सिस्टम ( मराठी शब्द ? ) वापरलेला. जर हे मंदिर वरून पाहिले तर त्यांची रचना स्टार (चांदणी) सारखी आहे.

दुसरा टप्पा, बारा प्रकारचे लेअर (विभाग) असलेल्या भिंती. वेगवेगळ्या प्रकारे भिंती शिल्पे व नक्षी काम केलेले व अनेक पुराण कथा यांचे चित्रण याचा संगम म्हणजे मंदिराचे बाह्य रूप. सर्वात खालील विभागात, गज शक्तीचे प्रदर्शन, नंतर राज्य चिन्ह असलेल्या सिंहाचे व त्यांनंतर वेगळ वेगळ्या आपात्कालीन पद्घतीने नक्षी काम. त्याच्या वरच्या विभागात यक्ष, किन्नर, वाद्य वाजवणारे, नृत्यात मग्न असे नर्तकी व नर्तक यांची दर्शन. १० इंचाच्या आसपास उंची असलेल्या या विभागात, इतक्या बारकाईने कोरीव काम केले आहे की पाहताना दंग व्हावे व समोर पहात असलेले दृष्य आपल्या नजरे समोर घडत आहे असलेले नृत्य असावे असे भासते, अनेक छोट्या छोट्या गोष्टी, नर्तकीच्या पायातील पैंजण, ती च्या गळ्यातील दागिने व डोळे. कलेतून एखादं दृष्य जिवंत होते कसे या प्रश्नाचे उत्तर येथे मिळते.

नंतरच्या सातव्या व आठव्या विभागामध्ये (लेअर) पुरातन कथा रेखाटलेल्या आहेत, ज्यामध्ये रामायण व महाभारत प्रामुख्याने आहेत. कर्ण वध, अभिमन्यू वध, युद्ध रचना, आयुधे, रथ यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तसेच कृष्ण अवतारातील अनेक कथा येथे दिसतात, बाललीला कालिया मर्दन इत्यादी. प्रत्येक विभागाचे वैशिष्टे अधोरेखित करण्यामागचे कारण हे की त्यांनी जेव्हा मंदिर निर्माण सुरू केले तेव्हा त्यांना काय तयार करायचे आहे, याची स्पष्ट कल्पना होती, रामायणामध्ये महाभारत घुसत नाही अथवा महाभारतात इतर कथा. प्रमुख व महत्त्वपूर्ण कथा व त्यातील पात्र त्यांनी आधीच ठरवले होते, हे पाहताना लक्ष्यात येते. येथे काही गोष्टींचा संदर्भ तुम्हाला जोडावा लागतो, व ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्हाला त्या कथा पुर्ण माहिती असतील अथवा तो पार्ट, त्या कथेतील तो भाग स्पष्टपणे तुम्हाला समजला असेल. याच लेअर (विभागामध्ये ) ज्या चित्रा पासून हा प्रवास चालू झाला ते मला मिळाले. येथे तुम्हाला रावण कैलाश पर्वत उचलताना, कृष्ण – अर्जून अभिमन्यू च्या वधानंतर चर्चा करत असलेले, अर्जून व कर्णाचे भयंकर युध्द त्यांची अस्त्रे, शंकराचा दरबार, शंकराचे नटराज स्वरूप इत्यादी अनेक कथा पहावयास मिळतात.


चक्रव्यूह

ज्या चित्रा पासून हा प्रवास चालू झाला ते चित्र येथे देत आहे. हा फोटो टिम गोवा यांच्या लेखातील आहे.

हा सात लेयर मध्ये (विभागामध्ये) असलेल्या चक्रव्युहाचा नकाशा आहे. (९९.९% मला असे वाटते)

महाभारतातील प्रमुख घटना मधील ही एक घटना तेथे सचित्र कोरलेली आहे व तेथेच अश्याच पद्धतीचे एक भित्तीचित्र मला दिसले. व्युह रचना व त्याचा आकार. आधी मला गोव्यातील ते चित्र म्हणजे शक्यतो सुर्य घड्याळ असावे की काय असे वाटले होते व तसेच मी कोठेतरी पाहिले आहे असे वाटत होते, पण हे भित्तीचित्र पाहिल्यावर लक्ष्यात आले की नाही, हा चक्रव्यूह आहे व हा आपण उत्तर भारतात फिरताना, काही वाचन करताना पाहिलेले आहे.


यानंतरचा लेअर (विभाग) हा नक्षीकामाचा आहे व त्यानंतर मुख्य लेअर (विभाग) येतो तो भित्तीशिल्प याचा.
मी येथे व वरील लेखनामध्ये दोन वेगळे शब्द वापरले आहेत, भित्तीचित्रे व भित्तीशिल्प. दोन्ही प्रकारे दगडामध्ये कोरून कला प्रदर्शन केले जाते पण, दोन्ही मध्ये सौम्य असा फरक आहे, भित्तीशिल्प पुर्ण कोरीव व हाव-भावसह तसेच पूर्णाकृती मूर्ती / मूर्तींची रांग असते, तर भित्तीचित्रे मध्ये कथेला प्राधान्य असते मूर्तीच्या दिसण्यावर नाही (हा फरक मला वाटतो, याचे कुठलेही शास्त्रीय कारण माझ्याकडे नाही आहे).

तर,
मुख्य लेअर (विभाग) मध्ये ३-४ फुट उंचीचे भित्तीशिल्प आहेत, ज्यामध्ये विष्णूची अनेक रूपे, अवतार, ब्रम्ह स्वरूप, शिव स्वरूप गणेश मूर्ती व इतर देवदेवता इत्यादी यांचे दर्शन घडते, येथे एक गोष्ट नोंद घेण्यासारखं आहे, मंदिर हे शिव मंदिर आहे, राजे हे शिव उपासक होते, पण त्यांच्या कलेमध्ये, आवडीमध्ये, फक्त शिव हा अट्टहास नाही आहे, विष्णू व शिव वाद ( जो उत्तर भारतात होता, आहे.) दिसत नाही, ज्या होयसाळ / होयसाल राज्यांनी जैन धर्माची पाळेमुळे खणून काढली दक्षिण भारतातून ( सध्या यांनीच की इतर कोणी याचे उत्तर नाही, कारण याच्या राजधानी पासून म्हणजेच द्वारसमुद्र पासून ९०-१०० किमी दुरवर असलेले प्राचीन जैन धार्मिक स्थळ / पुरातन स्थळ जसेच्या तसे उभे आहे, त्यामुळे थोडा गोंधळ होतो आहे.) त्यांनी निर्माण केलेल्या मंदिराच्या भित्तीचित्रे / शिल्पा वर जैन तीर्थंकर देखील दिसतात. एक तर त्यांचा सर्वधर्म समावेशक असा विचार असावा अथवा एखाद्या धर्माचे, पंथाचे मन दुखावणे म्हणजे राजकारण हे कारण असावे.

मुख्य लेअर (विभाग) मध्ये विष्णूचा मक्ता जास्त उठावदार दिसतो, अनेक शिल्पे त्याच्या अवताराची आहेत, वराह अवतारापासून, नरसिंह अवतार व राम अवतार सगळेच तेथे दिसतात, बम्हास्वरूप देखील तेथे कोरलेले आहे त्याच बरोबर अजुन एक जाणवलेली गोष्ट म्हणजे जी मी इतर भारता अनेक मंदिरे फिरलो पण दुर्गा अवतार /काली अवतार बिंतीशिल्पे मंदिरावर कधी पाहिलेले आठवत नाही, गळ्यात मुंडमाला पासून पायाखाली लोळलेला राक्षस अश्या प्रकारच्या ३-४ शिल्पे तेथे आहेत.

याच लेअर मध्ये, गणेश मुर्ती देखील आहे, पण त्याला प्रमुख द्वारा वर स्थान नाही मिळालेले आहे, पण गणेश मूर्ती ही ब्रह्मा, विष्णू व महेश (शिव) याच्या बरोबरीने तेथे दिसते तसेच, इतर कुठल्या देवाची नाही पण एक ८-९ फुटी उंच गणेश मूर्ती त्याच प्रांगणातून मिळाली होती जी आधी प्रवेशद्वारासमोर होती. अतिशय रेखीव एका पाषाणातून घडवली गेलेली ही मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. विष्णूच्या नरसिंह अवताराचा देखील येथे बोलबाला आहे, नरसिंह शिल्पे तर आहेतच, पण नरसिंह स्तंभ व नरसिंह कथा असलेला शिलालेख देखील येथे आहे, शक्यतो याचे कारण साम्राज्याचे प्रमुख चिन्ह सिंह हे होते. अनेक जागी सिंहाची शिल्पे कोरलेली आहेत.

सर्व जग डावीकडून उजवीकडे असे भटकते, पण आम्ही मुद्दाम उजवीकडून सुरूवात केली होती, कारण तेथे असलेली गर्दी टाळता यावी व योगायोगाने अनेकवेळा केलेला हा प्रयोग पुन्हा यशस्वी ठरला व मंदिर मनसोक्तपणे हवा तेवढा वेळ बाहेरून पाहता आले. मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत, एक मुख्य प्रवेशद्वार व दोन उजवी व डावीकडून प्रवेशद्वार. जे प्रमुख द्वार आहे त्यातून राजघराण्यातील मंडळींना प्रवेश, उजवीकडच्या प्रवेशद्वारातून मंत्री अथवा राजघराण्या समकक्ष लोकांचे प्रवेश द्वार, व डावीकडील प्रवेशद्वार सर्व सामान्य जनतेसाठी होते. उजवी व डावी बाजू पाहिली तर दोन्ही मध्ये कणमात्र फरक करता येत नाही, दोन्ही बाजूची जडण-घडण एकाच पद्घतीने व प्रकाराने केलेली आहे, द्वारपालाच्या मूर्ती पासून चौकटीवर असलेल्या चिन्हापर्यंत सर्व काही एक सारखे. पण राज घराणे ज्या द्वारातून प्रवेश करत असे, त्याची योजना वेगळी व खास पद्घतीने केली आहे.

प्रवेशद्वारापासून काही फुट अंतरावर मंडप आहे, ज्या मंडपात भला मोठा नंदी आहे, भारतात जे अखंड शिळेतून तयार केलेले नंदी आहेत, व जे मी पाहिले आहेत त्यात सर्वात रेखीव असा हा नंदी आहे, तसेच हा भारतातील ४ अथवा पाचव्या क्रमांकाचा सर्वात उंच नंदी आहे. नंदीद्वारापासून प्रवेश केल्यावर समोर मंदिराचे प्रवेशद्वार व आता एक मंडप व त्याच्या समोर गाभारा आहे. मुख्य मंदिरात ५ फुटी उंच व जवळ जवळ ८-९ फुटी रुंदीचे शिवलिंग आहे ( आकार अंदाजे) वर मी लिहिल्याप्रमाणे हे जुळे मंदिर आहे, एकाबाजूला शिवलिंग व एका बाजूला मुर्ती असलेला गाभारा. असे दोन गाभारे आहेत. दोन्ही गाभार्‍या समोर नंदी आहे, व त्याच्या साठी पाषाण मंडप आहे, जुळे मंदिर हा शब्द देखील याच कारणामुळे वापरला जातो.

हे मंदिराचे पुरावे व शिलालेख सापडले आहेत, त्यात एका भल्यामोठ्या सुर्यनारायणाच्या मुर्तीचा उल्लेख येतो, ज्यात सुर्य नारायण त्यांच्या सात अश्व जोडलेल्या रथातून येत आहेत असे रेखाटले होते, पण ती मुर्ती हरवलेली आहे, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. ही पश्चिम मुख मूर्ती नंदी मूर्तीच्या बरोबर मागे म्हणजे पूर्वेकडे स्थापन केलेली होती आतील मंडपातील प्रत्येक खांब वेगवेगळ्या कथा सांगतो, जसे नरसिंह कथा, महाभारत कथा. छतावर अत्यंत रेखीव सुबक असे नक्षी काम केले आहे. भिंतीवर कन्नड/तामिळ मध्ये शिलालेख कोरलेले आहेत, वर लिहिल्याप्रमाणे एका गाभार्‍यात शिवलिंग आहे व दुसर्‍या गाभार्‍यात मुर्ती.

क्रमशः

प्रवास !

तु केव्हा शांतचित्त बसतोस व कधी तुझा संगणक तुझ्याबरोबर नसतो ? हा प्रश्न माझे अनेक मित्र नेहमी विचारतात कारण माझा स्वभाव त्यांना माहीत आहे, खुप चंचल व संगणक म्हणजे माझा दुसरा जीव पण मी संगणकापासून वेगळा झालो की मला निसर्ग हवा असतो मनसोक्त जगण्याचा आनंद उपभोगण्यासाठी. मग कधी दोन दिवसाची सुट्टी मिळो वा चार दिवसाची, मग सरळ हिमालयाची नाहीतर राजस्थानची वाट पकडणे हा आता छंद जडला आहे, हिमालयाच्या सानिध्यात गेलो की सर्व टेन्शन, सर्व काम सर्व दुनियादारी ह्यापासून मी मुक्त होतो व मनसोक्त फिरतो व परत आपल्या रुटीनच्या कामावर परत नव्या तेजाने, नव्या विश्वासाने. कुठे व असे जायचे असे प्रश्न मला कधीच पडत नाहीत, घरी जाऊन मोजकीच बँग भरणे व गाडीने जायचे असेल तर गाडी बाहेर काढणे नाही तर सरळ हायवे वर एखाद्या ट्रकला / गाडीला हात देऊन विचारायचे बाबा रे कुठे जाणार आहेस ? तो म्हणाला जयपुर तर जयपुरला जायचे, तो म्हणाला चंडीगड तर चंडीगड… एकदा दिल्ली (NCR) पार केली तर जेथे वाटेल तेथे गाडी थाबवायला लावायची व एखाद्या धाब्यावर जाऊन अंदाज घ्यायचा की कुठला ट्रक कुठे चालला आहे. थोड्या गप्पा व एक दोन सिगरेट शेयर केल्या की लगेच कळते की कुठली गाडी कुठे जाणार आहे व कोण कुठे सोडू शकतो, मग त्याच्याशी थोडा गप्पा मारल्या की आपल्या मनातील गोष्ट त्याला सांगायची पंजाबी असेल तर लगेच पाठीत रट्टा देऊन म्हणजे ” ओ, पुतर.. चल मैं छोड देता हूं तुम्हे “. मग ज्या प्रवासाची सुरवात येवढी मजेदार होऊ शकते मग तो प्रवास कीती मजेदार होऊ शकतो ना ? ट्रक प्रवासात एक खबरदारी की फक्त ट्रक मधून दिवसा प्रवास करावा, कारण हे ट्रकवाले रात्री नेहमी दारु घेऊन ट्रक चालवतात व कुठला प्रवास तुमचा शेवटचा प्रवास होईल सांगता येणार नाही. टप्पा टप्पाने प्रवास केला की थोडे शरीर हार मानू लागते पण त्याची एक मजा वेगळीच, वेगवेगळ्या लोकांशी बोलत, चालत तर कधी मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे म्हणजे काय हे केल्या शिवाय समजणार नाही.

कुठून तरी दुरवरुन एक पाण्याचा झरा हिमालयाच्या अंगाखांद्यावर खेळत खेळत, पहाडावरुन दरीतून वाहत, मोठ्या प्रवाहामध्ये बदलतो व तो प्रवाह कधी मोठ्या नदी मध्ये परिवर्तित होतो व एका दैवीय वलय आदीकालापासून कसे त्या नदीच्या नावाबरोबर जुडले जाते हा प्रवास नक्की पहावा असा. प्रत्येक भारतीय मनामध्ये गंगानदीसाठी एक वेगळी खास भावना आहे जी शब्दामध्ये व्यक्त करणे खरोखर अवघड. पण मला गंगा ही नदी धार्मिक कारणापेक्षा जास्त नदीने जोपासलेला निसर्गामुळे आवडते, तुम्हाला स्वर्गिय आनंद अनुभव करुन देणारा निसर्ग, तुम्ही निसर्गापेक्षा नक्कीच मोठे नाही ह्याची जाणीव करुन देणारा निसर्ग . पण दोन वेळा प्रयत्न करुन ही मला गंगोत्रीचे दर्शन घेता आले नाही, कधी तरी खराब वातावरण तर कधी दुसरीच अडचण, पण तरी ही जेवढे जमेल तेवढे मी गंगेचे खोरे पालथं घातले. माझ्या जिवनातील काही महिने हरिद्वारमध्ये होतो त्याची आठवण नेहमी येत राहते व अधून मधून मी हरिद्वार दर्शन करण्यासाठी जातो, जुन्या आठवणी ताज्या होतात व मातेचे दर्शन घेता येते हा त्यामागचा निस्वार्थ उद्देश. कुठे गेलो कसा गेलो, कुठले गाव मध्ये लागले हे मला आठवत नाही कारण माझा मेंदू जे गरजेचे आहे तेवढेच लक्ष्यात ठेवतो, हे मी अनुभवले आहे खुपदा, एखादी खुण, एखादे झाडं, एखादे मंदिर हे माझे लॅन्डमार्क, गावांची नावे व लोकांचे मोबाईल नंबर लक्ष्यात ठेव म्हणाले की माझा मेंदू एकदम नकार देतो.

धडपडत जेव्हा तुम्ही हरिद्वारमध्ये पोहचालं तेव्हा तुम्हाला पाय दुखणे व अंग दुखणे हे छोटे छोटे त्रास चालू होतात, काही न करता सरळ हर की पौडींकडे चालू लागणे व तेथे आपले कपडे सुरक्षित जागी ठेवल्यावर, सर घाट उतरत गंगेच्या पाण्याजवळ येणे व एकदा पाया पडून पोहाता येत असेल तर सुर मारणे, दोन मिनिटामध्ये सर्व शारिरिक मानसिक त्रास गायब ! हा अनुभव आहे, कधी अनुभव घेऊन बघा, जेव्हा तुमचे शरीर पाण्याला स्पर्श करते तेव्हा थंड पाण्याचा एक वेगळाच करंट तुमच्या शरीराला आंदोलित करतो पण नंतर त्या पाण्यातून बाहेर यावेच वाटत नाही, मनसोक्त दंगा घालू झाल्यावर देखील तुम्ही स्वतःवर जबरदस्ती करुन पाण्यातून बाहेर येता.

हर की पौडीं चा घाट म्हणजे गंगा दर्शन नाही ह्यांचा अनुभव जर तुम्हाला घेणे असेल तर तर तुम्हाला थोडे पायी चालावे लागेल काही एक किलोमिटर, नदीच्या काठाने, सरळ वाटचाल चालू करावी नदीच्या उलट दिशेला, म्हणजेच उगमाकडे. येथे अजून कचरा पोहचला नसेल अश्या जागी, का व कश्यासाठी हा जर प्रश्न मनात येत असेल तर सरळ मागे वळावे व हरिद्वार मधील जनसागरामध्ये विरघळून जावे, हर की पौडीं वर जाऊन पाण्यात थोडावेळ खेळावं व संध्याकाळची भरगच्च गर्दी असलेली आरती उरकावी व आपल्या घरी निघण्याची तयारी करावी कारण पुढील मार्ग तुमच्यासाठी नाही आहे. किती जण जाणार आहात की एकटेच ते तुम्ही ठरवा, मी तर कधी कधी एकटाच गेलो आहे व मला एकटेच जायला आवडेल कारण एक निरव शांतता अनुभव करणे व निसर्गाचे मंजुळ गीत तुम्हाला आपल्या कानी पडावे असे वाटतं असेल तर तुम्ही निशब्द होणे आधी गरजेचे आहे, जो पर्यंत तुम्ही शांत नाही तो पर्यंत तुम्ही निसर्गाचा आनंद कसा घेणार ?

तयारी ? कसलीच नाही. आपले नेहमीचे स्पोर्ट्स शुज, थोडीशी हलकी रात्री थंडी वाजते त्यासाठी स्लिपींग बॅग, पाठीवर लटकवण्याची सॅक व त्यामध्ये थोडे चॉकलेट्स, थोडी बिस्कुट्स व हलकी फळे, एक-दोन लिटर ज्युस. व कमीत कमी वजन. सुरक्षा करण्यासाठी छोटा चाकू, नायलॉनची रस्सी, पाण्यासाठी बाटली, लायटर (एक-दोन, एक संपला तर ) , टॉर्च व त्याच्या बॅट-या. बस !

क्रमशः

हरवलेली पानं…. भाग – १

प्रस्तावना :- मनोगत :- जे काही म्हणायचे आहे ते :-

मागील आठवड्यात निखिल देशपांडे ह्यांनी माझ्या एका जुन्या लेखाचा हरवलेला धागा मला समोर आणून दिला व आज मी तो लेख ” एक सोडून…. ” लेख लिहला. जेवढे लेखन मी आजपर्यंत मराठी महाजालावर केले असेल त्यात कुठे ना कुठे सत्याचा अंश होता. माझी सफर ही लेखमाला वाचून चतुरंग ह्या सदस्यांने मला प्रतिसाद दिला होता त्याचा पुर्ण भाग आठवत नाही पण एक वाक्य नक्कीच होते, जीवन हे सफरचंदासारखं नसतं ! कुठून ही सुरवात करा.. गोडवाच मिळेल… असे नक्कीच नसते…. अशीच काही पानं मागे राहीली होती.. माझी सफरची सुरवात अशीच कुठेतरी मागे राहीली होती.. कारण काही पानं अशीचं हरवली होती.. काही पाने मुद्दाम मी झाकून ठेवली होती तर काही काळाच्या आड नकळत गेली होती.. ती आज अशीच मनावर ठसठसीत होती म्हणून हे सर्व काही… भाग किती, क्रमशः किती.. मला नाही माहीत, माझे सफरचे २० भाग झाले होते ते देखील अगदी अजाणतेपणे.. हे तर मी जाणूनबूजून लिहीत आहे त्यामुळे नक्की माहीत नाही कधी व कुठे थांबेन ते.. पण सुरवात आज नक्की करायला हवी आहे, उद्या जाताना मनात शल्य नको… !

काही जणांना वाटतं हे सगळे असे का ? हा राजे उर्फ राज जैन जो आज आपल्या समोर उभा आहे तो असा नसावा, माझी सफर लिहली मी तेव्हा मी वेगळा होतो व आज आहे त्यापेक्षा नक्कीच वेगळा होतो, एक तप पुर्ण झाले आहे. एखाद्या गोष्टीकडे तटस्थपणे पाहण्याची नजर मला कर्मामुळे, नशीबामुळे वयाच्या हिशोबाप्रमाणे जरा लवकरच मिळाली. ज्यांनी माझी सफर वाचली नाही त्यांना शक्यतो काही संदर्भ लागणार नाहीत पण ठीक आहे कधी ना कधी वाचतील व त्यांना मी काय म्हणतो आहे हे कळेल. असे नाही आहे मी सर्व जागी एकदम बरोबर आहे कुठे कुठे नक्की मी चुकत असेन चुकलो असेन नाही असे नाही पण हे जीवन मला असेच कळले व जसे कळले त्या शब्दात मी येथे लिहीत आहे, आईने कधी मध्ये रागामध्ये, प्रेमामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या व मी तश्याच जगत आलो त्यामुळे शक्यतो कुणाची मने दुखावतील कोणाच्या हदयास घाव होईल, पण जेव्हा मुक्त होणे ठरवले आहेच तर सर्व गोष्टींना सामोरे जाणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून जे सत्य आहे तेच लिहीत आहे.. परवा पाय तुटला म्हणून घरी पडून होतो.. कधी कळून नये त्या गोष्टी कळाल्या.. तिळतिळ तुटावे असा हाल झाला… त्याचा परिणाम समजा अथवा आत्म्याची हाक…

*************

कधीतरी डोळे उघडले असतील जेव्हा मी जन्मायला आलो तेव्हा, विश्व म्हणजे काय हे डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा माझ्यासमोर माझी आई, मावशी व मावशीचा नवरा सोडून कोणीच नव्हते. कुठेतरी इंचलकरंजी सारख्या खेडेगाव वजा शहरामध्ये मी जन्मलो. ते ही मावशीच्या घरी. एका खोलीत संसार तेथे एक जीव नवा. सांगायला व वाचायला सोपं वाटतं पण जगणे म्हणजे नरक हे समजणे खरोखर अशक्य हे समजणे थोडे फार नक्कीच अवघड आहे.

माझी आई, कधीतरी बालविवाह कायदा जुमानत नव्हता तेव्हा लग्न झालेलं, घरात जास्त कोणी शिकले नसेलले तरी रुढारुढ परंपरेपासून दुर असे माझे अजोळ पण कसे काय त्या विवाहास तयार झाले देव जाणे, जेथे लग्न ठरवले होते तेथे मानपानावरुन कसल्याश्या गोष्टीवरुन वाद झाला व वादाचे रुपांतर लग्न मोडण्यापर्यंत झाले, आजोबानीं देखील रागाच्या भरात लग्न तोडले. कुठेतरी कोल्हापुरामध्ये एका कपड्याच्या दुकानामध्ये काम करणारा घरदार सोडून दुरवर राहणारा कोणीतरी सांगितला म्हणून त्याला जावई करुन घेतला, घर काय, घराची अवस्था काय, घरात आहे काय, मागे कोण, पुढे कोण, काय नाही आहे काय, काय आहे, मुलगी जगणार कशी, राहणार कुठे ह्याचा सारासार विचार न करता रागाच्या भरात लग्न लावून दिले. लग्नाच्या पहिल्याच दिवशी महाशय तर्र होऊन घरी परतले होते व तो दिवस व शेवटचा दिवस ना ती दारु सुटली ना आईच्या मागच्या दारुची पिंडा… लग्नानंतर काही दिवसामध्येच दारुपायी मंगळसुत्र विकले गेले..

लग्नानंतर घर म्हणजे विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर, असे दिवस काढले तीने, कधी ही खोली कधी ती खोली, कधी शिवाजी पेठ, कधी मंगळवार पेठ कधी बुधवार पेठ तर कधी शुक्रवार पेठ. पण समाधान नाही तीच्या जीवाला, एकाचे दोन जीव झाले तरी साहेब काय सुधरावयास तयार नाहीत, शेवटी कसे बसे मावशीच्या नवर्‍याने इचलकरंजीमध्ये नोकरी लावली व आमचे शब्दश: घर… नाही उरलेले जपलेले, चार तांबे, दोन ताटे, एक स्टो, दोन सतरंजी, व दोन-तीन चादरी अक्षरशः गोळा करुन आपला वाड्यात एक खोली टाकले व त्यांचा संसार उभा केला, तेव्हा आईला दिवस गेलेले व महाराज नेहमी नशेमध्ये चुर, पगार मधल्यामध्ये कुठे गायब होत असे ते देखील कोणास कळायचे नाही. दुसर्‍याच्या घरादारची भांडी व कपडे-धुणे करुन काबाड कष्ट करुन आईने पोटात मला वाढवले. कसेबसे मी दोन वर्षाचे झालो तोच ताई पण घरात आली ते पण जीव घेणे दुखणे घेऊन, कसेबसे देवाची कृपा होती म्हणून वाचली व दोन महिन्यानंतर घरी आली, माझ्या पाठची पण सगळेच ताई म्हणायचे तिला म्हणून मी पण.

आई गावभर लोणी व तुप गोळा करायची व आठवडी बाजारासाठी ते तुप व लोणी डोक्यावर ठेऊन चालत १६ किलोमीटर दुरवर असलेल्या सदलगा ह्या गावी विकायला घेऊन जायची. काखेत ताई व चालत मी ! किती चालणार मी पण.. शेवटी रडारड, मग एका बाजूला अक्का व एका बाजूला मी वर डोक्यावर कपड्यांचा गठ्ठा व त्यात कुठेतरी तुप व लोणी. कपडे विकणे व त्याच बरोबर लोणी व तुप विकणे हा जोड धंदा. आठवड्यातून एकदाच पण तीची बिचारीची फरफट व्हायची ह्यामध्ये, दोघे लहान कधी ताईचे रडणे कधी माझे, हट्टी लहानपणापासूनच मी त्यामुळे प्रचंड त्रास. चार पाऊले चालले नाही की मला उचलून घे हा घोष. व राहीले बाबा, त्यांचे भावविश्वच वेगळे, ते कुठे असायचे व कुठे नाही देवाला माहीत. कधी मन केले तर दारुच्या दुकानात कामाला तर कधी हातमागावर….

हळुहळु मी देखील मोठा झालो, बाबा व आई परत कोल्हापुरला आले राहण्यासाठी. शिवाजी पेठेत. काय झाले काय माहीत पण माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडिल कधी आमच्या घरी आलेच नाहीत. पोरीला चुकीच्या हातात दिले ह्याचे शल्य की काय देव जाणे पण ते कधी फिरकलेच नाहीत कोल्हापुरकडे.. मरे पर्यंत ! माझी शाळा जवळच, मंगळवार पेठेत. केजी बीजी काय नव्हतं त्यावेळी. सरळ पाच वर्षांनी पहिलीत प्रवेश. मला जास्त नाही आठवत पण कधी कधी आई सांगायची एकदा प्रवेश घेण्यासाठी बाबा शाळेत गेले होते ते परत कधीच गेलेले नाहीत शाळेत. बाबांना मदत व्हावी म्हणून आईने घरी शिवण मशीन आणले तेव्हा असेन मी ४-५ वर्षाचा ते मशीन सरळ पाठीचा मणका दुखावला तेव्हाच बंद झाले नाही तर आहोरात्र चालूच होते… !

काही गोष्टी मला हळूहळू कळत होत्या पण अक्का पाठची तिला काहीच कळत नसे व तिला काही हवे नको ते मला व माझ्या ताकतीबाहेरचे असेल तर आईला सांगणे… एवढंच तिला कळायचे. आज तिला आठवत ही नसेल, कीती वेळा तिला सफरचंद हवेत म्हणून मी अंबाबाईच्या मंदिरासमोरील मार्केट मधून फेरीवाल्यांच्याकडून चोरली असतील व किती वेळा मला हवे म्हणून चिक्कू चोरले असतील. शाळेत प्रवेश झाला त्या दिवशी शक्यतो माझे आई-वडील एकत्र शाळेत आले असतील त्यानंतर कधीच नाही बाहूबली हॉस्टेलपर्यंत..तर नक्कीच नाही.. कारण मी गायब होतो म्हणून आले होते मी नसताना.

एक खोली, त्यातच किचन त्यातच बेडरुम व त्यातच बाजूला दोन-तीन फुट उंच भिंत बांधून केलेली बाथरुम. संडास कुठेतरी खाली नाहीतर सार्वजनिक. हे असे आमचे घर. चुल ठेवायला परवानगी नाही म्हणून स्टोव्ह. अल्युमिलियमची भांडी व स्टिलची दोन-चार ताटं.. आज नवल वाटतं तीने तो संसार कसा निभावला असेल.. कशी ती जगली असेल.. ती त्यावेळी.

शाळेतील सहली व शाळेतील जगणे हेच भावविश्व तेव्हा देखील व नंतर देखील. आम्ही कोठे ही गेलो तर माझी ताई माझ्याबरोबर असे. शाळेत हुषार, पहिले ते सहावी पर्यंत कधीच एक नंबर सोडला नाही कधी तरी दोन नंबर पण पहिल्या दोनात मी नक्कीच असे. शाळेतील शिक्षकांचे, मॅडमचे तेवढेच प्रेम… पण माझ्या एवढा दंगेखोर व टवाळखोर दुसरा कोणीच नव्हता शाळेत. त्यामुळे रोज मार व रोज ओरडणे. घरी आले तर गल्ली भर मस्ती करुन झालेली असायची. कधी बाबांनी माझा अभ्यास घेतला असावा असे आठवत देखील नाही, ना मला ना ताईला. हा पण मार मात्र प्रचंड खल्ला असेल, ताईने कमीच, शक्यतो नाहीच, पण मी मात्र… हिशोब नाही !

आधी शिवाजी पेठ ते मंगळवार पेठ व नंतर काही दिवसानंतर बुधवार पेठ ते मंगळवार पेठ, आम्ही चालत शाळेत यायचो, मी ताईचा हात पकडायचो व शाळेत आल्यावर सोडायचे. आमची रुपा खुप हुषार, माझ्यापेक्षा ही खुप हुषार अनेक पट्टीने, तिला चांगले काय वाईट काय लगेच समजायचे, खुप गोड.. पण माझ्या मनात नेहमी गोंधळ चाले, मी दंगा केला असो वा नसो बाईनीं बोलवले असो वा नसो माझे बाबा कधी शाळेत आलेच नाहीत. मात्र घरी मात्र मार कधी चुकायचा नाही, काही करो वा न करो, त्यांचा राग कुठेतरी नक्कीच निघायचा… त्यांची माझी काय दुश्मनी होती देवास ठाऊक. पण कधी जवळ घेणे नाही ना कधी प्रेमाने डोक्यावर हात फिरवणे नाही, नाही म्हणायला कसे काय कोण जाणे मी लहान असेन तेव्हा किती ते पण आठवत नाही व ताईला देखील आज आठवणार नाही, कधीतरी असे अचानक आम्हाला सहपरिवार आई, मी व अक्काला गोव्याला घेऊन गोव्याला आले, शक्यतो बाबांच्या बरोबर ह्या जन्मातील ती पहिली व शेवटची ट्रिप असावी ती आमची, त्यामुळे असेल नक्की माहीत नाही, पण मला ती ट्रिप नक्की पुर्ण आठवते, ते बीच, ते चर्च व तो दोना-पावला बीच जेथे बाबांनी त्यांची गोष्ट सांगितली होती व नंतर मोठे झाल्यावर कळाले होते की एक दुजें के लिए हा चित्रपट त्याच गोष्टीवर बेतला होता. ह्या नंतर असंख्य वेळा गोव्याला गेलो असेन पण दोना-पावला बीचवर कधी चुकून पण पाऊल नाही ठेवले आज देखील.

दहावी बारावीला मी टॉप करेन असा आत्मविश्वास माझ्या शाळेतील सरांना, मॅडमना देखील होता, आत्मस्तुती नाही पण जवळ जवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तरासाठी माझा हात वर असे व परिक्षेत देखील मी नेहमीच वरचढ असे… जवळ जवळ पहिली ते पाचवी-सहावी पर्यंत तरी नक्कीच… सायन्स असो वा ईतिहास.. नाहीतर भुगोल नाहीतर गणीत.. व्याकरण व इंग्रजी ह्यामध्ये जरा तडफडायचो पण कच्चा नक्कीच नव्हतो. नुतन मराठी विद्यालय सुटले व कधी जाउन बाहुबली हॉस्टेल मध्ये पडलो ते कळालेच नाही, आईचे शिलाई मशीन कधी थांबलेच नाही, रोज बाहेर असलेली सवत, ती दारु कुठल्या अंगाने घरात शिरली ते देखील आईला कळालेच नाही. रोज बाहेर घेणारे बाबा आजकाल घरात बसूनच बाटलीवर बाटली गटकवू लागले.कष्टाचे दिवस कमी झाले असे मनात येऊपर्यंत अपार कष्ट समोर येऊन पडले. लोकांच्या परकर व पिकोफॉल करण्याच्या कामावर घर चालणार नाही हे आईला लवकरच उमजले व तीने खानावळ चालू केली, हॉस्टेलमध्ये माझी पळापळ, घरात आई सोडून कुणालाच मी नको आहे ही भावना ह्यामुळे प्रचंड तगमग व त्यावर उपाय म्हणून रोज सकाळी उठून हॉस्टेल मधून पळण्याचा प्लॉन, फसला की मार, परत दुसरा दिवस परत दुसर प्लॉन.. ! आई जवळ जाणे हा एकच ध्यास, त्यावेळी कोणास ठाऊक कोणाला समजला नाही किंवा उमजला नाही, आई शिवाय राहणे शक्यच नव्हते ना.. रोज तीचीच सवय सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपूपर्यंत.

पण ते माझे भाव विश्व कोणास समजलेच नाही मी रोजच्या रोज निगरगट्ट होत गेलो, एकदा तर हॉस्टेल मधून चांगले चार दिवस पळून गेलो ना घरी गेलो ना हॉस्टेलमध्ये परतलो… पाचव्या दिवशी आईचीच आठवण जीवावर आली म्हणून परत ग़ंगावेशेत येऊन उभा राहीलो, पण ते चार दिवस दाजीपुरच्या जंगलात एका १२-१३ वर्षाच्या पोराने कसे काढले असतील ते येथे लिहणे शक्यपण नाही व मला लिहणे देखील. त्यानंतर आमचे जीवन जसे ढवळून निघाले, हॉस्टेल मधून मी परत कोल्हापुरात आलो व बाबांनी पण नोकरी सोडून कपड्याचा स्टॉल महाद्वार रोडवर घातला होता, आईचे काम देखील चालूच होते, दिवसभर मशीनवर परकर शिवणे, पिकोफॉल करणे… व सकाळ संध्याकाळ पिसीआर हॉस्पिटलच्या शिकाऊ डॉक्टर ना डब्बा पोहचवणे.. कधी ते जेवायला याचे तर कधी आम्ही डब्बा पोहचवायचो. असेच एक दिवस प्रचंड पाऊस पडत होता, जेवण तयार होते पण कोणीच पोहचू शकत नाही अशी अवस्था. नऊ वाजत आले होते शेवटी आईने शेजारच्या मुलाची सायकल मागून घेतली व मला डब्बे पोहचवण्यास सांगितले. त्याआधी कधी डब्बे पोहचवले नव्हते असे नाही पण एवढ्या रात्री आईने मला एकट्याला बाहेर पाठवण्याची पहिलीच वेळ. हो ना करत मी डब्बा घेऊन निघालो व परतुं येताना टाऊनहॉलच्या पाठीमागे असलेल्या सोन्यामारुती चौकामध्ये पाऊसामुळे रस्त्यात अडव्या पडलेल्या झाडाच्या फांदीला धडकून माझा अपघात झाला व मी मोकळे डब्बे व सायकल घेऊन उत्ताणा पडलो. जिवनात पहिला झालेला अपघात. जास्त काही लागले नाही पण.. बाबांच्या शिव्या व मार.. दुसर्‍याच्या मुलाची सायकल तुटली ह्याचा राग प्रचंड, पण स्वतःचा मुलगा सहिसलामत आहे ह्याची त्यांना फिकर नक्कीच नव्हती त्यावेळी.. काय करणार अक्कामाई पोटात गेली होती व ती बोलत व मारत होती…

क्रमशः

देव.. चमत्कार व मी

देव ह्या संकल्पनेवर अनेकवेळा चर्चा होते व होत राहील, विज्ञाननिष्ठ व्यक्ती देव नसल्याचा पुरजोर दावा करेल व जो देव मानतो तो देव असल्याचा खात्रीलायक दावा करेल, येथे मीमराठीवर देखील अधून मधून ही चर्चा चालूच असते कधी धाग्यावर कधी खरडफळ्यावर तर कधी कट्टावर. देवाचे अस्तित्व नाकारावे की नाही हा ज्याच्या त्याच्या बुध्दीचा प्रश्न. विज्ञान देव ही संकल्पना मान्य करत नाही व प्रत्येक गोष्टीला एक कारक आहे , कारण आहे असे शास्त्र शुध्द नियमाद्वारे दाखवून देतो. अनिंस सारख्या संस्था व अनेक विज्ञान निष्ठ व्यक्ती मुळापासून देवाचे अस्तित्व मान्य करतच नाहीत पण हजारो वर्षापासून हिंदू मनावर देवाचे अस्तित्व वेगवेगळ्या कथेतून, ग्रंथातून, काव्यातून, अभंगातून बिंबवले जात आहे व त्यामुळे देवाचे अस्तित्व मान्य करणार्‍यांची संख्या ही जास्त दिसते, त्यामुळे हा वाद नेहमीच रंगतो.

दैवी चमत्कार मान्य करणे न करणे विज्ञाननिष्ठ व्यक्तीला सोपं जाते कारण त्याची मुळापासून आपल्या विज्ञानावर श्रध्दा असते व आपले मत बरोबर आहे ह्यासाठी विज्ञाननिष्ठ पुरावा ही त्याच्याकडे असतो ( जसे नाईल ह्यांनी विहीरी बाबत गणित मांडले आहे तसे) व प्रत्येक वेळी ते पुरावे सामान्य व्यक्तीला देखील पटतात. सामान्य व्यक्तीला आपल्या पुरातन संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी, पुरातन कथांना, चमत्कारांना, पुराण पुरुषाच्या अस्तित्वाला, देवाला नाकारणे जवळ जवळ अशक्य होऊन बसलेले असते कारण संस्कार, लोक-शिक्षणाची कमतरता.

मी स्वतः चमत्कार मान्य करतो पण तो विज्ञाननिष्ठ चमत्कार ! बाकी कुठला ही चमत्कार मी मान्य करु शकत नाही ह्यांचे कारण शक्यतो माझ्या वाचनामध्ये असेल किंवा जेव्हापासून डिस्कव्हरी व नॅशनल जीओग्रॉफिक टाईपची सर्वांग सुंदर दुरचित्रवाण्या आल्या त्यामुळे असेल. ह्यांनी दृष्टी दिली एखाद्या चमत्काराकडे कसे पहावे ह्याची. मी देवाचे अस्तित्व नाकारतो असे देखील नाही आहे कारण शेवटी मी देखील त्याच मातीतून आलो आहे जेथे लहानपणापासून देव सदैव आपल्याला पाहात आहे आपले कर्म पहात आहे असे शिकवले जाते. पण तरी ही काही गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर तोलून नक्की पहाव्या असे वाटतं.

कित्येक पिढ्यामागे माहीत नाही पण आमच्या घरातील एका व्यक्तीला आपला मुळ धर्म सोडून जैन धर्मात प्रवेश करावे असे वाटले असेल व त्यांनी त्यानूसार केला. पण मुळ धर्मातील देव हे ते देखील त्याग करु शकले नाहीत त्यामुळे नवीन धर्मात आल्यावर जसे नवीन देव देव्हार्‍यात आले तसेच जुने देव देखील तेथेच राहीले त्यामुळे आमच्या घरात लक्ष्मीपुजन होते, गणपती पुजन होते, कुल दैवत नाईकबाचे पुजन होते व त्याच बरोबर २४ तिर्थंकरांचे देखील पुजन मनन होते. त्यामुळे लहानपणापासून देव ह्या संकल्पनेवर प्रचंड विश्वासाचे वातावरण आमच्या घरात दिसे. देव व देवाचे मंदिर ह्या विषयी मला काय वाटते दे मी मागे एका लेखामध्ये लिहले आहे पण येथे देवाचेच अस्तित्व नाकारणारे वातावरण पाहीले की माझ्यासारखा माणूस बावरुन जातो. कोणाला बरोबर मानावे, कोणाचे सत्य सत्य म्हणून अंगिकारावे ह्या गोंधळात तो गप्प राहणेच पसंद करतो.

चमत्काराचा व माझा सरळ संबध आला तो जेव्हा मी बाहुबली हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असताना नेहमी दंगा व हॉस्टेलमधून पळून जाते असे प्रकार करत असे तेव्हा. कोणीतरी आईला सांगितले की ह्याच्यावर (माझ्यावर) कोणीतरी करणी केली असू शकते मग लगेच आमच्या माता आम्हाला कोल्हापुर पासून १३०-१४० किमी दुरवर कर्नाटकात एकोंडी नावाच्या गावी घेऊन गेल्या. बुवामहाराजांनी मला एका पुजेचे ठिकाण असलेल्या पाटावर बसवले व आपले मंत्र पठण चालू केले काही मिनिटानंतर डोक्यावर टपा टपा लिंबू पडू लागले चांगले वीस तीस लिंबू खाली पडले. अंगारा फुंकणे, चित्रविचित्र आवाज काढत गोल गोल फिरणे वर करुन लिंबू पाडणे हे काही वेळ चालू राहीले व आई कडून ५०१ रु. दक्षिणा घेऊन माझ्या डोक्यावरचे भुत उतरले आहे असे सांगून बोळवणी केली. त्या एरियातून बाहेर पडल्या पडल्या मी आईला प्रश्न विचारला ते महाराज मला बाहेर अंगणात बसवून ते लिंबू पाडून दाखवतील का ? झाले देवाबद्दल काय वाटेल ते विचारतोस म्हणून धप्पा धप्पा मार पडला रस्त्यावरच. माझी आई कमी शिकलेली आहे त्यामुळे मी त्या चमत्कारावर शंका व्यक्त करतो आहे म्हणजे मी त्याचे अस्तित्वच नाकारत आहे असे तिला वाटले. ( त्यानंतर देखील मी हॉस्टेलमधून अनेकवेळा पळून गेलो ही गोष्ट निराळीच 😉 )

ह्यानंतरचा चमत्कार आमच्या पाहुण्यामध्येच एक स्त्री करत असे. पाटावर जोंधळे पसरवून त्यावर भरलेली पाण्याची तांब्याची घागर ठेवत असे समोर ती बसत असे व विरुध्द बाजूला ज्याला काही अडचण आहे ती व्यक्ती. मनातल्या मनात प्रश्न विचारायचे व त्या घागरी च्या काठांना दोन्ही हाताच्या मधल्या बोटाने फक्त स्पर्श करायचा व तिकडून तीने देखील तश्याच पध्दतीने स्पर्श करायचा उत्तर हो असेल तर घागर उजव्याबाजूला फिरु लागे व नाही असेल तर डाव्या बाजूला. मला ते पाहून एकदम तिच्यामध्ये असलेल्या शक्तीबद्दल तिच्या कार्याबद्दल व तिच्या अंगात येण्याबद्दल प्रचंड विश्वास वाटू लागला व काहीतरी दैवी शक्ती आहे ह्यामध्ये नक्की ह्या निर्णयापर्यंत आलो. असे काही दिवस भारावलेल्या अवस्थेत मी चांगल्या मुलासारखा वागलो तर घरी देखील तिच्याबद्दल विश्वास निर्माण झाला मग दर रवीवारी त्या पाहुणीकडे आमच्या फेर्‍या वाढल्या. घर पाहुण्याचेच असल्यामु़ळे मला व माझ्या बहिणीला प्रचंड मोकळीक होतीच. आम्ही खेळता खेळता त्या पुजाघरात शिरलो तर समोर ती घागर व साहित्य तयार होते अंगात मस्ती फार त्यामुळे लगेच समोर जबरदस्तीने बहिणीला बसवले व तिला त्या घागरीला स्पर्श करण्यास सांगितले व मी देखील केला काय नवल ती घागर माझ्यासारख्याच्या स्पर्शाने देखील उजवीकडे फिरली, मी बहिणीला हात त्या घागरीवरुन काढून पुन्हा स्पर्श करायला लावला पण आधी उजवे बोट स्पर्श कर असे सांगितले मग परत घाघर फिरली डाव्याबाजूला. हे पाहून माझी बहिणीची तंतरी उडली व ती तेथेच किंचाळली घागर फिरत आहे बघून. झाले परत मार पडला पण मला कळाले ही काहीही असो चमत्कार नक्कीच नाही आहे ह्यामागे. घरी आल्यावर आईला पटवून देण्याचा खुप प्रयत्न केला घरीच तसा सेटअप करुन तीला घागर फिरवून दाखवली तरी तीने ते मान्य केले नाही की तो चमत्कार नव्हता.

ही झाली दोन उदाहरणे भोंदुबाजीची म्हणा अथवा चमत्काराची कारण दोन्ही जागी लोकांच्या प्रचंड रांगा लागायच्या संकट निवारण्यासाठी. चांगल्या गोष्टीचा प्रसार होण्यासाठी वर्षानू वर्ष लागतात पण एखादा चमत्कार काही तासामध्ये जगभर पसरु शकतो, आपल्यापैकी जवळ जवळ सर्वांना “गणपती दुध पितो” चा पराक्रम माहीत असेल ना ! त्या दिवशी आमच्या घरातील डाव्या सोंडेचा सोनेरी गणपती देखील चमच्याने दुध पित होता व वाड्यात आमच्याच घरी गणपतीची मुर्ती असल्यामुळे घरी प्रचंड गर्दी व बाहेर रांगा लागल्या होत्या ते अजून आठवते 😉

असे अनेक चमत्कार करणारे पाहणे माझ्या नशीबी आले पण परवा परवा जेव्हा अपघात झाला म्हणून घरी आडवा पडलो होतो तेव्हा आईला कोणी तरी माझी दृष्ट काढावयास सांगितली, अर्धातास लेक्चर दिले पण आई काय बधली नाही व शेवटी मी हार मान्य करुन तीला तिचे कार्य करु दिले. दहा-बारा वाळलेल्या लाल मिर्च्या तीने माझ्यावर उतरवून चुलीत टाकल्या व चार पाच मिनिटाने माझ्याकडे आली व म्हणाली बघ.. आता तरी समजले का ? मला काहीच समजले नाही तेव्हा तीने मला सांगितले की तु एक लाल मीर्ची चुलीत टाकून बघ. काही न करता उचलायची व चुलीत टाकायची. माझे विज्ञान निष्ठ मन ह्यासाठी लगेच तयार झाले व म्हणालो बघ ह्या मिर्चीचा पण धुर होणार नाही म्हणून समोर असलेल्या पोत्यात हात घालून एक मिर्ची उचलली व सरळ स्वंयपाक घरातील चुलीत टाकली…….दहा मिनिटे खोकुन खोकुन जीव अर्धमेला झाला..

आईच्या डोळयात विजयी भाव होते व माझ्या मनात हे असे कसे झाले असावे ह्याचा विचार. त्याच पोत्यातील बागडी मिर्च्या ( कर्नाटकातील एक लाल मिर्चीचा प्रकार जो प्रचंड तिखट असतो व जहाल देखील) आईने माझ्यासमोर घेतल्या होत्या व चुलीतल्या निखार्‍यावर टाकल्या होता तेव्हा धुर न होता मिर्च्या जळून गेल्या पण त्याच पोत्यातील मिर्ची मी जेव्हा निखार्‍यावर नुस्तीच टाकली तेव्हा मात्र ती मिर्ची जळून न जाता घरात मिर्चीचा धुर करुन गेली असे का घडले असावे ? ह्याचे उत्तर मला काही सापडले नाही, आमच्या स्वयंपाक घरातून त्यानंतरचे चारपाच दिवस मिर्च्याचा धुर येतच असे.. कारण माझे समाधान झाले नव्हते पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी मिर्ची टाकत असे तेव्हा धूर होत असे हे नक्की. शेवटी माझी मावस बहिणी आपल्या बाळाला घेऊन मला बघायला आली होती ते बाळ प्रचंड रडत होते म्हणुन आईने परत तोच प्रयोग त्या बाळावर केला तेव्हा मात्र धुर झाला नाही त्यामुळे डोके जाम सटकले विश्वास ठेवू नये असे नक्की माझे मन सांगत होते पण जे डोळ्यासमोर घडले त्याला काय म्हणावे ! ह्याला मी चमत्कार नक्कीच म्हणणार नाही पण कुठेतरी काहीतरी नक्की ह्यामागे कारण असेल हे मात्र खरं.

जाता जाता….

आग्र्याला ताजमहल आहे जगप्रसिध्द, वास्तू शास्त्रातील चमत्कार असे पण म्हणतात काही जण पण त्याचे मला कधीच आकर्षण वाटले नाही पण तेच जयपुर मध्ये हवा महल आहे तो मला नक्कीच चमत्कार वाटतो भर उन्हाळ्यात बाहेर ४०-४२ अंश उष्णता रखरखत असते व हवामहल मधील प्रत्येक खोली एसी लावल्याप्रमाणे थंडगार असते… चमत्कार म्हणावा तर ह्याला !