राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

Category Archives: photos

सागरगड…..

काय मिळते रे भटकून ? हा प्रश्न गेली अनेक वर्षे अनेकांच्या कडून माझ्यासाठी आला असेल, पण दर प्रवासाच्या वेळी आमच्या मातोश्री न चुकता हे वाक्य आमच्या तोंडावर फेकतात व आम्ही एक विकट असे हास्य उत्तरा दाखल परत देतो. विनोदाचा भाग सोडला तर खरचं नेहमी हा प्रश्न विचारला जातो. प्रत्येक वेळी काय उत्तर देणार ? घरात बसून गड-किल्लावर चढण्याचा आनंद, तेथे पोहचल्यावर मिळणारे सुख हे शब्दात कसे सांगायचे ?

असो,

जे शब्दात सांगता येत नाही ते येथे थोडं फोटोद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो.

मित्रवर्य महेश सावंत याच्यांकडून सभार

आयला मी Big smile

गडाची वाट…

सुप्परमॅन Big smile

दुरवर राहिला…. सागर किनारा……

आपला निसर्ग…..

तरीच…. गाडी हिंदकाळत होती जाताना

माझ्या सारखे तरूण व ररा सारखे म्हातारे.. असा गड’करर्‍याचा हा मेळावा !!

सुझे म्हणत आहेत “मायला, पक्का भटक्याने लैभ भटकवला राव” Big smile

माझे आवडते खाद्य !!!

पोरांचा थरारक खेळ !!!

वाट हरवली रे.. धुक्यात!!

पुण्यातून कसे जावे :

कसे ही जा Big smile
अलिबाग च्या अलिकडे ४/६ किमी खंडाले नावाचे गाव आहे, तेथून रस्ता आहे गडावर जाण्यासाठी.
पहाटे पहाटे निघा व्यवस्थित पोहचाल. ( मित्रांना उठवण्याची जबाबदारी अंगावर घेऊ नका, पोपट होतो )

अवघड आहे का ?

आमच्या संगे ररा, निपो, टिंग्या सारखे म्हातारे कोतारे होते ते धडघाकट परत आले यावरून समजून घ्या Oups

Advertisements

त्रिकोण – एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. – (द्वारसमुद्र) भाग -१

प्रस्तावना :
एखाद्या गोष्टीचे वेड जर मनात घेतलं तर ते पुर्ण केल्या शिवाय माझा आत्मा शांत राहत नाही, असेच एक वेडं मला मागच्या सोमवारी/मंगळवारी टिम गोवा यांनी गोवाच्या इतिहासावर लेखन करण्यास सुरूवात केली व पहिल्या भागामध्ये, विचार करावे व शोध घ्यावे असे काहीतरी सापडले ते म्हणजे पाषाणावर खोदलेले / रेखाटलेले चक्रव्यूह पाहताना, अगदी असेच नसले तरी त्याच्याशी मिळते जुळते काहीतरी मी पाहीले होते, पण कोठे हे काही केल्या आठवत नव्हते, मग त्याचा शोध घेणे चालू केले, जुन्या ट्रिपचे फोटो पाहिले, नेटवर शोधले पण काहीच हाती पडेना पण तोच काहीतरी शोधताना काहीतरी सापडावे असे घडले, एक चित्र मला सोनालीने दाखवले व नंतर तेथेच शोध घेतल्यावर जे दिसले ते अद्वितीय होते, हैलेबिडु येथे असलेल्या पुरातन मंदिराचे फोटो कोणीतरी पिकासावर अपलोड केले होते. फोटो पाहिले थोडी शोधा शोध घेतल्यावर समजले येथून (बेंगलोर पासून) जवळ नसले तरी लांब देखील जास्त नाही हे स्थळ.

माझ्या सारखाच अजुन एक वेडा, माझ्या ऑफिसमध्येच आहे, पण कामामुळे आम्ही दोघे एकत्र भटकायला बाहेर पडू शकत, पण सगळे योग जूळून आले व अचानक शनिवारी पहाटे या प्रवासाला निघायचे असे ठरले सुद्धा. त्यांने नवीन बाईक घेतली आहे, बजाज अव्हेंजर. व त्याच प्रकारची माझी बाईक होती यामाहा एनटायसर, त्यामुळे लांबच्या बाईक प्रवासाचा अनुभव कामी आला. सकाळी ६ वाजता आम्ही बेंगलोरू मधून बाहेर पडलो. जास्त काही त्रास न घेणे हा एकमेव उद्देश ठेऊन बाईकचे स्पिड फिक्स ६० किमी / तास असे आम्ही दोघांनी ठरवले व पुर्ण प्रवास त्याच वेगाने केला. (जीवनात पहिल्यांदा कुठल्यातरी गोष्टीवर सुरवाती पासून शेवट पर्यंत कंट्रोल ठेवला)

प्रवासाला निघताना आम्हाला कल्पना नव्हती की आपण काय पाहणार आहोत व त्याचे महत्त्व काय. १००० वर्षापेक्षा जास्त काळात देखील, आसमानी व सुलतानी कहर झेलून दिमाखाने उभे असलेल्या व भारताच्या स्थापत्यकलेचा उज्ज्वल इतिहास संभाळून ठेवणार्‍या ३ भव्य व दिव्य अश्या स्थळांचे दर्शन आम्ही अचानक घेऊ, हे ध्यानीमनी देखील नव्हते पण सर्व अचानक ठरत गेले व प्रवास सूरू झाला..

स्थळ : हैलेबिडु
जिल्हा : ह्सन, कर्नाटक
कसे जावे : बाईक वरून २४० कि.मी. बेंगलोरू हून. जवळचे रेल्वे स्टेशन हसन व एअरपोर्ट बेंगलोरू.

द्वारसमुद्र, होयसाळ / होयसाल साम्राज्याची राजधानी. ईस्वीसन १००० ते १४०० हा काळ त्या साम्राज्याचा सुवर्णकाल होता. या काळामध्ये वेगवेगळ्या मंदिरांची व अनेक वास्तुशिल्पांचे निर्माण सातत्याने होत राहिले. पृथ्वीवरील स्वर्गाची निर्मिती केले होयसाळ / होयसाल सामाज्याने. द्वारसमुद्र व बेल्लूर यांना पृथ्वीवरचा स्वर्ग असे म्हणले जात असे. पुर्ण दख्खन (कर्नाटक) व तामिळनाडूवर होयसाल साम्राज्य पसरले होते.

ई.स. १००० च्या आधी त्या व आजूबाजूच्या सर्व प्रदेशावर जैन धर्माचा प्रचंड प्रभाव होता, तो प्रभाव मोडून काढून पुन्हा हिंदू साम्राज्य उभे करण्याचे श्रेय या होयसाळ / होयसाल राजांना जाते, त्यांनी त्या भागावरील जैन धर्माचा प्रभाव जवळजवळ पुर्ण नष्ट केला व आपल्या अद्भुत व देखण्या होयसाल स्थापत्य कलेतून अनेक मंदिरे उभी केली, जुळी मंदिरे या प्रकार देखील त्यांनी सुरू केला ( याची माहिती पुढे येईल). द्वारसमुद्र मध्ये असलेली व होयसाळ / होयसाल राजांनी निर्माण केलेली ही मंदिरे प्रामुख्याने शिव मंदिरे आहेत.

मलिक काफुर व मोहंम्मद बीन तुगलक, यांनी या साम्राज्यावर आक्रमण केले, सर्वात आधी दिल्ली सुलतानाच्या आदेशाने मलिक काफुर ने १३११-१३१५ च्या आसपास होयसाळ / होयसाल सम्राजावर आक्रमण केले व शेकडो उंटावरून, सोने व दागिने या साम्राजातून घेऊन गेला पण जाताना त्याने द्वारसमुद्र जवळ जवळ नष्ट केले, मंदिरे पाडली, मुर्त्या नष्ट केल्या व शहर ध्वस्त केले. यानंतर काहीच वर्षानंतर मोहंम्मद बीन तुगलक ने आक्रमण केले व राहिलेले सर्व लुटून नेले व द्वारसमुद्र पूर्णतः: नष्ट केले, त्याच्या तावडीतून काहीच मंदिरे शिल्लक राहिली ती देखील भग्न अवस्थेत.

पृथ्वीवरील स्वर्ग असणारे नगर, मातीत मिळाले, व त्याला नवीन नाव मिळाले हैलेबिडु म्हणजे जुनी राजधानी, एक नष्ट शहर.

३५० ते ४०० वर्ष होयसाळ / होयसाल राजांनी एका मोठ्या भूखंडावर राज्य केले. हे प्रामुख्याने शिव भक्त. यांच्या राज्याचं चिन्ह होते सिंह व योद्धा, त्याकाळी ज्ञात व वापरात असलेल्या तिन्ही लिपी मध्ये त्यांनी अनेक शिलालेख निर्माण केले ज्यामध्ये, तामिळ (जूनी), कन्नड व तसेच मोडी भाषेत. मंदिरामध्ये, विजय / धर्म स्तंभावर तसेच रेखीव संगमरवरी पाषाणावर यांनी विपुल लेखन केले, ज्यामध्ये विजय कथा, साम्राज्यात झालेले फेरबदल, पुराण कथा, देव स्तुती इत्यादी चा समावेश आहे. मंदिर निर्माण साठी त्यांनी स्थानिक पिवळसर दगड (प्रस्तर ?) व पाया व मूर्ती निर्माण साठी काळ्या पाषाणाचा वापर प्रामुख्याने केला.

आता त्या काळात उपलब्ध असलेली दोन मंदिरे शिल्लक व सुस्थितीत आहेत. हैलेबिडु व बेल्लूर. १२ किलोमीटरच्या अंतरावर वसलेल्या दोन प्राचीन शहरातील राहिलेले वैभव. तसे पाहता होयसाळ / होयसाल राजांनी आपल्या साम्राज्यात १५० च्या वर मंदिर निर्माण केलीत पण उल्लेखनीय व स्थापत्य कलेचा नमुना म्हणून हैलेबिडु व बेल्लूर हे महत्त्वाचे आहेत. मंदिरांची वैशिष्ट्य पुर्ण रचना व मांडणी वेगळ्या पद्घतीने केली गेली आहे. तीन द्वार असलेली व एकाच मंदिरात दोन गाभारे असलेल्या जुळ्या मंदिराची संकल्पना येथे राबवली गेली आहे. सर्वात प्रथम आपण हैलेबिडू मंदिर व त्याची रचना पाहू.

हैलेबिडु, असे नाव वापरण्यापेक्षा मी त्या शहराचे प्राचीन नाव पुढे वापरणार आहे जेणेकरून एका वैभवशाली शहराचे नाव आपल्या स्मृतीत कोरले जावे व आपल्या समृद्ध अश्या इतिहासामध्ये एक द्वारसमुद्र नावाचे नगर देखील होते ज्या नगराने देशाला व त्यावेळच्या समाज व्यवस्थेला एक नवीन प्रकारच्या स्थापत्य पद्धतीची, कलेची ओळख जगाला करून दिली याचा विसर पडू नये म्हणून.

तर,

द्वारसमुदचे मंदिर : एका तलावाच्या काठी उभारले गेलेले हे व पुर्ण पाषाणामध्ये निर्माण केले गेलेले हे मंदिर व त्याचे नाव आहे होयसळायेश्वर / होयसलायेश्वर मंदिर. राजघराण्यांचे प्रमुख मंदिर त्या राजघराण्याच्या नावानेच आजही ओळखले जाते. या मंदिराची ४-५ एकर परिसरामध्ये एक मुख्य जुळे मंदिर व आजूबाजूला सलग्न पण भारदस्त अशी ४-५ मंदिरे, समोर नंदी मंडप व (गर्भगृहाच्या समोर) विस्तृत तळे. अशी संरचना होती. आक्रमणानिमित्त प्रमुख मंदिर राहिले व बाकीची सलग्न मंदिरे काळाच्या ओघात नष्ट झाली / केली केली. आता द्वारसमुद्र मध्ये फक्त होयसलायेश्वर मंदिर आहे, पण ते भव्य व दिव्य आहे.

प्रवेशद्वारातून पाहिल्यावर अनेकांना तामिळनाडू मधील महाबलीपुरम (तामिळनाडू, ५०-६० किमी, चेन्नई पासून) मंदिराची आठवण झाली नाही तर नवलच. पण जसे जसे जवळ जाऊ तसा तसा फरक समोर स्पष्ट होत जातात. महाबलीपुरम विषयी नंतर कधीतरी लिहतो. तर होयसलायेश्वर मंदिर हे तीन टप्पात आहे. नजरेत भरतो तो पहिला भाग दर्शनी मंदिराचा. जसे जसे तुम्ही जवळ जाता तसे मंदिर निर्माण करताना वापरलेली कल्पकता समोर येत जाते. ५-६ फुटाच्या मंदिराचा पाया, पूर्णतः इंटर-लॉकिंग सिस्टम ( मराठी शब्द ? ) वापरलेला. जर हे मंदिर वरून पाहिले तर त्यांची रचना स्टार (चांदणी) सारखी आहे.

दुसरा टप्पा, बारा प्रकारचे लेअर (विभाग) असलेल्या भिंती. वेगवेगळ्या प्रकारे भिंती शिल्पे व नक्षी काम केलेले व अनेक पुराण कथा यांचे चित्रण याचा संगम म्हणजे मंदिराचे बाह्य रूप. सर्वात खालील विभागात, गज शक्तीचे प्रदर्शन, नंतर राज्य चिन्ह असलेल्या सिंहाचे व त्यांनंतर वेगळ वेगळ्या आपात्कालीन पद्घतीने नक्षी काम. त्याच्या वरच्या विभागात यक्ष, किन्नर, वाद्य वाजवणारे, नृत्यात मग्न असे नर्तकी व नर्तक यांची दर्शन. १० इंचाच्या आसपास उंची असलेल्या या विभागात, इतक्या बारकाईने कोरीव काम केले आहे की पाहताना दंग व्हावे व समोर पहात असलेले दृष्य आपल्या नजरे समोर घडत आहे असलेले नृत्य असावे असे भासते, अनेक छोट्या छोट्या गोष्टी, नर्तकीच्या पायातील पैंजण, ती च्या गळ्यातील दागिने व डोळे. कलेतून एखादं दृष्य जिवंत होते कसे या प्रश्नाचे उत्तर येथे मिळते.

नंतरच्या सातव्या व आठव्या विभागामध्ये (लेअर) पुरातन कथा रेखाटलेल्या आहेत, ज्यामध्ये रामायण व महाभारत प्रामुख्याने आहेत. कर्ण वध, अभिमन्यू वध, युद्ध रचना, आयुधे, रथ यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तसेच कृष्ण अवतारातील अनेक कथा येथे दिसतात, बाललीला कालिया मर्दन इत्यादी. प्रत्येक विभागाचे वैशिष्टे अधोरेखित करण्यामागचे कारण हे की त्यांनी जेव्हा मंदिर निर्माण सुरू केले तेव्हा त्यांना काय तयार करायचे आहे, याची स्पष्ट कल्पना होती, रामायणामध्ये महाभारत घुसत नाही अथवा महाभारतात इतर कथा. प्रमुख व महत्त्वपूर्ण कथा व त्यातील पात्र त्यांनी आधीच ठरवले होते, हे पाहताना लक्ष्यात येते. येथे काही गोष्टींचा संदर्भ तुम्हाला जोडावा लागतो, व ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्हाला त्या कथा पुर्ण माहिती असतील अथवा तो पार्ट, त्या कथेतील तो भाग स्पष्टपणे तुम्हाला समजला असेल. याच लेअर (विभागामध्ये ) ज्या चित्रा पासून हा प्रवास चालू झाला ते मला मिळाले. येथे तुम्हाला रावण कैलाश पर्वत उचलताना, कृष्ण – अर्जून अभिमन्यू च्या वधानंतर चर्चा करत असलेले, अर्जून व कर्णाचे भयंकर युध्द त्यांची अस्त्रे, शंकराचा दरबार, शंकराचे नटराज स्वरूप इत्यादी अनेक कथा पहावयास मिळतात.


चक्रव्यूह

ज्या चित्रा पासून हा प्रवास चालू झाला ते चित्र येथे देत आहे. हा फोटो टिम गोवा यांच्या लेखातील आहे.

हा सात लेयर मध्ये (विभागामध्ये) असलेल्या चक्रव्युहाचा नकाशा आहे. (९९.९% मला असे वाटते)

महाभारतातील प्रमुख घटना मधील ही एक घटना तेथे सचित्र कोरलेली आहे व तेथेच अश्याच पद्धतीचे एक भित्तीचित्र मला दिसले. व्युह रचना व त्याचा आकार. आधी मला गोव्यातील ते चित्र म्हणजे शक्यतो सुर्य घड्याळ असावे की काय असे वाटले होते व तसेच मी कोठेतरी पाहिले आहे असे वाटत होते, पण हे भित्तीचित्र पाहिल्यावर लक्ष्यात आले की नाही, हा चक्रव्यूह आहे व हा आपण उत्तर भारतात फिरताना, काही वाचन करताना पाहिलेले आहे.


यानंतरचा लेअर (विभाग) हा नक्षीकामाचा आहे व त्यानंतर मुख्य लेअर (विभाग) येतो तो भित्तीशिल्प याचा.
मी येथे व वरील लेखनामध्ये दोन वेगळे शब्द वापरले आहेत, भित्तीचित्रे व भित्तीशिल्प. दोन्ही प्रकारे दगडामध्ये कोरून कला प्रदर्शन केले जाते पण, दोन्ही मध्ये सौम्य असा फरक आहे, भित्तीशिल्प पुर्ण कोरीव व हाव-भावसह तसेच पूर्णाकृती मूर्ती / मूर्तींची रांग असते, तर भित्तीचित्रे मध्ये कथेला प्राधान्य असते मूर्तीच्या दिसण्यावर नाही (हा फरक मला वाटतो, याचे कुठलेही शास्त्रीय कारण माझ्याकडे नाही आहे).

तर,
मुख्य लेअर (विभाग) मध्ये ३-४ फुट उंचीचे भित्तीशिल्प आहेत, ज्यामध्ये विष्णूची अनेक रूपे, अवतार, ब्रम्ह स्वरूप, शिव स्वरूप गणेश मूर्ती व इतर देवदेवता इत्यादी यांचे दर्शन घडते, येथे एक गोष्ट नोंद घेण्यासारखं आहे, मंदिर हे शिव मंदिर आहे, राजे हे शिव उपासक होते, पण त्यांच्या कलेमध्ये, आवडीमध्ये, फक्त शिव हा अट्टहास नाही आहे, विष्णू व शिव वाद ( जो उत्तर भारतात होता, आहे.) दिसत नाही, ज्या होयसाळ / होयसाल राज्यांनी जैन धर्माची पाळेमुळे खणून काढली दक्षिण भारतातून ( सध्या यांनीच की इतर कोणी याचे उत्तर नाही, कारण याच्या राजधानी पासून म्हणजेच द्वारसमुद्र पासून ९०-१०० किमी दुरवर असलेले प्राचीन जैन धार्मिक स्थळ / पुरातन स्थळ जसेच्या तसे उभे आहे, त्यामुळे थोडा गोंधळ होतो आहे.) त्यांनी निर्माण केलेल्या मंदिराच्या भित्तीचित्रे / शिल्पा वर जैन तीर्थंकर देखील दिसतात. एक तर त्यांचा सर्वधर्म समावेशक असा विचार असावा अथवा एखाद्या धर्माचे, पंथाचे मन दुखावणे म्हणजे राजकारण हे कारण असावे.

मुख्य लेअर (विभाग) मध्ये विष्णूचा मक्ता जास्त उठावदार दिसतो, अनेक शिल्पे त्याच्या अवताराची आहेत, वराह अवतारापासून, नरसिंह अवतार व राम अवतार सगळेच तेथे दिसतात, बम्हास्वरूप देखील तेथे कोरलेले आहे त्याच बरोबर अजुन एक जाणवलेली गोष्ट म्हणजे जी मी इतर भारता अनेक मंदिरे फिरलो पण दुर्गा अवतार /काली अवतार बिंतीशिल्पे मंदिरावर कधी पाहिलेले आठवत नाही, गळ्यात मुंडमाला पासून पायाखाली लोळलेला राक्षस अश्या प्रकारच्या ३-४ शिल्पे तेथे आहेत.

याच लेअर मध्ये, गणेश मुर्ती देखील आहे, पण त्याला प्रमुख द्वारा वर स्थान नाही मिळालेले आहे, पण गणेश मूर्ती ही ब्रह्मा, विष्णू व महेश (शिव) याच्या बरोबरीने तेथे दिसते तसेच, इतर कुठल्या देवाची नाही पण एक ८-९ फुटी उंच गणेश मूर्ती त्याच प्रांगणातून मिळाली होती जी आधी प्रवेशद्वारासमोर होती. अतिशय रेखीव एका पाषाणातून घडवली गेलेली ही मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. विष्णूच्या नरसिंह अवताराचा देखील येथे बोलबाला आहे, नरसिंह शिल्पे तर आहेतच, पण नरसिंह स्तंभ व नरसिंह कथा असलेला शिलालेख देखील येथे आहे, शक्यतो याचे कारण साम्राज्याचे प्रमुख चिन्ह सिंह हे होते. अनेक जागी सिंहाची शिल्पे कोरलेली आहेत.

सर्व जग डावीकडून उजवीकडे असे भटकते, पण आम्ही मुद्दाम उजवीकडून सुरूवात केली होती, कारण तेथे असलेली गर्दी टाळता यावी व योगायोगाने अनेकवेळा केलेला हा प्रयोग पुन्हा यशस्वी ठरला व मंदिर मनसोक्तपणे हवा तेवढा वेळ बाहेरून पाहता आले. मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत, एक मुख्य प्रवेशद्वार व दोन उजवी व डावीकडून प्रवेशद्वार. जे प्रमुख द्वार आहे त्यातून राजघराण्यातील मंडळींना प्रवेश, उजवीकडच्या प्रवेशद्वारातून मंत्री अथवा राजघराण्या समकक्ष लोकांचे प्रवेश द्वार, व डावीकडील प्रवेशद्वार सर्व सामान्य जनतेसाठी होते. उजवी व डावी बाजू पाहिली तर दोन्ही मध्ये कणमात्र फरक करता येत नाही, दोन्ही बाजूची जडण-घडण एकाच पद्घतीने व प्रकाराने केलेली आहे, द्वारपालाच्या मूर्ती पासून चौकटीवर असलेल्या चिन्हापर्यंत सर्व काही एक सारखे. पण राज घराणे ज्या द्वारातून प्रवेश करत असे, त्याची योजना वेगळी व खास पद्घतीने केली आहे.

प्रवेशद्वारापासून काही फुट अंतरावर मंडप आहे, ज्या मंडपात भला मोठा नंदी आहे, भारतात जे अखंड शिळेतून तयार केलेले नंदी आहेत, व जे मी पाहिले आहेत त्यात सर्वात रेखीव असा हा नंदी आहे, तसेच हा भारतातील ४ अथवा पाचव्या क्रमांकाचा सर्वात उंच नंदी आहे. नंदीद्वारापासून प्रवेश केल्यावर समोर मंदिराचे प्रवेशद्वार व आता एक मंडप व त्याच्या समोर गाभारा आहे. मुख्य मंदिरात ५ फुटी उंच व जवळ जवळ ८-९ फुटी रुंदीचे शिवलिंग आहे ( आकार अंदाजे) वर मी लिहिल्याप्रमाणे हे जुळे मंदिर आहे, एकाबाजूला शिवलिंग व एका बाजूला मुर्ती असलेला गाभारा. असे दोन गाभारे आहेत. दोन्ही गाभार्‍या समोर नंदी आहे, व त्याच्या साठी पाषाण मंडप आहे, जुळे मंदिर हा शब्द देखील याच कारणामुळे वापरला जातो.

हे मंदिराचे पुरावे व शिलालेख सापडले आहेत, त्यात एका भल्यामोठ्या सुर्यनारायणाच्या मुर्तीचा उल्लेख येतो, ज्यात सुर्य नारायण त्यांच्या सात अश्व जोडलेल्या रथातून येत आहेत असे रेखाटले होते, पण ती मुर्ती हरवलेली आहे, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. ही पश्चिम मुख मूर्ती नंदी मूर्तीच्या बरोबर मागे म्हणजे पूर्वेकडे स्थापन केलेली होती आतील मंडपातील प्रत्येक खांब वेगवेगळ्या कथा सांगतो, जसे नरसिंह कथा, महाभारत कथा. छतावर अत्यंत रेखीव सुबक असे नक्षी काम केले आहे. भिंतीवर कन्नड/तामिळ मध्ये शिलालेख कोरलेले आहेत, वर लिहिल्याप्रमाणे एका गाभार्‍यात शिवलिंग आहे व दुसर्‍या गाभार्‍यात मुर्ती.

क्रमशः

गणराज रंगि नाचतो, नाचतो…………

देव मानावा अशी माणसं, देवानं पृथ्वीवर पाठवणे कधीच बंद केले आहे, युग-युग गेले, कोणी नाही आला, हाताच्या छापाला कंटाळलेली, संघटीत गुन्हेगारीला व मंदिर-मसजिद मध्ये पोळलेली जनता, एक प्रकारे वैतागलेली जनता. काहीतरी वेगळी नशा हवी होती, या सगळ्या व्यापातून, या सगळ्या कटकटीतून दूर जाण्यासाठी. त्याच वेळी देव देवदुतासारखा धावला व जनतेला देव सापडला, खराखुरा हसत-बोलत खेळत असलेला देव… !

१९८९ ला कसोटी मध्ये, बलाढ्य अश्या पाकिस्तान समोर १६ वर्षाचे एक पोरं उभ होते, जेमतेम १५ धावा करून बाहेर आला, पण त्याच टिमबरोबर दुसर्‍या कसोटीमध्ये त्यांने अर्धशतकी धावा करून आपली हलकीशी चुणूक दाखवली, देवलोकांचे असेच असते, सर्वांची सुरवात संकटातूनच होते, आपला तो कृष्ण बघा, जन्माच्या आधीपासून संकटात..पण पाऊले हळूहळू टाकत गेला अजून ही जनमनसावर राज्य करत आहेच ना, हजारो वर्ष झाली तरी. तर हा आमचा नवा देव, समजले असेलच, तरी ही सांगतो.. सचिन रमेश तेंडुलकर, जगासाठी. आमच्या साठी, सच्या, सचीन.. तेंडल्या !!! बस्स ! दुसरे नाव नाही गरजेचे.

वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादिर व नवखा वकार युनूस यांच्या समोर क्रिकेट जिवनाची सुरवात वयाच्या १६ व्या वर्षी करणे म्हणजे मजाक नाही महाराज, त्यासाठी दैवी काहीतरी हवे तुमच्याकडे… जेव्हा आम्हाला क्रिकेट म्हणजे काय हे समजले तो पर्यंत केसं पांढरी होण्याची वेळ आली होती अनेकांची, तेव्हा त्याच्या रक्तात क्रिकेट खेळत होतं.. तुम्ही कुठल्या जगप्रसिध्द, महान खेळाडूचा अगदी चड्डी न घालता येण्याच्या वयापासून हातात क्रिकेटची बॅट देऊन, हसमुख पोझ दिलेला फोटो पाहिला आहे.. सांगा बरं ? नसेल आठवतं ! कसं आठवणार दुसरा कोणी नाहीच आहे सच्या सोडून..

ज्याच्या रक्तात क्रिकेट आहे, ज्याचे बालपण क्रिकेट खेळण्याची स्वप्ने पाहत गेले, तो सोडून दुसरा कोण उचलणार भारतीय क्रिकेट संघाचा गोवर्धन ? कृष्णानं तर करंगळीवर पेलवलं काही दिवस.. यांने तर आपल्या बॅटवर गेली २१ वर्ष पेलून धरलं आहे व अजून धरून उभाच आहे हा विक्रमादित्य !! देव नाहीतर हा कोण आहे सांगा पाहू ?

९८ शतके, हा हसण्याचा अथवा ९ व ८ हा आकडा लागोपाठ लिहण्याएवढा सोपा खेळ नाही राज्या, एकाग्रता, जिद्द, रक्तबंबाळ होऊन ही, फक्त खेळण्याची जबरदस्त इच्छा शक्ती, व त्यापेक्षा जास्त तेथे सच्या लागतो… मग कुठे कोणाच्या नावापुढे ९८ शतक !! असे लिहले जाईल… हे करणारा शतकात एखादाचं !! तुम्ही नियम बदला, पध्दत बदला, मैदाने बदला काही फरक नाही पडणार जेव्हा देव उभा असेल पीच वर तेथे बाकीच्या गोष्टींची काय मोजदाद ?

एक चांगला माणूस, एक चांगला कुटुंबवत्सल गृहस्थ व खेळावर जिवापाड प्रेम करणारा खेळाडू, ही तीन रुपे, सगळ्यांना संभाळणे जमतेच असे नाही. पण देव काही करू शकतो… काही संभाळू शकतो.

जगात सर्वात जास्त धावा असलेला खेळाडू, एका वर्षात सर्वात जास्त धावा, जगात सर्वात जास्त धावा असलेला एकमेव खेळाडू, जगात सर्वात जास्त शतके, जगात सर्वात जास्त वेळा ९० ते ९९ दरम्यान ऑट झालेला खेळाडू.. जगात एकदिवसीय सामन्यात २०० धावा करणारा एकमेव.. किती एकमेव उदाहरणे देऊ ? असे सगळे रेकॉर्ड देवाच्याच नावाने असतात…

देवाच्या सगळ्या शतकांची माहिती व इतर काही गोष्टी येथे देणार आहे.. हाच धागा अद्यावत होत राहिलं, देव पुराण सांगण्यास आज शब्द कमी पडत आहेत साहेब Sad

पुन्हा एकदा या धाग्यावर लवकर या, अपडेट्स लवकरच असतील…. देवाचे शतकाचे शतक झाले की लगेच !!

पुणे-भिमाशंकर-शिवनेरी-लेण्याद्री-नाशिक-त्रिंबकेश्वर-मेटघर किल्ला- अंजनेरीगड-पुणे – भाग १

शनिवारीच बाईकवरुन कामानिमित्य पनवेलवारी ( २४० किमी येणे जाणे) करुन रात्री २ वाजता पोहचलो होतो घरी.

रवीवारी सकाळ सकाळी आई म्हणाली की नाशिकला जातोस का उद्या ( २१० किमी) ? पोर्णिमा आहे व एक पुजा करायची राहीली आहे तुम्ही नागबळी व त्रीपिंडीदान. हे राम ! हेच शब्द बाहेर पडले तरी म्हणालो बघतो विचार करुन. महाजालावर थोडीफार शोधाशोध केली तर तो भाग तर प्रचंड देखणा व निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला आहे असे समजले. आईची इच्छा देखील पुर्ण होईल व थोडेफार जे ताप चालू आहेत ते देखील ह्या पुजेमुळे कमी होतात का हे पाहू असा उद्दात्त हेतू मनात ठेऊन आपले मित्रवर्य श्री पाषाणभेद ह्यांना फोन लावला व थोडक्यात विचार सांगितला. लगेच महाराजांनी इकडे तिकडे फोन करुन एक पंडित शोधला जो त्रिंबकेश्वर ( नाशिक पासून ३० किमी) मध्ये दोन्ही पुजा करुन देतो असा.

आईला ही माहिती दिली व म्हणालो उद्या सकाळी निघतो पहाटे उठव मला. सर्व तयारी सकाळीच करेन 😉 झाले गजर लावले गेले, जबरदस्तीने दिवसाढवळ्या रात्री १० वाजता झोपा असा आदेश झाला, मन मोडून झोपी गेलो… सकाळी आईने ५ वाजता मला उठवण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला मग सहा वाजता मग सात वाजता शेवटी ७.३० वाजता मी उठलो. साहेबांचा फोन परत आला की निघालो की नाही असे विचारणारा.. मी लगेच धावपळ करुन तयारी सुरु केली अंघोळ इत्यादी छोटी मोठी कामे लगेच १० मिनिटात आवरुन ८ वाजता नाष्टा करुन सरळ ८.३० ला हायवेवर लागलो.

रम्य सकाळ होती, हिरवळच हिरवळ चोहीकडे, पक्षी-पक्षिणी गुलुगुलु बोलत आहेत असे दृष्य मला तरी कोठे नजरेस पडले नाही पण हा नाही म्हणायला दोनचार म्हशी व गायी सकाळचा नाष्टा करायला बाहेर पडलेल्या दिसल्या… चला तेवढेच निसर्ग सौंदर्य पहाण्याची सुरवात झाली..
हायवेवर गाडी सुसाट पळवायचा हा विचार करुन सगळे ब्रेक, केबली, चाके, इंजिन, हवा, पाणी, बॅटरी चेक करुन घेतले व सुरवात केली प्रवासाची.

तोच आठवले अरे नाशिकला जायचे कसे ? रस्ता ? अडला राजे मीमकरांचे पाय धरी ! पटापट दोनचार फोन केले व दोनचार वेगवेगळे रस्ते सांगितले गेले, हरी ओम म्हणत बाईक लावली सरळ मुंबई हायवेला. हिंजवडचा उड्डाणपुल मागे टाकून पहिल्याच वळणावर एकाला विचारले नाशिक फाटा ? त्यांने कसाबसा रस्ता सांगितला त्याचे आभार माणून गाडी त्या वळणावर घातली, मग वाकड, चिचवड, पिंपरी इत्यादी भागाला फेरी मारुन विमोच्या (विवेक मोडकांच्या) घराचा रस्त्याला गाडी आल्यावर मग डोक्यात आले आपण शक्यतो रस्त्ता चुकलो. परत एकाला विचारुन घेतले व मग नाशिक हायवेवर लागलो (टोटल ६० एक किमी अतिरिक्त फिरणे).

नाशिकचा बोर्ड दिसला २१० किमी. च्यामायला म्हणजे ह्या फाट्यापासून २१० किमी व घरापासून इथपर्यंतचा प्रवास कोण मोजणार ? सिस्टमला दोनचार शिव्या देऊन पुढे निघालो, चाकण मागे गेले व मंद पाऊस चालू झाला. मस्त पैकी थंड हवा थोंडाला लागत होती व सकाळ पासून रस्ता शोधताना झालेली चिडचिड आपोआप कमी कमी होत गेली. ८०-९० चा काटा कधी मागे पडला व १०० च्यावर स्पिडवर बाईक कधी धावू लागली काही कळले देखील नाही मार्ग दाखवणारे बोर्ड झर झर मागे पडत होते मंचर जवळ आल्याचा एक बोर्ड समोर दिसला भिमाशंकर ! हे नाव कुठेतरी वाचले होते आठवत नव्हते, परत एकदा पाषाणभेद यांना फोन लावला व विचारले अरे भिमाशंकर ला काय आहे ?

प्रश्नातच उत्तर होते, सरळ डावीकडे बाईक टर्न केली व भिमाशंकरच्या रस्त्याला लागलो. दैवी प्रवास ! ह्या एका शब्दात वर्णन होऊ शकते. वाटेतच्या दोन्ही बाजूने निसर्गांने अक्षरशः अदभुत खेळ मांडला होता ऊन-पाऊस व निसर्गरम्य असा व मंत्रमुग्ध होऊन पहात रहावे असा खेळ ! गडबडीने बाईक रस्ताच्या बाजूला लावली व फोन बाहेर काढून फोटो काढायची तयारी केली तेव्हाच समजले मोबाईल मेला आहे ते. रात्रभर चार्ज करायचाच राहून गेला होता. त्याक्षणी खुप असाह्य वाटले रे.. यार ! वाटले देऊ या भिरकावून दरीमध्ये नोकियाला 😉 पण आता हाच एकमेव आधार असल्यामुळे व आमचा जिवापाड प्रिय सॅमसंग अतिदक्षता विभागात अ‍ॅडमीट असल्यामुळे नोकिया विषयी सध्या मला खुप ममत्व वाटले म्हणून पुन्हा खिश्यात ठेऊन दिला. मधी एक दोनहॉटेल मध्ये ट्राय केला पण लाईट नव्हती व संध्याकाळी ५ वाजता येणार होती 😦 , भिमाशंकर विषयी मी काही लिहावे एवढा चांगला लेखक नाही आहे पण पुन्हा एकदा मी नक्की भिमाशंकर ला जाईन लवकरच व चांगले शेकड्यानी फोटो काढेन व ते प्रकाशित करेन.

भटकणे हा उद्देश असल्यामुळे देवदर्शन इत्यादी फंदामध्ये पडलो नाही व मला लवकर नाशिक गाठायचे होते म्हणून भिमाशंकरची ही भेट थोडी लवकरच संपवली वर परतीच्या प्रवासास लागलो. दिड एकतासाच्या ड्राईव्ह नंतर एका हॉटेलात फोन चार्जिंगला लावला व मस्तपैकी वडापावावर दणका दिला फोन चार्ज होई पर्यंत मी इकडे तिकडे फिरावे म्हणून हॉटेलातून बाहेर पडलो तर समोर एक फाटा दिसत होता व तेथे बोर्ड लावला होता.. शिवनेरी २५ किमी… फक्त २५ किमी व शिवनेरी इकडे आहे ? आयला मी तर समजत होतो.. जाऊ दे. येथे पर्यत आलोच आहे तर जरा शिवनेरी जाऊन येऊ तसा ही हा भुईकोट किल्ला आहे असे शाळेतील पुस्तकात वाचले होतेच त्यामुळे चढाचढी करावी लागणार नाही व चालाचाली देखील असा विचार डोक्यात डोकाऊ लागला एक मन म्हणत होते जाऊ या एक म्हणत होते नको ! शेवटी माझा विजय झाला व दुष्ट दुसरे मन हरले.

नंतर च्या दहा मिनिटामध्ये मी शिवनेरीच्या रस्तावर वार्‍याशी शर्यत करत होतो.

अर्धा-पाऊण तासामध्येच शिवनेरीच्या पार्किंग लॉटमध्ये बाईक लावली ५ रु.चे टिकिट फाड्ले गेले व मस्त १० रु.चे लिंबू सरबत घेतले व गडाकडे जावयास निघालो पण गडाकडे बघिल्यावर लक्ष्यात आले की आपल्याला शाळेत शक्यतो चुकीचे शिकवले गेले आहे 😉 शिवनेरी भुईकोट किल्ला नाही आहे चढावे लागनाराच व समोरचा गडाचा मॅप पाहून खात्रीच पटली की चालावे देखील प्रचंड लागणार आहे…. छत्रपती शिवाजी महाराज की ! असा एक घोष दिला तोच पाचपन्नास आवाज दुमदुमले जय !!!!!!!!!! आयला वर पायर्‍यावर खुप पब्लिक दिसत होते म्हणजे ह्या गडावर तरी मी नक्कीच एकटा भुतासारखा भटकणार नव्हतो तर… !

shivneri 1

पायथ्यावरुन शिवनेरीच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर

shivneri २

shivneri ३

गडाचा मुख्य दरवाजा !

shivneri ४

shivneri ५

आई शिवाई चे मंदिर आत फोटो काढू देत नाहीत.

shivneri ६

अंबरखाना

shivneri ७

shivneri ८

गडावरील मनमोहक दृष्य !

shivneri ९

shivneri १०

shivneri ११

shivneri १२

shivneri १३

शिवाजी महाराजांचे जन्म स्थळ !

shivneri १४

shivneri १५

क्रमशः

( जेथे फोन चार्जिंगला लावला होता तेथून जेव्हा फोन काढला तेव्हा लक्ष्यात आले की फोनचा डिस्पले गंडला आहे 😦 पांढरा फटाक पडला होता. हे सर्व फोटो अंदाजाने घेतले आहेत त्यामुळे चांगले आले नाही आहेत समक्ष्व.)

नृसिंहवाडी

लुटा ‘लुफ्त’ – अवस्था -ए- बाईकची ;)

हॅ हॅ हॅ !

सगळे फोटो मुद्दाम वरुन घेतले आहेत, व्यवस्थीत अ‍ॅगल् ने फोटो घेतले तर तुटलेले ईजिंन ड्रम दिसला असता व नको ती इज्जत उघड्यावर आली असती =))

गावाची भटकंती..

कॅमेरा – आपला नेहमीचाच सॅमसंग मोबाईल 😉

स्थळ – सदलगा, चिक्कोडी. कर्नाटक.

प्रतापगड – एक सुरेख सफर

महाबळेश्वर फिरुन झाले होते व एका जागी पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबलो, व थोडे स्नॆक घेतले खाण्यासाठी. दुपारचे दिड-पाऊणे दोन वाजले होते समोर मार्गदर्शक फलक लागला होता, व एका छानश्या रस्त्याकडे बाण दाखवून खाली लिहले होते प्रतापगड ! अरे वाह ! प्रतापगड… चलो प्रतापगड ! ह्या विचार मनात येऊ पर्यंत मी स्नॅक माझ्या सॅकमध्ये टाकले पाण्याच्या बाटलीच्या पिशवीत पाण्याची बाटली ठेवली व सॅक पाठीला बांधून बाइक चालू पण केली. रस्ते एवढे सुरेख आहेत की राहून राहून वाटत होते आपण महाराष्ट्रातच आहोत ना 😉 महाबळेश्वर सोडून खाली घाटाला लागलो. खुप वर्षापुर्वी म्हणजे जवळ जवळ मी सहावी-सातवीत असताना शाळेच्या सहलीबरोबर कधी प्रतापगड पाहिला होता व त्यानंतर आता योग आला होता. थंडीचे दिवस हलकी हलकी थंडी वाजत होती पण नेहमी प्रमाणेच आम्ही गोवा फिरायला आलो आहोत अश्या ड्रेस मध्ये भटकत होतो. पण घाट उतरताना खुपच थंडी वाजण्याची लक्षणे दिसू लागली म्हणून बाइक कुठेतरी थांबवून दुसरा टिशर्ट व शर्ट अंगावर घालण्याचा विचार करत गाडी थांबवण्यासाठी स्पॉट शोधत हळू हळू चालू बाइक चालवू लागतो. काही किमी पुढे आल्यावर उजव्या बाजूला एक मस्तपैकी धबधबा दिसला धबधबा म्हणावे असा मोठा नाही व झरा म्हणावा एवढा लहानपण नाही. मस्त पैकी बाइक तेथे पार्क केली. सॅक मधील कपडे काढले तोच बाइकच्या आरश्यात थोबाड (पक्षी: मुखकमल) दिसले. बाइकवर उघड्या चेहयाने फिरुन चेह-याचा हाल एकदम कालियातल्या बच्चन सारखा झाला होता विचार केला आता थांबलोच आहोत अंघोळ करुन घ्यावी चांगला स्पॊट पण आहेच. लगेच विचार आल्या आल्या कृती करण्यावर भर असल्यामुळे जीन्स काढून लगेच बरमुडा घालून बनियनवर मी अंघोळीसाठी सज्ज झालो. बुट इत्यादी आयटम सॆकमध्ये कोंबून बाइकवर ठेवली झपाझपा पाण्याकडे गेलो. तो पर्यंत थंडी हा विषय डोक्यातून बाहेर पडला होता व पाण्याचा काहीच अंदाज न घेता पाण्याखाली जाऊन उभा राहिलो. आई गं !! च्यामायला वर कोणी बर्फाच्या लाद्या ठेवल्या आहेत काय रे असे जवळ जवळ ओरडूनच पाण्यापासून बाहेर आलो. अर्धा भिजलो होतो व आता चळाचळा कापत होतो 😉 तोच महाबळेश्वर कडून एक सोमो गाडी आली व ती पण धबधब्याजवळ फोटो काढण्यासाठी थांबली.. त्याच्या मागे एक त्याच्या मागे अजून एक अश्या तीन चार गाड्यांची रांगच लागली 😦 व त्यातून पटापटा सुंदर कन्या बाहेर पड्ल्या. हॆ हॆ हॆ अंगाची थरथराट कमी झाली व दाखवण्याची मर्दानकी जागृत झाली व सरळ जसे मी गरम पाण्याच्या शॊवर खाली उभा आहे तसा मस्त पैक्की त्या थंडपाण्याच्या झ-याखाली उभा राहीलो. थोडावेळ मस्ती करुन पाण्यातून बाहेर आलो व बाईकवर थॊडे पाणी घालून तीला देखील अंघोळ घातली. त्यामुलींना काही फोटो काढण्यासाठी मदत केली व टाटा बाय बाय करुन आपल्या बाइकला किक मारली.

जवळ जवळ घाट मोकळाच होता त्यामुळे बाइकच्या स्पिडचे टेस्टिंग पण येथेच पार पाडले. हे यामाहाचे धुड किती वेगाने जाऊ शकते व कुठे व कसा ब्रेक मारल्यावर बाइक घसरु अथवा पडू शकते ह्याची ट्रायल घेऊन झाली व तो १८-२० किमीचा घाट पुर्ण करुन मी खाली एका धाब्याबर मस्तपैकी जेवण केले व गाडी परत सुसाट प्रतापगडाकडे वळवली. प्रतापगडचा घाट व जो उतरलो होतो तो घाट ह्यावर निसर्गाने असिम कृपा केली आहे हे जागोजागी जाणवत होते व मी एका चांगल्या सिझन मध्ये इकडे आलो आहे ह्याबदल मी नशीबाचे देखील आभार मानत घाट चढायला सुरवात केली. गडाच्या तोंडावरच बाइक पार्क केली वर जय शिवाजी महाराज अशी आरोळी देऊन खालची लाल मातीचा टिळा कप्पाळाला लावला !

गडाच्या पुर्नबांधणीचे काम जोरात चालू आहे ढासळलेले बुरुज, भिंती, वाटा ह्यांचे काम जागो जागी चालू आहे ह्याच्या खाणाखुणा सर्वत्र दिसत होत्या. गडावर एक भलामोठा भगवा जोमात फडकत होता त्याला मस्त पैकी वाकून मुजरा केला तोच पाठीवर कोणी तरी थपका मारला वळून पाहिले तर एक ६०-६५ वर्षाचे आजोबा माझ्या मागे उभे होते व म्हणाले शब्बास बच्चा ! व पुढे निघून केले.. मी त्यांच्या पाठमो-या आकृतीकडे पाहतच राहिलो का व कश्यासाठी शब्बास हे विचारायचे सुध्दा विसरलो. गडावर गर्दी दिसत होती, शाळेच्या ट्रिप आलेल्या होत्या एक दोन मुलांना विचारले कुठून रे तर आमरावती, लातूर, विटा अशी नावे समोर आली.

मंदिरात जाऊन दर्शन घेतले बाहेरुन मंदिराची रुपरेखा व बांधणी थोडावेळ निरखून पाहिली व त्या काळ्या दगडात बांधलेल्या मंदिराला एक नमस्कार करुन पुढे चालू लागलो. वर गडावर महाराजांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा मधोमध उभा केला आहे अत्यंत सुरेख व सुबक अशी मुर्ती. बुट काढून वर चबुत-यावर चढून महाराजांचे दर्शन घेतले व थोडा वेळ महाराजांच्या चेह-याकडे पाहत तेथेच बसलो.

तसे गडावर पाहण्यासारखं खुपकाही नाही पण एका बाजूला माझे लक्ष गेले तिकडे गर्दी कमी होती जवळ जवळ एखाद दुसरा सोडला तर कोणीच नव्हते.. गडाची तटबंदी. दिड-दिड फुटी सात-आठ पाय-या चढल्यावर मी तटबंदीवर उभा झालो आह ! प्रचंड सुंदर असे दृष्य समोर दिसत होते व मी थिजल्यासारखा समोर तोंड आ करुन पाहत होतो.. कोकणदरा !!!

मग मी झपाटल्यासारखा पुर्ण गडाची तटबंदी फिरलो. एकेजागी आत कोणी जाउ नये म्हणून जाळी लावली होती पण पुर्ण तटबंदी पाहण्याचा एक जुनून माझ्या अंगात संचारला होता त्यामुळे मी तटबंदीच्या उलट बाजूने (दरीकडून) तो अडथळा दुर केला वर एका नितांत सुदर जागी पोहचलो. आता ह्यापुढे काही शब्दांची गरज नसावीच. सर्वकाही हे फोटोच बोलतील.

* नेट स्पीड कमी आहे त्यामुळे फोटो थोडे छोटे करुन अपलोड केले आहे परत उद्या सगळे फोटो अपलोड करतो.

चंद्र हा नभात….

कवीमंडळींपासून शास्त्रज्ञांपर्यंत आणि लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच प्रिय असलेला आकाशीचा चंद्र आज, शनिवारी माघ पौर्णिमेचा मुहूर्त साधून पृथ्वीच्या अधिक जवळ येणार आहे. नेहमीच्या तुलनेत १५ टक्के मोठा आकार आणि ३० टक्के अधिक तेज असे त्याचे आजचे राजस रुपडे असेल. सामान्यत: चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ८४ हजार ८०० किमी अंतरावर फिरत असतो; आज तो पृथ्वीच्या अधिक निकट म्हणजे ३ लाख ५६ हजार ६३० किमीवर येऊन भ्रमंती करेल. त्यामुळे तो आकाराने मोठा व अधिक तेजस्वी दिसेल. विशेषत: रात्री आठ वाजता त्याचे रूप कमालीचे विलोभनीय असेल.

माहिती : महाराष्ट्र टाईम्स.
चित्र : फोटोबकेट

राजापुर गुंफा (पाचगणी)

पाचगणी च्या टेबल लॅंड वर मनसोक्त फिरून झाले होते, बाइक चालू करून परत खाली उतरू लागलो. पाचगणी बस स्टॅंड च्या बरोबर मागील बाजूस एक चौक आहे एक रस्ता टेबल लॅंड कडे जातो व एक राजापुराकडे व बाकीचे दोन्ही रस्ते मुख्य महाबळेश्वर रोडला मिळतात निमुळता गल्लीवजा तो रोड तेथेच चौकामध्ये एक हिरवट रंगाचा अक्षरे उडालेला सरकारी बोर्ड उभा आहे राजापुराच्या गुंफा. सकाळचे १०. ३० / ११ वाजले होते व अजून खूप वेळ आहे आपल्या जवळ असा मनात हिशोब चालू होता व तो बोर्ड मला सारखा सारखा खुणावतं होता. एकाला विचारले बाबा रे किती लांब आहे व पाहण्यासारखे आहे का काही तेथे? तर तो म्हणाला ५-६ किमी आहे काही गुंफा आहेत बाकी नाही कशाला जाता तिकडे कोणी जात पण नाही, ह्या सीझन मध्ये तर कोणी गेलेले मी पाहिलेच नाही तिकडे बघा तुमची इच्छा असेल तर जा. सुरवातीलाच असा निराशवादी सल्ला मिळेल असे वाटले नव्हते, मी परत महाबळेश्वर रोड कडे जाण्यासाठी वळलो पण मनात काही आले म्हणून जशी वळवली होती बाइक तशीच पुन्हा वळवून सरळ राजापूर रस्त्यावर चालू लागलो.

उतरणीचे, म्हणजे मी जो घाट पाचगणी ला येताना चढलो होतो त्याच्या अगदी उलट बाजूने मी (कोंकणाच्या दिशेने) घाट उतरत होतो. ५-६ किमी झाले पण गुंफा असतील असे एखादे ही ठिकाण नजरेस पडेना शेवटी एका गावात जाऊन बाइक थांबवली व त्यांना रस्ता विचारला. त्यांनी हा रस्ता सोडू नका असा सल्ला दिला व म्हणाले आहे थोडे अजून लांब. पण गाडी हळू चालवा कारण नवीन रस्त्याचे काम चालू आहे बारीक खडी टाकली आहे पूर्णं रस्त्यावर ब्रेक मारला जोरात तर सरळ घाटातून खाली जाल व कपाळमोक्ष ठरलेला. त्यांचा सल्ला मी महत्त्वाचा मानला व बाइकचा स्पीड ३०-४० येवढाच ठेवला व हळू हळू घाटवजा तो छोटा रस्ता मी खाली उतरू लागलो. त्या बारीक खडीमुळे एकदम खतरनाक असा रस्ता झाला आहे तेथे जरा ही निष्काळजीपणा दाखवला तर पडण्याचे चान्स जास्तच. १३-१४ किमी नंतर थोड्यावेळाने एका गावात मला भिंतीवर लिहिलेले नाव दिसले राजापूर ग्रामपंचायत आपले स्वागत करत आहे. हुश्श! पोहचलो एकदाचे.

गावातील एका तरुणाला गुंफाचा पत्ता विचारला त्याने समोरच असलेल्या घळीकडे बोट दाखवले व म्हणाला बाइक येथेच बाजूला उभी करून जा, पूर्णं निसरडा रस्ता आहे तेव्हा पाय ठेवताना जपून ठेवा व आधार घेत उतरा खाली. त्याने दिलेला सल्ला व बाइक उभी करायला जागा दिल्या बद्दल मी त्याचे आभार मानले व आपली बॅग पाठीवर सांभाळतं मी खाली उतरण्यासाठी सज्ज झालो.
आता कुठेतरी डोंगर-कपारीतून उतरावे लागेल आपण एकटेच आलो आहोत काही झाले तर, कुठेतरी पडलो तर? असे नकोसे वाटणारे काही विचार मनात आले पण आता येथे पर्यंत आलोच आहोत तर पाहून जाऊ गुंफा हा विचार करून मी त्या घळीकडे चालू लागलो, समोर पाहतो काय एकदम आश्चर्य, एकदम व्यवस्थित बांधकाम केलेल्या दगडी पायऱ्या, पूर्णं गुंफा पर्यंत जाण्यासाठी (स्थानिक ग्रामपंचायतीने ही सुविधा निर्माण केली आहे. ).

वरून पडणाऱ्या पाण्यामुळे व टपकत असलेल्या पहाडी झऱ्यामुळे सर्व जागा एकदम निसरडी झालेली आहे. तुम्ही एक ५०-६० पायऱ्या उतरलात की तुम्हाला समोर अप्रतिम सृष्टी-सौंदर्य नजरेस पडते ते खाली दरी कडे पाहताना. ह्या गुंफाबद्दल माहिती देणारा एखादा ही फलक तेथे नाही आहे ना गावातील लोकांना ह्या बद्दल काही माहिती कुठल्याश्यातरी साधूने ह्यावर कब्जा करून ठेवला होता ते निर्वाण प्राप्त झाले आता तेथे गावातील एक पुजारी सोडला तर कोणी येत जात नाही. खाली उतरल्यावर उजवीकडे गुंफा आहेत ऐकून सात गुंफा आहेत चार पूर्णं गुंफा तीन अर्धवट पूर्णं. तेथे तीन पाण्याचे कुंड आहेत, गुंफा मानव निर्मित आहेत व पुरातन आहेत ह्या बद्दल काही शंकाच नाही. प्रत्येक गुफेतून दुसऱ्या गुंफेत झोपून प्रवेश करता येईल अशी निमुळता खंदक वजा रस्ता आहे. शेवटची जी गुंफा आहे ती सर्वात मोठी असून त्यात पाण्याचे दोन कुंड आहेत तसेच गोमुख व विष्णू मंदिर देखील आहे. हे मंदिर इत्यादी आताच म्हणजे मागील शतकामध्ये अस्तित्वात आले असावे. पाण्याचे झरे, पुरातन काळातील मंदिराच्या स्तंभाचे, गोपुरांचे अवशेष इकडे तिकडे अस्तावस्त पडलेले आहेत. गुंफामध्ये काही भिंती शिल्पे पुजे साठी ठेवलेली आहेत, त्याना निरखून पाहताना लक्ष्यात येते की ते भिंती शिल्पे खूप जूनी असून व्यवस्थित निगा न राखल्या गेल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गुंफाच्या बाहेर एका छोट्या पुरातन मंडपामध्ये नंदी ची तीन फुट उंच मुर्ती आहे, गुंफामधील भींती शिल्पे व बाहेर असलेली भींती शिल्पे, नंदीची मुर्ती ह्या एकाच प्रकारच्या खडकातून निर्माण केलेले आहेत.

गुंफा पांडवकालीन असाव्यात असा एक कयास आहे, तेथे असलेली विष्णु मुर्ती व भींती शिल्पे त्याकडेच इशारा करतात की ह्या गुंफा पांडवकालीन असाव्यात, तीन्ही कुंडातील पाणी एकदम स्वच्छ आहे व पिण्यात अतीशय मधूर. वरील डोंगरातून पाझरत पाझरत आलेले पाणी देखील गुंफाच्या समोर पडत असते व गुंफाच्या समोर एक नैसर्गिंक पाण्याचा अस्पष्टसा पडदा निर्माण होतो हे दृष्य पाहण्या योग्य आहे. समोर दरी मध्ये प्रचंड झाली आहे व पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तेथे पाहवयास मिळतात जाण्यासाठी हा डिसेंबर-जानेवारी महिना योग्य आहे असे माझे व्यक्तीगत मत आहे.

फोटो अल्बमचा दुवा

************

************